View 13556 Cases Against State Bank Of India
View 13556 Cases Against State Bank Of India
View 24612 Cases Against Bank Of India
View 24612 Cases Against Bank Of India
Suhas Rangnath Morale filed a consumer case on 27 Jan 2015 against The Branch Manager State Bank of india in the Aurangabad Consumer Court. The case no is CC/14/358 and the judgment uploaded on 12 Mar 2015.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, औरंगाबाद
__________________________________________________________________________________________________________________________
ग्राहक तक्रार क्रमांक :-358/2014
तक्रार दाखल तारीख :-12/08/2014
निकाल तारीख :- 27/01/2015
__________________________________________________________________________________________________________________________
श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष
श्रीमती संध्या बारलिंगे,सदस्या श्री.के.आर.ठोले,सदस्य
__________________________________________________________________________________________________________________________ सुहास रंगनाथ मोराळे,
रा. मोराळे निवास, बालेपीर,
अमराई नगर रोड, बीड …….. तक्रारदार
विरुध्द
दि ब्रँच मॅनेजर,
स्टेट बँक ऑफ इंडिया,
एम.आय.टी.ब्रँच, औरंगाबाद ........ गैरअर्जदार
___________________________________________________
तक्रारदारातर्फे – अॅड. अविनाश डी. अघाव,
गैरअर्जदारातर्फे – अॅड
निकाल
(घोषित द्वारा – श्रीमती. संध्या बारलिंगे, सदस्या)
तक्रारदार यांनी कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार सदर तक्रार ग्राहक मंचामध्ये दाखल केली आहे.
तक्रारदाराने फ्लॅट विकत घेतला होता. त्याकरिता त्याने गैरअर्जदार बँकेकडून रु.22,92,000/- चे कर्ज घेतले होते. गैरअर्जदारानी दिलेल्या sanction letter नुसार, कर्जाच्या रकमेवरील व्याज पहिल्या वर्षाकरिता 8.5% p. a.( fixed), पुढील 2 वर्षाकरिता 9.5% दराने आणि 3 वर्षांनंतर floating rate नुसार आकारल्या जाईल, असे नमूद केलेले होते. परंतु गैरअर्जदारांनी कर्जाची रक्कम वितरित केलेल्या तारखेपासून 9% ते 9.5% ने व्याज आकारलेले आहे. तक्रारदाराने गैर अर्जदार बँकेकडे अनेक वेळा तक्रार केली परंतु गैरअर्जदाराने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तक्रारदाराने त्याच्याकडून वसूल केलेली अधिक व्याजाची रक्कम परत मिळावी, अशी मागणी केली आहे. तसेच नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
गैरअर्जदाराने मुदतीच्या आत लेखी जवाब दाखल केला नाही. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध नो-सेचा आदेश पारित करण्यात आला.
तक्रारदाराने त्याच्या कर्ज मंजुरीचे ARRANGEMENT LETTER मंचासमोर सादर केलेले आहे. त्यात तक्रारदारास रु.21,85,000/- चे कर्ज मंजूर केल्याचे नमूद आहे. कर्जावर आकारलेल्या interest विषयी पुढीलप्रमाणे विवरण दिलेले आहे:-
Rate
तक्रारदाराने त्याच्या कर्ज खात्याचे स्टेटमेंट दाखल केले आहे. त्याचे अवलोकन केल्यावर असे दिसून आले की, दि.16/7/11 रोजी त्याच्या खात्यात रु.21,85,000/- जमा झाले. दि.13/8/11 रोजी interest rate 10% ते 10.50% आकारल्याचे दिसून येत आहे. दि.11/2/12 रोजी तो rate 10.50% ते 10.50% एवढे आहे. दि.30/4//12 रोजी व्याजदर 10.50% ते 11.25% इतका आहे. यावरून असे दिसून येते की, गैरअर्जदाराने पहिल्या वर्षीपासून arrangement letter मध्ये निर्देशित केल्याप्रमाणे ठरलेले व्याजदर न आकारता floating rate नुसार व्याजदर आकारलेला आहे. अशा रीतीने सेवेमध्ये त्रुटी दिली आहे.
सुनावणीच्या दरम्यान गैरअर्जदाराने तडजोड पत्र सादर केले. त्यातील मजकूर पुढील प्रमाणे आहे:-
‘ With reference to your letter No. Nil dated 27/9/14 we enclose herewith the excess interest applied calculation sheet. You are therefore advised to debit your branch interest Account for Rs. 100151/- & credit the excess interest applied Rs. 100151/- to the above cited Account immediately under advise to Us.’
त्या पत्रासोबत तक्रारदाराच्या लोन अकाऊंट चे स्टेटमेंट दाखल केले आहे. त्यात दि.17/10/14 रोजी तक्रारदाराच्या कर्ज खात्यात रु.1,00,151/- जमा झाल्याचे दिसून येत आहे. तक्रारदाराने सदर रक्कम मान्य असल्याचे लेखी निवेदन दिले आहे.
गैरअर्जदाराने तक्रारदारकडून चुकीच्या पद्धतीने व्याजदर वसूल केल्याबद्दल तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे अनेक वेळा तक्रार केली होती. परंतु गैरअर्जदाराने सुरूवातीला तक्रारदाराच्या विनंतीस प्रतिसाद दिला नव्हता. गैरअर्जदार बँकेने उशीराने त्यांची चूक स्वीकारली आहे. तसेच अधिकची रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा केली आहे. परंतु तक्रारदारास दिलेल्या सेवेमधील त्रुटीकरिता तो नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे.
वरील कारणामुळे हा मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
(श्रीमती संध्या बारलिंगे) (श्री.किरण.आर.ठोले) (श्री.के.एन.तुंगार)
सदस्या सदस्य अध्यक्ष
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.