निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 15/04/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 14/05/2011 तक्रार निकाल दिनांकः- 15 /11/2011 कालावधी 06 महिने 01 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. सायस पिता केरबा गवळी. अर्जदार वय 67 वर्ष.धंदा.शेती. अड.अरुण. डी.खापरे. रा.उंडेगाव ता.गंगाखेड जि.परभणी. विरुध्द 1 मा.तहसिलदार. गैरअर्जदार. तहसिल कार्यालय,गंगाखेड. ता.गंगाखेड.जि.परभणी. 2 मा.तालुका कृषी अधिकारी. तालुका कृषी कार्यालय.गंगाखेड.ता.गंगाखेड.जि.परभणी. 3 विभागीय व्यवस्थापक. कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हीस प्रा.लि. स्वतः भास्करायन,एच.डी.एफ.सी.होमलोन बिल्डींग. प्लॉट नं.7 इ.सेक्टर -1. टाउन सेंटर,सिडको औरंगाबाद. 4 व्यवस्थापक, अड.जी.एच.दोडीया. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं.लि. 570,रेक्टेफायर हाउस,इंदोरी जिन, इलेक्ट्रीक लि. नायगम क्रॉस रोड,नेक्सट टु रॉयल इंडस्ट्रीयल इस्टेट,वडाळा वेस्ट मुंबई. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- (निकालपत्र पारित व्दारा श्रीमती. अनिता ओस्तवाल.सदस्या.) गैरअर्जदारानी त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने हि तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराची पत्नी शेतकरी होती त्यामुळे ती महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत लाभार्थी होती दिनांक 17/11/2008 रोजी अर्जदाराच्या पत्नीचा सर्पदंश झाल्यामुळे मृत्यू झाला.अर्जदाराने त्याच्या पत्नीची उपरोक्त योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी गैरअर्जदार कमांक 1 यांच्याकडे दिनांक 15/12/2008 रोजी प्रस्ताव दाखल केला.तदनंतर गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदाराचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीस्तव गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे पाठविला पुढे अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 याच्याकडे क्लेम मंजुरी संदर्भात विचारणा केली असता त्यास गैरअर्जदार कमांक 2 कडे संपर्क साधण्यास सांगण्यात आले.अर्जदाराने अनेक वेळा गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्याकडे सदरील दाव्या बाबत विचारणा केली असता त्यास समाधान कारक उत्तर दिले नाही गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी विनाकारण अर्जदाराचा विमादावा प्रलंबित ठेवला म्हणून अर्जदाराने मंचासमोर तक्रार दाखल करुन गैरअर्जदारांनी अर्जदारास रक्कम रु.1,00,000/- त्याच्या पत्नीच्या मृत्यू झाल्या तारखेपासून द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत द्यावेत तसेच अर्जदारांना मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.25000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.5000/- द्यावेत अशी मागणी मंचासमोर केली आहे. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.4/1 ते नि.4/12 व नि.20/1 ते नि.20/5 मंचासमोर दाखल केले. मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांना तामील झाल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हे नेमल्या तारखेस मंचासमोर हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरोधात एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला गैरअर्जदार क्रमांक 3 व गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी लेखी निवेदन अनुक्रमे नि.14 व नि.17 वर मंचासमोर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे.गैरअर्जदार क्रमांक 3 चे म्हणणे असे की, ते IRDA मान्यता प्राप्त विमा सल्लागार कंपनी म्हणून कार्यरत आहे.महाराष्ट्र शासनाने उपरोक्त योजनेखाली सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. प्रस्ताव सोबतच्या कागदपत्राची छाननी करणे व परिपूर्ण प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्याची जबाबदारी त्यांची आहे. त्यासाठी ते महाराष्ट्र शासनाकडून अथवा विमा धारकाकडून कोणतेही शुल्क किंवा मानधन स्वीकारीत नाही.पुढे त्यांचे म्हणणे असे की, श्री.केरबा गवळी याचा विमा दावा त्यांना मिळालेला नाही विनाकारण सदर प्रकरणात त्यांना गोवण्यात आल्यामुळे त्यांना या प्रकरणातून वगळण्यात यावे तसेच दाव्याच्या खर्चापोटी रक्कम रु.2000/- मिळावेत अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत.गैरअर्जदार क्रमांक 4 चे म्हणणे असे की, अर्जदाराचा प्रस्ताव त्यांना मिळालेला नाही त्यामुळे त्यास त्याच्या पत्नीच्या डेथक्लेमची रक्कम देण्याचा प्रश्नच उदभवत नाही.म्हणून अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करावा अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 4 ने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि.17 वर मंचासमोर दाखल केले आहे. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदारांनी लेखी निवेदनातून घेतलेला बचाव योग्य आहे काय ? नाही. 2 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी अर्जदारास त्रुटीची सेवा दिलेली आहे काय ? होय. 3 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे. अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराची पत्नी शेतकरी होती त्यामुळे ती महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत लाभार्थी होती.दिनांक 17/11/2008 रोजी तिचा मृत्यू सर्पदंशाने झाला अर्जदाराने त्याच्या पत्नीची उपरोक्त योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे प्रस्ताव दिनांक 15/12/2008 रोजी दाखल केला.तेव्हा पासून ते अद्याप पावेतो अर्जदाराचा प्रस्ताव प्रलंबीत आहे.अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.यावर गैरअर्जदार क्रमांक 3 चे म्हणणे असे की, श्री केरबा गवळी यांचा क्लेम त्यांना मिळालेला नाही.अशीच भुमिका गैरअर्जदार क्रमांक 4 ने देखील घेतलेली आहे. यावर मंचाचे असे मत आहे की, यात काहीतरी गफलत झालेली दिसते कारण केरबा गवळी यांच्या क्लेम संदर्भात सदरचा वाद नसून तो अर्जदाराची पत्नी मयत पद्मीनीबाई सायस गवळी हीच्या क्लेम संदर्भात आहे. अर्जदाराने नि.20/1 ते नि.20/4 वर गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दिनांक 08/10/2009, दिनांक 15/04/2010, दिनांक 14/12/2009, दिनांक 01/02/2010 रोजी पत्र पाठवून कागदपत्रांच्या अभावी अपूर्ण असलेल्या शेतक-याच्या प्रस्तावाची यादी दिलेली आहे व या यादी मध्ये अर्जदाराच्या मयत पत्नीचाही समावेश क्रमांक 1 ला करण्यात आलेला आहे. व Remarks या कॉलम खाली अपूर्ण व Requirement या सदरा कॉलम खाली काही कागदपत्रांची मागणी केल्याचे दिसते यात क्लेमफॉर्म तालुका कृषी अधिका-याचे पत्र 20 रु. स्टॅम्प, तलाठ्याचे प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र इ कागदपत्राची पुर्तता करण्यास सुचविण्यात आलेले आहे. वास्तविक पाहता नि.4/1 वर गैरर्जदार क्रमांक 1 ने गैरअर्जदार क्रमांक 3 ला दिनांक 16/12/2008 रोजी पाठविलेल्या पत्रात अर्जा सोबत काही कागदपत्र पाठविल्याचे म्हंटले आहे. ते जर कागदपत्र गैरअर्जदार क्रमांक 3 ला मिळालेले असतील तर पुन्हा तेच कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही.तसेच अशाच प्रकारची अनेक प्रकरण हाताळतांना मंचाच्या हे ही लक्षात आले आहे की, शासनाच्या परिपत्रकात नमुद केलेल्या कागदपत्रा शिवाय अनावश्यक कागदपत्राची मागणी विमा कंपनी करीत आहे.वास्तविक पाहता शासनाच्या परिपत्रकात नमुद केलेल्या कागदपत्राचीच मागणी गैरअर्जदारांनी करावी त्या व्यतिरिक्त कागदपत्राची मागणी गैरअर्जदार करत असतील ती मागणी गैर आहे.त्यामुळे आधी दिलेल्या कागदपत्रा व्यतिरिक्त व महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकात नमुद केलेले कागदपत्राची पुर्तता अर्जदाराने त्वरित करावी व प्रस्ताव मिळाल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 4 ने अर्जदाराचा प्रस्ताव मंजूर करावा असा आदेश देणे न्यायोचित होईल. तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 व यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडलेली दिसत नाही.अन्यथा कागदपत्राची पुर्तता अर्जदाराकडून करुन घेतली असती तर एव्हांना अर्जदारास त्याच्या न्याय हक्का पासून वंचीत रहावे लागले नसते.असे ही मंचास वाटते म्हणून वरील सर्व बाबीचा सारासार विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 आदेश कळाल्यापासून 15 दिवसांच्या आत अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकात नमुद केलेली उर्वरित कागदपत्रे संबंधिताकडे द्यावीत व गैरअर्जदार क्रमांक 4 याने अर्जदाराचा प्रस्ताव मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत त्याच्या पत्नीचा डेथक्लेम मंजूर करावा. 3 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी संयुक्तिकपणे सेवात्रुटी पोटी अर्जदारास रक्कम रु. 2,000/- आदेश कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत द्यावे. 4 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |