रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक – 137/2008 निकालपत्र दि – 22/12/08
राधास्वामी प्लास्टीक उद्योग लि., रजि ऑफिस – अजंता अपार्टमेंट, 75, एस.बी. रोड, कुलाबा बस स्टेशन जवळ, मुंबई – 400005. फॅक्टरीचा पत्ता – मु.कासारवाडी, पो. सिध्देश्वर, ता. सुधागड, जि.रायगड. .... तक्रारदार
विरुध्द
1. सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ, मु.पाली, ता.सुधागड, जि. रायगड.
2. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ, पनवेल, ता. पनवेल, जि. रायगड. .... विरुध्दपक्ष उपस्थिती – मा.श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष मा.श्री.बी.एम.कानिटकर,सदस्य
- नि का ल प त्र -
द्वारा मा.सदस्य, श्री.कानिटकर तक्रारदार हे लघुउद्योजक असून त्यांची मु.कासारवाडी, ता.सुधागड, जि. रायगड येथे फॅक्टरी आहे. त्यांचा प्लास्टीक ग्रॅन्युअल्स बनविण्याचा व्यवसाय असून त्यांच्या लघुउद्योगाचा रजिस्टर्ड नंबर 111202060 हा आहे. 2. तक्रारदारांनी त्यांच्या फॅक्टरीसाठी 20 HP ची विद्युत जोडणी विरुध्दपक्षाकडून घेतली आहे. विद्युत भारनियमनामुळे त्यांच्या फॅक्टरीमध्ये अपेक्षित ते उत्पादन न झाल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी त्यांनी विरुध्दपक्षाचे विरुध्द सदर तक्रार दाखल केलेली आहे. ते विजेचा वापर हे व्यापारी हेतूने करीत आहेत असे त्यांच्या तक्रारीवरुन दिसून येते त्यामुळे तक्रारदारांना ते ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत ग्राहक म्हणून कसे येतात याबाबत खुलासा करण्यासाठी दि. 5/12/08 रोजी मंचाने नोटीस जारी केली. तसेच दि. 19/12/08 रोजी सदर प्रकरण नेमण्यात आले होते. दि. 19/12/08 रोजी तक्रारदार स्वतः हजर होते त्यांनी आपले म्हणणे योग्य त-हेने दिले नाही म्हणून त्यांना पुनहा एकदा मंचाने मुदत देऊन प्रकरण दि. 22/1//08 रोजी नेमण्यात आले. 3. तक्रारदार हे 22/12/08 रोजी हजर राहिले त्यांनी त्यांचा कोणताही खुलासा संधी देऊनही केला नाही व पुन्हा अर्ज देऊन मुदत मागितली. मंचाचे मते त्यांना योग्य संधी दिलेली असूनही त्यांनी आपले म्हणणे योग्य त-हेने सादर केलेले नाही. कागदपत्रांवरुन ते वीजेचा वापर व्यापारी हेतूने करीत असल्याने ही तक्रार मंचाला दाखल करुन घेता येणार नाही कारण ते ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार ग्राहक होत नाहीत म्हणून ही तक्रार निकाली काढण्यात येते. या आदेशाची प्रत तक्रारदारांना पाठविण्यात यावी. दिनांक – 22/12/08 ठिकाण – रायगड – अलिबाग.
(बी.एम.कानिटकर) (आर.डी.म्हेत्रस) सदस्य अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Post vacant ......................Shri B.M.Kanitkar | |