Maharashtra

Kolhapur

CC/19/690

Babaso Shivaji Patil - Complainant(s)

Versus

The Bajaj Alloanz Genral Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

D.L.Chechar

28 Sep 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/19/690
( Date of Filing : 01 Oct 2019 )
 
1. Babaso Shivaji Patil
At.Bhuyewadi, Tal Karvir, Dist.Kolhapur
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The Bajaj Alloanz Genral Insurance Co.Ltd.
D3,D4 2nd Floor, Royal Prestiges, Shahupuri, Kolhapur
Kolhapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 28 Sep 2022
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

(व्‍दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्‍या)

 

1.     तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे—

  

      तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 मार्फत म्‍हैस खरेदी केली होती.  सदर म्‍हैशीचा विमा वि.प.क्र.1 कंपनीकडे उतरविला होता.  त्‍याचा पॉलिसी क्र. OG/19/2005/5002/00001600 असा असून कालावधी दि. 13/02/2019 ते 12/02/2020 हा होता.  सदरची म्‍हैस ही दि. 22/08/2019 रोजी व्‍यायली व व्‍यायल्‍यानंतर ती आजारी पडली व तिची रेडकाची नाळ/वार पडली नसल्‍याने रक्‍तस्‍त्राव होत असल्‍याने गावातील जनावरांचे डॉक्‍टर श्री संदीप पाटील यांना दाखविली व त्‍यांचेकडून औषधोपचार चालू केला होता. परंतु सदरची म्‍हैस दि. 25/08/2019 रोजी मयत झाली.  मयत झालेनंतर सदर म्‍हैशीचे पोस्‍टमार्टेम करण्‍यात आले तसेच पंचनामा करण्‍यात आला व म्‍हैस भुये येथील गट नं.35 या शेतात पुरण्‍यात आली.  तदनंतर तक्रारदारांनी वि.प.क्र.1 यांचेकडे विमाक्‍लेमची मागणी केली असता वि.प यांनी दि. 09/09/2019 च्‍या पत्राने तक्रारदाराचा क्‍लेम नाकारला आहे.  वि.प. यांनी Broken Tag No claim असे कारण देवून तक्रारदाराचा क्‍लेम नाकारलाआहे.  परंतु मयत म्‍हैस ही टॅग मारलेली व विमा उतरविलेलीच म्‍हैस मयत झाली असून तिचे वर्णन पॉलिसीप्रमाणे आहे व तिच्‍या कानात वरील नंबरचा टॅग होता. विमा उतरविलेवेळीचे फोटो व पी.एम करतेवेळीचे फोटो पाहिले असता विमा उतरविलेलीच म्‍हैस मयत झाली हे सिध्‍द होते.  अशा प्रकारे वि.प. यांनी चुकीचे कारणास्‍तव विमा दावा नाकारुन तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली केली आहे.  सबब, विमाक्‍लेमपोटी रक्‍कम रु.75,000/- मिळावेत व सदर रकमेवर 18 टक्‍केप्रमाणे व्‍याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.10,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्‍हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. 

 

2.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत व्‍हॅल्‍यूएशन सर्टिफिकेट, पी.एम.रिपोर्ट, मयत दाखला, पंचनामा, विल्‍हेवाट दाखला, म्‍हैस खरेदीची पावती, मयत म्‍हैशीचे फोटो, पॉलिसी शेडयुल, क्‍लेम नाकारलेचे इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र, साक्षीदाराचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

3.    वि.प.क्र.1 यांनी याकामी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्‍हणणे दाखल करुन तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारली आहे.  वि.प. यांनी तक्रारदाराने उतरविलेली विमा पॉलिसी मान्‍य केली आहे.  पॉलिसीतील अटी व शर्तीप्रमाणे In case broken tag submitted due to any reason, claim not admissible.  5-6 dead animal photos compulsory animal and tag should get identified properly.

 

Special Condition No. 5 – Broken Tags will not be considered claim not payable in these conditions. No tag no claim.

 

तक्रारदाराने क्‍लेम दाखल केल्‍यानंतर असे दिसून आले की, तक्रारदाराने जमा केलेला टॅग तुटलेला होता व त्‍यामुळे वि.प. यांनी योग्‍य कारणास्‍तव तक्रारदाराचा क्‍लेम नाकारला आहे.  सबब, वि.. यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. सबब, तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्‍यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.

 

4.    वि.प.क्र.1 यांनी याकामी कागदयादीसोबत विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्ती, क्‍लेम फॉर्म, व तक्रारदाराने जमा केलेला टॅग दाखल केला आहे.  तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

5.    वि.प.क्र.2 व 3 यांना तक्रारअर्जाची नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत व त्‍यांनी आपले म्‍हणणे दाखल केले नाही.  सबब, वि.प.क्र.2 व 3 यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आला.

 

6.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.क्र.1 यांचे म्‍हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प.क्र.1 यांचे पुराव्‍याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?     

होय.

3

तक्रारदार हे विमा रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

4

तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

5

अंतिम आदेश काय ?

अंशतः मंजूर.

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र. 1

 

7.    वि.प.क्र.1 ही वित्‍तीय व्‍यवसाय करणारी विमा कंपनी असून वि.प.क्र.2 ही पतपुरवठा करणारी सरकारी बँक आहे. तक्रारदार यांनी वि.प. क्र.2 यांचेमार्फत कर्ज घेवून प्रस्‍तुतची म्‍हैस खरेदी केली होती. वि.प.क्र.3 ही दूध संकलन करुन पुरवठा करणारी दुग्‍ध  व्‍यावसायिक संस्‍था आहे. त्यांच्‍या म्‍हैशीचा विमा वि.प.क्र.1 कडे वि.प.क्र.2 व 3 यांचेमार्फत उतरविलेला असून तिचा पॉलिसी नं. OG/19/2005/5002/00001600 असा असून कालावधी दि. 13/02/2019 ते 12/02/2020 असा आहे. सदरची पॉलिसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.   सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.2

 

8.    तक्रारदार यांनी सदरची म्‍हैस ता. 2/2/19 रोजी ग्रामपंचायत, मौजे कोपार्डे, ता. करवीर येथून खरेदी केली हाती.  दि.22/8/19 रोजी सदरची म्‍हैस व्‍याली परंतु तिची रेडकाची नाळ/वार पडली नसल्‍याने रक्‍तस्‍त्राव होत असल्‍याने गावातील जनावरांचे डॉक्‍टर श्री संदीप पाटील यांना दाखविली व त्‍यांचेकडून औषधोपचार चालू केला होता. परंतु सदरची म्‍हैस दि. 25/08/2019 रोजी मयत झाली.  सदरची म्‍हैस मयत झाल्‍यानंतर वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून क्‍लेम फॉर्मची मागणी करुन क्‍लेम फॉर्म सोबत संबंधीत कागदपत्रे जोडून वि.प.क्र.1 यांनी ता.9/9/19 रोजी Broken Tag, No Claim या कारणास्‍तव तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला.  सबब, वि,प, यांनी सदर कारणाने तक्रारदारांचा क्‍लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ?  हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  सदर मुद्याचे अनुषंगाने वि.प. यांनी दाखल केले म्‍हणणेचे अवलोकन करता वि.प. यांनी तक्रारदारांचा क्‍लेम नाकारलेला आहे.  सदर पॉलिसी ही तक्रारदार व वि.प. यांचेमधील द्वीपक्षीय करार आहे व पॉलिसीमध्‍ये दोन्‍ही पक्षांच्‍या जबाबदा-या निश्चित केल्‍या आहेत.   कोणत्‍याही कारणास्‍तव तुटलेल्‍या टॅग जमा केल्‍यास क्‍लेम स्‍वीकारार्ह नाही, 5 ते 6 मयत जनावरांचे फोटो अनिवार्य आहे व त्‍यामध्‍ये टॅग स्‍पष्‍टपणे दिसणे आवश्‍यक आहे.  मृत्‍यूच्‍या क्‍लेमवेळी टॅग जमा करणे अनिवार्य आहे.  टॅग निघाल्‍यास त्‍वरित विमा कंपनीस कळविणे व रिटॅगींग करणे बंधनकारक आहे, टॅग तुटला असल्‍यास क्‍लेम स्‍वीकार्य नाही, टॅग नाही तर क्‍लेम नाही, असे विमाधारकास स्‍पष्‍ट सांगितले आहे.  सबब, तक्रारदाराने जमा केलेला टॅग तुटलेला होता, त्‍यामुळे वि.प. यांनी दि.9/9/21 च्‍या पत्राने तक्रारदाराचा क्‍लेम नाकारला आहे असे वि.प. यांनी म्‍हणणे दाखल केलेले आहे. प्रस्‍तुतकामी तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केले कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदाराने मयत जनावराचा दि.25/8/2020 रोजीचा पी.एम. रिपोर्ट दाखल केलेला आहे.  सदर पीएम रिपोर्टचे अवलोकन करता,

Switch of tail – Black, Horn-moderately curled, colour – black, cervix profruded or prolapsed from vaginal passage नमूद आहे.

Cause of death – might be due to hypovolumic shock

I confirm that I have personally conducted Post Mortem on the deceased animal  having description as mentioned above on 25/08/2019 at Bhuyewadi at 12.00 p.m. having tag No. 18C/90773 on right ear (Tag not intact) असे नमूद आहे.  तसेच अ.क्र.2 ला ता. 25/8/2019 चा पंचनामा व विल्‍हेवाट दाखला दाखल केलेला आहे.  सदर पंचनाम्‍याचे व दाखल्‍याचे अवलोकन करता म्‍हैशीचा रंग काळा शिंग रिंगवाली व शेपूट गोंडा पांढरा व तिच्‍या कानात बजाज अलियांझ कंपनीचा 90773 क्रमांकाचा बिल्‍ला असलेली वर्णनाची मयत म्हैस मयत होती असे पंचनाम्‍यात नमूद असून त्‍यावर पंचाची सही आहे.  तसेच विल्‍हेवाट दाखल्‍यामध्‍ये म्‍हैशीचा रंग काळा, शिंग रिंगवाली व शेपूट गोंडा पांढरा व तिच्‍या कानात बजाज अलियांझ कंपनीचा 90773 क्रमांकाचा बिल्‍ला असलेली वर्णनाची मयत म्हैस मयत गट नं.35 या ठिकाणी पुरण्‍यात आली असे नमूद असून त्‍यावर पोलिस पाटील यांचा शिक्‍का आहे.  प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी गोठयामध्‍ये म्‍हैस मयत झाल्‍यावेळचे तसेच पोस्‍ट मॉर्टेम करतेवेळचे फोटो दाखल केले आहेत. सदरचे फोटो व कागदपत्रे वि.प. यांनी नाकारलेली नाहीत.  प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारदारतर्फे बाजीराव भिकाजी देवकुळे यांचे पुरावा शपथपत्र दाखल केले आहे.  सदर पुरावा शपथपत्राचे अवलोकन करता,

मला सदर म्‍हैशीस फाडण्‍यासाठी जिल्‍हा परिषदेचे डॉक्‍टर आल्‍यामुळे त्‍यांनी मला भुयेवाडी येथे बोलावून घेतलेले होते.  त्‍याच्‍या सांगण्‍याप्रमाणे मी बाबासो शिवाजी पाटील यांची मयत म्‍हैस फाडली.  त्‍यानंतर सदर डॉक्‍टर व इन्‍शुरन्‍सचे अधिकारी यांनी मला मयत म्‍हैशीचा मानातील बिल्‍ला कापून काढण्‍यास सांगितले. त्‍यांच्‍या सांगण्‍याप्रमाणे मी मयत म्‍हैशीच्‍या कानातील बिल्‍ला कापून काढला. सदरचा बिल्‍ला बाबासो शिवाजी पाटील यांचे हाती डॉक्‍टर व इन्‍शुरन्‍सचे अधिकारी यांचे सांगणेप्रमाणे दिला.  त्‍यानंतर डॉक्‍टर व इन्‍शुरन्‍सचे अधिकारी यांनी बाबासो शिवाजी पाटील यांना असे सांगितले की, बिल्‍यास रक्‍त लागल्‍याने तो बिल्‍ला धुवून प्‍लॅस्‍टीक पिशवीत बंद करुन कंपनीस द्या, तरी सदरचा बिल्‍ला मी डॉक्‍टर व इन्‍शुरन्‍स कंपनीचे अधिकारी यांचे सांगणेप्रमाणे कापला आहे. 

 

9.    प्रस्‍तुतकामी वि.प. क्र.1 यांनी मयत म्‍हैशीचा टॅग दाखल केलेला आहे.  सदर टॅगचे अवलोकन करता त्‍यावर 18C/90773 हा नंबर नमूद आहे.  सबब, वरील सर्व कागदपत्रांचे पी.एम. रिपोर्ट, पंचनामा, विल्‍हेवाट दाखला, गोठयामधील मयत म्‍हैशीचे फोटो यांचे अवलोकन करता वादातील मयत म्‍हैशीचे वर्णन हे रंग काळा, शिंगे रिंगवाली, शेपूट गोंडा पांढरा असे असून तिच्‍या कानात बजाज अलियांझ कंपनीचा 90773 क्रमांकाचा बिल्‍ला असलेचे दिसून येते.  सबब, मयत झालेली म्‍हैस ही टॅग मारलेली व विमा उतरविलेली म्‍हैस मयत झाली असून तिचे वर्णन पॉलिसीप्रमाणे होते.  सदर म्‍हैशीच्‍या कानात सदर नंबरचा टॅग होता ही बाब तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या बाजीराव देवकुळे यांचे पुरावा शपथपत्रावरुन तसेच वि.प. यांनी दाखल केलेल्‍या टॅगवरुन सिध्‍द होते.  सबब, वि.प.क्र.1 यांनी पॉलिसीचा मूळ हेतू विचारात न घेता, तक्रारदाराच्‍या मयत जनावराचा विमा स्‍वीकारुन देखील चुकीच्‍या कारणास्‍तव तक्रारदाराचा क्‍लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.3    

 

10.   उपरोक्‍त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांचा विमा क्‍लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडून व्‍हॅल्‍यूएशन सर्टिफिकेट दाखल केले असून सदर व्‍हॅल्‍युएशन सर्टिफिकेटमध्‍ये मयत म्‍हैशीचे रु.75,000/- चे व्‍हॅल्‍यूएशन केलेचे दिसून येते.  सदरचे व्‍हॅल्‍युएशन सर्टिफिकेट वि.प. यांनी नाकारलेले नाही.  त्‍याकारणाने  तक्रारदार हे वि.प. क्र.1 यांचेकडून पॉलिसीप्रमाणे म्‍हैशीचा विमा रक्‍कम रु.75,000/- मिळणेस पात्र आहेत.  तसेच सदर रकमेवर म्‍हैस मयत झाले तारखेपासून म्‍हणजे दि.9/9/2019 पासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के प्रमाणे व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.3 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

 

मुद्दा क्र.4

 

11.   वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत.  सबब, मुद्दा क्र.3 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.5  -  सबब आदेश.

 

- आ दे श -

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो. 

 

  1. वि.प.क्र.1 विमा तक्रारदार यांना रक्‍कम रु.75,000/- अदा करावी व सदर रकमेवर म्‍हैस मयत झाले तारखेपासून म्‍हणजे दि.9/9/2019 पासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.9 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.

 

  1. वि.प. क्र.1 विमा कंपनी यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- अदा करावी. 

 

  1. वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. क्र.1 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

  1. विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींअन्‍वये वि.प. विरुध्‍द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

  1. आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 
 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.