Maharashtra

Gondia

CC/12/24

Babuji Servo Petrol Pump (Babiji Servo Automobiles) - Complainant(s)

Versus

The Ashish Agency, Through Prop. Atul Kokardekar - Opp.Party(s)

MR. P. S. AAGASHE

30 Aug 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGOAN ROAD, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/12/24
 
1. Babuji Servo Petrol Pump (Babiji Servo Automobiles)
R/o- Amgaon, Tah.Amgaon,
Gondia
...........Complainant(s)
Versus
1. The Ashish Agency, Through Prop. Atul Kokardekar
R/o- Nagpur, 5/66, Bharat Nagar, Nagpur
Nagpur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MS. VARSHA O. PATIL MEMBER
 HON'BLE MR. WAMAN V. CHOUDHARI MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

(आदेश पारित द्वारा मा. सदस्‍या, कु. वर्षा ओ. पाटील)

(पारित दि. 30 ऑगस्‍ट, 2014)

तक्रारकर्तीने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 11 व 12 अन्‍वये दाखल केली आहे.  तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-

2.    तक्रारकर्ती ही मौजे आमगांव, ता. आमगाव, जिल्‍हा गोंदीया येथील रहिवासी असून ती बाबुजी सर्व्‍हो पेट्रोल पंपची प्रोप्रायटर आहे.   सदरहू प्रकरणात संपूर्ण न्‍यायालयीन प्रक्रिया पार पाडण्‍याकरिता तक्रारकर्तीने श्री. हरीहर केशवराव मानकर राह. आमगांव, ता. आमगांव, जिल्‍हा गोंदीया यांना आममुखत्‍यारपत्र लिहून दिलेले आहे. 

3.    विरूध्‍द पक्ष एजंसी असून प्रोप्रायटर श्री. अतुल कोकर्डेकर, राह. नागपूर यांच्‍या मालकीची आहे.

4.    तक्रारकर्तीने दिनांक 23/04/2009 रोजी विरूध्‍द पक्षाकडून खालीलप्रमाणे काही वस्‍तू खरेदी केल्‍या.

वस्‍तू

दर

नग

रक्‍कम (रू.)

5 KVA  सोलर इन्‍व्‍हर्टर

रू. 50,000/-

1

रू. 50,000/-

165 Ah ऑटोबॅट टॅब्‍युलर

रू. 10,000/-

8

रू. 80,000/-

बॅटरी सोलर पॅनल 160 वॅट

रू. 234/-

160

रू. 2,24,640/-

वायरिंग ऍन्‍ड इन्‍स्‍टॉलेशन

रू. 50,000/-

L/S

रू. 15,000/-

एकूण

 

 

रू. 3,69,640/-

5.    वरील तक्‍त्‍यात नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारकर्तीने सोलर उपकरण विरूध्‍द पक्षाकडून खरेदी केले.  परंतु सदर उपकरणामध्‍ये त्रुटी, दोष आढळून आल्‍यामुळे तक्रारकर्तीने सदरहू उपकरण दुरूस्‍त करून देण्याची मागणी विरूध्‍द पक्षाकडे केली.  तथापि विरूध्‍द पक्ष यांनी सदरहू उपकरण दुरूस्‍त करून दिले नाही.  सदर उपकरणाचे 10 वर्षाचे वॉरन्‍टी सर्टिफिकेट दिनांक 15/03/2009 चे विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दिले होते ते तक्रारकर्तीने सदर प्रकरणामध्‍ये पृष्‍ठ क्र. 18 वर दाखल केलेले आहे.  सदर सोलर उपकरणामध्‍ये दोष किंवा त्रुटी आढळल्‍यास विरूध्‍द पक्ष सोलर उपकरण बदलवून नवीन लावून देईल तसेच त्‍यात त्रुटी आढळल्‍यास तक्रारकर्तीस दुरूस्‍तीची हमी देण्‍यात आली होती.  विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्तीकडून सदरहू 6 सोलर उपकरण दुरूस्‍त करून देतो म्‍हणून परत घेतले आणि त्‍यानंतर ते दुरूस्‍तीही केले नाही किंवा तक्रारकर्तीला परतही केले नाही.  त्‍यानंतर दिनांक 07/04/2011 रोजी विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला एक पत्र दिले की आम्‍ही सर्व सोलर उपकरण दुरूस्‍त करून तक्रारकर्तीला परत दिले.  ते सदर केसमध्‍ये पृष्‍ठ क्र. 13 वर दाखल केलेले आहे.

6.    परंतु तक्रारकर्तीचे म्हणणे आहे की, सदर उपकरणांची दुरूस्ती वारंवार विनंती करून सुध्दा विरूध्द पक्ष यांनी करून दिलेली नाही.  म्हणून तक्रारकर्तीने विरूध्द पक्षाला दिनांक 30/09/2011 रोजी कायदेशीर नोटीस पाठविला.  तो सदर केसमध्ये पृष्ठ क्र. 25 वर आहे.  तसेच सदर तक्रारीत तक्रारकर्तीने मुखत्यारनामा पृष्ठ क्र. 10, दिनांक 06/06/2009 रोजीची टॅक्स इन्व्हॉईस पृष्ठ क्र. 12, दिनांक 22/04/2009 रोजीची टॅक्स इन्व्हॉईस पृष्ठ क्र. 14, दिनांक 25/03/2009 रोजीची टॅक्स इन्व्हॉईस पृष्ठ क्र. 15, 16 असे दस्तऐवज दाखल केलेले आहेत.

7.    तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्‍याय मंचाने दिनांक 16/05/2012 रोजी दाखल करून घेतल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष यांना दिनांक 23/05/2012 रोजी मंचामार्फत नोटीस बजावण्‍यात आला.  विरूध्‍द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष यांनी हजर होऊन दिनांक 28/08/2012 रोजी त्यांचा लेखी जबाब दाखल केला. 

विरूध्‍द पक्ष यांनी त्‍यांच्‍या जबाबात तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचे खंडन केले असून तक्रारकर्ती ही ग्राहक या संज्ञेत बसत नाही कारण त्यांचा पेट्रोल पंप चालविण्याचा व्यवसाय (Commercial purpose) आहे म्हणून तक्रार खारीज करण्यात यावी असे त्यांनी आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे.  विरूध्द पक्ष यांनी मान्य केले की, सदर उपकरण तक्रारकर्तीने त्यांच्या दुकानातून खरेदी केलेले  होते.

8.    तक्रारकर्तीचे वकील ऍड. पी. एस. आगाशे यांनी सदरहू प्रकरणात लेखी युक्तिवाद सादर केला असून तो पृष्ठ क्र. 32 वर आहे.  त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, तक्रारकर्तीने विरूध्द पक्षाकडून सोलर उपकरण खरेदी केलेले आहे व विरूध्द पक्षाने ते आपल्या लेखी उत्तरात मान्‍य केले आहे.  विरूध्द पक्षाने सदर सोलर उपकरणाची जोडणी करतांना तक्रारकर्तीला 10 वर्षाची वॉरन्टी दिली होती की, कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा दोष, त्रुटी आढळल्यास विरूध्द पक्ष हे सोलर उपकरण पूर्णपणे बदलवून नवीन लावून देतील.  तसेच त्यात त्रुटी असल्यास तक्रारकर्तीस दुरूस्ती करण्याची हमी सुध्दा लेखी स्वरूपात विरूध्द पक्षाने घेतली होती असा लेखी युक्तिवाद तक्रारकर्तीचे वकिलांनी दाखल केलेला आहे. 

9.    सदरहू प्रकरणात विरूध्‍द पक्षाच्या वतीने युक्तिवादाच्या वेळेस कुणीही हजर झाले नाहीत.  

10.   तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, विरूध्‍द पक्ष यांचा लेखी जबाब, तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच लेखी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.

अ.क्र.

मुद्दे

निर्णय

1.    

तक्रारकर्तीची तक्रार मान्‍य होण्‍यास पात्र आहे काय?

नाही

2.

या तक्रारीचा अंतिम आदेश काय?

कारणमिमांसेप्रमाणे

- कारणमिमांसा

11.   तक्रारकर्ती ही पेट्रोल पंप चालविण्याचा व्यवसाय करीत असून तो Commercial Purpose या उद्दिष्टाखाली येत असल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील ‘ग्राहक’ या संज्ञेमध्ये तक्रारकर्तीचा समावेश होत नाही. 

      Sec. 2(d)(i) – Definition of  Consumer, under Consumer Protection Act] 1986 means any person who buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment & includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised or under any system of deferred payment when such use is made with the approval of such person, “but does not include a person who obtained such goods for resale or for any commercial purpose”.

(ii)        Hires or availed of, any services for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised or under any system of deferred payment & include any beneficially of such services other than the person who, hires of avails of, the services for consideration paid or promised or partly paid and partly promised or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first mentioned person. (But does not include a person who availed of such services for any commercial purpose).

 

Expl.- (For the purposes of this clause, “Commercial purpose” does not include use by a person of goods bought and used by him and services availed by him exclusively for the purposes of earning his livelihood by means of self employment).

12.   तक्रारकर्ती ही ‘ग्राहक’ या संज्ञेत मोडत नाही आणि म्हणून ती ग्राहक होण्यास पात्र नाही.  करिता सदरहू प्रकरण खारीज करण्यात येत आहे.  

-// अंतिम आदेश //-

1.     तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात येते.

2.    खर्चाबद्दल कुठलाही आदेश नाही. 

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. VARSHA O. PATIL]
MEMBER
 
[HON'BLE MR. WAMAN V. CHOUDHARI]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.