निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 18/04/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 04/05/2011 तक्रार निकाल दिनांकः- 11/01/2012 कालावधी 08 महिने 23 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. उर्मिला भ्र.विठठल शिंदे अर्जदार वय 40 वर्ष.धंदा.शेती व घरकाम अड.अरुण खापरे रा.धसाडी, ता.जि.परभणी. विरुध्द 1 तहसिलदार गैरअर्जदार. तहसिल कार्यालय,जि.परभणी . स्वत: 2 कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हीसेस प्रा.लि. भास्करायन एच.डी.एफ.सी.होमलोन बिल्डींग, प्लॉट नं.7, सेक्टर इ -1 टाउन सेंटर. सिडको औरंगाबाद. 3 व्यवस्थापक अड.जी.एच.दोडीया रिलायंस इन्शुरंस जनरल कं.लि. 570 रेक्टीफायर हाउस,इन्दोरीजिन इलेक्ट्रीक लि. नेक्सट टू रॉयल इंडस्ट्रीयल इस्टेट वडाळा (वेस्ट) मुंबई. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष) शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा योजनेची नुकसान भरपाई मयत शेतक-याच्या वारसास देण्याचे विमा कंपनीने नाकारले म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार मौजे धसाडी जि. परभणी येथील रहिवाशी आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण खातेदार शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 3 यानी पुरस्कृत केलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविलेला होता त्या पॉलीसीचा अर्जदारचा मयत पती विठठल भानुदास शिंदे हा देखील लाभार्थी होता. तारीख 10/04/2008 रोजी त्याचा वाहन अपघातात मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पोस्टमार्टेम सरकारी दवाखान्यात केले. अर्जदारने त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 3 कडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी क्लेमफॉर्मसह आवश्यक ती सर्व कागदपत्रे तारीख 11/09/2008 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे सुपुर्द केली होती. परंतु बरेच दिवस होवुन गेले तरी क्लेम मंजुरी बाबत काहीच कळवले नाही. म्हणुन वकिलामार्फत गैरअर्जदारास नोटीसा पाठविल्या पण त्यालाही उत्तर दिले नाही व विनाकारण प्रकरण रखडत ठेवले आहे. अशा रितीने सेवात्रुटी करुन नुकसान भरपाई देण्यापासून वंचित ठेवले आहे म्हणून ग्राहक मंचात प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन नुकसान भरपाई रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह मिळावी याखेरिज मानसिकत्रासापोटी रु.25,000/- आणि अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी मागणी केलेली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र ( नि. 2) व पुराव्यातील कागदपत्रात नि. 4 लगत एकूण 18 कागदपत्रांच्या छायाप्रती दाखल केलेली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी तारीख 16.08.2011 रोजी आपला लेखी जबाब (नि.15) सादर केला. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी पोस्टाव्दारे आपले लेखी म्हणणे पोष्टाव्दारे मंचाकडे पाठवले होते ते तारीख 27/06/2011 रोजी प्रकरणात नि.12 ला समाविष्ट केले. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी मंचाची नोटीस स्वीकारुनही नेमलेल्या तारखेस मंचापुढे हजर झाले नाही व लेखी म्हणणे सादर करण्यासाठी संधी देवुनही दिले नाही त्यामुळे त्यांचे विरुध्द तारीख 14/10/2011 रोजी एकतर्फा आदेश पारित करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी आपल्या लेखी जबाबात ( नि.15) तक्रार अर्जातून त्यांच्या विरुध्द केलेल्या विधानांचा इन्कार करुन प्रस्तुतची तक्रार विमा कंपनी विरुध्द मुळीच चालणेस पात्र नाही त्यांचेकडून कोणत्याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही कारण अर्जदार व कबाल इन्शुरन्स ब्रोकरेज सर्व्हीसेस यांचेकडून आजपर्यंत डेथक्लेमची सर्व कागदपत्रे कंपनीला मिळालेली नाहीत त्यामुळे अर्जदाराला नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उदभवत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. शेतकरी विम्या संबंधी तक्रार अर्जातील मजकुर वगळता बाकीचा मजकूर वैयक्तिक माहिती अभावी विमा कंपनीने साफ नाकारला आहे. गैरअर्जदाराकडून क्लेम मंजुरीच्या बाबतीत कोणतीही सेवात्रुटी झालेली नाही.सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा. अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार नं 3 चे शपथपत्र (नि.16) दाखल केले आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 यानी आपल्या लेखी जबाबात (नि.12) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई दावा क्लेम संदर्भातील कागदपत्राची विमा कंपनीकडे आवश्यक ती पूर्तता व छाननी करण्यासाठी शासनाने त्याना मध्यस्थ सल्लागार म्हणून नेमलेले आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्यांचेकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत विठठल भानुदास शिंदे याच्या विमा क्लेमची कोणतीही कागदपत्रे त्यांचेकडे आलेली नाहीत. त्यामुळे रूपये 2000/- ची कॉम्पेनसेटरी कॉस्टसह तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. तक्रार अर्जाचे अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड. खापरे आणि गैरअर्जदार क्रमांक 4 तर्फे अड दोडिया यानी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्ये उत्तर 1 गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी अर्जदाराच्या मयत पतीच्या शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई देण्याचे बाबतीत सेवात्रुटी केली आहे काय ? होय फक्त गै.अ.क्र.1 ने 2 निर्णय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 ते 3 अर्जदाराचा मयत पती विठठल भानुदास शिंदे रा धसाडी जि.परभणी हा शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्यात सादर केलेल्या नि.4/6 ते 4/9 वरील गट नं.147, 148, 150 व 158 चे 7/12 उतारे, नि.4/10 वरील 6-क चा उतारा, नि.4/4 वरील नं. 8-अ चा उतारा या कागदपत्रातील नोंदी मधून शाबीत झाले आहे. दिनांक 10.04.2008 रोजी अर्जदाराच्या पतीचा वाहन अपघातात मृत्यू झाला होता त्या वस्तुस्थिती बाबत पोलीस पेपर्सचे बारकाईने अवलोकन केले असता अपघाताची घटना दि.10.04.2008 रोजी घडलेली असल्याचे दिसते ती अशी की त्या दिवशी राञी 10.00 वाजता अर्जदारचा पती मोटार सायकल क्रमांक एम.एच.22/के-4056 ला गंगाखेड परभणी रोडवर महातकरी फाटयाजवळ समोरून भरधाव येणा-या एम.एच.22/एच-735 वरील जीप चालकाने मोंटार सायकलला ठोकल्यामुळे अपघातात तो जबर जखमी होवुन मयत झाला होता. याबाबत पुराव्यात दाखल केलेल्या नि.4/13 वरील सोनपेठ पोलिस स्टेशन अ.मृ.क्र.34/2008 मधील एफ.आय.आर. नि.4/14 वरील मरणोत्तर पंचनामा, नि.4/15 वरील घटनास्थळ पंचनामा, नि.4/16 वरील पी.एम.रिपोर्ट या पुराव्यातून शाबीत झालेले आहे. मयत विठठल शिंदे हा शेतकरी वैयक्तिगत अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे अर्जदाराने ( मयताची पत्नी) विम्याची नुकसान भरपाई रुपये 1 लाख मिळणेसाठी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे विमा क्लेमसह आवश्यक ती सर्व कागदपत्रे दि. 11.09.2008 सादर केलेली होती त्याच्या छायाप्रती अर्जदाराने पुराव्यात नि. 4 लगत दाखल केलेल्या आहेत.शिवाय नि.4/4 वरील गैरअर्जदार क्र.1 च्या पोहच पञातुन शाबीत झाले आहे. तहसिलदार यांनी क्लेम व कागदपञे स्वीकारल्यानंतर पुढील मंजुरीच्या कार्यवाहीस ती कागदपञे गैरअजर्दार क्र.2 कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेसकडे पाठविली होती यासंबंधीचा कोणताही ठोस पुरावा प्रकरणात अर्जदाराने सादर केलेला नाही. अर्जदाराने गैरअर्जदारांना वकिलामार्फत नोटीस (नि.4/17) पाठविल्यानंतर गैरअर्जदारांनी काहीही खुलासा दिला नाही. त्यामुळे अर्जदारने कायदेशीर दाद मिळणेसाठी ग्राहक मंचात प्रस्तुतची तक्रार दाखल केल्यानंतर कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस व रिलायन्स इन्शुरन्स कंपनी यांनी आपल्या लेखी जबाबामध्ये असे स्पष्टपणे नमुद केले आहे की, विठठल शिंदे याच्या अपघाती मृत्युचे शेतकरी विमा कंपनीची कोणतीही कागदपञे त्याच्याकडे आलेली नाही. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. याबाबतीत त्याचेकडुन सेवाञुटी झालेली नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे म्हणणे खोटे आहे ही पुराव्यातुन शाबीत करण्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदारावर होती. परंतु प्रकरणाच्या अंतीम सुणावणीपर्यन्त अर्जदाराने क्लेमची कागदपञे गैरअर्जदार क्र.1 ने गैरअर्जदार क्र.2 अथवा 3 कडे पाठविली होती या संदर्भाचा कोणताही ठोस पुरावा मंचापुढे सादर केलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र.2 व 3 कडुन यासंदर्भात सेवाञुटी झाली असे मुळीच म्हणता येणार नाही माञ गैरअर्जदार क्र.1 कडुन सेवाञुटी झाल्याचे नि.4/1 वरील पञावरून शाबीत झाले आहे. मुळातच राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलीसीचा खर्च लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे. अर्जदाराचा पती अपघातात मयत झालेला असल्यामुळे शासनाच्या योजनेचा लाभ तीस मिळालाचा पाहिजे. ती नुकसान भरपाई मिळण्यापासून अर्जदार मुळीच वंचीत राहता कामा नये असे आमचे मत आहे. त्यामुळे मुदतीची अट विचारात न घेता विमा कंपनीने तिचा क्लेम मंजुर करणे न्यायोचीत होईल. सबब मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 अर्जदारने गैरअर्जदार क्र.1 कडील विमा दाव्याची कागदपञे स्वतः ताब्यात घेवुन गैरअर्जदार क्र.3 कडे रजि.पोस्टाने पाठवावीत गैरअर्जदार क्र.3 यांनी कागदपञे मिळाल्यावर अर्जदारच्या मयत पतीच्या डेथ क्लेमची नुकसान भरपाई रूपये 1,00,000/- चा क्लेम दोन महिन्यात सेटल करावा. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |