निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 30/08/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 06/09/2010 तक्रार निकाल दिनांकः- 07/03/2010 कालावधी 06 महिने01दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. विजयमाला भ्र.मारोती लिपणे अर्जदार वय सज्ञान धंदा शेती व घरकाम, अड.अरुण डि.खापरे रा.साळेगाव ( ह.मु.कावी ता.जिंतूर ) जि.परभणी. विरुध्द 1 तहसिलदार. एकतर्फा तहसिल कार्यालयसेलू ता.सेलू जि परभणी. 2 मे.कबाल इंशुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. (स्वतः) भास्करायन एच.डि.एफ.सी.होम लोन बिल्डींग, प्लॉट क्रमांक 7 सेक्टर ई 1 टाऊन सेंटर, सिडको, औरंगाबाद. 3 रिलायन्स जनरल इंशुरन्स कं.लि. अड.गोपाल दोडीया 570 रेक्टीफायर हाऊस इंदो रिजीन इलेक्ट्रीक लिमीटेड, नायगम क्रॉस रोड पनेक्स्ट टू रॉयल इंडस्ट्रीयल इस्टेट, वडाळा ( वेस्ट ) मुंबई. ----------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- (निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे.अध्यक्ष.) शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारी नुकसान भरपाई मयत शेतक-याच्या वारसाना देण्याचे विमा कंपनीने नाकारुन त्रूटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराचीथोडक्याततक्रारअशीकी, अर्जदाराचा पती मारोती सौदाजी लिपणे रा. साळेगांव ह.मु.कावी ता.जिंतूर हा शेती व्यवसाय करीत होता. त्याच्या मालकीची गट क्रमाक 161 ही शेतजमीन आहे महाराष्ट्रशासनानेराज्यातीलसंपूर्णखातेदारशेतक-यांचागैरअर्जदारक्रमांक3यानीपुरस्कृतकेलेल्याशेतकरीअपघातविमायोजने अंतर्गतविमाउतरविलेलाहोतात्यापॉलीसीचाअर्जदाराचा पती हा देखीललाभार्थीहोतातारीख26.03.2008रोजीमुलीच्या सोयरीकीसाठी टेम्पोने जात असताना रस्त्यात टेंम्पो पलटी झाल्याने अपघातात अर्जदाराचा पती मारोती सौदाजी लिपणे जबर जख्मी होवून मयत झाला होता. अपघाताची खबर पोलीस स्टेशनला दिल्यावर पोलीसानी गुन्हा नोंद करुन घटना स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा केला तसेच मयत मारोतीचे पोष्टमार्टम सरकारी दवाखान्यात केले. त्यानंतर अर्जदाराने तहशीलदार यांचेतर्फेमयत पतीचे मृत्यूपश्चात तिला शेतकरीअपघातविम्याचीनुकसानभरपाईमिळणेसाठीपी.एम.रिपोर्ट, पोलीस पेपर्स व इतर आवश्यक ती कागदपत्रे दिनांक 22/04/2008 रोजी सपूर्त केली त्यानंतर 29.04.2008 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 ने गैरअर्जदार क्रमांक 2 कडे कागदपत्रे व क्लेम प्रस्ताव पाठविला परंतू गैरअर्जदारानी नुकसान भरपाईची रक्कम देण्याची व्यवस्था केली नाही व सेवेतील त्रूटी करुन मानसिक त्रास दिला व नुकसान भरपाई मिळण्याच्या लाभापासून वंचीत ठेवले म्हणून ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदाराकडून रुपये 100000/- द.सा.द.शे. 18 % व्याजासह मिळावेत विमा नुकसान भरपाई मिळावी मानसिक त्रासापोटी रुपये 25000/- व अर्जाचा खर्च रुपये 5000/- मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रारअर्जाचेपुष्टयर्थअर्जदारानेआपलेशपथपत्र(नि. 2) वपुराव्यातीलकागदपत्रातनि. 4लगतएकूण17कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 यानी मंचाची नोटीस स्विकारुनही नेमलेल्या तारखेस हजर झाले नाही अथवा लेखी म्हणणे सादर करण्याची व्यवस्था केली नाही म्हणून त्यांचेविरुध्द दिनांक 04.01.2011 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 2 ने पोष्टामार्फत पाठविलेला आपले लेखी म्हणणे प्रकरणात दिनांक 14.10.2010 रोजी नि. 6 वर समाविष्ठ केले. गैरअर्जदार क्रमांक 3 यानी दिनांक 06/12/2010 रोजी आपला लेखी जबाब ( नि.13) सादर केला. गैरअर्जदार क्रमांक 2 यानी आपल्या लेखी जबाबात (नि.6) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई दावा क्लेम संदर्भातील कागदपत्रांची विमा कंपनीकडे आवश्यक ती पूर्तता व छाननी करण्यासाठी शासनाने त्याना मध्यस्थ सल्लगार म्हणून नेमलेले आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्यांचेकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत देविदास सौदाजी लिपणे रा.कावी ता.जिंतूर या नावाची विमा क्लेमची कागदपत्रे तहशीलदाराकडून दिनांक 19/05/2008 रोजी मिळाली होती परंतू मारोती सौदाजी लिपणे हा अपघातात मयत झाल्याचे कागदपत्रातून दिसून येत असल्याने देविदास व मारोती हे एकाच व्यक्तिचे नावे आहे किंवा काय असा संभ्रम पडला आहे. क्लेम फॉर्मसोबत पाठविलेल्या कागदपत्रात पि.एम.रिपोर्ट, फेरफार नमुना नं. 6 ड च्या सर्टीफाईट कॉपी नसल्यामुळे त्याची पूर्तता करण्यासाठी अर्जदारास तहशीलदार जिंतूर मार्फत दिनांक 21.05.2008 रोजी कळविले होते त्यानंतर ही पुन्हा दिनांक 30.07.2008 तारीख 10.11.2008 तारीख 20.03.2009 रोजी स्मरणपत्रे पाठविली होती त्यानंतर तारीख 21ञ06.2009 रोजी क्लेम प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविला तो मंजूरीसाठी प्रलंबित आहे. सबब सबब गैरअर्जदार क्रमांक 2 याना या प्रकरणातून वगळावे अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबासोबत अर्जदाराकडून कागदपत्रांची पूर्तता करण्या संबंधी वेळोवेळी पाठविलेल्या स्मरणपत्राच्या छायाप्रती ( नि. 7 ते 10 ) पुराव्यात दाखल केलेल्या आहेत. गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने आपल्या लेखी जबाबात ( नि.13) तक्रार अर्जातील सर्व विधाने साफ नाकारुन अर्जदारानी खोटी व बोगस तक्रार केली असल्याने ती फेटाळण्यात यावी असे म्हटलेले आहे. कबाल इन्शुरन्स ब्रोकरजे यांचेकडे अर्जदाराच्या मयत पतीच्या विमा क्लेमची कोणतीही कागदपत्रे पाठविलेली नाही असे असताना अर्जदारानी प्रस्तूतची तक्रार ग्राहक मंचात दाखल करुन गैरअर्जदारावर खोटे अक्षेप घेतलेले आहे त्याच्याकडून कोणतेही प्रकारे सेवा त्रूटी झालेली नाही शिवाय तक्रार अर्जही कायदेशीर मुदतीत नाही याही कारणास्तव फेटाळण्यात यावा. गैरअर्जदार क्रमांक 3 यानी तक्रार अर्जात अर्जदाराचा पतीचे नावे असलेल्या शेत जमिनीच्या सबंधातील मजकूर अपघाता संबधीचा मजकूर व इतर सर्व विधाने वैयक्तिक माहिती अभावी साफ नाकारली आहे. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत विमा पॉलीसी संबधीची कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाही ती सादर करणे आवश्यक आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 यानी तहशीलदार यानी गेरअर्जदार क्रमांक 2 याचेकडे दिनांक 29.04.2008 रोजी अर्जदाराच्या मयत पतीचा नुकसान भरपाई विमा प्रस्ताव पाठविलेला होता हे तक्रार अर्जातील विधान ही विमा कंपनीने नाकारले. मयत मारोती लिपणे याचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यापैकी कोणाकडेही आलेला नाही त्यामुळे अर्जदाराला नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. असे त्यांचे म्हणणे आहे. अर्जदारानी गैरअर्जदार क्रमांक 1 ची सगनमत करुन ही तक्रार ग्राहक मंचात दाखल केलेली आहे. ती खर्चासह फेटाळण्यात यावी अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 3 चे शपथपत्र ( नि.14) दाखल केले आहे. तक्रार अर्जाचे अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड खापरे व गैरअर्जदार क्रमांक 3 यांचेतर्फे अड दोडीया यानी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्ये. मुद्ये उत्तर 1 गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांचेकडून अर्जदाराच्या विमा क्लेमची नुकसान भरपाई देण्याचे बाबतीत सेवा त्रूटी झाली आहे काय ? होय 2 अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय 3 निर्णय ? अंतिम आदेशाप्रमाणे . कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराचा पती मयत मारोती सौदाजी लिपणे शेतकरी विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदारानी पुराव्यात सादर केलेल्या नि. 4/5 वरील होल्डींग प्रमाणपत्र नि 4/7 वरील फेरफार नमुना नं. 6-ड चा उतारा नि.4/4 वरील 7 X 12 नि. 4/13 वरील फेरफार उतारा, नि. 4/3 वरील तलाठयाचे प्रमाणपत्र या कागदपत्रातील नोंदीतून शाबीत झाले आहे दिनांक 26.03.2008 रोजी मयत मारोती सौदाजी लिपणे याचा वाहन अपघातात मृत्यू झाला ही वस्तूस्थिती पुराव्यातील नि. 4/10 वरील जिंतूर पोलीस ठाणे अ.मृ रजि.नं. 43/08 प्रमाणे पोलीस स्टेशनला दिलेली खबर, (एफ.आय.आर.) ,नि.4/14 वरील पोलीस पाटीलांचे प्रमाणपत्र, नि.4/9 वरील घटनास्थळ पंचनामा नि. 4/11 वरील मयताचा प्रोव्हीजनल पि.एम.रिपोर्ट या पुराव्यामधील नोंदीतून ही शाबीत झालेले आहे. यावरुन अर्थातच मयत मारोती लिपणे याचा अपघाती मृत्यू झालेला होता हे स्पष्ट होते. मयत मारोती सौदाजी लिपणे हा शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे अर्जदाराने तहशीलदार जिंतूर यांचेकडे विम्याची नुकसान भरपाई रुपये 1 लाख मिळणेसाठी शासनाच्या परिपत्रकामध्ये नमूद केलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर केलेली होती असे तक्रार अर्जात म्हंटले आहे.त्याच्या छायाप्रती अर्जदाराने पुराव्यात नि. 4 लगत दाखल केलेल्या आहेत. याउलट गैरअर्जदार क्रमांक 2 यानी आपल्या लेखी जबाबामध्ये क्लेम फॉर्म सोबत पाठविलेली कागदपत्रे अपूर्ण होती असे म्हटले आहे. अपु-या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तहसिलदार जिंतूर यांना 21/05/2008 ,30/07/2008 , 11/11/2008 आणि 20.03.2009 रोजी जी स्मरणपत्रे पाठविलेली होती त्याच्या छायाप्रती पुराव्यात ( नि.7 ते नि.10 ) दाखल केलेल्या आहेत. परंतू त्या स्मरणपत्रामध्ये मयत देविदास सौदाजी लिपणे या नावाचा उललेख केलेला दिसतो. वास्तविक पणे अपघातात मरण पावलेली व्यक्ति मारोती सौदाजी लिपणे असताना व पुराव्यातील इतर कागदपत्रातून देखील मारोती लिपणे याच नावाचा उल्लेख दिसत असताना गैरअर्जदार क्रमांक 2 याना मयत सौदाजी लिपणे असा कोणत्या कागदपत्राच्या अधारे संभ्रम पडला हे कळून येत नाही. लेखी जबाबासोबत दाखल केलेल्या स्मरणपत्रातील स्थळप्रतीवर देविदास सौदाजी लिपणे असा उल्लेख करुन तहशीलदार याना अपू-या कागदपत्रांची पूर्तता करण्यासंबधी कशाचे अधारे कळविले हे देखील स्पष्ट होत नाही त्या संबधीचा पुरावाही दाखल केलेला नसल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 कडूनच चुकीच्या नावाने कागदपत्रे पाठविण्याबाबत तहशीलदार याना कळविले असावे असा निष्कर्ष निघतो स्मरणपत्रामधून ज्या कागदपत्रांची तहशीलदार मार्फत मागणी केलेली होती त्या सर्व कागदपत्रांच्या नकला अर्जदाराने नि. 4 लगत दाखल केलेल्या आहेत त्या अर्थी गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदाराकडून ही कागदपत्रे मागून घेवून गैरअर्जदार क्रमांक 2 कडे त्याची पूर्तता केली असलीच पाहीजे असे आमचे मत आहे. कारण अर्जदारानी ग्राहक मंचात प्रस्तूतची तक्रार दाखल केल्यावर मंचाची नोटीस स्विकारुनही गैरअर्जदार क्रमांक 1 ने आपले लेखी म्हणणे संधी देवूनही सादर केलेले नाही व मंचापुढे हजर न राहता मौन पाळले यावरुन ही अर्जदाराकडून त्यांच्याकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता झालेली असावी असाच निष्कर्ष निघतो एवढेच नव्हेतर गैरअर्जदार क्रमांक 2 यानी ही लेखी जबाबात शेवटी क्लेम फॉर्म व कागदपत्रे विमा कंपनीकडे दिनांक 21.06.2009 रोजी पाठविलेले आहे असे स्पष्टपणे नमूद केलेले असल्यामुळे क्लेम मंजूर करण्याचे दृष्टीने गैरअर्जदार क्रमांक 3 याचेकडे आवश्यक ती कागदपत्रे हे ही स्पष्ट होते. दिनांक 21.06.2009 रोजी इन्शुरन्स ब्रोकरेज सर्व्हीसेस कडून गैरअर्जदार क्रमांक 3 कडे कागदपत्रांची पूर्तता झालेली असताना आजपर्यंत अर्जदाराचा नुकसान भरपाई क्लेम मंजूरीविना रखडत ठेवून तिला मानसिक त्रास देवून व अर्थिक नुकसान करुन निश्चीतपणे गैरअर्जदार क्रमांक 3 कडून सेवा त्रूटी झालेली आहे. मयत मारोती लिपणे हा शेतकरी अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे व पॉलीसी मुदतीत त्याचा अपघाती मृत्यू झालेला असल्यामुळे कायदेशीर वारस अर्जदाराला रुपये एक लाख नुकसान भरपाई मिळाली पाहीजे व ती त्याला पात्र आहे. सबब रिपोर्टेड केस 2008 (2) All MR ( Jorunal )Page 13 (महाराष्ट्र ), रिपोर्टेड केस 2010 (1) सी.पी.आर.पान 219 (महाराष्ट्र),फर्स्ट अपील 1047 /08 सर्किटबेंच औरंगाबाद महाराष्ट्र निकाल तारीख 05/02/2009, रिपोर्टेड केस 2005 सी.पी.आर.पान 24 (महाराष्ट्र), मधील मा.राज्य आयोगाने व्यक्त केलेल्या मतांचा आधार घेवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 तक्रार अर्ज अंशत मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी अर्जदाराच्या मयत पतीच्या डेथक्लेमची नुकसान भरपाई रु.1,00,000/- ( अक्षरी रु.एकलाख ) आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास द्यावी. 3 आदेश मुंदतीत नुकसान भरपाई न दिल्यास मुदतीनंतर नुकसान भरपाई रक्कमेवर द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याजासह रक्कम वसुल करण्याचा अधिकार अर्जदारास राहिल. 4 पक्षकारानी आपला खर्च आपण सोसावा. 5 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुराव्यात. सौ. अनिता ओस्तवाल . सौ.सुजाता जोशी. श्री. सी.बी. पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |