जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.2009/54. प्रकरण दाखल दिनांक – 04/03/2009. प्रकरण निकाल दिनांक – 26/06/2009. समक्ष - मा. श्री.सतीश सामते. अध्यक्ष प्र. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. सारजाबाई भ्र. चंद्रकांत आळणे वय, 43 वर्षे, धंदा घरकाम, रा.कापसी (बु.) ता. लोहा जि. नांदेड. अर्जदार विरुध्द 1. मा. तहसिलदार, लोहा, तहसील कार्यालय, लोहा जि.नांदेड. 2. रिलायंन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत व्यवस्थापक/मॅनेजर 19,रिलायंन्स सेंटर वॉलचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई -400 038 गैरअर्जदार 3. रिलायंस जनरल इन्शूरन्स कंपनी लि. मार्फत शाखा व्यवस्थापक, शाखा उज्वल इंटरप्रायजेसच्यावर हनुमान गड कमानी जवळ, हिंगोली नाका, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.एस.एस. टेंभूर्णीकर गैरअर्जदार क्र.1 तर्फे - स्वतः गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे - अड.अविनाश कदम. निकालपत्र (द्वारा,मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या) गैरअर्जदार रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार हिचे पती मयत चंद्रकांत फालप्पा आळणे हे शेतकरी होते. मौजे कापशी (बु.) ता लोहा येथे शेत गट नंबर 36, क्षेञ 0 हेक्टर, 21 आर चे ते मालक होते. दि.18.10.2008 रोजी कापशी (बु.) येथे तक्रारदाराच्या पतीस साप चावला व त्यामूळे दि.23.10.2009 रोजी त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना सूरु केली. शासनाने गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचेकडे शेतक-यांचा विमा उतरविला होता व त्यांचा हप्ता शासनाने भरलेला आहे. कबाल इन्शुरन्स प्रा.लि. हे ब्रोकर व विमा सल्ला देणारी संस्था म्हणून काम करतात. शासन व इन्शूरन्स कंपनी यांच्यामधील ते दूवा आहेत. मयताची वारस म्हणून अर्जदार हिने रु.1,00,000/- ची विमा रक्कम मिळण्यासाठी सर्व कागदपञासह तहसिलदार लोहा यांचेकडे अर्ज केला. गैरअर्जदार क्र.1 यांनी सर्व कागदपञाचे अवलोकन करुन अर्जदार यांचा अर्ज गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे पाठविला व गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदार यांचा अर्ज गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे पाठविला. गैरअर्जदार क्र.2 यांनी क्लेम अर्ज प्राप्त झाल्यापासून एक महिन्याचे आंत मयत वारसांना विमा रक्कम देण्याचे ठरले असताना त्यांनी सूड बूध्दीने व गैरन्यायीक पध्दतीने विमा रक्कम देण्यास नकार दिला आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना दि.13.1.2009 रोजी वकिलामार्फत रजिस्ट्रर पोस्टाने नोटीस पाठविली ती नोटीस त्यांना मिळाली परंतु सदर नोटीसचे उत्तर गैरअर्जदार क्र.2 यांनी दिलेले नाही. असे करुन गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली आहे.त्यामूळे अर्जदाराची मागणी आहे की, विमा रक्कम रु.1,00,000/- व त्यावर 12 टक्के व्याज दावा दाखल केल्यापासून रक्कम वसूल होईपर्यत मिळावा तसेच नूकसान भरपाई म्हणून रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 हे स्वतः हजर झाले व त्यांनी एक अर्ज दाखल केलेला आहे.सदर अर्जामध्ये अर्जदार यांचा अर्ज योग्य त्या कागदपञाची पूर्तता करुन घेऊन कागदपञाची तपासणी करुन त्यांचा प्रस्ताव औंरगाबाद येथील कबाल इन्शूरन्स कंपनी कडे योग्य त्या कार्यवाहीस्तव दि.11.02.2009 रोजी पाठविण्यात आल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांचे विरुध्द दि 08.06.2009 रोजी गैरहजर राहून म्हणणे दिले नाही म्हणून त्यांचे विरुध्द नो से चा आदेश करण्यात आलेला आहे. गैरअर्जदार क्र. 2 व 3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. अर्जदार हिचे पती दि.18.10.2008 रोजी शेत गट नंबर 36, 21 आर मौजे कापसी बु. येथे शेती करत असताना त्यांना साप चावला व त्यामूळे दि.23.10.2008रोजी मृत्यू पावले या बाबत यकोणताही लेखी व तोंडी पुरावा सादर केलेला नाही. सदर अपघाताची खबरी अहवाल अथवा एफ.आय. आर. देखील मंचात दाखल कलेला नाही. मयतास पत्नी शिवाय मूलगा दत्ताञय, बालाजी व मुलगी सौ. मीरा हे पत्नीसह चार वारस आहेत. त्यामूळे त्यांचे अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक होतात काय ? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांचे पती चंद्रकांत हे शेतकरी होते. त्यांचा दि.23.10.2008 रोजी साप चावल्याने अपघाती मृत्यू झाला आहे. त्या बाबतचे कागदपञ अर्जदार यांनी या अर्जासोबत दाखल केलेले आहेत. त्यामध्ये शेतकरी असल्या बाबत 7/12 चा उतारा, गाव नमूना नंबर 8 (अ) चा उतारा, फेरफार रजिस्ट्ररचा उतारा अशी कागदपञे दाखल केलेली आहेत. तसेच अर्जदार यांनी प्रोव्हीजनल पोस्ट मार्टेम रिपोर्ट कम डेथ सटिफिकेट दाखल केलेले आहे. सदर प्रमाणपञामध्ये प्रोव्हीजनल ओपिनियन ऐज टू कॉज ऑफ डेथ यामध्ये स्नेक बाईट असे नमूद करण्यात आलेले आहे. सदर प्रमाणपञावर पोस्ट मार्टेम ऑफिसर डेप्यूटी ऑफ एफ.एम.टी., जी.एम.सी.अन्ड जी.जी.एम. हॉस्पीटल नांदेड यांची सही आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञे यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी सदरच्या अर्जाची नोटीस मिळाल्यानंतर मंचामध्ये हजर राहून त्यांनी अर्ज दिला आहे. सदर अर्जामध्ये गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांचेकडून आवश्यक त्या कागदपञाची पूर्तता करुन घेऊन कागदपञाची तपासणी करुन त्यांचा प्रस्ताव औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यासाठीचा प्रस्ताव औरंगाबाद येथील कबाल इन्शुरन्स कंपनी कडे असल्यामूळे सदरचा प्रस्ताव दि.11.02.2009 रोजी पाठविण्यात आल्याचे नमूद केलेले आहे. त्यामूळे गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांना योग्य प्रकारे सेवा दिलेली आहे. सदरच्या विमा क्लेमचे कामी गैरअर्जदार क्र.1 यांची एवढीच सेवेची पूर्तता होणे आवश्यक आहे ती त्यांनी केल्याचे त्यांचे अर्जावरुन स्पष्ट होत आहे. मूददा क्र.2 ः- गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये व शपथपञामध्ये अर्जदार हे शेतकरी असल्याचे नाकारलेले आहे. तसेच अर्जदार यांनी प्रस्तूतचा अर्ज हा एक आठवडयामध्ये तलाठी यांचेकडे सादर केलेला नाही. त्यामूळे तो मूदतीत नाही असे म्हटले आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपञाचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना विमा क्लेम देण्यासाठी आवश्यक ती कागदपञे म्हणजेच बँकेचा तपशील तहसिलदार प्रमाणपञ, मयताचे नांवाचे तहसिलदाराचा गोल शीक्का व सही, 7/12, 8 (अ), 6 (क) चा उतारा ज्यावर मयताचे नांव समावेश असणे गरजेचे आहे. पोस्ट मार्टेम रिपोर्ट, वैद्यकीय अधिका-याने सांक्षाकीत केलेलया व मयताच्या नांवावर जमिन कशी आली त्यांचा गांवाचा फेरफार नक्कल, ही सर्व कागदपञे अपघाताच्या पूराव्यासाठी सादर करणे आवश्यक अशी आहेत आणि ती सर्व कागदपञे अर्जदार यांनी या मंचामध्ये या अर्जासोबत दाखल केलेली आहेत. तसेच ती सर्व कागदपञे तहसिलदार लोहा यांचेमार्फत पाठविली आहेत. ही बाब दाखल कागदपञावरुन स्पष्ट होत आहे. अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी दि.5-8-2008 चे परिपञक दाखल केलेले आहे. सदर परिपञकामध्ये योजनेचा कालावधी हा 15.8.2008 ते 14.8.2009 असा नमूद करण्यात आलेला आहे आणि औरंगाबाद विभागासाठी रिलायन्स जनरल इन्शूरन्स कंपनीला नियूक्त करण्यात आलेले आहे, हे परिपञकावरुन स्पष्ट होत आहे. अर्जदार यांचेकडून योग्य त्या कागदपञाची पूर्तता झालेली असून सूध्दा गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना विमा क्लेमची रक्कम अदा केलेली नाही. यांचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी योग्य त्या सर्व कागदपञाची पूर्तता केलेली आहे ही बाब दाखल कागदपञावरुन स्पष्ट होत आहे. गैरअर्जदार क्र.2 व 3 हे या मंचामध्ये दि.1.4.2009 रोजी वकिलामार्फत हजर झालेले आहेत. त्यानंतर अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपञाचे अवलोकन करुन गैरअर्जदार यांना क्लेम देण्याचे दूष्टीकोनातून कोणताही प्रयत्न केलेला नाही. अर्जदार हे रु.1,00,000/- एवढी रक्कम मिळण्यापासून वंचित राहीलेले आहेत. त्यामूळे सदर रक्कमेवर दि.1.4.2009 पासून 9 टक्के दराने व्याज मिळण्यास अर्जदार हे पाञ आहेत असे या मंचाचे मते आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेमार्फत त्यांचा क्लेम सर्व कागदपञासहीत दि.11.2.2009 रोजी पाठविला आहे परंतु गैरअर्जदार यांनी त्या बाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामूळे अर्जदार यांना या मंचामध्ये अर्ज करावा लागलेला आहे. त्या अनुषंगाने खर्चही करावा लागलेला आहे. त्यामूळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडून मानसिक ञासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होऊन मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी दि.11.05.2009 रोजीचे अर्जासोबत अर्जदार यांच्या दोन मूलाचे व एका मूलीचे शपथपञ दाखल केलेले आहे. त्यामध्ये अनूक्रमे दत्ताञय पि. चंद्रकांत आळणे, बालाजी पि. चंद्रकांत आळणे व सौ. मिरा भ्र. संतोष पटणे या तीघाचे शपथपञ दाखल केलेले आहे. सदर शपथपञामध्ये अर्जदार ही त्यांची आई असून सदरच्या विमा क्लेमची रक्कम त्यांची आई सारजाबाई भ्र. चंद्रकांत आळणे यांना मिळण्यास आमचा कोणताही आक्षेप अगर उजर राहणार नाही असे नमूद केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांचा विमा क्लेम गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेकडे पाठविला आहे. त्यामूळे गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केली नाही. सबब त्यांचे विरुध्द कोणताही आदेश नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञ व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद व गैरअर्जदार यांनी दाखल केलेला लेखी जवाब, शपथपञ व कागदपञ तसेच लेखी यूक्तीवाद यांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश आजपासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदार यांना खालील प्रमाणे रक्कमा दयाव्यात. 1. शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत येणारी रक्कम रु.1,00,000/- दयावेत, सदर रक्कमेवर दि.01.04.2009 पासून 9 टक्के व्याज दराने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याज दयावे. 2. मानसिक ञासापोटी रु,4,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- दयावेत. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्रीमती सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) सदस्या अध्यक्ष (प्र.) जे.यु, पारवेकर लघुलेखक. |