Maharashtra

Nagpur

CC/13/394

Dr. Mani Ram Saharan - Complainant(s)

Versus

The Branch Manager State Bank of India - Opp.Party(s)

24 Feb 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/13/394
 
1. Dr. Mani Ram Saharan
Scientist Quarter S-32, NEERI Colony, Nagpur-20
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. The Branch Manager State Bank of India
Surendra Nagar Branch (Branch Code 8239) 244, West High Court Road, Surendra Nagar, Nagpur 20
Nagpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  none PRESIDING MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ऍड. एस.एन. कुमार.
 
Dated : 24 Feb 2015
Final Order / Judgement

(मंचाचा निर्णय : श्री. मनोहर चिलबुले - अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये)

 

                          -//  आ दे श  //-

 

 (पारित दिनांकः 24/02/2015)

 

 

1.    तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 अन्‍वये दाखल केली असून, तक्रारकर्त्‍याची संक्षिप्‍त तक्रार अशी आहे की,

 

      तक्रारकर्ता डॉ मनि राम सहारण हे सेंट्रल इन्स्टिटयूट ऑफ मायनिंग ऍन्‍ड फयुअल रिसर्च, एमईसीएल कॉम्‍प्‍लेक्‍स, सेमिनरी हिल्‍स, नागपूर येथे सायंटिस्‍ट या पदावर कार्यरत असून नागपूर येथे निरा कॉलोनीत राहातात. त्‍यांचे विरुध्‍द पक्ष स्‍टेट बॅक ऑफ इंडिया, सुरेंद्र नगर शाखा नागपूर येथे सॅलरी सेव्हिंग खाते आहे. विरुध्‍द पक्षाने सदर सेव्हिंग खात्‍यावर तक्रारकर्त्‍यास इंटरनॅशनल डेबिट-कम-एटीएम कार्ड दिला आहे. तक्रारकर्ता ऑगष्‍ट- 1012 मध्‍ये डेहराडून येथे डेप्‍युटेशनवर गेले होते. त्‍यांनी एटीएम कार्डचा पासवर्ड कोणासही सांगितला नाही किंवा कधीही एटीएम कार्ड अन्‍यव्‍यक्‍तीकडे दिला नाही अथवा पैसे काढण्‍यासाठी कधीही कोलकाता येथे गेले नव्‍हते. मात्र सदर कार्डमध्‍ये पुरेशी सुरक्षा यंत्रना नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या बचत खात्‍यातून अज्ञात व्‍यक्तिने कोलकाता येथील एटीएम मधून दि. 13 आणि 14 ऑगष्‍ट 2012 रोजी खालीलप्रमाणे  रु. 63,400/- काढले आहेत.

 

Sr.No.

Date of Fraudulent

withdrawal

Mode of

withdrawal

Place of withdrawal

Amount

Involved

1

Aug 14, 2012

ATM , WDL.

ATM 4185 HAKURPUKUR, KOLKATA

Rs.8,400/-

2.

Aug 14, 2012

ATM , WDL.

ATM 4184 THAKURPUKUR, KOLKATA

Rs.15,000/-

3.

Aug 13, 2012

ATM , WDL.

ATM 5473 SBI ALIPOUR, RAMMOHA, KOLKATA

Rs.20,000/-

4.

Aug 13, 2012

ATM , WDL.

ATM 5471 SBI ALIPOUR, RAMMOHA, KOLKATA

Rs.20,000/-

 

 

 

TOTAL Rs.

Rs.63,400/-

 

सदर विड्रावलबाबत खातेदारास एसएमएस व्‍दारे सुचित करण्‍याची विरुध्‍द पक्षाची नेहमीची सर्वसाधारण पध्‍दत आहे परंतु सदर बनावट विड्रावल बाबत विरुध्‍द पक्षाकडून तक्रारकर्त्‍यास कधीही एसएमएस, ट्रॉन्‍झाक्‍शन अलर्ट किंवा फोन कॉल अथवा ई-मेल व्‍दारे सुचित करण्‍यांत आले नव्‍हते.

 

2.          तक्रारकर्त्‍यास दि. 16 ऑगष्‍ट 2012 रोजी सदर विड्रावलची माहिती झाली तेव्‍हा त्‍यांनी विरुध्‍द पक्षाला त्‍याबाबत ई-मेल, फोन आणि फॅक्‍स व्‍दारे ताबडतोब कळविले तसेच विरुध्‍द पक्ष बॅकेच्‍या डेहराडून शाखेस आणि डेहराडून पोलीस स्‍टेशनला देखिल कळविले. परंतु विरुध्‍द पक्षाने वरील प्रमाणे अज्ञान व्‍यक्तिने अनधिकृत विड्रॉल व्‍दारे एटीएम मधून काढलेल्‍या तक्रारकर्त्‍याच्‍या पैशाची भरपाई केलेली नाही, तक्रारकर्त्‍याने मागणी करुनही एटीएम विड्रावल व्हिडीओ फुटेज पुरविले नाही किंवा तक्रारकर्त्‍याने एटीएम कार्डच्‍या सुरक्षा उपाययोजनेचा भंग केल्‍याचे सिध्‍द करणारा कोणताही पुरावा दिलेला नाही.

 

3.          विड्रावलबाबत खातेदारास एसएमएस व्‍दारे सुचित करण्‍याची विरुध्‍द पक्षाची नेहमीची पध्‍दत आहे तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या आर्थीक नुकसानीस तसेच मानसिक त्रासासाठी विरुध्‍द पक्षाची सेवेतील न्‍युनता सकृतदर्शनी कारणीभूत आहे. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने खालील प्रमाणे मागणी केली आहे.

 

      1. तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यातून अज्ञात व्‍यक्तीने काढलेली रक्‍कम

   रु. 63,400/-  त्‍यावर आदेशाचे तारखेपर्यंत दंडव्‍याजासह देण्‍याचा

   विरुध्‍द पक्षाविरुध्‍द आदेश व्‍हावा. 

2. तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या मनस्‍तापाबाबत व त्रासाबाबत नुकसान भरपाई

   रु. 1,00,000/- देण्‍याचा विरुध्‍द पक्षाविरुध्‍द आदेश व्‍हावा.

3. तक्रारीचा खर्च रु. 10,000/- विरुध्‍द पक्षाकडून मिळावा.

 

 

4.          तक्रारीचे पुष्‍टयर्थ तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष व पोलिसांसोबत केलेल्‍या पत्रव्‍यवहाराच्‍या प्रती तसेच वृत्‍तपत्रात आलेल्‍या बातमीची प्रत दस्‍तावेज यादीसह दाखल केलेली आहे.

 

5.         विरुध्‍द पक्षाने लेखी जबाब दाखल करुन तक्रारीस तिव्र विरोध केला आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष बॅकेत सेव्हिंग खाते असून त्‍यांचे विनंतीवरुन  एटीएम कार्ड देण्‍यांत आल्‍याचे मान्‍य केले आहे. एटीएम कार्डचा वापर त्‍यासंबंधाने अटी व शर्तीचा अवलंब करुनच करावयाचा आहे. त्‍याबाबत महत्‍वाची सुचना आणि अट  खालील प्रमाणे

 

“Please remember that an unauthorized person can access the ATM service on cardholder’s  account  if he gains the card and PIN. The card, therefore should remain in card holder’spossession and should not be handed over to anyone else.

 

The card is issued on the condition that the Bank bears no liability for the unauthorised use of the card. This responsibility is fully of the cardholder.”

           

6.         विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे असे कि, तक्रारकर्त्‍याने एटीएम कार्डच्‍या सुरक्षेबाबबत पुरेशी काळजी न घेतल्‍यामुळे त्‍यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे अज्ञात व्‍यक्तिने सदर कार्ड व पिनचा गैरवापर करुन तक्रारकर्ता म्‍हणतो त्‍याप्रमाणे त्‍यांच्‍या खात्‍यातून कोलकाता येथील एटीएम मधून पैस काढले आहेत. एटीम कार्ड आणि पीन नंबर हया दोन्‍ही बाबी फक्‍त तक्रारकर्त्‍याच्‍याच ताब्‍यात आणि फक्‍त त्‍यांनाच माहित असल्‍यामुळे त्‍याचा इतरांनी दुरुपयोग केला असल्‍यास विरुध्‍द पक्ष बॅक त्‍यासाठी जबाबदार नाही. एटीएम कार्ड ग्राहकाला पोष्‍टाव्‍दारे सरळ पाठविला जाता आणि पीन नंबर बंद लिफाफ्यातून ग्राहकाला देण्‍यांत येतो आणि तो स्‍वतःच्‍या इच्‍छेप्रमाणे बदलविण्‍याची ग्राहकास मुभा असते. त्‍यामुळे बॅक अधिकारी अगर कर्मचा-यांना पीन नंबर माहित असण्‍याची शक्‍यता नाही व बॅकेकडून ग्राहकाच्‍या एटीएम वापरात कोणताही संबंध येत नाही. म्‍हणून विरुध्‍द पक्षाकडून सदर विड्रावल संबंधाने सेवेत कोणताही न्‍युनतापूर्ण व्‍यवहार घडलेला नसल्‍याने सदरची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे.

 

7.          विरुध्‍द पक्षाचा दुसरा आक्षेप असा कि, तक्रारकर्त्‍याच्‍या कथनाप्रमाणे अज्ञात व्‍यक्तिने  धोकेबाजी करुन (by fraud) कोलकाता येथील एटीएम मधून पैसे काढले असल्‍याने व ग्राहक तक्रारमंच अशा धोकेबाजीच्‍या प्रकरणांत निर्णय  करण्‍यास सक्षम नसल्‍यामुळे तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे.

 

8.         तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यातून अनधिकृत विड्रावल करण्‍यांत आले तेव्‍हा तक्रारकर्ता डेपुटेशनवर डेहराडून येथे होते व एटीएम कार्ड त्‍यांच्‍या कडेच होता आणि ते कोलकात्‍यास गेले नाही आणि एटीएमचा वापर केला नाही किंवा त्‍याबाबत  इतर व्‍यक्‍तीस सांगितले  नाही किंवा इतराकडे दिला नाही  इ. बाबी विरुध्‍द पक्षाने नाकबुल केलेल्‍या आहेत. तसेच तक्रारकर्त्‍यानी एटीएम कार्ड सुरक्षेबाबत सर्व बाबींचे काटेकोर पालन केले आहे आणि त्‍यांच्‍या खात्‍यातून अनधिकृतपणे अज्ञात इसमाने विड्रावल करुन रक्‍कम काढली त्‍यांस बॅकेच्‍या एटीएम कार्ड सुरक्षा प्रणालीतील तृटी कारणीभूत असल्‍याचे नाकबुल केले आहे. 

 

9.          विरुध्‍द पक्षाचे पुढे म्‍हणणे कि, ज्‍या ग्राहकाने  बॅकेकडे आपला मोबाईल नंबर रजिस्‍टर केला आहे त्‍या प्रत्‍येकास विड्रावलबाबत कॉम्‍पुटर प्रणालीव्‍दारे SMS व्‍दारे विड्रावलची माहिती आपोआप (Automatically) पाठविली जाते. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास अनधिकृत विड्रावल बाबत SMS व्‍दारे माहिती मिळाली नाही हे नाकबूल केले आहे. विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे असे कि, विड्रावल संबंधाने फोनकॉल किंवा ईमल व्‍दारे विड्रावलची माहिती पाठविण्‍याची बॅकेची पध्‍दत नाही. तक्रारकर्त्‍याने अ‍नधिकृत विड्रावल बाबत विरुध्‍द पक्षाला फोन आणि फॅक्‍सव्‍दारे माहिती दिल्‍याचे नाकबुल केले आहे. सदर अनधिकृत विड्रावलसाठी बॅकेच्‍या सुरक्षा उपाय योजनेतील कोणतीही उणिव कारणीभूत नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास तथाकथीत अनधिकृत विड्रावलच्‍या रक्‍कमेची प्रतीपुर्ती करण्‍याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. तथाकथीत विड्रावल हे विरुध्‍द पक्षाच्‍या सुरेंद्रनगर शाखेतून झाले नसल्‍याने त्‍याबाबत व्हिडीओ फुटेज विरुध्‍द पक्षाकडे उपलब्‍ध नाहीत. वरील कारणामुळे तक्रारकर्ता तक्रारीतील मागणीस पात्र नसल्‍याने तक्रार खारीज करण्‍याची विनंती  केली आहे.

 

 

10.        सदर प्रकरणाच्‍या निर्णयासाठी खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ आले, त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.

      मुद्दे                                             निष्‍कर्ष

 

1)  विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 3 ने सेवेत न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार

   केला आहे काय ?                                      नाही.

2)  तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यास पात्र आहे काय ?         नाही.

3)  अंतिम आदेश काय ?                                   तक्रार खारीज.

-कारणमिमांसा-

 

 

11.        मुद्दा क्र. 1  बाबत –   सदर प्रकरणात  तक्रारकर्ता डॉ. मनिराम सहारण यांचे विरुध्‍द पक्ष स्‍टेट बॅक ऑफ इंडिया, सुरेंद्र नगर शाखा नागपूर येथे सॅलरी सेव्हिंग खाते क्र.00000030448246964 आहे आणि  विरुध्‍द पक्षाने सदर सेव्हिंग खात्‍यावर  तक्रारकर्त्‍यास इंटरनॅशनल डेबिट-कम-एटीएम कार्ड दिला आहे याबाबत वाद नाही. तक्रारकर्त्‍याने सदर खात्‍याचा 1 एप्रिल 2012 ते 15 आगष्‍ट 2012 या कालावधीचा उतारा जोडला आहे.  तक्रारकर्ता ऑगष्‍ट 1012 मध्‍ये डेहराडून येथे डेप्‍युटेशनवर  होते हे त्‍यांनी दाखल केलेल्‍या विरुध्‍द पक्षाला दि.16.08.2012 रोजी लिहिलेल्‍या दस्‍त क्र. 1 या पत्रावरुन दिसून येते. सदर पत्रान्‍वये त्‍यांनी विरुध्‍द पक्ष बॅकेस देहरादूनवरुन कळविले कि, त्‍यांच्‍या खात्‍यातून कोलकाता येथून अज्ञात इसमाने रु. 73,400/- (रकमेची बेरीज रु. 63,400/- ऐवजी चुकीने 73,400/- नमुद आहे) काढल्‍याची त्‍यांचा नुकतीच माहिती मिळाली. यासाठी बॅकेच्‍या एटीएम प्रणालितील सुरक्षा यंत्रणेतील तृटी कारणीभूत आहेत. त्‍यांना विड्रावल बाबत कोणताही एसएमएस/ फोनकॉल किंवा मेल बॅकेकडून प्राप्‍त झालेला नाही. याबाबत चौकशी करावी आणि एटीएम व्हिडीओ फुटेज उपलब्‍ध करुन द्यावे आणि त्‍यांची एटीएम मधून काढलेली रक्‍कम त्‍यांच्‍या खात्‍यात जमा करावी. दस्‍त क्र. 2 वर त्‍याच संबंधाने ईमेलची प्रत दाखल केली आहे. याबाबत दि. 23 डिसेबर 2012 रोजी बिकानेर राजस्‍थान येथून विरुध्‍द पक्ष बॅकेस पाठविलेल्‍या स्‍मरणपत्राची प्रत देखिल तक्रारकर्त्‍याने दाखल केली आहे. दि.16.8.2012 रोजी पोलीस स्‍टेशन डेहराडून यांना दिलेल्‍या तक्रारीची प्रत, सदर पोलीस स्‍टेशनने कमिश्‍नर ऑफ पोलीस नागपूर यांना सदर तक्रार चौकशीसाठी पाठविली त्‍या पत्राची प्रत, तक्रारकर्त्‍याने पोलीस कमिश्‍नर नागपूर यांना त्‍याच्‍या तक्रारीसंबंधाने काय प्रगती झाली याची माहिती कळवावी म्‍हणून दि. 21.12.2012 रोजी लिहिलेल्‍या पत्राची प्रत इ. दस्‍तावेज दाखल केले आहेत.

12.         तक्रारकर्त्‍याकडून तक्रार प्राप्‍त झाल्‍यावर विरुध्‍द पक्ष बॅंकेने स्‍टेट बॅंक ऑफ इंडिया, अलिपूर बँच, कोलकाता यांना व्हिडिओ फुटेज उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत दि. 17.08.2012 रोजी लिहिलेल्‍या पत्राची प्रत, तक्रारकर्त्‍याने बॅकिंग ओम्‍बुडसमन, नवी दिल्‍ली यांचेकडे तक्रार दाखल केली होती त्‍यांनी सदर तक्रार त्‍यांच्‍या अधिकारक्षेत्रात नसल्‍याने बॅकिंग लोकपाल मुंबई यांच्‍याशी संपर्क करण्‍यास सुचविले त्‍या दि.27.09.2012 च्‍या पत्राची प्रत, बॅकिंग लोकपाल मुंबई कडून प्राप्‍त दि. 25.10.2012 चे पत्र  तसेच बॅकिंग ओम्‍बुडसमन, मुंबई यांचेकडून दि. 27.12.2012 चे पत्र इ. दस्‍तावेज  दाखल केले आहेत. बॅकिंग ओम्‍बुडसमन,मुंबई यांनी सदर पत्रात  तक्रारीवर निर्णय न घेण्‍यासाठी खालील कारणे नमुद केली आहेत.

 

“2. Since the disputed ATM transactions have been alleged to be fraudulent in nature by you we express our inability to intervene in the matter, as frauds and alleged frauds are not covered by Banking Ombudsman Scheme 2006,

 

3. SBI vide its aforesaid letter has dvised that the transactions have taken place by using Valid PIN/ATM Card and are binding on the customer.

 

4.Under the circumstances your complaint is treated as dealt with and closed, under clause 13(c) of BOS  2006, as the case is ‘requiring consideration of elaborate documentary and oral evidence and the proceedings before the Banking Ombudsman are not appropriate for adjudication of such complaint.”

 

तक्रारकर्त्‍याने आपल्‍या युक्तिवादात सांगितले कि, बॅकेने एटीएम कार्ड व्‍दारे कोणत्‍याही ठिकाणी पैसे काढण्‍याची सुविधा  उपलब्‍ध करुन दिल्‍यानंतर प्रत्‍यक्ष कार्ड व पिन नंबरचा वापर केल्‍याशिवाय कोणत्‍याही परिस्थितीत अन्‍य व्‍यक्तिस एटीम  मधून पैसे काढता येणार नाही अशी अभेद्य सुरक्षायंत्रना कार्यान्वित करणे हे विरुध्‍द पक्षबॅकेचे कर्तव्‍य आहे. सदरच्‍या प्रकरणात तक्रारकर्त्‍याचे खाते विरुध्‍द पक्षाच्‍या नागपूर शाखेत आहे ऑगष्‍ट 2012 मध्‍ये तक्रारकर्ता डेप्‍युटेशनवर डेहराडून येथे होते आणि त्‍यांनी कोणासही एटीएम कार्ड कधीही दिला नव्‍हता किंवा पीन नंबर देखिल सांगितला नव्‍हता अशा परिस्थितीत  तक्रारकर्त्‍याच्‍या  खात्‍यातून दि. 13.08.2012 आणि 14.08.2012  रोजी प्रत्‍यक्ष एटीएम कार्ड व पीन नंबरच्‍या वापराशिवाय अज्ञात व्‍यक्तिने कोलकाता येथील एटीएम मधून रु. 63,400/- काढले आणि तक्रारकर्त्‍याच्‍या रकमेचा अपहार केला ही विरुध्‍द पक्षाच्‍या सुरक्षा यंत्रनेतील तृटी असल्‍याने त्‍या रकमेची भरपाई करुन देण्‍याची जबाबदारी विरुध्‍द पक्ष बॅकेची आहे. मात्र वि.प.बॅकेने दिनांक 29.04.2013 रोजी तक्रारकर्त्‍यास पत्र देवून कळविले कि,

“Once the Debit Card and PIN is handed over to customer, it is the responsibility of the customer to keep the card safe and maintain secrecy of the password. The Bank is not responsible for any such action which might have facilitated an unknown miscreant to clone/duplicate the card and access the PIN thereby causing loss to the account holder.”

 

तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला संबंधीत एटीएम टॉन्‍झाक्‍शन चे व्हिडिओ फुटेजची मागणी केली परंतु ते देखिल विरुध्‍द पक्षाने उपलब्‍ध करुन दिले नाही. सदरची बाब ही सेवेतील न्‍युनता आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍या युक्तिवादाचे समर्थनार्थ एटीएम कार्ड फ्रॉड अॅन्‍ड सिक्‍युरिटी या विषयावर इंटननेट वरुन प्राप्‍त केलेली माहिती  तसेच अनेक प्रकरणांत जिल्‍हा ग्राहक मंचाने बॅकेला ग्राहकाच्‍या खात्‍यातून  एटीएम कार्ड फ्रॉड व्‍दारे काढलेल्‍या रकमांची भरपाई करुन देण्‍याबाबत दिलेल्‍या आदेशाबाबत विविध वृत्‍तपत्रातील बातम्‍या दाखल केलेल्‍या आहेत. त्‍यांतील कांही खालील प्रमाणे -

DECCAN  Chronicle  16th Nov 2012

After going through the case, the forum held that the SBI should pay Rajinikanth 2.82 lakh that was stolen from his account through the ATM withdrawals, together with six per cent interest and legal costs of Rs. 2,000.

 

INDIAN EXPRESS 13 Aug 2012

The District Consumer Forum recently ordered the State Bank of India to reimburse the fradulent debit from ATMs.

 

याशिवाय तक्रारकर्त्‍याने RBI Banking Ombudsman Annual  Reposr 2010-2011 , Exemplary Cases  चा दाखला दिलेला आहे. त्‍यांत हरवलेल्‍या एटीएम कार्डची बॅकेला माहिती देवूनही बॅकेने वेळीच कार्ड ब्‍लॉक न कल्‍यामुळे त्‍यानंतर झालेल्‍या विड्रावलसाठी बॅकेस जबाबदार धरुन तक्रारकर्त्‍यास अशा विड्रावलच्‍या रकमेची भपाई करण्‍याचे आदेश दिलेले आहेत.

 

13.         एटीम कार्डची माहिती चोरुन तयार केलेल्‍या 25 एटीएम कार्डव्‍दारे अज्ञात व्‍यक्‍तीने काढलेल्‍या रकमेबाबत नुकसान भरपाई देण्‍याचे आदेश बॅकेला देण्‍यांत आले. याबाबतची टिपणी खालील प्रमाणे -

“16.Fraudulent ATM withdrawals – Importance of video footage

            “A series of complaints were received against a few banks alleging unauthorized debits in complainants accounts as a result of fraudulent withdrawals through ATNs. Considering the volume, value, timing and modus operandi of disputed transactions, the bank was advised to preserve camera footage and submit all documentary evidences relating to these transactions. The vital evidence, which helped in taking a firm view, came through the camera recording provided by the bank. It  was observed in all the cases that, a suspicious looking person having covered his face was in possession of multiple cards and he had made withdrawals of Rs. 20,000/-in successive transactions, in the absence of SMS alert facility, he succeeded in withdrawing almost Rs.40,000/- every day using most of the cards till almost entire balance in the account was withdrawn or the accounts were blocked by the customer or bank. Video footage also revealed that the chose midnight or early morning hours for these operations which allowed him considerable time to be alone inside the ATMs. On one occasion he carried out almost40 transactions in a row using more than 25 cards. All the complainants had claimed that they had not parted with their cards and PIN details and were in possession thereof when actual withdrawals took place. Although the bank’s usual stand had been that the money cannot be withdrawn without compromising with the security of card and PIN details, in view of the overwhelming circumstantial evidence suggesting that the withdrawals from ATMs were of fraudulent nature, awards were issued in all cases and banks were advised to pay the complainants, amounts fraudulently withdrawn”.

 

 

14.          याउलट विरुध्‍द पक्षाच्‍या अधिवक्‍त्‍यांनी आपल्‍या युक्तिवादात सांगितले कि, बॅकेने ग्राहकाच्‍या मागणी प्रमाणे एटीएम कार्ड दिले आहे. सदर एटीएम कार्डचा वापर त्‍यासंबंधाने अटी व शर्तीचा अवलंब करुनच करावयाचा आहे. त्‍याबाबत महत्‍वाची सुचना आणि अट  खालील प्रमाणे -

 

“Please remember that an unauthorized person can access the ATM service on cardholder’s  account  if he gains the card and PIN. The card, therefore should remain in card holder’spossession and should not be handed over to anyone else.

 

The card is issued on the condition that the Bank bears no liability for the unauthorised use of the card. This responsibility is fully of the cardholder.”

           

तक्रारकर्त्‍याने एटीएम कार्डच्‍या सुरक्षेबाबबत पुरेशी काळजी न घेतल्‍यामुळे त्‍यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे अज्ञात व्‍यक्तिने सदर कार्ड व पिनचा गैरवापर करुन तक्रारकर्ता म्‍हणतो त्‍याप्रमाणे त्‍यांच्‍या खात्‍यातून कोलकाता येथील एटीएम मधून पैस काढले आहेत. एटीम कार्ड आणि पीन नंबर हया दोन्‍ही बाबी फक्‍त तक्रारकर्त्‍याच्‍या  ताब्‍यात आणि फक्‍त त्‍यांनाच माहित असल्‍यामुळे त्‍याचा इतरांनी दुरुपयोग केला असल्‍यास वि.प.बॅक त्‍यासाठी जबाबदार नाही. एटीएम कार्ड ग्राहकाला पोष्‍टाव्‍दारे सरळ पाठविला जातो आणि पीन नंबर बंद लिफाफ्यातून ग्राहकाला देण्‍यांत येतो आणि तो स्‍वतःच्‍या इच्‍छेप्रमाणे बदलविण्‍याची ग्राहकास मुभा असते. त्‍यामुळे बॅक अधिकारी अगर कर्मचा-यांना पीन नंबर माहित असण्‍याची शक्‍यता नाही व बॅकेकडून ग्राहकाच्‍या एटीएम वापरात कोणताही संबंध येत नाही. म्‍हणून वि.प.कडून सदर विड्रावल संबंधाने सेतेत कोणताही न्‍युनतापूर्ण व्‍यवहार घडलेला नसल्‍याने सदरची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. आपल्‍या युक्तिवादाच्‍या पुष्‍टयर्थ त्‍यांनी खालील न्‍यायनिर्णयाचा दाखल दिला आहे.

National Consumer Disputes Redressal Commission, Nwe Delhi.

Revisiojn Petition No. 3182 of 2008

(Against order dt. 30.05.2008 in Appeal No.366/2008 of the State Commission Delhi)

STATE BANK OF INDIA Vs. K.K.BHALLA

Pronounced on 7th April, 2011

सदर न्‍यायनिर्णयात  मा. राष्‍ट्रीय  आयोगाने खालील प्रमाणे अभिप्राय व्‍यक्‍त केला आहे.

 

            “It is not in dispute that the ATM card was issued to the Respondent and that he had kept the card in his safe custody. Thus, no one had access to it nor was it ever missing. Further, only the Respondent was aware of the special four digit PIN number which is essential to operate the ATM card. Despite all these facts, learned for a below ruled in favour of the Respondent only on the grounds that the CCTV footage which was required in respect of ATM transactions was not made available and this was a major lapse on the part of the Petitioner/Bank since it breached the security and safety in ATMs and was thus, clearly a deficiency in service.

            We are not convinced by this reasoning of either the District Forum or the State Commission, particularly, in view of the fact that merely because the CCTV was not working on those dates and its footage was thus not available, does not mean that the money could be withdrawn fraudulently without using the ATM card and the PIN number. In case the ATM card had been stolen or the PIN number had become known to persons other than ATM card holder then the CCTV coverage could have helped in identifying the persons who had fraudulently used the card. In the instant case it is not disputed that the ATM card or PIN remained in the self-custody/knowledge of the Respondent. In view of elaborate procedure evolved by the Petitioner/Bank to ensure that without the ATM Card and knowledge of the PIN number, it is not possible for money to be withdrawn by an unauthorized person from an ATM, we find it difficult to accept the Respondent’s contention. No doubt there have been cases of fraudulent withdrawals as stated by the State Commission but the circumstances of those cases may not be the same as in this case and in all probability, these fraudulent withdrawals occurred either because the ATM card or the PIN number tell in wrong hands.

            Keeping in view these facts, we have no option but to set aside the orders of the learned for a below and accept the revision petition which is allowed with no order as to costs.”

 

15.                  मंचासमोरील प्रकरणांत  बॅकेच्‍या कर्मचा-यांनी एटीएमबाबत गोपनिय माहिती अन्‍य व्‍यक्तिस उपलब्‍ध करुन दिली व त्‍यामुळे बॅकेच्‍या निष्‍काळजीपणामुळे अन्‍य व्‍यक्तिस तक्रारकर्त्‍याच्‍या  एटीएम कार्डचा गैरवापर करणे शक्‍य झाल्‍याचे तक्रारकर्त्‍याने तक्रारीत म्‍हटलेले नाही व तसा कोणताही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. मा. राष्‍ट्रीय आयोगाच्‍या वरील निर्णयाप्रमाणे तक्रारकर्त्‍याच्‍या चुकीच्‍या पध्‍दतीने एटीएम कार्ड हाताळण्‍यामुळे  जर इतर व्‍यक्तिने पिन कोड हॅक करुन त्‍याचा दुरुपयोग केला असेल तर त्‍यासाठी विरुध्‍द पक्ष बॅकेला जबाबदार धरता येणार नाही व तक्रारकर्त्‍याच्‍या झालेल्‍या नुकसानीस विरुध्‍द पक्ष बॅकेची सेवेतील त्रुटी कारणीभूत आहे असे अनुमान काढता येणार नाही. म्‍हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.

 

16.         मुद्दा क्र. 2 बाबतः- मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्षाप्रमाणे विरुध्‍द पक्षाकडून सेवेत कोणताही त्रुटीपूर्ण व्‍यवहार झाला नसल्‍याने, तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाविरुध्‍द मागणी केलेली दाद मिळण्‍यास पात्र नाही.

 

            वरील निष्‍कर्षास अनुसरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

                       

- // आदेश //-

 

1.    तक्रारकर्त्‍याचा ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 12 खालील तक्रार अर्ज खारीज       करण्‍यांत येत आहे.

2.    उभयपक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.

3.    आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्‍य देण्‍यांत यावी.

4.    प्रकरणाची फाईल तक्रारकर्त्‍यास परत करावी.

 

 

 

 

 

       (श्रीमती मंजुश्री खनके)                             (मनोहर चिलबुले)

             सदस्‍या                                       अध्‍यक्ष

 

 

 

 

 
 
[ none]
PRESIDING MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.