जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.2009/49. प्रकरण दाखल दिनांक – 25/02/2009. प्रकरण निकाल दिनांक –09/07/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. शकुंतला भ्र. संपत तोटेवाड वय, 30 वर्षे, धंदा घरकाम रा.बेरळी ता.मुखेड, जि.नांदेड. अर्जदार विरुध्द 1. तहसीलदार, तहसील कार्यालय, मुखेड ता. मुखेड जि.नांदेड. 2. व्यवस्थापक/मॅनेजर रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि. 19, रिलायंस सेंटर वॉलचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई – 400 038 गैरअर्जदार 3. रिलायंन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत शाखा व्यवस्थापक, शाखा उज्वल इंटरप्रायझेसच्या वर हनुमान गड कमानी जवळ, हिंगोली नाका, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.भूरे बी.व्ही. गैरअर्जदार क्र.1 तर्फे - स्वतः गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे - अड.अविनाश कदम निकालपत्र (द्वारा,मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या) गैरअर्जदार रिलायंन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार ही बेरळी ता. मुखेड येथील राहणार असून मयत संपत यांची पत्नी आहे. गैरअर्जदार क्र.1 हे तहसीलदार मूखेड आहत. गैरअर्जदार क्र. 2 व 3 हे रिलायंन्स इन्शूरन्स कंपनी आहे.अर्जदार हीचे पती संपत हे दि.28.10.2007 रोजी मोटर सायकल क्र. एम.एच.-13-3548 ने वसंत नगर ता. मुखेड येथून काम करुन परत येत असताना सायकांळी 7.00 वाजता मुखेड ते कंधार रोडवर कंमलेवाडी फाटयावर अलीकडे गंगाधर बंडे याच्या शेता समोरील रोडवर मुखेड शिवार येथे समोरुन येणारी मोटार सायकल क्र. एम.एच.-24-2437 ने धडक दिल्यामूळे अर्जदाराचे पती हे गंभीर जखमी झाले. त्यांना सरकारी दवाखाना मुखेड येथे शरीक केले. त्यानंतर पूढील उपचारासाठी जात असताना वाटतच दि.28.10.2007 रोजी त्यांचा मृत्यू झाला. पोलिस स्टेशन मुखेड येथे गून्हा नंबर 123/2007 कलम 279, 337, 338, 304 (अ) भा.द.वि. प्रमाणे मोटार चालका विरुध्द गून्हा नोंदविला. गैरअर्जदार यांचेकडे सर्व आवश्यक त्या कागदपञासह म्हणजे एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पी.एम. रिपोर्ट, ग्रामपंचायत चे मृत्यू प्रमाणपञ, मरणोत्तर पंचनामा तसेच 7/12 चा उतारा, नमुना नंबर 8 चा उतारा व 6-क चार उतारा दाखल केला आहे. अर्जदार हा शेतकरी आहे त्यांची मौजे बेरळी ता. मुखेड येथे गट नंबर 116, क्षेञफळ 54 आर एवढी जमिन आहे. मयत संपत यांस पत्नी तसेच दोन अज्ञान मूले व वयोवृध्द आई वडील आहेत. मयत हा घरातील कर्ता पूरुष होता. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांना विमा संरक्षण देण्यासाठी शेतकरी अपघात विमा योजना गेरअर्जदार क्र.2 यांचेकडे काढली व त्यांचे प्रिमियम गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे भरले आहेत. त्यामूळे अर्जदार हे लाभार्थी आहेत. सदर पॉलिसीचा कालावधी हा दि.15.7.2007 ते दि.14.07.2008 असा आहे व घटना ही दि.28.10.2007 रोजीची आहे. त्यामूळे अर्जदार नूकसान भरपाई मिळण्यास पाञ आहेत. महाराष्ट्र शासनाच्या जी. आर नुसार अर्जदार यांनी तलाठी सज्जा यांचेकडे क्लेम फॉर्म घेतले व दि.2.1.2008 रोजी तहसील कार्यालय मुखेड यांना विनंती अर्ज व क्लेम फॉर्म व आवश्यक कागदपञासह विम्याची रक्कम मिळण्यासाठी अर्ज केला. अनेक वेळा मागणी करुनही गैरअर्जदार यांनी विमा दावा दिला नाही त्यामूळे दि.12.01.2009 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली पण नोटीस मिळूनही त्यांनी विमा दावा रक्कम दिली नाही. त्यामूळे अर्जदाराची मागणी आहे की, विमा दावा रक्कम रु.1,00,000/- व त्यावर 12 टक्के व्याज तसेच मानसिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 हे हजर झाले पण त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले नाही. लेखी म्हणणे सादर करण्यासाठी वेळ मागणारा अर्ज दिला. गैरअर्जदार क्र.2 व 3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराची तक्रार त्यांना मान्य नाही म्हणून ती फेटाळावी अशी मागणी केली कआहे. अर्जदार ही मयत संपत यांची पत्नी असल्याबददल काहीही पूरावा दिलेला नाही. अर्जदाराची दि.28.10.2007 रोजीची अपघाताची घटना त्यांना मान्य नाही. हे मान्यक आहे की, मयत संपत हा सरकारी दवाखान्यात शरीक होता व त्यांचा दि.28.10.2007 रोजी मृत्यू झाला. गून्हा दाखल केला हे त्यांना मान्य नाही. त्यांनी दाखल केलेले कागदपञ हे खोटे व चूक आहेत. त्यांनी दाखल केलेला 7/12 हा मयत संपत यांचे नांवाने नाही. त्यामूळे ते विमा दावा मिळण्यास पाञ नाहीत. अर्जदार यांनी मूलाचे नाहरकत प्रमाणपञ दाखल केलेले नाही. अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचे ग्राहक नाहीत तसेच त्यांनी सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही. अर्जदार यांनी कोणत्याही पॉलिसीची कॉपी दाखल केलेली नाही. तसेच घटना घडल्यानंतर अर्जदार यांनी एक आठवडयाचे आंत दावा दाखल केलेला नाही. घटना ही दि.28.10.2007 रोजी घडली व तलाठी यांचेकडे तक्रार दि.2.1.2008 रोजी दाखल केलेली आहे. त्यामूळे त्यांचा कालावधी संपलेला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा दावा फेटाळला नाही त्यामूळे त्यांना तक्रार दाखल करण्यास कारण घडलेले नाही त्यामूळे त्यांचा दावा फेटाळण्यात यावा. अर्जदार यांनी शासनाने मान्य केलेले हेअरशिप प्रमाणपञ किंवा लिगल सक्सेंसर प्रमाणपञ दाखल केलेले नाही. अर्जदार यांचे एफ.आय.आर. प्रमाणे मोटार सायकलचा अपघात असल्यामूळे सदर तक्रार एमऐसीटी कडे दाखल करावा. त्यामूळे अर्जदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांचे गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजना पॉलिसी अंतर्गत पॉलिसी घेतलेली आहे. सदर शेतकरी अपघात विमा योजना यांचा प्रिमियम गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे भरलेलो आहे. सदरची बाब गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये व शपथपञामध्ये नाकारलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञे यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 न्यायमंचामध्ये नोटीस मिळाल्यानंतर अर्ज देऊन हजर राहीले आहेत, परंतु त्यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. त्यामूळे त्यांचे विरुध्द नो से चा आदेश पारीत झालेला आहे. गैरअर्जदार क्र.1 यांची जबाबदारी ही शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत कागदपञाची पूर्तता करुन सदरचा क्लेम इन्शूरन्स कंपनीला पाठविणे एवढीच आहे. सबब त्यांचेकडून कोणतीही सेवेत कमतरता झाली हे सिध्द होत नाही. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांचे अर्जातील कथनानुसार गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांचा विमा क्लेम पाठवलेला आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे कबाल इन्शूरन्स यांचे दि.13.10.2008 च्या पञामध्ये नमूद केलेले कागदपञासहीत म्हणजेच लाभार्थीच्या बँकेच्या तपशील सहीत मूळ प्रत तहसीलदार प्रमाणपञ, मयताचे नांवचे तहसीलदारचा गोल शिक्का व सही, आवश्यक मूळ प्रत,तलाठी प्रमाणपञ मयताचे नांवचे, तलाठीचा गोल शिक्का व सही आवश्यक मूळ, 6(क) चा उतारा त्यावर मयत व्यक्तीचे नांव समाविष्ठ असणे घटनास्थळ पंचनामा, पोलिस अधिका-याने सांक्षाकीत केलेले, इन्क्वेस्ट पंचनामा, मयताचे नांवावर जमीन कशी आली त्यांचे नांवाचा फेरफार नक्कल, मूळ प्रत, 7/12, 8(अ), 6(क) चा उतारा ज्यावर मयत व्यक्तीचे नांव समाविष्ट असणे गरजेचे आहे मूळे प्रत इत्यादी आवश्यक कागदपञासह पाठविले आहे. अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी या मंचामध्ये शेतकरी अपघात विमा योजना, तलाठयाचे प्रमाणपञ, गांव नमूना 7/12 चा उतारा, नमूना 8 (अ) चा उतारा, गांव नमूना 6 (अ) चा उतारा, फेरफार रजिस्ट्रर, प्रथम माहीती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट वैद्यकीय अधिका-याने सांक्षाकीत केलेला, ही कागदपञे अशी या मंचामध्ये या अर्जाचे कामी दाखल केलेली आहेत. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी सदर मंचाची नोटीस मिळाल्यानंतर दि.25.3.2009 रोजी या मंचामध्ये हजर झालेले आहेत. त्यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये व शपथपञामध्ये अर्जदार यांनी त्यांचा अर्ज मूदतीत दाखल केलेला नाही व अर्जदाराचा तक्रारीमधील अपघात त्यांना मान्य नाही. गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर क्लेम दावा हा कबाल इन्शूरनस कंपनीकडे पाठविला आहे.त्यामूळे त्यांना सदर तक्रारीमध्ये पार्टी केलेले नाही. त्यामूळे त्यांना सदरची विमा क्लेमची रक्कम घेण्यास ते पाञ नाहीत वगैरे मूददे उपस्थित केलेले आहेत. अर्जदार यांनी त्यांचे लेखी यूक्तीवादा सोबत शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजना सन 2007-08 चे परिपञक या अर्जाचे कामी या मंचामध्ये दाखल केलेले आहेत. सदर परिपञकाचे अवलोकन केले असता “ शेतकरी अपघात विमा योजना प्रस्ताव विहीत कागदपञासह विमा योजनेच्या कालावधीत केव्हाही प्राप्त झाला तरी तो घेणे बंधनकारक राहील. दूर्घटना सिध्द होत असेल व अपवादात्मक परिस्थितीत एखादया कागदपञाची पूर्तता होऊ शकत नसेल तर पर्यायी दाखला पाहता शासनाशी विचारविनिमय करुन पूर्तता करुन घेऊन नूकसान भरपाई अदा करावी. प्रस्तूत तरतूदीनुसार फेटाळली जाणार नाही या बाबत दक्षता घ्यावी व योजनेची परीणामकारक उल्लघंन होण्याचे दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी ” असे नमूद केलेले आहे. सदर परिपञकामध्ये अपघाताचे स्वरुप विजेचा धक्का वा विज पडून अपघात असे तरतूदी शेतकरी विमा योजना अंतर्गत आहे. सदर परिपञकाचा व त्यामधील बाबीचा विचार करता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचेकडून प्राप्त झालेल्या कागदपञाची छाननी करुन योग्य ती कारवाई करणे न्याय व आवश्यक असे होते. परंतु गैरअर्जदार यांनी या मंचामध्ये हजर झाल्यानंतरही विमा क्लेम देणे बाबत कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत यांचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी लेखी यूक्तीवादामध्ये सदर अर्जाचे कामी 2000 (I) Suprem Court Cases, page no. 98, Regional Provident Fund Commissioner Vs Shivkumar Joshi या वरिष्ठ कोर्टाचे निकालपञाप्रमाणे अर्जदार हे लाभार्थी ग्राहक आहेत. फेअर इंजिनिअरिंग प्रा.लि. विरुध्द एन.के.मोदी या निकालपञाप्रमाणे न्यायमंचास सदरचे प्रकरण हाताळण्याचा अधिकार आहे. संजय काबडिया विरुध्द मिताली घोष 2008 या निकालपञाप्रमाणे ग्राहक मंचास सदरचे प्रकरण चालविण्याचे कार्यक्षेञ आहे. श्रीमती शांती विरुध्द मे. इन्सल हौऊसिंग अन्ड कन्स्ट्रक्शन लि. या निकालपञाप्रमाणे अधिकार क्षेञावर बंधन घालण्यात आलेले आहे ते अवैध आहे. 2008 (II) ALL MR (JOURNAL) 13 ICICI Lombard General Insurance Co. Ltd. Vs. Smt. Sidhubai Khanderao Khairnar या वरिष्ठ कोर्टाचे निकाल पञाप्रमाणे अर्जदार यांचे अर्जास मूदतीची बाधा येत नाही. अर्जदार यांनी या अर्जाचे कामी या मंचामध्ये दाखल केलेल्या कागदपञाचे अवलोकन केले असता शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत अर्जदार यांनी विमा क्लेमची रक्कम गैरअर्जदार यांना अदा करणे आवश्यक असे होते परंतु गैरअर्जदार यांनी विमा क्लेमची रक्कम दिली नाही म्हणून अर्जदार यांना या मंचामध्ये अर्ज दाखल करावा लागलेला आहे व त्या अनुषंगाने खर्चही करावा लागलेला आहे यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडून मानसिक ञासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होऊन मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचे पतीचा मृत्यू दि.24.7.2008 रोजी अंगावर विज पडल्यामूळे झालेला आहे परंतु अर्जदार यांना विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- रक्कम आज अखेर मिळाली नाही. त्यामूळे रक्कम रु.1,00,000/- एवढया रक्कमेस अर्जदार यांना वंचित राहावे लागलेले आहे. त्यामूळे अर्जदार हे सदर रक्कम रु.1,00,000/- यांचे आर्थिक नूकसानी पोटी व्याज गैरअर्जदार यांचेकडून वसूल होऊन मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्यांनी दाखल केलेला लेखी यूक्तीवाद व लेखी यूक्तीवादात नोंद केलेली वरिष्ठ कोर्टाची निकालपञे व गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, शपथपञ, व लेखी यूक्तीवाद यांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. आदेश अर्जदार यांचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. आजपासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदार यांना खालील प्रमाणे रक्कमा दयाव्यात. 1. गैरअर्जदार क्र.1 यांना वगळण्यात आल्यामूळे त्यांचे विरुध्द आदेश नाही. 2. विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- दयावेत,सदर रक्कमेवर दि.25.3.2009 पासून प्रत्यक्ष रक्कम पदरीपडेपर्यत 9 टक्के व्याजासह होणारी रक्कम अदा करावी. 3. मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) अध्यक्ष. सदस्या जे.यु, पारवेकर लघुलेखक. |