Maharashtra

Nagpur

CC/193/2015

Pradeep L Surana - Complainant(s)

Versus

The A.G.M.P.G B.S. N.L Zero Mile Nagpur - Opp.Party(s)

G. S. Lahoti

04 Oct 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/193/2015
 
1. Pradeep L Surana
Nagpur
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. The A.G.M.P.G B.S. N.L Zero Mile Nagpur
Zero Mile Civil Lines Nagpur
Nagpur
Maharastra
2. All India Consumer Protection Committee
New Delhi 110002
Delhi
Delhi
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. PRADEEP PATIL MEMBER
  none MEMBER
 
For the Complainant:G. S. Lahoti, Advocate
For the Opp. Party:
ऍड. रणजीत सारडे
 
Dated : 04 Oct 2016
Final Order / Judgement

(मंचाचा निर्णय : श्रीमती. मंजुश्री खनके - सदस्‍या यांचे आदेशांन्‍वये)

 

                          -//  आ दे श  //-

                 (पारित दिनांकः 04/10/2016)

 

            तक्रारकर्त्‍यांनी  विरुध्‍द पक्षाविरुध्‍द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली असुन तक्रारकर्त्‍याचे कथन थोडक्‍यात येणेप्रमाणे...

 

1.          तक्रारकर्ता क्र.1 यांनी विरुध्‍द पक्षांकडून फोन क्र.0812-2682444 या दुरध्‍वनी क्रमांकावर ब्रॉड बँडचे कनेक्‍शन स्किम क्र. बीबीजीएफएन- कोम्‍बो 630/- मासिक याप्रमाणे 2013 मध्‍ये घेतले होते. तक्रारकर्ते क्र.1 जे वेळोवेळी त्‍याचे पैसे चुकवीत होते. सदर प्‍लॅन हा ‘नाईट अनलिमीटेड प्‍लॅन’, या प्रकारातला होता. त्‍याच मासिक शुल्‍कामध्‍ये रात्रीचे वेळी डाऊनलोड, अपलोड इत्‍यादी सर्व अनलिमीटेड होते तक्रारकर्ते यापुढे कथन करतात की, तक्रारकर्ता क्र.1 यांच्‍या ई-मेलवर दि.07.08.2014 ला कळविण्‍यांत आले की, त्‍यांचा सदर्हू प्‍लॅन लिमिटेडमध्‍ये बदलविण्‍यांत आलेला आहे. परंतु सदर प्‍लॅन बदलविण्‍याकरीता दोन्‍ही पक्षांची स्विकृती ही अटी व शर्तींप्रमाणे घ्‍यायला पाहिजे होती. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे असे की, मी विरुध्‍द पक्षाला अशा प्रकारची स्विकृती दिलेली नव्‍हती. दि.07.08.2014 रोजी तक्रारकर्ता क्र. 1 ने कनेक्‍शन सरेंडरसाठी आणि खाते सेटल कर ण्‍याकरीता निवेदन दिले परंतु विरुध्‍द पक्षाने ते निवेदन मान्‍य न करता जुलै-2014 पर्यंत 51.03 जीबीचा वापर झाल्‍यामुळे त्‍यासाठी देय राशीची मागणी केली. तसेच विरुध्‍द पक्षाने ब्रॉड बँडची सुविधा दि.10.11.2014 पासुन बंद केली ते फोन कनेक्‍शन व ब्रॉड बँड कनेक्‍शनसुध्‍दा विरुध्‍द पक्षाने बिना नोटीस बंद केले व  त्‍याची सुचना दि.26.11.2014 रोजी एसएमएस व्‍दारे दिली. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे बरेच नुकसान झाले इतर लोकांना मेल किंवा संवाद करण्‍यांस तक्रारकर्ता क्र.1 असमर्थ राहीला आणि शैक्षणिकदृष्‍टया नुकसान झाले.

 

2.          तक्रारकर्ता क्र.1 नमुद करतात की, त्‍यांचे रु.1100/- जमा असुन रु.1,000/- ची क्रेडिट लिमीट होती तरीही विरुध्‍द पक्षाने कनेक्‍शन बंद केले आणि वेळेवर सुचना दिली नाही. जर वेळेवर सुचना दिली असती तर तक्रारकर्त्‍याने वापर कमी केला असता. परंतु वेळेवर सुचना न देणे अश्‍या प्रकारचा चुकीचा व्‍यवहार विरुध्‍द पक्षाने केलेला असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला मानसिक, शारीरिक नुकसान झाले त्‍याची भरपाई म्‍हणून रु.20,000/- मिळण्‍यांत यावे आणि इतर खर्च व नुकसानीसाठी रु.10,000/- मिळण्‍यांत यावे. तसेच विरुध्‍द पक्षाने पाठविलेले बिल सुचने अभावी मान्‍य नसल्‍यामुळे सदरच तक्रार मंचासमोर दाखल केलेली आहे.

 

3.          तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत आवश्‍यक ते कागदपत्रे त्‍यात विरुध्‍द पक्षास पाठविलेले पत्र, तक्रारकर्ता क्र. 2  ने पाठविलेला नोटीस आणि दि.26.07.2014 पासुनचे बिल इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

 

3.          मंचात तक्रार दाखल झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने हजर होऊन लेखीउत्‍तर दाखल केले, आणि तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील संपूर्ण कथन अमान्‍य करुन आपल्‍या लेखीउत्‍तरात नमुद केले आहे की, विरुध्‍द पक्ष कंपनी ही गर्व्‍हरमेंट अंडरटेकींग कंपनी असुन ती त्‍यांच्‍या कार्पोरेट ऑफीस, न्‍यू दिल्‍लीच्‍या निर्देशानुसार काम करते. त्‍यानुसार कंपनीचा हा प्‍लॅन दि.01.07.2014 पासुन सर्क्‍युलर  नं.1-1/1014-R&C(CFA) dated 03.06.2014 of the BSNL Corporate Office. च्‍या निर्देशाप्रमाणे बदलविण्‍यांत (रिवाईज) आला होता. तसेच विरुध्‍द पक्षाने सदर प्‍लॅन बदलवितांना सर्व ग्राहकांना प्‍लॅन बदलविण्‍याची माहीती एसएमएसव्‍दारे कळविण्‍यांत आली होती आणि परिपत्रक त्‍याप्रमाणे माहितीची सुचना देण्‍यात आली होती. त्‍याप्रमाणे  ग्राहकांना तो प्‍लॅन नियमीत करायचा किंवा बदलवायचा किंवा बंद करायचा पर्याय देण्‍यांत आलेला होता. त्‍याप्रमाणे तसा बंद करण्‍याबाबतचा अर्जही ग्राहकांना देण्‍यांत आला होता. तक्रारकर्त्‍याने त्‍याचेकडून अपेक्षित असलेल्‍या डाटापेक्षा खुप जास्‍त डाटा वापरल्‍यामुळे आणि त्‍या प्‍लॅनमध्‍ये परवानगी नसल्‍याच्‍या एकाच कारणामुळे तक्रारकर्त्‍याचा प्‍लॅन बंद करण्‍यांत आला होता. आणि तक्रारकर्त्‍याने दिवस व रात्र डाटा वापरलेला आहे आणि ते ब्रॉडबँडच्‍या मीटर रिडींगमध्‍ये आलेले असल्‍यामुळे सदरच्‍या वापराचे बिल तक्रारकर्त्‍यास पाठविण्‍यात आलेले आहे. विरुध्‍द पक्षाने कुठलीही चुकीची पध्‍दत अवलंबीलेली नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची सदरची तक्रार खारिज करण्‍याची विनंती केलेली आहे. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्द पक्षाचे लेखीउत्‍तर दाखल करुन विरुध्‍द पक्षाने परिपत्रक व एसएमएस पाठविल्‍याचे अमान्‍य केलेले आहे.  विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखीउत्‍तरासह एप्रिल ते जून  - 2014 चे फोन बिल, परिपत्रक, नाईट बीबी युसेज,  मार्च – 2014 ते जुलै -2014 चे काळातील उपयोग केल्‍याबाबतची माहिती इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत

 

4.          तक्रारकर्त्‍याची शपथपत्रावर दाखल तक्रार, विरुध्‍द पक्षांचे लेखीउत्‍तर, लखी व तोंडी युक्तिवाद, अभिलेखावर दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्‍कर्ष खालील प्रमाणे...

 

                  मुद्दे                                       निष्‍कर्ष

 

      1.    विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास न्‍युनतापूर्ण सेवा

            दिली आहे  काय ?                                 नाही.

      2.    तक्रारकर्ता प्रार्थनेप्रमाणे दाद मागण्‍यांस पात्र

            आहे काय ?                                      नाही.

      3.    अंतिम आदेश काय ?                            आदेशाप्रमाणे.                                                                                                                      

 

  • // कारणमिमांसा // -

     

    5.          मुद्दा क्र.1 बाबतः-  तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार व अभिलेखावर दाखल कागदपत्रे यांवरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांनी टेलिफोन वापराचे जे बिल दाखल केलेले आहे ते प्‍लॅनप्रमाणे दरमहीन्‍यात बरोबर पाठविलेले आहे आणि त्‍याचा भरणाही तक्रारकर्त्‍यान वेळोवेळी केलेला आहे. परंतु तक्रारकर्त्‍याने एवढयाच एका कारणासाठी तक्रार दाखल केली आहे की, विरुध्‍द पक्षाने उपरोक्‍त नमुद अनलिमीटेड प्‍लॅन बदलवितांना तक्रारकर्त्‍यास सुचना दिलेली नाही आणि त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे नुकसान  झालेले आहे आणि त्‍याची भरपाई मिळण्‍यांत यावी. परंतु विरुध्‍द पक्षाने दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन हे स्‍पष्‍ट होते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास एसएमएस पाठवुन जून-2014 महिन्‍याचे बिलात माहिती प्रकाशित केलेली आहे. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने सेवेतील त्रुटी ठेवलेली नाही, तसेच ब्रॉडबँडचे प्‍लॅनबाबतही तक्रारकर्त्‍याने वापर केल्‍यानुसारच विरुध्‍द पक्षाने बिल पाठविलेले आहे, हे दाखल कागदपत्रांवरुन स्‍पष्‍ट होत आहे. त्‍यामुळे मुद्दा क्र. 1  चे उत्‍तर नाही असे नोंदविलेले आहे.

     

    6.          मुद्दा क्र.2 व  3 बाबतः-  मुद्दा क्र. 1 चे निष्‍कर्षांचे अनुषंगाने विरुध्‍द पक्षाचे सेवेतील न्‍युनता दिसुन येत नसल्‍यामुळे तक्रारकर्ता प्रार्थनेतील मागणीप्रमाणे दाद मागण्‍यांस पात्र नाही, असे मंचाचे मत आहे. म्‍हणून तक्रारकर्त्‍याची तक्रार खारिज करण्‍याचा मंच आदेश पारित करीत आहे.

     

                वरील निष्‍कर्षास अनुसरुन मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.

     

                            -//  अंतिम आदेश  //-

     

                     

    1.    तक्रारकर्त्‍याची विरुध्‍द पक्षा विरुध्‍दची तक्रार खारिज करण्‍यांत येत आहे.

    2.    दोन्‍ही पक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

    3.    उभय पक्षास सदर आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

    4.    तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

     

 
 
[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER
 
[ none]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.