जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 32/2016 तक्रार नोंदणी दि. :- 31/5/2016
तक्रार निकाली दि. :- 21/12/2016
निकाल कालावधी :- 5 म.21 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- The State of Maharashtra,
Through Asst. Conservator of Forests, (Mobile),
Gadchiroli Forest Division, Gadchiroli,
Ta.& Dist. Gadchiroli.
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- (1) The Branch Manager.
National Co.op.Consumers Federation
of India Ltd.(NCCF)
H.No.318, P.K.Salve Road,
Near Parasher Hotel, Mohan Nagar,
Nagpur.
(2) Shri Sanjay S/o Kishanchand Valeja,
Age Not known, Occu. Business,
C/o M/S Unique Stationers, Tin Nala Chowk,
Bhandara Road, Itwari, Nagpur.
(3) M/s.Nitin Motors,
Through its Proprietor,
Shri Manohar Kushalchand Kachela,
Opp. Police Head Quarter,
Mul Road, Chandrapur (M.S.)
अर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री.व्हि.बी.गोरे
गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील :- अधि.श्री.एम.जे.केसवानी
गैरअर्जदार क्र.3 तर्फे :- गैरहजर
गणपूर्ती :- (1) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्यक्ष (प्र.)
(2) श्री सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य
- आ दे श -
(मंचाचे निर्णयान्वये, सादिक मो.झवेरी, सदस्य)
(पारीत दिनांक : 21 डिसेंबर 2016)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 18 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1.
महाराष्ट्र शासनातर्फे या विभागास मिळालेले अनुदान 60,00,000/- सन 2014-15 च्या अंदाजपत्रकानुसार प्राप्त झालेल्या अनुदानामधून या विभागासाठी ट्रॅक्टर, ट्राली इ. खरेदी करावयाचे होते व केले. उरलेल्या रकमेमधून एक नग Front End Loader व Backhoe आणि 2 नग Long Handlers called as Bull ext loader सदर साहित्य जंगलामध्ये मोठे लाकूड उचलणे व थप्पी लावण्यासाठी उपयोगी पडत असल्यामुळे सदरी साहित्य तात्काळ तत्वावर खरेदी करण्याचे ठरविण्यात आले. मुख्य वनसरंक्षक यांचे निर्देशानुसार या विभागाने गैरअर्जदार क्र.1 सोबत बैठक घेवून व निविदा घेवून तसे त्यांना साहित्याचा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले. आदेश क्र. Des-2(6)/Store/Gad/15-16/287 dtd. 18.4.2015. गैरअर्जदार क्र.1 हे मुख्य वनसंरक्षक यांचे कार्यालयात येऊन सदर आदेशाप्रमाणे संपुर्ण रक्कम 100 टक्के अग्रीम दयावे, तरच सदर आदेशातील साहित्य उपकरण देता येईल, असे कळविले असता व गैरअर्जदाराव्दारे साहित्य पुरवठयाचे आश्वासन दिल्यानंतर गैरअर्जदार क्र.1 ला संपुर्ण 100 टक्के अॅडव्हान्स पेमेंट देण्याचे ठरविले. इथे हे खास नमुद करण्यात येते की, अॅडव्हान्स पेमेंट देण्याआधी या विभागाचे आदेशातील सदर साहित्य हाताळणारे अधिकारी यांनी मुख्य वनसंरक्षक यांची विना परवानगीने सदर साहित्य प्राप्त झाल्याची नोंद डिलेव्हरी मेमो वर करुन दिली. या कृत्यासाठी त्या अधिका-याला चार्जशिट करण्यात आलेले आहे, हे विशेष.
तसेच, विभागीय व्यवस्थापक (नियोजन) यांनी सुध्दा मुख्य वनसंरक्षक याची परवानगी न घेता उपवनसंरक्षकांना पत्र देवून 100 टक्के 17,93,002/- पेमेंट देण्याचे कळविले व उपवनसंरक्षकांनी परस्पर पेमेंट केलेले आहे. त्यांनाही या कृत्यासाठी चार्जशिट करण्यात आलेले आहे.
गैरअर्जदार क्र.1 ने गैरअर्जदार क्र.3 ला सदर साहित्य पुरवठा करण्यासाठी रुपये 16,30,000/- चा आरटीजीएस व्दारे गैरअर्जदार क्र.3 ला युनिक स्टेशनरीच्या माध्यमातून करण्यात आला ही फर्म गैरअर्जदार क्र.1 च्या मालकीची आहे. त्यानंतर एका आठवडयानंतर गैरअर्जदार क्र.1 ला अर्जदाराव्दारे सदर साहित्य पुरवठा करण्याबाबत विचारण्यात आल्यास गैरअर्जदार क्र.1 हे या ना त्या कारणाने वेळ काढू लागले. गैरअर्जदार क्र.1 चे सदर व्यवहार बघून अर्जदाराने दिनाक 22.9.2015 ला पत्र पाठवून रक्कम परत करण्यास सांगितले. तसेच, गैरअर्जदार क्र.3 ला सुध्दा दिनांक 29.9.2015 ला पत्र देवून रक्कम परत करण्यास सांगितले. परंतु गैरअर्जदार क्र.1 ने कुठलीही प्रतिउत्तर दिले नाही. गैरअर्जदार क्र.3 ने आपल्या वकीलामार्फत पत्र पाठवून साहित्य पुरवठा करण्यासाठी किंवा दिलेली रक्कम परत करण्यासाठी 1 ते 1 ½ महिन्याचा वेळ मागितला.
अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 ला वारंवार साहित्य पुरवठा करण्यासाठी चर्चा केली, परंतु कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. नंतर गैरअर्जदार क्र.1 ने दिनांक 11.1.2016 ला रुपये 1,25,000/- उपवनसंरक्षक, गडचिरोली यांचे खात्यात जमा केले. त्यानंतर गैरअर्जदार क्र.1,2 व 3 ने कुठलेही उत्तर दिले नाही व साहित्य सुध्दा पुरवठा केलेला नाही.
अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक असून गैरअर्जदारांनी अर्जदारास न्युनतापुर्ण सेवा देवून अनुचित व्यापार पध्दती अवलंबिलेली आहे. अर्जदाराने आपल्या तक्रारीसोबत नि.क्र.5 नुसार एकूण 15 दस्तऐवज दाखल केलेले आहे.
अर्जदाराची तक्रार ही मुदतीत असून अर्जदाराने आपल्या प्रार्थनेमध्ये म्हटले आहे की,
- गैरअर्जदार क्र.1 ते 3 च्या विरुध्द तक्रार स्विकृत करावी.
- गैरअर्जदारांविरुध्द तक्रार मंजूर करुन रुपये 16,68,002/- 18 टक्के व्याजासह व रुपये 5,00,000/- मानसिक व शारिरीक त्रासापोटी तसेच रुपये 15,000/- तक्रारीचा खर्च असे एकूण रुपये 17,33,002/- अर्जदारास मिळण्याचे आदेश व्हावे.
अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आली.
गैरअर्जदार क्र.3 ला वारंवार संधी देवूनसुध्दा हजर न झाल्याने, गैरअर्जदार क्र.3 विरुध्द नि.क्र.1 वर प्रकरण एकतर्फी चालविण्याचे आदेश पारीत करण्यात आले.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने नि.क्र.20 व 21 नुसार आपले लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी आपल्या लेखी उत्तरात असे म्हटले आहे की, अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 18 मध्ये दाखल केलेली असून ती या मंचात चालु शकत नाही तसेच प्रथमदर्शी वाद/विरोध असा घेतला आहे की, अर्जदार हा कसा गैरअर्जदार क्र.1 व 2 चा ग्राहक आहे. अर्जदाराने कोणते व्यवहार झाले आहे ते पुर्णपणे न सांगता मोघम आरोप केलेले आहे. म्हणून सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदाराच्या तक्रारीतील केलेले कथन अमान्य करुन आपल्या विशेष कथनात असे म्हटले आहे की, गैरअर्जदार क्र.3 च्या चुकीमुळे गैरअर्जदार क्र.1 व 2 ला गृहीत धरता येत नाही. गैरअर्जदार क्र.3 ने साहित्याचा पुरवठा का केला नाही, ते त्यांनाच माहित असेल.
गैरअर्जदार क्र.1 व 2 ने असेही म्हटले आहे की, अर्जदाराने साहित्य मिळाल्याची पोचपावती बघितल्यानंतरच गैरअर्जदार क्र.3 ला रक्कम दिलेली आहे. यावरुनही गैरअर्जदार क्र.3 हा यासाठी जबाबदार आहे. गैरअर्जदार क्र.2 ने जेव्हा गैरअर्जदार क्र.3 ला साहित्याचा पुरवठयाबाबत विचारल्यास गैरअर्जदार क्र.3 ने गैरअर्जदार क्र.2 ला साहित्य पुरवठा न केल्यामुळे साहित्याच्या रकमेचा धनादेश क्र.000256 दिनांक 31.10.2015 एच.डी.एफ.सी. बँकेचा रुपये 8,00,000/- आणि धनादेश क्र. 000257 दिनांक 6.11.2015 एच.डी.एफ.सी. बँकेचा रुपये 8,30,000/- असे दोन धनादेश दिले व ते दोन्ही धनादेश “Fund insufficient” म्हणून परत आले व त्याबाबत गैरअर्जदार क्र.2 ने गैरअर्जदार क्र.3 च्या विरुध्द फौजदारी गुन्हा नागपूर येथील न्यायालयात दाखल सुध्दा केलेला आहे. एकंदरीत गैरअर्जदार क्र.1 व 2 चा प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 व 2 विरुध्द खोटी तक्रार दाखल केली असून सदर तक्रार गैरअर्जदार क्र.1 व 2 विरुध्द खर्चासह खारीज होण्यास पात्र आहे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने लेखी उत्तरासोबत कुठलेही दस्तऐवज दाखल केलेले नाही. अर्जदाराने नि.क्र.22 नुसार तक्रार हीच शपथपत्र समजण्यात यावे, अशी पुरशिस दाखल केली. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने नि.क्र.23 व 24 नुसार शपथपत्र दाखल केले.
अर्जदाराने नि.क्र.28 नुसार तक्रारीतील भाग हा अर्जदाराचे लेखी युक्तीवाद समजावे, अशी पुरशिस दाखल केली.
गैरअर्जदार क्र.1 व 2 ने नि.क्र.29 व 30 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले व नि.क्र.35 नुसार दस्तऐवज दाखल केले.
4. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेले लेखी बयान, तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले तोंडी व लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 ग्राहक आहे काय ? : होय
2) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.2 ग्राहक आहे काय ? : नाही
3) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.3 ग्राहक आहे काय ? : होय
4) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराप्रती सेवेत न्युनतापूर्ण : नाही
व्यवहार केला आहे काय ?
5) गैरअर्जदार क्र.3 ने अर्जदाराप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय
व्यवहार केला आहे काय ?
6) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 ला आदेश क्र.Des-2(6)/Store/Gad/15-16/287 Dtd. 18.4.2015 दिला असल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 चा ग्राहक आहे, असे दिसून येते. अर्जदाराने दाखल केलेले दस्तऐवज क्र. डी-1 नुसार तसेच सदर आदेश गैरअर्जदार क्र.2 विरुध्द नसल्यामुळे व अर्जदाराचा गैरअर्जदार क्र.2 सोबत कोणताही व्यवहार झाला नसल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार क्र.2 चा ग्राहक नाही, हे सिध्द होते.
अर्जदाराने दाखल केलेले दस्तऐवज नि.क्र.डी-10 व डी-12 वरुन असे दिसून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 ला दिलेले आदेशातील साहित्याचा पुरवठा गैरअर्जदार क्र.3 व्दारा करावयाचा होता व आहे म्हणून सदर दस्तऐवजावरुन सिध्द होते की, अर्जदार हा गैरअर्जदार क्र.3 चा ग्राहक आहे.
अर्जदाराने केलेली तक्रार तसेच सोबत दाखल केलेले दस्तऐवजावरुन असे दिसून येते की, गैरअर्जदार क्र.1 ही शासकीय यंत्रणा आहे (N.C.C.F. राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ मर्या.) ही संस्था केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या मंत्रालयाच्या अधीन असून या सहकारी संस्थेमार्फत शासकीय कार्यालयाकरीता लागणारे साहित्य खरेदी करता येते.
अर्जदाराने सुध्दा त्यांचे कार्यालयाचे उपयोगाकरीता लागणारे औजार, साहित्यासाठी गैरअर्जदार क्र.1 मार्फत गैरअर्जदार क्र.3 ला आदेश दिला असल्याचे अर्जदाराची तक्रार व दाखल दस्तऐवजावरुन दिसून येते.
अर्जदाराने आपल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, आम्ही गैरअर्जदार क्र.1 ला संपुर्ण रक्कम अग्रीम स्वरुपात दिलेले आहे. परंतु, अर्जदाराने दाखल केलेले दस्तऐवज क्र.डी-3 डिलेव्हरी मेमोवर दिनांक 29.4.2015 ला माल मिळाल्याची पोच आहे. यावरुन असे दिसून येते की, अर्जदारास औजार साहित्य मिळालेले आहे. परंतु, अर्जदाराने आपल्या तक्रारीत केलेले कथन की, सदर पोचपावती साठी जबाबदार असलेल्या अधिका-याला चार्जशिट करण्यात आलेली आहे. तसेच, अर्जदाराचा दस्तऐवज क्र.डी-10, डी-12 व डी-14 वरुन दिसून येते की, अर्जदारास सदर औजार साहित्य मिळालेले नाही व फक्त आगाऊ (Advance) पेमेंट करण्यासाठी सदर पोचपावती देण्यात आलेली आहे. एकंदरीत, अर्जदाराचे तक्रारीतील कथन व दाखल दस्तऐवजावरुन असे सिध्द होते की, अर्जदाराला औजार साहित्य पुरवठा करण्यात गैरअर्जदार क्र.3 तर्फे कसूर झालेला आहे. अर्जदार हा जर गैरअर्जदार क्र.1 ला आदेश करुन साहित्य पुरवठा करण्यास सांगितले असले तरी, गैरअर्जदार क्र.1 चा अर्जदार हा ग्राहक असला तरी, गैरअर्जदार क्र.1 ला सरळ (Direct) पुरवठादार नसून भारत सरकार अधीन सहकारी संस्था असून ती फक्त ग्राहक व पुरवठा करणारे कंपनीमध्ये सेतूचे काम करणारी सेवा संस्था आहे, असे दिसून येते. तसेच, अर्जदाराने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन व तक्रारीतील कथन यावरुन स्पष्ट होते की, अर्जदाराच्या खात्यातील अधिका-यांनी या खरेदी प्रकरणात कसूर केलेला आहे व त्याकरीता गैरअर्जदार क्र.1 ला जबाबदार धरता येत नाही. या संपुर्ण प्रकरणात गैरअर्जदार क्र.1 ने कोणतीही न्युनतापुर्ण सेवा दिलेली नाही व अनुचित व्यापार पध्दती अवलंबिलेली नाही, हे सिध्द होते.
अर्जदाराचे दस्तऐवज क्र.डी-10,डी-12,डी-13 व डी-14 गैरअर्जदार क्र.1 व 2 च्या वतीने दाखल दस्तऐवज वरुन सिध्द होते की, संपुर्ण प्रकरणात गैरअर्जदार क्र.3 तर्फे कसूर झाला असून गैरअर्जदार क्र.3 ने अर्जदारास न्युनतापुण्र सेवा देवून अनुचित व्यापार पध्दती अवलंबिलेली आहे व गैरअर्जदार क्र.3 ला नोटीस मिळून सुध्दा व पुरेसा वेळ देवून सुध्दा या मंचात हजर न झाल्यामुळे हे सिध्द होते की गैरअर्जदार क्र.3 हे या प्रकरणासाठी जबाबदार आहे.
एकंदरीत अर्जदाराचे खात्यातील अधिका-यांनी केलेल्या चुकांमुळे गैरअर्जदार क्र.1 व 2 ला जबाबदार धरता येत नाही व गैरअर्जदार क्र.3 ने गैरअर्जदार क्र.1 व 2 मार्फत रक्कम घेवूनसुध्दा अर्जदारास उपकरण साहित्य पुरवठा केलेला नाही व सदर रक्म सुध्दा परत केलेली नाही, हे अर्जदाराचे व गैरअर्जदार क्र.1 व्दारे दाखल दस्तऐवजावरुन सिध्द होते. म्हणून या न्यायमचाचे असे मत आहे की, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास कुठलीही न्युनतापुर्ण सेवा व अनुचित व्यापार पध्दती अवलंबिलेली नाही. गैरअर्जदारक्र.3 ने अर्जदारास अनुचित व्यापार पध्दती अवलंबून न्युनतापुर्ण सेवा दिलेली असल्यामुळे हे न्यायमंच
वरील विवेचनावरुन खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहेत.
- अंतिम आदेश –
(1)
(2)
रुपये 16,68,002/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह, आदेशाची प्रत
मिळाल्यापासून 45 दिवसांत द्यावे.
(3)
त्रासापोटी रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- आदेशाची
प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांत द्यावे.
(4)
(5)
गडचिरोली.
दिनांक – 21.10.2016.