Maharashtra

Ahmednagar

CC/14/22

Mr.Suresh Gajanan Kulthe,Through his Son-Mr.Dyneshwar Suresh Kulthe - Complainant(s)

Versus

The Assistant Engineer,Maharashtra State Distribution Co.Ltd - Opp.Party(s)

Asawa

03 May 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/14/22
( Date of Filing : 06 Jan 2014 )
 
1. Mr.Suresh Gajanan Kulthe,Through his Son-Mr.Dyneshwar Suresh Kulthe
A/P Belapur Tal Shrirampur,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The Assistant Engineer,Maharashtra State Distribution Co.Ltd
Shrirampur Division,A/p & Taluka Shrirampur,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Asawa, Advocate
For the Opp. Party: Kakani, Advocate
Dated : 03 May 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्‍यक्ष)

1.   तक्रारकर्ता यांनी सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्‍वये दाखल केली आहे.

2.   तक्रारकर्ताने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ताने सामनेवाला कडून विज पुरवठा घेतलेला आहे. तक्रारकर्ताने पुढे असे कथन केले आहे की, तक्रारकर्ता हे सामनेवालाकडून सरासरी 35 युनिट विज पुरवठयाचे देयक जानेवारी 2013 पर्यंतचे भरणा सतत करीत आहेत. तक्रारकर्ताने पुढे असे कथन केले आहे की, दिनांक 27.01.2013 ते 26.02.2013 चे काळात तक्रारकर्ताला 203 युनिट विज वापराचे देयक देण्‍यात आले. त्‍यानंतर 122 युनिट विज देयक तक्रारकर्ताला देण्‍यात आले. देयकामध्‍ये रिडींग उपलब्‍ध नाही असा शेरा मारला आहे. म्‍हणून तक्रारकर्ताने सामनेवालाकडे तक्रार केली. सामनेवालाने तक्रारकर्ताला सुचविले व सदर देयकाची रक्‍कम भरुन घ्‍या, पुढील देयकामध्‍ये भरलेली रक्‍कम समाविष्‍ट करुन योग्‍य बिल / देयक तक्रारकर्ताला देण्‍यात येईल असे सांगितले. तक्रारकर्ताने सामनेवालाकडे मिटर संदर्भात तक्रार दाखल करुनसुध्‍दा सामनेवालाने त्‍यावर योग्‍य ती कारवाई केली नाही. जानेवारी 2013 मध्‍ये तक्रारकर्ताचे मिटर बदलण्‍यात आले. मिटर बदलल्‍यानंतरसुध्‍दा तक्रारकर्ताला जास्‍त रकमेचे विज वापराचे देयक येत आहे. सामनेवालाने तक्रारकर्ता यांना दिनांक 25.06.2013 व 25.07.2013 चे हस्‍तलिखीत 63,520/- रुपयाचे देयक तक्रारकर्ता यांना दिले. त्‍यात 100 युनिट विज वापर दर्शवून त्‍यावर आर.एन.ए (रिडींग उपलब्‍ध नाही) असा शेरा मारुन दिला. सामनेवालाने तक्रारर्ताला सतत सरासरी विज वापराचे देयक देत आहे. व अचानकपणे जास्‍त रकमेचे देयक पाठवून तक्रारकर्ताला मानसिक व शारीरीक त्रास देत आहे. दिनांक 25.06.2013 ते 25.11.2013 पर्यंत तक्रारकर्ताला 74,880/- रुपयाचे देयक देण्‍यात आले. तक्रारकर्ताने त्‍या संदर्भात सामनेवालाला वारंवार सुचना देऊन व नोटीस पाठवूनही त्‍यावर कोणतीही दखल घेतलेली नाही. सामनेवालने कलम 56 (1) विद्युत कायदा 2003 प्रमाणे तक्रारकर्ताची विज खंडीत करण्‍याबाबत दिनांक 20.11.2013 रोजी नोटीस पाठविली. तक्रारकर्ताचे तक्रारीवर सामनेवालाने कोणतीही कारवाई केलेली नाही. जेव्‍हा तक्रारकर्ताने सामनेवालाकडे विज देयक रक्‍कम भरण्‍यास बंद केले, तेव्‍हा बेकायदेशिर विज खंडीत करण्‍याची सुचना दिली. सदर बाब सामनेवालाने तक्रारकर्ताप्रति न्‍युनत्‍तम सेवा व अनुचित व्‍यवहार असल्‍याने तक्रारकर्ताने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

3. तक्रारकर्ताने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवालाने तक्रारकर्ताला दिनांक 27.01.2013 व 22.11.2013 ला देण्‍यात आलेले देयक रद्द करण्‍यात यावे. व जुने मिटर व नविन मिटरची तपासणी करुन त्‍या अनुषंगाने नविन देयक तक्रारकर्ताला देण्‍यात यावे. तसेच तक्रारकर्ताला झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च सामनेवालाकडून मिळण्‍याचा आदेश व्‍हावा अशी विनंती केली आहे.

4. तक्रारकर्ताची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीस काढण्‍यात आली. सदरहू नोटीस सामनेवालाला प्राप्‍त झाल्‍यावर सामनेवालाने प्रकरणात कैफियत दाखल केली नाही. म्‍हणून दिनांक 20.01.2014 रोजी सामनेवाला यांचेविरुध्‍द निशाणी 1 वर कैफियतशिवाय प्रकरण चालविण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला.

5. तक्रारकर्ताने दाखल तक्रार, दस्‍तावेज, शपथपत्र यावरुन मंचासमक्ष खालील मुद्दे विचारार्थ येतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारकर्ता हे सामनेवालाचे “ग्राहक” आहेत काय.?                    

 

... होय.

2.

सामनेवाला यांनी तक्रारदारासप्रति अनुचित व्‍यवहार प्रतिचा अवलंब केला आहे काय.?

 

... होय.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

का र ण मि मां सा

6.   मुद्दा क्र.1  – तक्रारकर्ता यांनी सामनेवाला यांचेकडून 2011 मध्‍ये त्‍यांचे घरगुती वापराकरीता विज पुरवठा सामनेवाला यांचेकडून घेतलेला आहे. तक्रारकर्ताचा ग्राहक क्रमांक 850710041583 असा आहे ही बाब उभय पक्षकार यांना मान्‍य असून तक्रारकर्ता हे सामनेवाल यांचे “ग्राहक” आहेत असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

7.   मुद्दा क्र.2 –तक्रारकर्ताने तक्रारीत व शपथपत्रात तसेच निशाणी 7 खाली दाखल केलेल्‍या दस्‍त क्र.1 ते 12 याची पडताळणी करताना तसेच निशाणी 28 दस्‍त क्र.1 ते 3 याची पडताळणी करताना असे दिसून आले आहे की, तक्रारकर्ताला सामनेवाला हे सरासरीचे विज वापराचे देयक पाठवित होते. व दिनांक 25.06.2013 ते 25.07.2013 यात तक्रारकर्ताला 10825 युनिटचे विज वापराचे देयक पाठविण्‍यात आले आहे. त्‍यात रिडींग उपलब्‍ध नाही असा शेरा मारुन दर्शविण्‍यात आले आहे. सदर देयक ओरीजनल बिल चे दर्शविण्‍यात आले आहे. त्‍यानंतर दिनांक 25.07.2013 ते 24.08.2013 चे 1150 युनिटचे विज वापराचे देयक सामनेवालाने तक्रारकर्ताला दिले व त्‍यानंतर दिनांक 24.08.2013 ते 23.09.2013 रोजी 160 युनिटचे देयक सामेनवालाने तक्रारकर्ताला दिले. त्‍यानंतर 236 व 191 युनिटचे विज वापराचे देयक सामनेवालाने तक्रारकर्ताला दिले. यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ताला सामेनवालाने ब-याच वेळा रिडींग उपलब्‍ध नसल्‍याचे किंवा मिटर फॉल्‍टी असल्‍याने सरासरीचे विज वापराचे देयक देण्‍यात आले आहे. त्‍यानंतर अचानकपणे सामनेवालाने तक्रारकर्ताला जास्‍त प्रमाणाचे देयक पाठविण्‍यात आले आहे. निशाणी क्र.6 दस्‍त क्र.8 जुलै 2013 चे देयकाची पडताळणी करताना असे दिसून आले आहे की, सामनेवालाने तक्रारकर्ताचे मिटर रिडींग उपलब्‍ध असूनसुध्‍दा हाताने 10825 युनिटचे विज वापराचे देयक दिले. सदर देयकामध्‍ये युनिटचा वापर 10825 कसा झाला याचा खुलासा देण्‍यात आला नाही. व त्‍यानंतर सदर रक्‍कम ऑगस्‍ट 2013 चे देयकामध्‍ये थकबाकी म्‍हणून दर्शविण्‍यात आलेली आहे. सामनेवालाने तक्रारकर्ताला वारंवार मिटर फॉल्‍टी असूनही सरासरीचे देयक पाठविण्‍यात आले व त्‍यानंतर रिडींग उपलब्‍ध नसल्‍याने सरासरीचे देयक पाठविण्‍यात आले. सामनेवालाने तक्रारकर्ताकडून मिटरचे पैसे घेऊनसुध्‍दा मिटर सुव्‍यवस्थित देखभाल राखीव ठेवण्‍याची जबाबदारी आहे. तसेच रिडींग उपलब्‍ध का नाही याचे कोणतेही देयकामध्‍ये शेरा दिसून येत नाही.  तक्रारकर्ताचे वारंवार सामनेवालाकडे तक्रारी करुनही त्‍यावर सामनेवालाने कोणतीही दखल घेतली नाही व अचानकपणे सामनेवालाने तक्रारकर्ताला हस्‍तलिखीत दिनांक 13.07.2013 चे देयक सामनेवालाने दिले ही बाब सामनेवालाने तक्रारकर्ताप्रति अनुचित व्‍यवहार प्रथेचा अवलंब ठरविले व दर्शविते. सामनेवालाने प्रकरणात वेळेवर कैफियत दाखल केली नसल्‍याने त्‍यांची कैफियत अभिलेखावर घेण्‍यात आली नाही व त्‍यांची बाजू ग्राहय धरता येत नाही.  तक्रारकर्ताची तक्रार व त्‍यांचे दस्तावेज, शपथपत्राव्‍दारे प्रकरणात हे सिध्‍द केलेले आहे की, सामनेवालाने तक्रारकर्ताला वेळोवेळी चुकीची देयके दिलेली आहेत व त्‍याचा भरणा करण्‍याकरीता तक्रारकर्ताला बेकायदेशिररित्‍या कलम 56 (1) विद्युत कायदा 2003 प्रमाणे नोटीस पाठविली ही बाब सामनेवालाची तक्रारकर्ताप्रति अनुचित व्‍यवहार प्रथेची अवलंबना दर्शविते व सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

8.   मुद्दा क्र.3 - मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारकर्ताची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.   सामनेवाला यांनी तक्रारकर्ताला जुने मिटर बदलून नविन मिटर योग्‍य तपासणी करुन तक्रारकर्ताने वापरलेल्‍या विज वापराचे युनिटप्रमाणे दिनांक 27.01.2013 ते 22.11.2013 या कालावधीतीचे सुधारीत बिल सामनेवालाने तक्रारकर्ताला द्यावे.  

3.   सामनेवाला यांनी तक्रारकर्ता यांना झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- (रक्‍कम रु.पाच हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.2,500/- (रक्‍कम रु.दोन हजार पाचशे फक्‍त ) तक्रारकर्ताला द्यावे.

4. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

5. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

6. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.