Maharashtra

Nagpur

CC/391/2018

SHRI. DEEPAK VASANTRAO MANDAVGADE - Complainant(s)

Versus

THE BRANCH MANAGER, BANK OF BARODA - Opp.Party(s)

ADV. RAVIKANT PANDE

04 Jun 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/391/2018
( Date of Filing : 25 May 2018 )
 
1. SHRI. DEEPAK VASANTRAO MANDAVGADE
R/O. C/O. SHRI. ADV. RAVIKANT PANDE, F-1, CHINNAB APARTMENT, PRASHANT NAGAR, AJANI, NAGPUR-15
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. THE BRANCH MANAGER, BANK OF BARODA
POST BOX NO. 310, WEST HIGH COURT ROAD, DHARAMPETH, NAGPUR-440010
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. RAVIKANT PANDE, Advocate for the Complainant 1
 Adv. Ramanipatro, Advocate for the Opp. Party 1
Dated : 04 Jun 2021
Final Order / Judgement

आदेश

 

मा. अध्‍यक्ष, श्री. संजय वा. पाटील यांच्‍या आदेशान्‍वये -

     तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत दाखल केली असून तक्रार खालीलप्रमाणे

  1.      तक्रारकर्ता हा पूर्वी इंडियन नेव्‍हीमध्‍ये नौकरीला होता आणि इंडियन नेव्‍हीमध्‍ये 20 वर्षे सेवा दिल्‍यानंतर 2010 मध्‍ये त्‍याने नागपूर येथे राहण्‍याचे ठरविले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष बॅंकेकडे बचत खाते क्रं. S.A/c/No. 04650100017275 उघडले. तसेच  एक मुदत ठेवीचे खाते हे त्‍याच्‍या आणि त्‍याची सासू लता प्रभाकर बर्डे यांच्‍या नांवाने उघडले. तक्रारकर्त्‍याची सासू ही वरिष्‍ठ नागरिक असल्‍यामुळे 0.5 टक्‍के जास्‍त व्‍याज मिळणार होते. त्‍यांचा मुदत ठेवीचा खाते क्रं. 04650300014990 असा असून त्‍यांनी मुदत ठेवीत रुपये 3,00,000/- गुंतविले. तक्रारकर्ता हा मुंबईला राहत असल्‍यामुळे सदरहू बॅंकेची कागदपत्रे त्‍याच्‍या पत्‍नीकडे दिलेली होती. परंतु तक्रारकर्ता आणि त्‍याच्‍या पत्‍नीमध्‍ये वाद निर्माण झाला आणि हिंदू वि‍वाह कायद्याप्रमाणे दोघांनी एकमेकां विरुध्‍द कोर्ट केसेस दाखल केल्‍या. काही दिवसानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष बॅंकेतील मुदत ठेवीच्‍या आणि बचत खात्‍यातील रक्‍कमेबाबत चौकशी केली तेव्‍हा त्‍याला असे समजले की, मुदत ठेवीचे खाते हे मुदती पूर्वी म्‍हणजेच दि. 12.08.2012 ला बंद करण्‍यात आले आणि नविन मुदत ठेवीचे खाते त्‍याची पत्‍नी सोनाली मांडवगडे आणि लता बर्डे यांच्‍या एकत्रित नांवाने उघडण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द  पक्ष बॅंकेने पूर्ण माहिती न दिल्‍यामुळे त्‍याने माहिती अधिकार कायद्या अंतर्गत विरुध्‍द पक्ष बॅंकेकडून माहिती मागितली. ती न दिल्‍यामुळे अपील दाखल केले आणि अपिलीय अधिका-यांनी सदरहू मुदत ठेवीच्‍या खात्‍याबाबतची सविस्‍तर माहिती देण्‍याचे आदेश दिले असतांना ही विरुध्‍द पक्षाने 30 दिवसाच्‍या आंत सदरहू माहिती तक्रारकर्त्‍याला दिली नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला पुन्‍हा दि. 19.03.2018 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. तरी ही  विरुध्‍द पक्ष बॅंकेने माहिती दिली नाही. तक्रारकर्त्‍याला सदरहू गुंतविलेल्‍या रक्‍कमेची आवश्‍यकता आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षावर सेवेत त्रुटी केल्‍याचा आरोप केला असून विरुध्‍द पक्षाने मुदत ठेवीची रक्‍कम न देऊन सेवेत त्रुटी केल्‍याचे नमूद केले आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मुदत ठेवीची रक्‍कम रुपये 3,00,000/-,  24 टक्‍के व्‍याजासह द्यावी अशी मागणी केलेली आहे. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 5,00,000/- आणि खर्चा पोटी रुपये 25,000/- ची मागणी केली आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने त्‍याचा लेखी जबाब नि.क्रं. 9 वर दाखल केला असून सदर तक्रार मुदतीत नसल्‍याचा आरोप केला. तसेच तक्रारकर्त्‍याने विलंब माफिसाठी अर्ज केलेला नाही आणि तक्रार दाखल करण्‍यास झालेला उशीर याबाबत स्‍पष्‍टीकरण दिलेले नाही. म्‍हणून सदरहू तक्रार या आयोगासमक्ष चालू शकत नाही. याकरिता विरुध्‍द पक्षाने कांदिमला विरुध्‍द नॅशनल इन्‍श्‍युरन्‍स कंपनी, ओरियन्‍टल इन्‍श्‍युरन्‍स कंपनी‍ विरुध्‍द एम.जे. खन्‍ना आणि बलिना विरुध्‍द न्‍यू इंडिया इन्‍श्‍युरन्‍स कंपनी आणि डी.गोपीनाथ पिलई विरुध्‍द स्‍टेट ऑफ केरळ आणि गुरुविंदर सिंग चिमा विरुध्‍द न्‍यू इंडिया इन्‍श्‍युरन्‍स कंपनी या न्‍यायनिवाडयांचा आधार घेतलेला आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, माहिती अधिकार कायद्याप्रमाणे तक्रारकर्त्‍याला वैकल्पिक सुविधा आहे आणि त्‍याचा त्‍यानी वापर केलेला नाही, तसेच तकारकर्त्‍याची सासू लता बर्डे यांना वर्तमान तक्रारीत आवश्‍यक पक्षकार केलेले नाही, म्‍हणून सदरची तक्रार चालू शकत नाही.  विरुध्‍द पक्षाने पुढे असे नमूद केले की, तक्रारकर्ता आणि त्‍याची सासूबाई यांनी मुदत ठेवीचे  एकत्रित खाते उघडून रुपये 3,00,000/- दि. 29.04.2010 ते 29.04.2011 या कालावधीकरिता रक्‍कम गुंतविलेली होती. सदरहू खाते हे  either or survivor या प्रकारचे होते. सदरहू मुदत ठेवीचा कालावधी संपल्‍यानंतर श्रीमती लता बर्डे ही बॅंकेकडे आली आणि परिपक्‍वता रक्‍कम तिच्‍या बचत खात्‍यामध्‍ये जमा करण्‍यात आली. लता बर्डे यांनी सदरहू रक्‍कम दि. 16.07.2012 पर्यंत गुंतविली व दि. 02.08.2012 रोजी लता बर्डे यांनी मुदत ठेवीचे खाते बंद करण्‍याची विनंती केली आणि सदरहू रक्‍कम तिच्‍या बचत खात्‍यामध्‍ये वळती करण्‍यात आली. त्‍यानंतर पुन्‍हा लता बर्डे आणि श्रीमती सोनाली दिपक मांडवगडे यांनी मुदत ठेवीच्‍या खात्‍यामध्‍ये सदरहू रक्‍कम गुंतविलेली आहे. तक्रारकर्त्‍याने तक्रारी मध्‍ये विरुध्‍द पक्षावर लावलेले आक्षेप  नाकारलेले आहे आणि तक्रार खारीज करण्‍याची विनंती केलेली आहे.

 

  1.      उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तावेज व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविलेला आहे.

 

   अ.क्रं.            मुद्दे                                                            उत्‍तर

1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय?      होय

  1.   प्रस्‍तुत तक्रार मुदतीमध्‍ये दाखल केलेली आहे काय ?   होय
  2.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?  होय
  3. काय आदेश ?                                                                  अंतिम आदेशानुसार

 

  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 -  आम्‍ही तक्रारकर्त्‍याचे वकील रविंद्र पांडे आणि विरुध्‍द पक्षाचे वकील श्रीमती रमनी पात्रो यांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी थोडक्‍यात असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्ता हा  हा भारतीय नवदल मध्‍ये 20 वर्षे सेवेला होते आणि त्‍यानंतर सेवानिवृत्‍त झाले आणि त्‍यांच्‍या निवृत्‍ती वेतनाचे फायदे असे मिळून रुपये 10 लाखा पेक्षा जास्‍त रक्‍कम मिळाली. तक्रारकर्त्‍याने त्‍यामधील रुपये 3 लाख विरुध्‍द पक्ष बॅंकेकडे त्‍यांच्‍या सासूबाई लता बर्डे आणि स्‍वतः अशा एकत्रित नावांने मुदत ठेवीत रक्‍कम गुंतविली आणि सदरहू मुदत ठेवीची रक्‍कम ही परिपक्‍व होण्‍याच्‍या पूर्वीच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची संमती न घेता लता बर्डे हिला दिली आणि सदरहू रक्‍कम पुन्‍हा लता बर्डे आणि तक्रारकर्त्‍याची पत्‍नी सोनाली मांडवगडे यांच्‍या नांवाने गुंतवणूक केली आणि सदरहू व्‍यवहाराबाबत तक्रारकर्त्‍याला काहीही कळविले नाही. तसेच तक्रारकर्त्‍याला सदरहू रक्‍कम मिळण्‍यापासून वंचित ठेवलेले आहे. अशा प्रकारे विरुध्‍द पक्षाने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारकर्त्‍याला शारीरिक, मानसिक त्रास व आर्थिक नुकसान केले आहे म्‍हणून प्रस्‍तुत तक्रार मंजूर करण्‍यात यावी.
  2.      विरुध्‍द पक्षाचे विद्यमान वकील यांनी थोडक्‍यात असा युक्तिवाद केला की, सदरहू रक्‍कम ही सन 2011 मध्‍ये गुंतविण्‍यात आली होती आणि वर्तमान तक्रार ही 2016 मध्‍ये दाखल करण्‍यात आलेली आहे, म्‍हणून प्रस्‍तुत तक्रार ही मुदतीत येत नाही. विरुध्‍द पक्षाच्‍या वकिलांनी पुढे असा युक्तिवाद केला की, सदरहू मुदत ठेवी मध्‍ये लता बर्डे यांचे ही नांव होते आणि लता बर्डे यांनी विरुध्‍द पक्ष बॅंकेकडे लेखी अर्ज करुन तक्रारकर्त्‍याचे नांव कमी करण्‍याची विनंती केली आणि तक्रारकर्त्‍याची पत्‍नी सोनाली मांडवगडे हिचे नांव समाविष्‍ट करण्‍याची विनंती केली. म्‍हणून विरुध्‍द पक्ष बॅंकेने सदरहू मुदत ठेव ही लता बर्डे आणि तक्रारकर्त्‍याची पत्‍नी सोनाली मांडवगडे यांच्‍या नांवाने पुढे चालू ठेवलेली आहे. विरुध्‍द पक्ष बॅंकेने तक्रारकर्त्‍याला कुठल्‍याही प्रकारची दोषपूर्ण सेवा दिलेली नाही व त्‍यांनी कोणत्‍याही प्रकारे अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही म्‍हणून वर्तमान तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी.

    

  1.        तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍द पक्षाच्‍या बॅंकेत बचत खाते  व तक्रारकर्त्‍याच्‍या आणि त्‍याच्‍या सासूबाई लता बर्डे यांच्‍या नांवाने संयुक्‍तीक मुदत ठेव बचत खाते असल्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍याने एकत्रित असलेल्‍या मुदत ठेवीच्‍या बचत खात्‍यात रुपये 3,00,000/- गुंतविलेले होते व त्‍याची परिपक्‍तवा तिथी ही दि. 29.04.2011 अशी होती आणि त्‍यानंतर सदरहू मुदत ठेवीची मुदत पुन्‍हा पुढे वाढविण्‍यात आली. सदरहू मुदत ठेवीच्‍या रक्‍कमेबाबत विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला कोणतीही माहिती दिली नाही आणि त्‍याकरिता तक्रारकर्त्‍याला माहितीच्‍या कायद्याचा आधार घ्‍यावा लागला. बॅंकेच्‍या अपिलीय अधिका-याने दि.14.02.2018 रोजी आदेश केल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याला सदरहू मुदत ठेवीच्‍या रक्‍कमेबाबत माहिती देण्‍यात आली. सदरहू मुदत ठेवीमध्‍ये तक्रारकर्त्‍याचे नांव असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला सदरहू रक्‍कम मिळण्‍याचा अथवा सदरहू रक्‍कम केवळ लता बर्डे हिला द्यावयाची असल्‍यास संमती देण्‍याचा अधिकार आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या अधिकारा पासून वंचित ठेवले आणि तक्रारकर्त्‍याला माहिती सुध्‍दा पु‍रविलेली नाही. म्‍हणून वर्तमान तक्रार दाखल करण्‍याचे कारण हे सतत घडत आहे. त्‍यामुळे वर्तमान तक्रार ही मुदतीत नाही असे म्‍हणता येणार नाही आणि याबाबत विरुध्‍द पक्षाने घेतलेला बचाव हा चुकिच्‍या आधारावर घेतलेला आहे आणि वर्तमान तक्रार दाखल करण्‍यास कोणत्‍याही प्रकारचा विलंब झालेला नसल्‍यामुळे विलंब माफिचा अर्ज करण्‍याची आवश्‍यकता नाही. म्‍हणून वर्तमान तक्रार ही मुदतीत आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
  2.      वर्तमान प्रकरणातील सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असता आणि विरुध्‍द पक्षाने नि.क्रं. 9 वर दाखल केलेल्‍या जबाबातील माहिती विचारार्थ घेता असे दिसून येते की, तक्रारकर्त्‍याला दि. 05.03.2010 रोजी ग्रॅज्‍युइटी, निवृत्‍ती वेतन याबाबत रुपये 10,03,801/- मिळाले होते, याबाबत तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे असलेल्‍या खाते उता-याची प्रत दाखल केलेली आहे. सदरहू रक्‍कम मिळाल्‍यानंतर दि. 28.04.2010 रोजी तक्रारकर्त्‍याने रुपये 3,00,000/- चेक नं. 765015 हा त्‍यांच्‍या सासूबाईच्‍या नांवाने विरुध्‍द पक्ष बॅंकेकडे देऊन मुदत ठेवीमध्‍ये दोघांच्‍याही नांवाने रक्‍कम गुंतविली ही बाब विरुध्‍द पक्ष यांनी त्‍यांच्‍या जबाबातील परिच्‍छेद क्रमांक 2.1 मध्‍ये मान्‍य केलेली आहे. विरुध्‍द पक्ष यांनी असेही मान्‍य केले की, सदरहू एकत्रित एफ.डी. चा प्रकार हा      ‘Either or Survivor’ अशा प्रकारचा होता. परिच्‍छेद क्रमांक 2.2 मध्‍ये विरुध्‍द पक्षाने मान्‍य केले की, दिनांक 02.08.2012 रोजी श्रीमती लता प्रभाकर बर्डे विरुध्‍द पक्ष बॅंकेकडे आली आणि सदरहू एफ.डी. बंद करण्‍यासाठी विनंती केली आणि ‘Either or Survivor’ असल्‍यामुळे सदरहू खाते बंद करण्‍यात आले आणि देय रक्‍कम तक्रारकर्ते आणि लता बर्डे यांनी दिलेल्‍या खात्‍यामध्‍ये जमा करण्‍यात आली. याबाबत तक्रारकर्ते यांनी सुध्‍दा दिनांक 13.11.2019  रोजी दाखल केलेल्‍या कागदपत्र क्रमांक 5 वरुन असे दिसून येते की, दिनांक 29/4/2010 रोजी गुंतवणूक केलेली रक्‍कम दिनांक 16/07/2012  रोजी रुपये 3,61,861/- एवढी झाली आणि त्‍यानंतर दिनांक 2/8/2012 रोजी काढून घेतल्‍याचे दिसून येते. विरुध्‍द पक्ष यांनी नमूद केल्‍याप्रमाणे सदरहू रक्‍कम ही दिनांक 2/8/2012 रोजी केलेल्‍या लता बर्डे  हिच्‍या अर्जाप्रमाणे तक्रारकर्ते यांचे नाव काढून लता बर्डे व श्रीमती सोनाली दिपक मांडवगडे यांचे नावाने गुंतवण्‍यात आली असल्‍याचे दिसून येते आणि तसे विरुध्‍द पक्ष बॅंकेने मान्‍य केलेले आहे. सदरहू गुंतवणूकीवर गुंतवणुकिच्‍या वेळेस देय असलेला व्‍याज दर हा 6.50 टक्‍के असा असल्‍याचे दिसून येते आणि सदरहू मुदत ठेवीचे खाते हे एकत्रित संयुक्‍तीक खाते असल्‍यामुळे दोन्‍ही खातेदारांच्‍या स्‍वाक्षरी घेणे आवश्‍यक होते. याबाबत तक्रारकर्त्‍याने रिझर्व बॅंक ऑफ इंडिया यांचे दि. 01 जुलै 2015 चे परिपत्रक क्रमांक RBI/2015-16/5, DCBR BPD (PCB) MC. No. 6/13.01.000/2015-16, Dated 1/7/2015, दाखल केलेले आहे आणि सदरहू परिपत्रकातील परिच्‍छेद क्रं. 5.1.1 हा खालीलप्रमाणे आहे.

5.1.1 Modes of Operations in joint accounts.

i) A copy of the letter No. LA.C/19-96-29, dated 28 August 1980 received from the IBA is given in the Annex I. Banks may consider the desirability of issuing suitable instructions to their branches for their information and necessary guidance on the subject.

ii) If fixed/term deposit accounts are opened with operating instructions ‘Either or Survivor’ the signatures of both the depositors need not be obtained for payment of the amount of the deposits on maturity. However, the signatures of both the depositors may have to be obtained, in case the deposit is to be paid before maturity. If the operating instruction is ‘Either or Survivor’ and one of the depositors expires before the maturity, no pre-payment of the fixed /term deposit may be allowed without the concurrence of the legal heirs of the deceased joint holder. This, however, would not stand in the way of making payment to the survivor on maturity.

     वरील परिपत्रकातील परिच्‍छेद 5.1.1 (i) व (ii) मधील निर्देशाप्रमाणे एकत्रित संयुक्‍तीक खात्‍यातील रक्‍कम मुदती पूर्वी द्यावयाची असल्‍यास  दोन्‍ही  खातेदारांची संमती घेणे आवश्‍यक आहे, अशा प्रकारच्‍या स्‍पष्‍ट सूचना रिझर्व बॅंकेने इतर सर्व बॅंकांना दिलेल्‍या आहेत,  असे असतांना ही विरुध्‍द पक्ष बॅंकेने तक्रारकर्त्‍याला सदरहू एकत्रित मुदत ठेवीच्‍या खात्‍यातील रक्‍कम एका व्‍यक्‍तीला देणे योग्‍य नाही. त्‍याचप्रकारे तक्रारकर्त्‍याचे नांव, त्‍याची संमती न घेता, मुदत ठेवीच्‍या खात्‍यामधून तक्रारकर्त्‍याचे नांव वगळणे हे गैरकायदेशीर आहे. विरुध्‍द पक्ष यांचे वकीलांनी असे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष बॅंकेने सदरहू रक्‍कम ही परिपक्‍वतेपूर्वी दिलेली नाही आणि म्‍हणून तक्रारकर्ते यांची संमती घेण्‍याची आवश्‍यकता नाही. परंतु सदरहू रक्‍कम ही परिपक्‍वतेपूर्वीच दिल्‍याचे विरुध्‍द पक्ष बॅंकेने दिनांक 14/02/2018 च्‍या पत्रामध्‍ये मान्‍य केलेले आहे. तसेच दिनांक 13/11/2019 रोजी तक्रारकर्ते यांनी सदरहू एफ.डी. ची प्रत कागदपत्र क्रमांक 2 वर दाखल केली आहे. सदरहू प्रत तक्रारकर्ते यांना अपीलीय अधिकारी यांच्‍या आदेशानंतर मिळालेली आहे. सबब तक्रारकर्ते आणि लता बर्डे यांनी गुंतवणूक केलेली एफ.डी. ही दिनांक 16/07/2013 रोजी परिपक्‍व होणार होती परंतु त्‍यापूर्वीच म्‍हणजे दिनांक 02/08/2012 रोजी लता बर्डे हिच्‍या अर्जावरुन विरुध्‍द पक्ष बॅंकेने नियमबाह्रय कृती करुन आणि तक्रारकर्ते यांची संमती न घेता, सदरची मुदत ठेव ही लता बर्डे आणि तक्रारकर्त्‍याची पत्‍नी सोनाली मांडवगडे यांच्‍या नांवाने ठेवली आणि ही विरुध्‍द पक्ष बॅंकेच्‍या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करणारी कृती असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते. वरील परिपत्रकात रिझर्व्‍ह बॅंकेने दिलेल्‍या निर्देशाप्रमाणे एफ.डी. परिपक्‍व झाल्‍यास दोन्‍ही खातेदारांची सही घेण्‍याची आवश्‍यकता नाही. म्‍हणून विरुध्‍द पक्ष बॅंकेने आज रोजी होल्‍डवर ठेवलेल्‍या खात्‍यामधील रक्‍कम तक्रारकर्ते यांना दिल्‍यास रिझर्व्‍ह बॅंकेच्‍या निर्देशाप्रमाणे अयोग्‍य कृती होणार नाही. विरुध्‍द पक्ष यांनी सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍यामुळे सदरहू त्रुटी दूर करण्‍याचा आदेश देण्‍याचा या आयोगाला अधिकार आहे आणि म्‍हणून विरुध्‍द पक्ष यांनी दिनांक 02/08/2012 रोजी मुळ एफ.डी. च्‍या बाबत केलेली कृती ही अयोग्‍य आहे आणि अनुचित व्‍यापारी प्रथांचा अवलंब करणारी आहे. अशा परिस्थितीमध्‍ये विरुध्‍द पक्ष यांनी लता बर्डे आणि सोनाली मांडवगडे यांना वर्तमान प्रकरणामध्‍ये पक्षकार केले नाही हा बचाव गैरकायदेशीर कृत्‍याचे समर्थन करणारा असल्‍यामुळे योग्‍य नाही. म्‍हणून तक्रारकर्ते हे नवीन नंबरने म्‍हणजे सावधि जमा क्रमांक 04650321320, धरमपेठ शाखा मध्‍ये गुंतवणूक केलेली रक्‍कम मिळण्‍यास कायदयाप्रमाणे आणि रिझर्व्‍ह बॅंकेच्‍या नियमाप्रमाणे मिळण्‍यास पात्र आहे असे आमचे मत आहे. विरुध्‍द पक्ष बॅंकेने सेवेमध्‍ये त्रुटी केली आणि अनुचित व्‍यापारी प्रथांचा अवलंब केला आणि त्‍यानंतरही तक्रारकर्ते यांना कित्‍येक वर्षे कागदपत्रे सुध्‍दा दिलेली नाही म्‍हणून तक्रारकर्ते हे शारीरिक, मा‍नसिक व आर्थिक नुकसानीबाबत रक्‍कम रुपये 30,000/- मिळण्‍यास पात्र आहे असे आमचे मत आहे.

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ते यांनी मुळ सावधि जमा क्रमांक 04650300014990  व नविन सावधि क्रमांक 04650321320, धरमपेठ शाखा मधील आदेशाच्‍या दिनांकाच्‍या दिवशी  देय असलेली रक्‍कम तक्रारकर्ते यांना आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत द्यावी आणि सदरहू देय रक्‍कम 30 दिवसाचे आत न दिल्‍यास सदरहू देय रकमेवर आदेशाचे दिनांकापासून रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.शा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये  30,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.
  4. विरुध्‍द पक्षाने उपरोक्‍त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आंत करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्र निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.