ग्राहक तक्रार क्रमांकः-316/2007 तक्रार दाखल दिनांकः-19/07/2007 निकाल तारीखः-06/09/2008 कालावधीः-01वर्ष01महिने17दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्री.एम.शनमुखन 37/1190,एम.एच.बी.कॉलनी, वर्तक नगर,ठाणे पश्चिम06 ...तक्रारकर्ता विरुध्द 1.दि ब्रँच मॅनेजर, कॅनरा बँक, गुरुवायूर ब्रँच, इस्ट नाडा, गुरुवायूर, त्रिसुर जिल्हा, केरळ राज्य. ...वि.प.1 2.दि ब्रँच मॅनेजर, कॅनरा बँक, वर्तकनगर ब्रँच, पी.ओ.जेकेग्राम, ठाणे पश्चिम 06 ... वि.प.2 3.श्री.एम.बी.एन.राव, चेअरमन/मॅनेजींग डायरेक्टर, कॅनरा बँक, 112, जे.सी. रोड, बंगलोर. 560 001 ... वि.प.3 गणपूर्तीः- 1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.श्री.पी.एन.शिरसाट, मा.सदस्य उपस्थितीः-तक्रारकर्त्यातर्फे वकीलः- पी.आर.राजकुमार विरुध्दपक्षातर्फे वकीलः-आर.एस.यादव 2/- आदेश (पारित दिनांक-06/09/2008) श्री.पी.एन.शिरसाट मा.सदस्य यांचेद्वारे आदेशः- तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सदर तक्रार दिनांक 29/07/2007 रोजी दाखल केली आहे त्याचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणेः- 1.तक्रारदाराचे बचत खाते क्रमांक 14037 असे असुन ते कॅनरा बँकेमध्ये प्रचलीत आहे व त्यांचा एटीएम खाते क्रमांक ऋणको कार्ड नंबर 4027901086014628 असा आहे. तक्रारदार हे त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने केरळ राज्यामधील गुरुवायुर मंदीरामध्ये भेटीसाठी गेले असता त्यांना पैश्याची आवश्यकता असल्यामुळे ते मंदीरातील आवारामध्ये बसविलेल्या एटीएमव्दारे रुपये 10,000/- काढण्यासाठी दिनांक 26/12/2006 रोजी गेलेअसता व पैसे काढण्याचा प्रयत्न केलाअसता त्याचा पैसे काढण्याचा व्यवहार व्यवस्थीत/यशस्वी न झाल्यामुळे तेथील नोकरीवर हजर असलेल्या इसमास विनंती केली की, त्यांना रुपये 10,000/-काढावयाचे आहेत. परंतु त्यांचा पैसे काढण्याचा व्यवहार यशस्वी झाला नाही. तेव्हा विरुध्द पक्षकाराचे कर्मचा-याने तक्रारदारास एकदमच रुपये 10,000/- काढता येणार नसल्याने त्यांनी रुपये 4,000/-, रुपये 4,000/- आणि रुपये 2,000/- असे तीन वेळा व्यवहार करुन रुपये 10,000/- कॅनरा बँकेमधून प्राप्त केले. तसेच पुन्हा पैश्याची आवश्यकता असल्यामुळे दिनांक 27/12/2006 रोजी रु.5,000/-अधिक रु.5000/- अधिक रु.5000/- असे 3/- एकूण रु.15,000/- काढले. परंतु त्याठिकाणी सदरचा व्यवहार केल्यानंतर जे अटोमेटीक अकाऊंट स्टेटमेंट येते ते पेपर रोल वरील एटीएम मशिनमध्ये नसल्यामुळे तक्रारदाराला कोणतेही लेखा विवरणपत्र मिळाले नाही. तदनंतर तक्रारदार हे त्यांचे ठाणे येथील घरी आल्यानंतर कॅनरा बँकेमध्ये ठाणे येथे चौकशी करण्यासाठी गेले असता त्याचे पासबुकामधील खात्यावर रुपये 5,000/- ज्यादा कापल्यामुळे, तक्रारदाराने तक्रार केली की, त्यांनी एटीएम खात्यामधून दि.26/12/2007 रोजी रुपये 4,000/- अधिक रु.4,000/-अधिक रु.2,000/- असे एकूण रुपये 10,000/-काढले व दिनांक 27/12/2007 रोजी रुपये 5,000/- अधिक रु.5,000/-अधिक रु.5,000/- असे एकुण रु.15,000/-काढले तेव्हा कोणतेही लेखी विवरणपत्र दिले नाही. परंतु ठाणे येथे आल्यानंतर त्यांच्या पासबुकमध्ये खालील प्रकारच्या नोंदी केल्या आहेत. पासबुकनुसार माहिती दिनांक रक्कम 26/12/2006 5000/- 26/12/2006 5,000/- 27/12/2006 4,000/- 27/12/2006 4,000/- 27/12/2006 5,000/- 27/12/2006 2,000/- 27/12/2006 5000/- 27/12/2006 5000/- 4/- 27/12/2006 5000/- उपमहाप्रबंधकाव्दारे सादर केलेली माहिती दिनांक वेळ रक्कम 26/12/2006 15.19.43 4000/- 26/12/2006 15.20.43 4000/- 26/12/2006 18.09.09 5000/- 26/12/2006 18.10.02 2000/- 27/12/2006 06.12.39 5000/- 27/12/2006 06.13.29 5000/- 27/12/2006 06.14.21 5000/- अशा प्रकारे विरुध्द पक्षकाराने तक्रारदाराचे रुपये 5,000/- जास्त कापले व त्यामुळे ते पैसे कापु नयेत कारण ते पैसे त्यांनी मेहनत करुन मिळविले आहेत. त्यामुळे रु.5,000/- जास्तीचे कापल्यामुळे तक्रारदाराचे समाधान विरुध्द पक्षकार करु शकले नाहीत. म्हणून त्यांच्या तक्रारीचे परिमार्जण करण्यासाठी त्यांनी विरुध्द पक्षकाराला दि.27/04/2007 रोजी वकीलामार्फत एक कायदेशीर नोटीस पाठवून त्यांच्या तक्रारीचे निवारण करावे अशी विनंती केली. परंतु ती अमान्य केल्यामुळे तक्रारदाराने सदरहु तक्रार या मंचात दाखल करुन खालील प्रकारची प्रार्थना केली. अ)तक्रारदाराने अनावश्यकपणे जे 5,000/-कापले ते परत मिळावेत.ब)मानसिक नुकसानीपोटी रु.10,000/-द्यावेत. क)रु.5,000/-वर 18 टक्के दराने व्याज देण्यात यावे. ड)या तक्रारीचा न्यायीक खर्च मिळावा. 5/- 2.वरील तक्रारीची नोटीस नि.5 वर विरुध्द पक्षकाराला मिळाली त्यानुसार त्यांनी त्यांचे वकीलपत्र नि.6 वर, लेखी जबाब नि.7 वर, प्रतिज्ञापत्र नि.8 वर व कागदपत्रे नि.9 वर सादर केले व तक्रारदाराने केलेली तक्रार नाकारली. व सादर केलेले लेखी विवरणपत्र संगणकप्रणाचे असल्यामुळे व त्यामध्ये मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे ख्ारे आहे व तक्रारदाराची तक्रार रद्दबातल ठरवावी असे निवेदन केले. तसेच उपरोक्त तक्रारीसंबंधी तक्रारदाराने नि.10 वर दिल्याप्रमाणे प्रतिउत्तर सादर करुन विरुध्द पक्षकाराने चुकीचे विवरणपत्र सादर केले असे प्रतिपादन केले. तसेच तक्रारदाराने त्यांचा लेखी युक्तीवाद नि.11 वर सादर केला व विरुध्द पक्षाने त्यांनी सादर केलेला लेखी जबाब हाच लेखी युक्तीवाद समजावा असे स्पष्ट संकेत दिल्यामुळे हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी ठेवण्यात आले. वरील तक्रारीसंबंधी खालील मुद्दे उपस्थित होतातः- अ)विरुध्द पक्षकाराने सेवेमध्ये न्युनता/त्रुटी/हलगर्जीपणा केला हे तक्रारदार सिध्द करु शकले काय.? उत्तर -होय ब)तक्रारदार मानसिक नुकसानीचा खर्च मिळण्यास पात्र आहे काय.? उत्तर -होय क)तक्रारदार न्यायीक खर्च मिळण्यास पात्र आहे काय.? उत्तर -होय. कारण मिमांसा स्पष्टीकरणाचा मुद्दा क्र.अः- या मुद्दयाचा विचार केलाअसता असे स्पष्ट होते की, तक्रारदार हे त्यांच्या मुलीच्या 6/- लग्ना प्रित्यर्थ केरळ येथे गुरुवायुर मंदीरामध्ये गेले व तेथे पैश्याची आवश्यकता असल्यामुळे व तेथे एटीएम फॅसीलीटी असल्यामुळे त्यांनी दोन वेळा 10,000/-काढण्याचा प्रयत्न केला परंतू तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यामुळे तेथे कार्यरत असलेल्या कर्मचा-यांची मदत घेतल्यानंतर कळले की येथे एकाच वेळेस रुपये 10,000/- मिळणार नाहीत. म्हणून त्यांनी रु.4,000/- अधिक रु.4,000/- अधिक रु.2,000/- असे काढावे त्यामुळे त्यांनी तसे पैसे काढले. परंतू कॉम्प्युटर जनरेटर स्टेटमेंट मिळाले नाही.कारण दिले पेपर रोल नाही.कॉम्प्युटर जनरेटर स्टेटमेंट दिले नाही आणि पेपर बील नाही हे दोन्हीही कारणांची सबब सांगणे म्हणजे सेवेमध्ये त्रुटी आणि न्युनता तसेच हलगर्जीपणा केला असे निर्विवादपणे सिध्द होते. तसेच विरुध्द पक्षाच्या म्हणण्यानुसार विचार केल्यास एकाच दिवशी फक्त तिन वेळाच व्यवहार करता येतो. त्याप्रमाणे विरुध्द पक्षकाराचे उप महाप्रबंधकाचे विवरणपत्रानुसार दिनांक 26/12/2006 रोजीचा व्यवहार हा 4 वेळा झालेला आहे व रुपये 5,000/- चा व्यवहार हा जास्तीचा दाखविला आहे व तो दुरुस्त करणे विरुध्द पक्षकाराचे कर्तव्य आहे. तक्रारदाराने रु.5,000/- चा व्यवहार दुरुस्त करण्यासाठी विरुध्द पक्षकाराला बरेच वेळा विनंती केली व त्यांची विनंती मान्य न केल्यामुळे वकीलामार्फत नोटीस पाठविली. वरील विषयाचा उहापोह केल्यास तक्रारदाराच्या तक्रारीमध्ये तथ्य आणि सत्य आहे असे सिध्द होते.त्यामुळे तक्रारदाराची मागणी रुपये 5,000/- व्यवहार दुरुस्त करण्याची रास्त आहे असे या 7/- मंचाचे म्हणणे आहे.या ठिकाणी असे नमूद करावेसे वाटते की, मा.सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे व भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रमाणित केलेल्या 10 परिमिताचा अवलंब करुन तक्रारदाराला व त्याच्या नातेवाईकाला पैसे जास्त वसुली करणे, जास्त व्याज आकारणी करणे, अनुचित व्यापारी प्रथांचा अवलंब करणे न्यायोचित, विधीयुक्त व कायदेशीर नाही. सबब तक्रारदाराची मागणी रुपये 5,000/- मान्य करणे या मंचास कायदेशीर वाटते. स्पष्टीकरण मुद्दा बः- या मु्द्दयाचा विचार केल्सास असे स्पष्ट होते की, तक्रारदार हा सेवामुक्त कर्मचारी आहे. वरील बँकेमध्ये त्याचे खाते आहे. आतापर्यंत कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे विरुध्द पक्षकाराने त्यांच्या तक्रारीचे समाधान न केल्यामुळे त्यांना बराच पत्रव्यवहार, कार्यालयात जाणे येणे तसेच वकीलामार्फत नोटीस पाठविणे यासाठी बराच मानसिक त्रास झाला त्या त्रासासाठी नुकसान भरपाई करणे विरुध्द पक्षाचे कर्तव्य आहे व त्यांनी सेवेमध्ये त्रुटी दाखविली नसती तर तक्रारदाराला मानसिक व शारिरीक त्रास झाला नसता. जाणुन बुजून विरुध्द पक्षकाराने तक्रारदाराला त्रास दिला त्या कारणास्तव रुपये 3,000/- मानसिक नुकसानीपोटी देणे न्यायोचित व विधीयुक्त व कायदेशीर होईल. स्पष्टीकरणाचा मुद्दा कः- तक्रारदाराच्या तक्रारीचे निराकरण विरुध्द पक्षाने न केल्यामुळे वकीलामार्फत नोटीस पाठवावी लागली व त्याचीही योग्य दखल न घेतल्यामुळे या मंचात तक्रार दाखल करावी लागली. त्यासाठी तक्रारदारास 8/- रु.2,000/- न्यायीक खर्च देणे विरुध्द पक्षकारास बंधनकारक आहे. सदरहू तक्रारीमध्ये या मंचाला तथ्य आणि सत्य आढळून आल्यामुळे खालील आदेश पारीत करण्यात येत आहे. आदेश 1.तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अशंतः मंजूर करण्यात आला आहे.
2.विरध्द पक्षकाराने संयुक्तीकरित्या किंवा एकत्रितरित्या रुपये 5,000/-(रुपये पाच हजार फक्त)तक्रारदारास द्यावे व त्या रकमेवर 9% द.सा.द.शे.तक्रार दाखल केल्या तारखेपासून व्याज द्यावे.
3.विरुध्द पक्षकाराने संयुक्तीकरित्या किंवा एकत्रितरित्या रुपये 3,000/-(रुपये तीन हजार फक्त) तक्रारदारास मानसिक नुकसान भरपाईपोटी द्यावे.
4.विरुध्द पक्षकाराने संयुक्तीकरित्या व एकत्रितरित्या रुपये 2,000/-(रुपये दोन हजार फक्त)हया तक्रारीचा न्यायीक खर्च तक्रारदारास द्यावा.
5.वरील हुकूमाची तामीली 30 दिवसाचे आत परस्पर (डायरेक्ट पेमेंट) करावी.
9/- 6.सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी.
7.तक्रारदार यांनी मा.सदस्य तक्रार दाखल केलेल्या दोन प्रती (फाईल)त्वरीत परत घेऊन जाव्यात.
दिनांकः-06/09/2008 ठिकाणः-ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट) (सौ.शशिकला श.पाटील ) सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|