जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 229/2008. प्रकरण दाखल तारीख - 25/06/2008 प्रकरण निकाल तारीख - 19/09/2008 समक्ष – मा.श्री.सतीश सामते - अध्यक्ष (प्र.) मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. अरविंद पि. मारोतीराव रायठक वय 40 वर्षे धंदा नौकर,. अर्जदार. रा. सहयोग नगर, नांदेड जि. नांदेड. विरुध्द. 1. सर व्यवस्थापक, दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लि. नांदेड मुख्य कार्यालय, भाग्यलक्ष्मी भवन, महावीर चौक, नांदेड. गैरअर्जदार 2. व्यवस्थापक, दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लि. नांदेड, शाखा पूर्णा रोड नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड. अभय व्ही. चौधरी गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.वी.पी.अंबेकर निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या ) गैरअर्जदाराने ञूटीची सेवा दिली या कारणावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदार हे गैरअर्जदार बँकेचे ग्राहक आहेत, त्यांनी गैरअर्जदार बँकेकडून रु.60,000/- कर्ज घेतले, त्यापैकी रु.55,000/- बँकेने त्यांना दिले, ते कर्ज पाच वर्षासाठी प्रतिमहा रु.1500/- फेडावयाचे होते. अर्जदार यांने मे व जूलै,2004 मध्ये थकीत भरणा रु.3000/- केला, ऑक्टोबर नोव्हेंबर 2004 तसेच जानेवारी 2005 या थकीत हप्त्याची परतफेउ दि.31.3.2005 रोजी रु.4500/- भरणा केले, एप्रिल मे व जूलै,2005 या मधील थकीत हप्त्याची परतफेउ दि.11.11.2006 व 12.12.2006 रोजी रु.4000/-भरणा केले. अशा प्रकारे अर्जदाराने थकीत हप्ते थकीत न राहू देता ते शक्य होईल तेवढे लवकर अदा केले. अर्जदार यांना दि.16.1.2008 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांची नोटीस मिळाली त्यात रु.24,049.76 पैसे बाकी असल्याचे सांगितले. याबाबत अर्जदाराने बँकेकडे विचारणा केली असता बँकेने ती रक्कम त्यांच्या अटी व नियमाप्रमाणे लावली आहे असे सांगितले. परंतु याबददल अर्जदाराचे समाधान झाले नाही. दि.6.5.2008 रोजी पर्यत गैरअर्जदार बँकेकडे एकूण 52 हप्त्याची परतफेडी द्वारे रु.78,000/- भरले आहेत व तसेच रु.5000/- जे सूरुवातीस मिळाले नाहीत ते मिळूण एकूण रुञ83,000/- ची परतफेड केली आहे. अर्जदाराला जे स्टेटमेंट दिलेले त्यामध्ये दि.10.3.2004 या महिन्यात रु.368/- हे कशामूळे लावण्यात आले तसेच दि.10.4.2004 रोजी रु.619/- हे देखील कशामुळे लावण्यात आले हया बाबत विचारण केली जे की हे अन्याय आहे. अर्जदार यांनी रु.78,000/- जमा केले आहे त्यामूळे गैरअर्जदारास रु.60,000/- मिळाल्याबददलचे बेबाकी प्रमाणपञ देण्यात यावे तसेच मानसिक व शारीरिक व आर्थिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- देण्यात यावे अशी मागणी अर्जदाराने केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले, त्यांनी आपला लेखी जवाब दाखल केला आहे, त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराने त्यांच्याकडून रु.60,000/- कर्ज घेतले व ते पाच वर्षात रु.1500/- प्रमाणे फेडावयाचे होते हे मान्य केले आहे. गैरअर्जदाराने कर्ज माण्गी अर्ज व मंजूरीपञ याची प्रत प्रकरणात दाखल केली आहे. अर्जदाराने कर्जाचे हप्ते वेळोवेळी भरले नाहीत, कर्जखाते क्र.75 व बचतखाते क्र.23/567 चा उतारा सोबत जोडला आहे. अर्जदाराला रु.5,000/- कमी दिलेले नाहीत, त्यांनी शेअर्स, नॉमिनल मेंबरशिप फिस व डाकूमेंटेशन फिसचा रोखीने भरणा न करता त्यापोटी दि.15.2.2004 रोजी रु.46462- ची वथिड्रावल स्पिल दिली व त्यातून शेअर्स, नॉमिनल मेंबरशिप फिस व कागदपञाचा खर्च आदीची वजावट जाता रु.1500/- अर्जदाराच्या कर्जखाती जमा करण्यात आलेले आहेत. ती स्लिपही दाखल केली आहे. अर्जदाराने उपस्थिती केलेल्या शंकेबाबत त्यानां खूलासा पञ दि.6.6.2008 रोजी दिले आहे ते सोबत जोडले आहे. अर्जदाराने एकूण रु.71,500/- जमा केलेले आहेत, रु.751/- जे दाखवलेले आहेत ती व्याजाची रक्कम आहे, अर्जदारास कर्जाचे नियम, बॅंकेचे पोटनियम माहीत असल्याबददल त्यांने लेखी लिहून दिलेले आहे. अर्जदाराने घेतलेले कर्ज रु.60,000/- व त्यावरील व्याज रु.28,907/- असे एकूण रु.88,907/- नांवे असून त्यापोटी रु.71,500/- चा भरणा केला आहे, दि.6.5.2008 अखेर अर्जदाराकडून रुञ17,407/- व त्यांच रोजी लागलेले व्याज रु.231/- असे एकूण रु.17,638/- बँकेस येणे बाकी आहे. त्यामूळे अर्जदाराने केलेली तक्रार खोटी असून कर्ज बूडविण्याच्या उददेशाने दाखल केलेली आहे. त्यामूळे बँकेने सेवेत कोणतीही सेवेत ञूटी केलेली नाही म्हणून तक्रार रु.10,000/- खर्चासह फेटाळण्यात यावी व अर्जदारास कर्जाची रक्कम व्याजासह भरण्याचे निर्देश दयावेत अशी मागणी केली आहे. अर्जदाराने पूरावा म्हणून स्वतःचे शपथपञ, तसेच हप्त्याच्या पावत्या, अर्जदारास दिलेले चालू स्टेटमेंट, नोटीस, इत्यादी कागदपञ दाखल केली आहेत. गैरअर्जदार यांनी श्री. मधूकर अनंतराव कूलकर्णी यांची साक्ष शपथपञाद्वारे नोंदविली, तसेच त्यांनी कर्ज अर्ज, कर्ज मजूरी पञ, कर्ज स्टेटमेंट, वीथड्रावल स्लीप, इत्यादी कागदपञ दाखल केली आहेत. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकूण खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात 2. काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 व 2 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार बँकेकडून कर्ज घेतलेले होते. व त्यांचा कर्ज खाते उतारा व त्या संबंधाने येणारी कागदपञ गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्यासोबत दाखल केलेले आहेत. अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक असल्याबाबतची वस्तूस्थिती गैरअर्जदार यांनी नाकारलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज त्यांनी दाखल केलेल कागदपञ व गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे त्यांनी दाखल केलेले कागदपञ यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार बँकेकडून रक्कम रु.60,000/- चे कर्ज घेतलेले होते पैकी गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना रु.55,000/- दिले. असे अर्जदार यांचे म्हणणे आहे. परंतु गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये नमूद केल्या प्रमाणे दि.15.02.2004 रोजी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना रक्कम रु.4,646/- ची वीथड्राल स्लीप दिलेली आहे. त्यातून शेअर्स, नॉमिनी मेंबरची फीस कागदपञाचा खर्च वजा जाता रक्कम रु.1500/- अर्जदाराचे कर्ज खाती जमा करण्यात आलेले आहेत. यांच्या पृष्टयर्थ गैरअर्जदार यांनी वीथड्राल स्लीप दाखल केलेली आहे. वास्तविक अर्जदार यांनी शेअर्स, नॉमिनी मेंबरशिप फिस कागदपञाचा खर्च यासाठी रोखीने भरणा केलेले नव्हते. त्यामूळे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचेकडून रक्कम रु.4646/- ची वीथड्राल स्लिप घेऊन त्यातून शेअर्स नॉमिनी मेंबरशिप फिस व कागदपञाचा खर्च केलेला दिसून येत आहे. व उरलेली रक्कम रु.1500/- अर्जदार यांचे कर्ज खात्यात जमा केल्याचे अर्जदार यांचे कर्ज खात्यावरुन दिसून येत आहे. याबाबत गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दि.6.6.2008 रोजी पञ पाठवून मूददेनिहाय कळविलेले आहे की, ही बाब गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दि.6.6.2008 रोजीच्या पञाचे अवलोकन केले असता स्पष्ट होत आहे. तसेच गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना आपणास शंका असतील तर आपण प्रत्यक्ष भेटून त्यांचे निरसण करुन घ्यावे असेही कळविण्यात आलेले आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार बँकेकडून रक्कम रु.60,000/- चे कर्ज घेतलेले आहे. सदरचे कर्जाची थकबाकी झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना नोटीस पाठवून थकीत कर्जाच्या रक्कमेची मागणी केलेली आहे. अर्जदार यांची रक्कम रु.4,646/- ची वीथड्राल स्लीप ही अर्जदार यांचे शेअर्स, नॉमिनी मेंबरशिप फिस व कागदपञाचा खर्च यासाठी गैरअर्जदार यांनी वापरलेली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दि.6.6.2008 रोजी पञ देऊन अर्जदार यांचे रक्कम रु.5,000/- या रक्कमेचे तपशील वार माहीती देऊन त्यांनी बँकेच्या नियमाप्रमाणे कर्जखात्यावर व्याज व दंडव्याजाची आकारणी केल्याचे कळविले आहे. व याबाबत काहीही गैरसमज असतील तर बँकेच्या मूख्य कार्यालयास भेटून त्यांचे निरसण करुन दयावे असेही कळविलेले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे कर्ज खात्याचा उतारा दाखल केलेला आहे. सदर कर्जखात्याचे अवलोकन केले असता अर्जदार यांना कर्ज थकीत रक्कमेची परतफेडीपोटी ज्या ज्या रक्कमा गैरअर्जदार बँकेकडे जमा केलेल्या आहेत त्यांची तपशीलवार माहीती सदरचे कर्जाच्या उता-यामध्ये नमूद आहे. माहे मे,2008 अखेर अर्जदाराच्या कर्जाची रक्कम थकीत असल्याचे दिसून येत आहे. वरील सर्व विवेचनाचा विचार होता, गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केली नसल्याचे स्पष्ट होत आहे. अर्जदार यांचा अर्ज शपथपञ, त्यांनी दाखल केलेले कागदपञ व त्यांचा लेखी यूक्तीवाद तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे व शपथपञ,गैरअर्जदार यांचे तर्फे तोंडी यूक्तीवाद करण्यात आला. यांचा विचार होता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपआपला सोसावा. 3. पक्षकाराना निकाल कळविण्यात यावा. श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते सदस्या अध्यक्ष (प्र.) जे. यु. पारवेकर लघूलेखक |