जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.25/2009. प्रकरण दाखल दिनांक – 23/01/2009. प्रकरण निकाल दिनांक – 20/04/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. मारोती नागनाथराव परबते वय वर्षे 48, व्यवसाय शेती, रा. खानापुर,ता. देगलूर जि.नांदेड. अर्जदार विरुध्द 1. तहसीलदार, तहसील कार्यालय, देगलूर ता. देगलूर जि. नांदेड. 2. व्यवस्थापक, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. स्टलिंग सिनेमा बिल्डींग, दुसरा मजला गैरअर्जदार 65 मर्झबान रोड, डि.ओ. 14 ख फोर्ट, मुंबई -400 001. 3. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत शाखा व्यवस्थापक, शाखा नगिना घाट रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.भुरे बी.व्ही. गैरअर्जदार क्र.1 तर्फे - स्वतः. गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे - अड.रियाझूल्लाखॉन निकालपत्र (द्वारा,मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष) गैरअर्जदार नॅशनल इन्शुरन्स कंपनी यांच्या ञूटीच्या सेवे बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार मारुती परबते हे मयत संदानंद परबते यांचे पिता आहेत.अर्जदारांचा मूलगा सदानंद हा दि.25.12.2006 रोजी मोटार सायकल क्र. एम.एच.26/पी-5671 वरुन खानापूरहून देगलूरकडे जात असताना पाठीमागे कस्तूरी ढाबा मौजे खानापूर शिवार जवळ देगलूर ते नांदेड रोडवर नांदेड कडून येणा-या ट्रॅव्हल्स क्र.एम.एच-26-बी-315 यांने त्यांना पाटीमागून धडक दिली यात तो जागीच मरण पावला. ट्रॅव्हल्स चालका विरुध्द गून्हा नंबर 179/2006 नोंदविला आहे. यात अर्जदाराने एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, दोषारोपपञ, पी.एम. रिपोर्ट, व मृत्यू प्रमाणपञ दाखल केलेले आहे. मयत सदानंद हा व्यवसायाने शेतकरी होता त्यांचे नांवाने गट नंबर 516 आणि क्षेञफळ 81 आर एवढी जमीन आहे यासाठी 7/12 नमूना नंबर 8 दाखल केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने शेतक-यासाठी विमा सूरक्षा अपघाती विमा योजना गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे काढली व त्यांचा प्रिमियम शासनाने भरलेला आहे. शेतक-यासाठी सर्व प्रकारची जोखीम स्विकारली आहे. पॉलिसीचा कालावधी दि.15.07.2006 ते दि.14.07.2007 असा आहे व घटना ही दि.25.12.2006 रोजीची आहे. शासनाच्या जीआर नुसार तलाठी सज्जा यांचेकडे अर्ज देऊन फॉर्म घेतला व दि.07.02.2007 रोजी तहसील कार्यालय देगलूर यांचेकडे क्लेम फॉर्म व आवश्यक कागदपञासह विम्याची रक्कम मिळण्यासाठी अर्ज दिला. अर्जदार हा ग्रामीण भागातील अडाणी असल्यामुळे व त्यांस सदर योजनेची माहीती नसल्यामूळे क्लेम दाखल करण्यास उशिर झाला. गैरअर्जदार क्र.2 यांनी बेकायदेशीररित्या कोणतेही कारण नसताना रिजेक्ट नो क्लेम म्हणून अर्जदारास कळविले. गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी दिली त्यामूळे विम्याची रक्कम रु.1,00,000/- त्यावर 12 टक्के व्याज, मानसिक ञासासाठी रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. दि.5.2.2006 रोजी तलाठी सज्जा यांनी अर्जदारांचा मूलगा सदानंद यांची खानापूर येथे गट नंबर 516 क्षेञफळ 0 हेक्टर 81 आर जमीन होती ही बाब खरी आहे. गैरअर्जदार क्र.1 ने दि.25.12.2006 रोजी अर्जदारास नूकसान भरपाई शेतकरी या नात्याने मयताचे वडील हे पाञ आहे असे लेखी कळविले आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडून नियमानुसार कागदपञाची पूर्तता करणेस कोणतीही टाळाटाळ केलेली नाही. गैरअर्जदार क्र.2 यांचे दि.15.05.2008 रोजीचे पञ गैरअर्जदार क्र.1 यांना मिळाले त्यात त्यांनी नो क्लेम केल्याचे कळविले आहे. अर्जातील क्लेम नंबर 13 व 14 मधील मजकूर कायदयावर आधारीत असल्यामूळे गैरअर्जदारा जवाब देण्याची गरज नाही असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. दि.25.12.2006 रोजी मयत सदानंद हा अपघातात मरण पावला हे त्यांना मान्य नाही. या प्रकरणात पोलिस स्टेशन व गून्हा नंबर 179/2006 यांची पण त्यांना माहीती नाही. शेतकरी अपघात विमा पॉलिसी व त्यांचा कालावधी हे गैरअर्जदारांना मान्य आहे परंतु नूकसान भरपाई देण्यास ते बांधील आहेत असे नाही. अर्जदाराने तहसिलदार यांचेकडे दि.07.02.2007 रोजी आपला दावा दाखल केला व गैरअर्जदाराने तो त्यांना उशिरा मिळाला या सबबीवर उशिरा मिळाला यामूळे ही तक्रार मूदतीत नाही. म्हणून अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द होय. करतात काय ? 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार हे मयत सदानंद यांचे वडील आहेत. वारसा हक्काप्रमाणे त्यांचे मूलाचे मृत्यूनंतर त्याबददल मिळणा-या फायदयासाठी ते वारस आहेत. त्यामूळे अशा प्रकारची तक्रार ते दाखल करु शकतात व फायदाही मागू शकतात. मयताचा उत्तराधिकारी म्हणून त्यांचे वडिलांना हिंदू एकञिक कूटूंबाअन्वये विम्याची रक्कम मागण्याचा अधिकार आहे. मयत सदानंद यांचे नांवावर 0.80 एवढे क्षेञफळ जमिन असल्याबददल गांव नमूना नंबर 7 दाखल केलेला आहे. यासोबत वारसा प्रमाणपञाची नोंद वही दाखल केली आहे. यात मृत भोगवटदाराचे किंवा इतर अधिकार धारकाचे नांव मध्ये सदानंद परबते यांचे नांव आहे. मयत सदानंद यांचा दि.25.12.2006 रोजी मोटार सायकलवरुन जात असताना अपघात झाला याबददल एफ.आय.आर. नंबर 179/2006 या प्रकरणात दाखल आहे. मयत सदानंद यांना ट्रव्हॅल्सने मागून धडक मारली त्यामूळे अपघात झाला यात काही सशंय नाही. गून्हा नोंदविला व घटनास्थळाचा पंचनामा केला याबददलचा पंचनामा या प्रकरणात दाखल आहे. तसेच मरणोत्तर पंचनामा व पी.एम. रिपोर्ट अर्जदाराने या प्रकरणात दाखल केलेले आहेत. पी.एम. रिपोर्ट प्रमाणे हेड इन्ज्यूरी व इतर अनेक जखमा असे मृत्यूचे कारण दर्शविले आहे. या पी.एम. रिपोर्टवर मेडीकल ऑफिसर सब डिस्ट्रीक्ट ऑफिसर देगलूर यांचे सही व शिक्का आहे. एवढे सर्व कागदपञ उपलब्ध असताना कबाल इन्शुरन्स कंपनी यांनी दि.09.03.2007 रोजी अपघाताबददल अनेक कागदपञाची मागणी केलेली आहे व दि.21.07.2007 रोजीच्या तहसिलदार देगलूर यंाचे पञानुसार त्यांनी मयत सदानंद यांचे दाव्यातील ञूटीची पूर्तता करुन प्रस्ताव परत पाठविला आहे. गैरअर्जदार यांना अर्जदार यांचेकडून पूर्ण प्रस्ताव प्राप्त झालेला आहे फक्त फरक एवढाच की, प्रस्ताव उशिराने प्राप्त झालेला आहे. अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जात सूरवातीलाच ते ग्रामीण भागातील व अडाणी असल्यामूळे व त्यांना सदर योजनेची मागणी नसल्यामूळे त्यांना क्लेम दाखल करण्यास उशिर झालेला आहे असे म्हटले आहे त्यांच्या म्हणण्यात तथ्यही आहे. ब-याच शेतक-यांना या योजनेची माहीती नसते व ते अशिक्षित असल्याकारणाने त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. त्यामूळे अशा प्रकारची मागणी करण्यास उशिर होतो. गैरअर्जदार कंपनीच्या नियमाप्रमाणे प्रस्ताव हा वेळेत आला पाहिजे असे जरी असले तरी योग्य कारण असल्यास तो विलंब माफ होऊ शकतो व अशा प्रकारचे नियम हे मॅन्डेंटरी नाहीत. याबददल निवाडे मा. राष्ट्रीय आयोगाने पण दिलेले आहेत. प्रस्ताव मंजूर करण्यास सर्व आवश्यक ते कागदपञ तसेच प्रस्तूत क्लेम फॉर्म भाग नंबर 1 या प्रस्तावासह अर्जदाराने दाखल केलेला आहे. ती सर्व कागदपञे प्रस्ताव मंजूर करण्यास पूरेशीही आहेत. गैरअर्जदाराने मृत्यू प्रमाणपञाची मागणी केलेली आहे. यात अर्जदाराने ते प्रमाणपञ दाखल केलेले नाही. असे जरी असले तरी पोलिस पंचनामा, पी.एम. रिपोर्ट, यावरुन त्यांचा मृत्यू व त्यांची दिनांक ही स्पष्ट झालेली आहे. त्यामूळे अशा प्रकारचे प्रमाणपञ जरी नसले तरी मृत्यत हा सिध्द होतो त्यामूळे गैरअर्जदार यांना आपल्या जबाबदारीतून मूक्त होता येणार नाही. गैरअर्जदार क्र.2 यांनी सर्व योग्य प्रस्ताव प्राप्त असताना विनाकारण फक्त प्रस्ताव उशिरा मिळाला हे कारण देऊन जबाबदारीतून मूक्त होण्याचा प्रयत्न केलेला आहे. मयत संदानंद यांचे मृत्यू बददल व दाव्या बददल श्रीदेवी मारुती परबते, शिवप्रेमा मारोती परबते, शिवानंद मारोती परबते,सौ.सरस्वती मारोती परबते (मयताची आई) या सर्वानी आपले शपथपञ दाखल केलेले आहेत. त्यात अर्जदारास नूकसान भरपाई देण्या बददल त्यांचा कोणताही आक्षेप नाही. म्हणून हे शपथपञ दिलेले आहेत. 2008 (2) ALL MR (JOURNAL) 13 Maharashtra State Consumer Disputes Redressal Commission Mumbai यांचे ICICI Lombard General Insurance Com. Ltd. Vs. Smt.Sindhubhai Khanderao Khairnar या केसमध्ये शेतकरी अपघात विमा योजना यात शेतक-याचा मृत्यू अपघाती झाला तो केवळ प्रस्ताव दाखल करण्यास उशिर झाला या कारणावरुन विमा कंपनीने दावा नाकारला होता. यावर Moreover such time limit not found to be mandatory असे म्हणून ग्राहक मंचाने मंजूर केलेला क्लेम योग्य आहे असे म्हटले आहे. निश्चितच गैरअर्जदार यांनी विम्याची रक्कम न देऊन सेवेत ञूटी केलेली आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांची तक्रार मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना विम्याची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर प्रकरण दाखल केलेल्या दिनांकापासून म्हणजे दि.19.02.2009 पासून 9 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह दयावेत. 3. मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्री. सतीश सामते) अध्यक्ष. सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्री. सतीश सामते) अध्यक्ष. सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक.
|