Maharashtra

Nagpur

CC/598/2021

SMT. JAMILA BI SHEIKH PEER KHAN - Complainant(s)

Versus

THE BRANCH MANAGER, LIBERTY GENERAL INSURANCE LTD. - Opp.Party(s)

ADV. KANCHAN R. DHANDODE

23 Sep 2024

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/598/2021
( Date of Filing : 08 Oct 2021 )
 
1. SMT. JAMILA BI SHEIKH PEER KHAN
R/O. C/O. MOHOMMAD SAFI 1128J/649 HASANBAG KABIRISTAN SECOND LINE NAGPUR-440009
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE BRANCH MANAGER, LIBERTY GENERAL INSURANCE LTD.
OFF.AT, PLOT NO.1 & 2,3RD FLOOR, GUPTA HOUSE, RABINDRANATH TAGORE MARG CIVIL LINES NAGPUR-440010
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SACHIN Y. SHIMPI PRESIDENT
 HON'BLE MR. B.B. CHAUDHARI MEMBER
 
PRESENT:ADV. KANCHAN R. DHANDODE , Advocate for the Complainant 1
 
Dated : 23 Sep 2024
Final Order / Judgement

.आदेश

मा. सदस्यश्री. बाळकृष्ण चौधरी यांच्या आदेशान्‍वये-

 

  1.      तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्तीचा मयत मुलगा शेख सफी शेख पेरु याने विरुध्‍द पक्षाकडून  दि. 17.07.2019  ते 16.07.2020 या कालावधीकरिता “Commercial Vehicle package Policy – Passenger  Carrying package Policy liability only Policy with PA Cover owner- Driver” ऑटो क्र.MH-49-AR-8322 चा विमा पॉलिसी क्रं. 201340030519700061000000 विमामुल्‍य रक्‍कम रुपये 15,00,000/- करिता विमाकृत केली होती. तक्रारकर्तीचा मुलगा दि. 01.09.2019 रोजी त्‍याच्‍या मित्रा सोबत ऑटो क्र.MH-49-AR-8322 वाहन घेवून जात होते त्यावेळी त्या वाहनाचा अपघात झाला व त्यावेळी तक्रारकर्तीचा मुलगा याचा मित्र वाहन ऑटो क्र.MH-49-AR-8322 चालवीत होता व मयत शेख सफी हा मागे बसला होता. अपघात झाल्‍यामुळे त्‍याला ग्रामीण  हॉस्‍पीटल कळमेश्वर नागपूर येथे  उपचाराकरिता आणले असता त्‍याचा मृत्यू झाल्‍याचे जाहिर करण्‍यात आले.  तसेच दि. 01.09.2019 रोजी तक्रारकर्तीचा मुलगा त्‍याच्‍या मित्राने पोलिस स्टेशन कलमेश्वर नागपुर येथे FIR दिला व अपघाताबाबतची नोंद करण्‍यात आली होती.

 

  1.    तक्रारकर्तीने मयतची आई या नात्‍याने विमा दावा मिळण्‍याकरिता सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन विरुध्‍द पक्षाकडे विमा दावा प्रस्‍ताव दि 20.09.2019 रोजी दाखल केला असता विरुध्‍द पक्षाने कोणतेही योग्‍य कारण न सांगता विमा दावा मंजूर अथवा नामंजूर केल्‍याबाबत कळविले  नसल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाला नोटीस पाठवून सुध्‍दा  विमा दाव्‍याची रक्‍कम दिली नाही,  ही बाब दोषपूर्ण सेवा दर्शविते. म्‍हणून तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 15,00,000/- व्‍याजासह मिळण्‍याची,  तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्‍याची मागणी केली आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्ष हे नोटिस मिळाल्यावर आयोगात हजर झाले परंतु त्यांनी   आपला  लेखी जबाब विहित मुदतीत दाखल न केल्याने प्रकरण वि.प. यांचे विरुध्‍द बिना लेखी जबाब चालवण्याचा आदेश दि. 01.04.2024 रोजी करण्यात आला. 

 

  1.      तक्रारकर्तीने दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता  व  तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

         

  1. तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाचा  ग्राहक आहे काय ?                     होय
  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय?            होय.
  1. काय आदेश ?                                              अंतिम आदेशानुसार

 

निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1 2 बाबत – तक्रारकर्तीच्‍या मुलाने प्रिमियम रक्‍कम रु. 9062/- अदा करुन  विरुध्‍द पक्षाकडून ऑटो क्र.MH-49-AR-8322 चा  “Commercial Vehicle package Policy – Passenger  Carrying package Policy liability only Policy with PA Cover owner- Driver” रु 15,00,000/- ची  विमा पॉलिसी घेतली असल्‍याची तसेच विमा कालावधीमध्‍ये अपघात झाल्‍याची  बाब विवादित  नाही. परिणामी तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक असल्‍याची सिध्‍द होते. त्याच प्रमाणे तक्रारकर्तीने अभिलेखावर दाखल केलेले केस पेपर, FIR, आरसी बुक, इनक्वेस्ट पंचनामा, पी.एम. रिपोर्ट इत्यादि वरून मृतक हा ऑटो चा मालक होता व त्याचा अपघात झाल्याचे निष्पन्न होते.

 

  1.     तक्रारकर्तीच्‍या मुलाचा मृत्‍यु हा अपघात झाल्यामुळे झाला व त्या गाडीचा विमा वी.प. यांचे कडे उतरविला होता व तो त्या गाडीचा मालक होता ही बाब विवादित नसून पी.एम.रिपोर्टमध्‍ये मृत्यूचे कारण हे Severe liver damage / Injury मार लागल्याने झाल्याचे नमूद आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्ष यांनी कोणतेही कारण नसताना सुध्‍दा तक्रारकर्तीचा कायदेशीररित्‍या योग्‍य असलेला विमा दावा नाकारुन दोषपूर्ण सेवा दिली असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. म्हणून आम्ही खालील नमूद मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाचा आधार घेतला Hon’ble Supreme Court in latest judgment in case of ‘Ramkhiladi & Anr. Vs. The United India Insurance Company Limited,2020 ACJ 627’ by the Hon’ble Supreme Court of India, to the effect that the borrower of the vehicle steps in to the shoes of the owner and therefore, the borrower of the vehicle or his legal representatives are entitled for personal accident cover. Thus, Sh.Ankush Sharma (since deceased), the driver of the insured car in question steps into the shoes of the owner of the vehicle and as such entitled to get Personal Accident cover (P.A. Cover)due under the policy. Hence, the rejection of the claim lodged by the complainants, being the legal heirs of Sh.Ankush Sharma (deceased), amounts to deficiency in service. The complainants are held entitled to get the claim. सबब मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.

 

 

  1. मुद्दा क्रमांक 3 बाबत – मुद्दा क्रमांक 1 व 2 चा निष्‍कर्ष स्‍पष्‍ट करतो की, तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची  ग्राहक आहे व विरुध्‍द पक्षाने वर नमूद केल्‍याप्रमाणे दोषपूर्ण सेवा दिली आहे. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडून विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 15,00,000/- ची मागणी केली आहे. तक्रारकर्तीच्‍या मुलाला रक्‍कम रुपये 15,00,000 /-  चे विमा संरक्षण होते ही बाब पॉलिसीच्‍या कव्‍हर नोटवरुन देखील स्‍पष्‍ट होते. परिणामी तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाकडून रक्‍कम रुपये 15,00,000/- विमा दावा मागणी केल्याची  तारीख 20.09.2019 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहे. तसेच तक्रारकर्ती आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे मत आहे.

             सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला विमा दावा रक्‍कम रुपये 15,00,000/-  व त्‍यावर विमा दावा मागणी केल्याची तारीख 20.07.2021 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्तीला अदा करावी.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला झालेल्‍या आर्थिक, शारीरिक,  मानसिक त्रासाकरिता रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- अदा करावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसाच्‍या आंत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SACHIN Y. SHIMPI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. B.B. CHAUDHARI]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.