Maharashtra

Nanded

CC/09/44

Sarswatibai Govind Kadam - Complainant(s)

Versus

Thasildhar,Thasil Office,Ardhapur. - Opp.Party(s)

Adv.Bhure B.V.

13 Aug 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/44
1. Sarswatibai Govind Kadam R/o Khodha Tq.Ardapure Dist.NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Thasildhar,Thasil Office,Ardhapur. Aradhapure Tq.Aradhapure.Dist.Nanded.NandedMaharastra2. Directer,National Insurance Company Limited,Mumbai.2nd Flower,65 Muzeban road,D.O.14 kh,Fourt-Mumbai.01.NandedMaharastra3. National Insurance Company Limited,Nanded.Branch Manger,Nagina Ghata Nanded.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 13 Aug 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :2009/44
                    प्रकरण दाखल तारीख -   10/02/2009     
                    प्रकरण निकाल तारीख    13/08/2009
 
समक्ष   मा.श्री.सतीश सामते.             - अध्‍यक्ष प्र
         मा.श्रीमती सुजाता पाटणकर              -  सदस्‍या
                
 
 
सरस्‍वतीबाई भ्र.गोविंद कदम,
वय वर्षे 37, व्‍यवसाय शेती,                                अर्जदार.
रा. कोंढा ता.अर्धापुर जि.नांदेड.
 
      विरुध्‍द.
 
1.   तहसीलदार,
तहसील कार्यालय,अर्धापुर,                         गैरअर्जदार.
     ता.अर्धापुर जि.नांदेड.
2.   व्‍यवस्‍थापक,
     नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि,
     स्‍टलिंग सिनेमा बिल्‍डींग,दुसरा मजला,
     65 मर्झबान रोड, डी.ओ.14, ख फोर्ट,
     मुंबई- 400 001.
3.   नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि,
     मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक,
     शाखा नगीना घाट रोड, नांदेड.
4.   कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि.
     मार्फत व्‍यवस्‍थापक,
     शॉप नं. 2 कॅनाट गार्डन टाऊन सेंटर,
     सिडको, औरंगाबाद.
 
अर्जदारा तर्फे वकील            -  अड.भुरे बी.व्‍ही.
गैरअर्जदार क्र 1                -   स्‍वतः
गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे       -   अड.जी.एस.औंढेकर.
गैरअर्जदार क्र. 4 तर्फे           -    स्‍वतः
 
निकालपञ
(द्वारा-मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्‍या)
 
          अर्जदार यांची तक्रार थोडक्‍यात अशी की, अर्जदार ही गोविंद पि.सिताराम कदम यांची पत्‍नी आहे जे की, दि.17/02/2007 रोजी गोविंद कदम मोटर सायकल क्र. एम.एच.39/ए-2836 ने नांदेडहुन कोंढा येथे जात असतांना नांदेड ते अर्धापुर रोडवर भोकर फाटयाजवळ समोरुन वारंगाकडुन नांदेडकडे जाणारा ट्रक एमएच31/एपी-7155 ने धडक दिल्‍यामुळे गोविंद पि.सिताराम कदम यांचा जागेवरच मृत्‍यु झाला. पोलिस स्‍टेशन अर्धापुर यांनी गुन्‍हा क्र.7/07 नुसार ट्रक चालका विरुध्‍द नोंदविला व साक्षीदाराचे बयान घेतले. अर्जदाराने संबंधीत घटने बाबतचे एफ.आय.आर,स्‍थळ पंचनामा व पी.एम.रीपोर्ट मरणोत्‍तर पंचनामा इ. दस्‍तऐवज दाखल केलेले आहेत. मयत गोविंद कदम हे व्‍यवसायाने शेतकरी होते, त्‍यांच्‍या नांवे मौजे कोंढा ता.अर्धापुर येथे गट नं.369 क्षेत्र एक हेक्‍टर सहा आर जमीन गट नं.379 क्षेत्र 52 आर जमीन होती व त्‍या जमीनीचे मालक व ताबेदार होते. अर्जदाराने सदरील शेतीचा 7/12 उतारा, नमुना नं. 8 चा उतारा व 6 क चा उतारा दाखल केला आहे. महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्रातील शेतक-यांचे, शेतक-यांना विमा संरक्षण देण्‍यासाठी शेतक-यांचे शेतकरी अपघात विमा योजना गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे काढली व त्‍याचे प्रिमियम गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे भरली. गैरअर्जदार क्र. 2 यांनी विमा घेते वेळेस सर्व प्रकारची जोखीम स्विकारली व विमा शेतक-याच्‍या हक्‍कात दिला. गैरअर्जदार क्र. 4 हे गैरअर्जदार क्र. 2 व 3 ची सल्‍लागार कंपनी आहे. अर्जदाराचा पती हा शेतकरी होता व त्‍याचे प्रिमीयम महाराष्‍ट्र शासनाने भरलेले आहे व तो लाभार्थी आहे. म्‍हणुन अर्जदाराचा पती हा गैरअर्जदार क्र. 2 याचा ग्राहक आहे. सदरील पॉलिसीचा कालावधी हा दि.15/07/2006 ते 14/07/2007 असा आहे व घटना ही दि.17/02/2007 ची आहे. अर्जदाराने महाराष्‍ट्र शासनाच्‍या जी.आर.नुसार आपल्‍या पतीच्‍या मृत्‍युनंतर दि.29/03/2007 रोजी तलाठी यांचेकडे अर्ज देवून क्‍लेम फॉर्म घेतले व दाखल केले व त्‍यानंतर दि.04/04/2007 रोजी तहसील कार्यालय अर्धापुर यांना विनंती अर्ज व क्‍लेम फॉर्म व सर्व आवश्‍यक कागदपत्रसह दाखल करुन विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी अर्ज केला. अर्जदाराने आपल्‍या पतीच्‍या मृ्त्‍यूनंतर क्‍लेम दाखल केल्‍यानंतर गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे सन 2007 पासुन विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी अनेकवेळा तोंडी विनंती केली असता, तुमचा क्‍लेम आम्‍ही वर पाठवला आहे, लवकरच होईल म्‍हणुन नुसते आश्‍वासन देत राहीले व आज या उद्या या म्‍हणुन टाळाटाळ करीत राहीले व अर्जदारास कोणत्‍याही प्रकारची रक्‍कम दिलेली नाही व सदरील रक्‍कम मिळण्‍यास अर्जदार हे हक्‍कदार आहेत. म्‍हणुन अर्जदाराने दि.08/05/2008 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठवुन नुकसान भरपाई मिळण्‍याची मागणी केली व ती नोटीस त्‍यांना मिळाली तरी अर्जदारास कोणत्‍याही प्रकारची नुकसान भरपाई दिलेली नाही. अर्जदार ही विधवा स्‍त्री असुन ती प्रस्‍तुत पॉलिसीनुसार नुकसान भरपाई मिळण्‍यास हक्‍कदार असुन गैरअर्जदार यांनी कोणत्‍याही प्रकारचा विलंब न लावता विम्‍याची रक्‍कम अर्जदारास देणे बंधनकारक असतांना बेकायदेशिरपणे टाळाटाळ करुन सेवेत त्रुटी केली आहे. म्‍हणुन अर्जदाराची मागणी आहे की, विमा पॉलिसीची रक्‍कम रु.1,00,000/- शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- तसेच दावा खर्चापोटी रु.5,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत.
          गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस देण्‍यात आली त्‍यांनी हजर होऊन आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. त्‍यांचे म्‍हणणे असे की, अर्जदार हे मयत गोविंद कदम यांची पत्‍नी असल्‍याची बाब मान्‍य आहे. अर्जदाराचे पती गोविंद कदम हे दि.17/02/2007 रोजी नांदेड अर्धापुर रोडवर भोकर फाटयाजवळ ट्रकने धडक दिल्‍यामुळे मयत झाले हे त्‍यांना मान्‍य आहे. सदर घटनेची पोलिस स्‍टेशन अर्धापुरला गुन्‍हा क्र. 7/07 नुसार नोंद झाली आहे. त्‍यांच्‍या कार्यालयाच्‍या अभिलेखानुसार मयत गोविंद सिताराम यांचे नांवे मौजे कोंढा येथे गट क्र.369 मध्‍ये 1 हेक्‍टर 6 आर, गट क्र.379 मध्‍ये 52 आर जमीन आहे. महाराष्‍ट्र शासनाच्‍या अध्‍यादेशानुसार अर्जदाराने त्‍यांचे पती गोविंद कदम यांचे मृत्‍युनंतर तलाठी मार्फत क्‍लेम फॉर्म, पोष्‍ट रिपोर्ट,7/12 उतारा, एफ.आय.आर. इत्‍यादी आवश्‍यक कागदपत्र कार्यालयात सादर केले आहे. सदर अर्ज आवश्‍यक त्‍या बाबींची पुर्तता करुन या कार्यालयाचे पत्र क्र.2007/लेखा/शे.व्‍य.अवियो/ प्र.क्र. दि.20/07/2007 द्वारे कबाल इन्‍शुरन्‍लस औरंगाबाद येथे दि.25/07/2007 रोजी पाठविण्‍यात आला आहे. विमा कंपनी ही सेवा पुरवठादार कंपनी असल्‍याने अर्जदाराने प्रस्‍तुत दाव्‍यात फक्‍त त्‍यांनाच पार्टी करणे आवश्‍यक असतांना गैरअर्जदार क्र. 1 म्‍हणुन या कार्याल्‍यास पार्टी केले आहे. अर्जदाराचा विमा क्‍लेम, अर्ज विमा कंपनीकडे पाठविण्‍यात या कार्यालयाकडुन कोणतीही उणीव राहीलेली नसल्‍याने प्रस्‍तुत प्रकरणांत तहसिलदार अर्धापुर यांना विनाकारण पार्टी करण्‍यात आले आहे ते चुकीचे आहे. त्‍यामुळे प्रस्‍तुत प्रकरण नामंजुर करुन सदर दाव्‍यातुन या कार्यालयास वगळणे योग्‍य आहे. अर्जदाराने केलेली इतर सर्व विपरीत विधाने नाकबुल करुन अर्जदाराचा अर्ज नामंजुर करावा आणि त्‍यांना या प्रकरणांतुन वगळण्‍यात यावे अशी विनंती केली आहे.
                   गैरअर्जदार क्र. 2 व 3 हे वकीला मार्फत हजर झाले. त्‍यांनी आपले लेखी निवेदन दाखल केले आहे. त्‍यांचे म्‍हणणे असे की, तक्रारीमध्‍ये केलेले सर्व आरोप खोटे असुन सदरीची तक्रार फेटाळण्‍यात यावी. त्‍यांनी सेवेमध्‍ये कोणतीही कमतरता केलेली नाही. त्‍यांना हे मान्‍य नाही की, अर्जदार हा मयताचा अधिकृत वारस आहे. ज्‍या दिवसी अपघात झाला त्‍या वेळेस वाहक हा निष्‍काळजीपणे वाहन चालवत होता.   मयत गोविंद कदम हा शेतकरी असल्‍याबद्यल कोणताही पुरावा दाखल केलेला नाही.   मयताचा मृत्‍यु हा पॉलिसीच्‍या अटीमध्‍ये बसत नाही. गैरअर्जदार क्र. 3 यांना पॉलिसीचा हप्‍ता मिळालेला नाही. त्‍यामुळे तक्रार दाखल करण्‍याचा अर्जदार यांना अधिकार नाही. वरील सर्व बाबींचा विचार करता, अर्जदाराची तक्रार ही खोटी असुन गैरअर्जदार यांना त्रास देण्‍याचे हेतुने दाखल केलेली आहे. त्‍यामुळे सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी.
          गैरअर्जदार क्र. 4 हे पोष्‍टाद्वारे आपले म्‍हणणे दाखल केलेले आहे. त्‍यांचे म्‍हणणे असे की, ते IRDA Approved Insurance Advisor Company appointed as a consultant by Govt. of Maharashtra  व यासाठी ते शासनाकडुन कोणतीही रक्‍कम मानधन म्‍हणुन देखील स्विकारत नाहीत. त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द दावा चालु शकत नाही. अर्जदार यांचा क्‍लेम त्‍यांचेकडे दि.18/09/2007 रोजी तहसिलदार यांचेकडुन आला. त्‍यानंतर सदरचा क्‍लेम गैरअर्जदार क्र. 4 यांनी पुढील कार्यवाहीसाठी नॅशनल इंशुरन्‍सकडे दि.15/10/2007 रोजी पाठवलेला आहे. गैरअरर्जदार क्र. 4 यांचे काम मध्‍यस्‍थ करणे व शेतक-यांच्‍या प्रस्‍तावाची छाननी करणे व योग्‍य त्‍या शिफारशीसह इन्‍शुरन्‍स कंपनीकडे पाठवीणे एवढेच आहे. त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दचा दावा खारीज करावा.
     अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद, त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्र तसेच गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांचे लेखी म्‍हणणे, शपथपत्र याचा विचार होता, खालील मुद्ये उपस्थित होतात.
          मूददे                                  उत्‍तर
 
      1. अर्जदार गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ?           होय.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये
   कमतरता केली आहे काय  ?                          होय.
   3. काय आदेश ?                        अंतिम आदेशाप्रमाणे.
                            कारणे
मूददा क्र.1 -
      अर्जदार यांचे मयत पती यांची गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजना पॉलिसी अंतर्गत पॉलिसी घेतलेली आहे. सदर शेतकरी अपघात विमा योजना यांचा प्रिमियम गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे भरलेला आहे. सदरची बाब गैरअर्जदार यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये व शपथपञामध्‍ये नाकारलेली आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेले कागदपञे यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
         अर्जदार यांचा विमा क्‍लेम गैरअर्जदार क्र. 1 यांनी गैरअर्जदार क्र. 4 यांचेकडे पाठवलेला आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कोणतीही कमतरता केलेली नाही, असे या मंचाचे मत आहे. सबब त्‍यांचे विरुध्‍द कोणतेही आदेश नाही.   गैरअर्जदार क्र. 4 यांनी अर्जदार यांचा विमा क्‍लेम गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचेकडे पाठवलेला आहे. त्‍यामुळे त्‍यांचेकडुन सेवा देण्‍यामध्‍ये कोणतीही कमतरता झालेली नाही, असे या मंचाचे मत आहे, सबब त्‍यांचे विरुध्‍दही कोणतेही आदेश नाही.
 
मूददा क्र.2 ः-
          अर्जदार यांचा विमा क्‍लेम गैरअर्जदार क्र.1 यांनी  गैरअर्जदार क्र.4 कबाल इन्‍शूरन्‍स यांचेकडे पाठविलेला आहे. गैरअर्जदार क्र. 4 यांनी अर्जदार यांचा विमा क्‍लेम पुढील कार्यवाहीसाठी गैरअर्जदार क्र.2 कडे पाठवलेला आहे, असे गैरअर्जदार क्र. 4 यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये नमुद करण्‍यात आलेले आहे. अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी या मंचामध्‍ये क्‍लेम फॉर्म, गांव नमुना, 6 क चा उतारा, एफ.आय.आर. घटनास्‍थळ पंचनामा, मरणोत्‍तर पंचनामा, शिधापत्रीकेची झेरॉक्‍स प्रत इ. कागदपत्र या अर्जाचे कामी या मंचामध्‍ये अर्जासोबत दाखल  केलेली आहे. दि.31/07/2009 रोजी कागद यादीने अर्जदार यांनी 7/12 चा उतारा आणि दि.11/08/2009 चे कागद यादीसोबत फेरफारची नक्‍कल दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्र. 3 यांच्‍या लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये अर्जदार यांचा विमा क्‍लेम नाकारलेला नाही. त्‍यामुळे अर्जदार यांची तक्रार ही मुदतपुर्व अशी आहे. त्‍यामुळे ती नाकरण्‍यात यावी असे म्‍हटलेले आहे. अर्जदार हे शेतकरी नाही तसे दर्शवीणारा 7/12 चा उतारा अर्जदार यांनी दिलेला नाही. त्‍यामुळे ते शेतकरी अपघात विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पात्र नाहीत. गैरअर्जदार क्र. 4 यांनी त्‍यांच्‍या लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये अर्जदार यांचा विमा क्‍लेम गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे, असे नमुद केलेले आहे.  अर्जदार यांनी त्‍यांचे लेखी यूक्‍तीवादा सोबत शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजना सन 2006-07 चे परिपञक या अर्जाचे कामी या मंचामध्‍ये दाखल केलेले आहे. सदर परिपञकाचे अवलोकन केले असता शेतकरी अपघात विमा योजना प्रस्‍ताव विहीत कागदपञासह विमा योजनेच्‍या कालावधीत केव्‍हाही प्राप्‍त झाला तरी तो घेणे बंधनकारक राहील. दूर्घटना सिध्‍द होत असेल व अपवादात्‍मक परिस्थितीत एखादया कागदपञाची पूर्तता होऊ शकत नसेल तर पर्यायी दाखला पाहता शासनाशी विचारविनिमय करुन पूर्तता करुन घेऊन नूकसान भरपाई अदा करावी. प्रस्‍ताव तांत्रिक मुद्यावर फेटाळला जाणार नाही या बाबत दक्षता घ्‍यावी व योजनेची परीणामकारक अंमलबजावणी होण्‍याचे दृष्‍टीने तातडीने कार्यवाही करावी असे नमूद केलेले आहे. सदर परिपञकामध्‍ये अपघाताचे स्‍वरुप अपघाती मृत्‍यु असेल तर वैक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळतील असे नमुद केलेले आहे.  सदर परिपञकाचा व त्‍यामधील बाबीचा विचार करता, अर्जदार यांनी या मंचामध्‍ये दाखल केलेल्‍या कागदपञाची छाननी करुन गैरअर्जदार यांनी योग्‍य ती कारवाई करणे न्‍याय व आवश्‍यक असे होते. परंतु गैरअर्जदार यांनी या मंचामध्‍ये हजर झाल्‍यानंतरही विमा क्‍लेम देणे बाबत कोणतेही प्रयत्‍न केलेले नाहीत यांचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
          अर्जदार यांनी लेखी यूक्‍तीवादामध्‍ये सदर अर्जाचे कामी 2000 (I) Suprem Court Cases, page no. 98, Regional Provident Fund Commissioner Vs Shivkumar Joshi या वरिष्‍ठ कोर्टाचे निकालपञाप्रमाणे अर्जदार हे लाभार्थी ग्राहक आहेत. फेअर इंजिनिअरिंग प्रा.लि. विरुध्‍द एन.के.मोदी या निकालपञाप्रमाणे न्‍यायमंचास सदरचे प्रकरण हाताळण्‍याचा अधिकार आहे. संजय काबडिया विरुध्‍द मिताली घोष 2008 या निकालपञाप्रमाणे ग्राहक मंचास सदरचे प्रकरण चालविण्‍याचे कार्यक्षेञ आहे. श्रीमती शांती विरुध्‍द मे. इन्‍सल हौऊसिंग अन्‍ड कन्‍स्‍ट्रक्‍शन लि. या निकालपञाप्रमाणे अधिकार क्षेञावर बंधन घालण्‍यात आलेले आहे ते अवैध आहे. 2008 (II) ALL MR (JOURNAL) 13 ICICI Lombard General Insurance Co. Ltd. Vs. Smt. Sidhubai Khanderao Khairnar या वरिष्‍ठ कोर्टाचे निकाल पञाप्रमाणे अर्जदार यांचे अर्जास मूदतीची बाधा येत नाही. या निकालपत्रांचा उल्‍लेख केलेला आहे. 
 
          अर्जदार यांनी या अर्जाचे कामी या मंचामध्‍ये दाखल केलेल्‍या कागदपञाचे अवलोकन केले असता शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत अर्जदार यांनी विमा क्‍लेमची रक्‍कम गैरअर्जदार यांना अदा करणे आवश्‍यक असे होते परंतु गैरअर्जदार यांनी विमा क्‍लेमची रक्‍कम दिली नाही म्‍हणून अर्जदार यांना या मंचामध्‍ये अर्ज दाखल करावा लागलेला आहे व त्‍या अनुषंगाने खर्चही करावा लागलेला आहे यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडून मानसिक ञासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम वसूल होऊन मिळण्‍यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे.
          अर्जदार यांचे पतीचा मृत्‍यू दि.17.02.2007 रोजी मोटर सायकल अपघातामध्‍ये जागेवरच मृत्‍यु झालेला आहे. तसे दर्शवणारा एफ.आय.आर.घटनास्‍थळ पंचनामा, मरणोत्‍तर पंचनामा, अर्जदार यांनी या मंचामध्‍ये अर्जासोबत दाखल केलेला आहे. शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये मृत्‍युचे कारण Head injuary maltipal skull totall brain lost  असे नमुद केलेले आहे. सदर शवविच्‍छेदन अहवालावर वैद्यकिय अधिकारी यांची सही व शिक्‍का आहे.  प्रस्‍तुतचे कागदपत्रानुसार अर्जदार यांना विमा क्‍लेमची रक्‍कम रु.1,00,000/- मिळणे आवश्‍यक होते परंतु ती रक्‍कम आज अखेर मिळाली नाही. त्‍यामूळे रक्‍कम रु.1,00,000/- एवढया रक्‍कमेस अर्जदार यांना वंचित राहावे लागलेले आहे. गैरअर्जदार या मंचामध्‍ये दि.16/03/2009 रोजी सदर अर्जाचे कामी हजर राहीलेले आहे. त्‍यानंरतही दाखल कागदपत्रानुसार गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना विमा क्‍लेमची रक्‍कम देण्‍याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्‍यामूळे अर्जदार हे सदर रक्‍कम रु.1,00,000/- वर व्‍याज अर्थिक नुकसानी पोटी दि.16/03/2009 पासुन गैरअर्जदार यांचेकडून वसूल होऊन मिळण्‍यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे.
          अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेला लेखी यूक्‍तीवाद व लेखी यूक्‍तीवादात नोंद केलेली वरिष्‍ठ कोर्टाची निकालपञे व गैरअर्जदाराचे लेखी म्‍हणणे, शपथपञ व त्‍यांचे तर्फे वकीलांनी केलेला तोंडी युक्‍तीवाद यांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.
                             आदेश
          अर्जदार यांचा अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.
          आजपासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी
          अर्जदार यांना खालील प्रमाणे रक्‍कमा दयाव्‍यात.
 
1.   विमा क्‍लेमची रक्‍कम रु.1,00,000/- दयावेत,सदर रक्‍कमेवर दि.16.3.2009 पासून प्रत्‍यक्ष रक्‍कम पदरीपडेपर्यत 9 टक्‍के व्‍याजासह होणारी रक्‍कम अदा करावी.
2.   मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दाव्‍याच्‍या खर्चापोटी
रु.1,000/- मंजूर करण्‍यात येतात.
3.  गैरअर्जदार क्र.1 व 4 यांचे विरुध्‍द आदेश नाही
4.   पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
(श्रीमती सुजाता पाटणकर)                  (श्री.सतीश सामते)  
            सदस्‍या                                      अध्‍यक्ष प्र  
 
 
 
 
गो.प.निलमवार,
लघुलेखक.