जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.386/2008. प्रकरण दाखल दिनांक – 04/12/2008. प्रकरण निकाल दिनांक –24/03/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. सूरेखाबाई भ्र. सूर्यकांत खानसोळे वय वर्षे 27, व्यवसाय घरकाम, रा. वाडी नियमतूलापूर, ता.मुदखेड जि. नांदेड. अर्जदार विरुध्द 1. तहसीलदार, तहसील कार्यालय, मुदखेड ता.मुदखेड जि.नांदेड 2. व्यवस्थापक/मॅनेजर, गैरअर्जदार रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि. 19, रिलायंन्स सेंटर वॉलचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई 400 038. अर्जदारा तर्फे. - अड.भुरे बी.व्ही. गैरअर्जदार क्र.1 तर्फे - कोणीही हजर नाही. गैरअर्जदार क्र.2 तर्फे - अड.अविनाश कदम निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार रिलायन्स जनरल इन्शुरंन्स यांच्या ञूटीच्या सेवे बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे दाखल केली आहे. मयत सूर्यकांत खानसोळे हे रा.वाडी नियमातुलापूर ता. मुदखेड येथील शेतकरी असून त्यांची गट नंबर 155 क्षेञफळ 23 आर एवढी जमीनीचे मालक होते. अर्जदार ही त्यांची वीधवा आहे. दि.13.07.2008 रोजी मयत सूर्यकांत त्यांची मोटार सायकल क्र.एम.एच.-26-एल-3237 वरुन बियाणे व खत आणण्यासाठी नांदेड येथे गेले होते व परंत येत असताना देगलूर रोडवर पाठीमागून येणा-या ट्रक क्र.एम.एच.-26-एच-7068 यांने निष्काळजीपणे मागून मोटारसायकलला धडक दिली. त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. पोलिस स्टेशन इतवारा येथे गून्हा नंबर 80/08 नुसार ट्रक चालका विरुध्द गून्हा नोंदविण्यात आला. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील शेतक-यासाठी विमा संरक्षण गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून काढलेले आहे व महाराष्ट्रातील सर्व शेतकरी लाभार्थी आहेत. सदरील पॉलिसीचा कालावधी दि.15.08.2007 ते दि.14.08.2008 असा होता. महाराष्ट्र शासनाच्या जीआर नुसार अर्जदार यांनी पतीच्या मृत्यूनंतर तलाठी मुदखेड यांचेकडे दि.15.07.2008 रोजी क्लेम फॉर्म व आवश्यक ती कागदपञे दिली. ती गैरअर्जदार क्र.1 यांचेमार्फत गैरअर्जदार क्र.2 यांना पाठवावयाचे होते. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे अनेक मागणी करुनही त्यांनी समाधानकारक उत्तरे दिले नाही. त्यामूळे अर्जदारांनी दि.12.09.2008 रोजी गैरअर्जदार यांनी वकिलामार्फत नोटीस पाठविली. अर्जदार यांचे मागणी आहे की, गैरअर्जदार यांचेकडून विम्याची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर 2008 पासुन 12 टक्के व्याज व मानसिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- देण्याचे आदेश व्हावेत. गैरअर्जदर क्र.1 हे हजर झाले पण त्यांनी आपले लेखी म्हणणे दिले नाही म्हणून प्रकरण “नोसे” करुन पूढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र.2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांचे म्हणण्याप्रमाणे त्यांना प्रपोजल क्लेम दाखल केल्यानंतर मिळाले. त्यामूळे लिमिटेशनमध्ये येत नसल्याकारणाने पॉलिसीच्या नियमाप्रमाणे अर्जदारांना क्लेम देय नाही. विमा करारनामा हा गैरअर्जदार व महाराष्ट्र शासन यांचेत आहे. जर काही वाद निर्माण झाला तर तो नेमलेल्या कमिटी मार्फत सोडविण्यात यावा असे म्हटले आहे. मयत सूर्यकांत यांचा अपघात झाला याबददल त्यांना माहीती नाही किंवा पूरावा नाही असे म्हटले आहे. दि.13.07.2008 रोजी अर्जदार यांचा मृत्यू झाल्यावर अर्जदाराने सात दिवसांचे आंत क्लेम दाखल केला नाही. गैरअर्जदार क्र.2 यांना क्लेम मागितल्याचा कोणताही पूरावा नाही त्यामूळे त्यांनी सेवेत ञूटी केली असे म्हणता येणार नाही.त्यामूळे अर्जदाराची यांची तक्रार फेटाळण्यात यावी अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार क्र.2 यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- महाराष्ट्र शासनाने शेतक-याचे अपघातापासून संरक्षणासाठी व नूकसान भरपाईसाठी गैरअर्जदार क्र.2 यांचेशी करारनामा करुन विमा पॉलिसी दि.15.08.2007 ते 14.08.2008 या कालावधीसाठी घेतली होती. त्यांचा प्रिमियम शेतक-यासाठी शासनाने भरलेले आहे त्यामूळे शेतकरी हे त्यांची लाभार्थी आहेत. तसे परिपञक गैरअर्जदारांनेच या प्रकरणात जोडलेले आहे. गैराअर्जदारांनी अर्जदाराची तक्रार पूर्णतः नाकारली जरी असली तरी वस्तूस्थिती ही वेगळी आहे तसे पूरावा देखील दाखल आहेत. अर्जदार यांचे मयत पती सूर्यकांत हे दि.13.07.2008 रोजी त्यांची मोटार सायकल क्र.एम.एच.-26-एल-3237 वरुन नांदेड येथे बियाणे आणण्यासाठी गेले असताना व परत येत असताना त्यांचा देगलूर रोडवर एका ट्रकने मागून धक्का दिल्यामूळे त्यातंच अपघाती मृत्यू झाला. यासाठी पूरावा म्हणून एफ.आय.आर., पोलिस पंचनामा, पी.एम. रिपोर्ट, इत्यादी कागदपञ अर्जदाराने दाखल केलेली आहेत. यात अपघाताचा स्पष्ट उल्लेख आहे. पी.एम.रिपोर्ट मध्ये डोक्याला मार लागून मेंदू डॅमेज झाला व त्यात मृत्यू झाला. त्यामूळे हा अपघाती मृत्यू आहे या बददल वाद नाही. यासंबंधी वाडी नियमतुलापूर ता. मुदखेड येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी मयताचे मृत्यू प्रमाणपञ व वारसा प्रमाणपञ दिलेले आहेत. मृत्यूनंतर अर्जदार यांनी तलाठयामार्फत व तलाठयांनी तहसीलदार मार्फत दावा प्रपोजल गैरअर्जदार यांचेकडे पाठविले होते. गैरअर्जदार क्र.1 यांनी हे प्रपोजल तलाठयाकडून घेऊन गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे पाठविले आहे. एवढाच त्यांचा यामध्ये सहभाग आहे. गेरअर्जदार क्र.2 यांनी आपल्या लेखी म्हणण्यात त्यांना क्लेम प्रपोजल मिळाले पण ते उशिराने मिळाले असा आक्षेप घेतला आहे. प्रपोजल वेळेत पाठविले पाहिजे हा नियम जरी असला तरी तो बंधनकारक नाही. मा. महाराष्ट्र राज्य आयोग मुंबई, 2008 (2) ALL MR (General) Pg. 13, ICICI Lombard Gen Insurance Co Vs. Smt. Sindhubai Khairnar हया अपीला मधील प्रकरणात क्लेम प्रपोजल दाखल करण्यास उशिर जरी झाला तरी लाभार्थीला त्यांचे फायदे मिळाले पाहिजेत, “ Such time limit not found to be mandatory ” म्हणजे वेळेत प्रपोजल दाखल झालेच पाहिजे हे बंधनकारक नाही असे म्हटले आहे. त्यामूळे गैरअर्जदार क्र.2 यांनी प्रपोजल उशिरा जरी मिळाले असेल तरी ते आपली जबाबदारी टाळू शकत नाहीत. कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. हे शासन व इन्शुरन्स कंपनी यांचेतील मध्यस्थी आहेत. त्यांनी पूर्ण प्रपोजल छाननी करुन गैरअर्जदार इन्शुरन्स कंपनी कडे पाठविले पाहिजे. त्यांनी तहसिलदार मुदखेड यांचेकडे प्रपोजल मिळाल्यानंतर काही कागदपञाची मागणी केलेली होती. ते त्यांचे पञ तपासले असता असे दिसून येते की, तहसिलदाराचे प्रमाणपञ यांचेमध्ये तहसिलदाराचा गोल शिक्का नाही. 7/12, नमूना नंबर 8, पी.एम. रिपोर्ट व मयताचे नांवावर जमिन इत्यादी कागदपञाची मागणी केली आहे. या प्रकरणात अर्जदाराने दाखल केलेले क्लेम फॉर्म भाग क्र.1 व्यवस्थित भरुन दिलेला आहे. मयत सूर्यकांत हे शेतकरी असल्याबददल 7/12 व नमूना नंबर 8 या प्रकरणात दाखल आहे. यावरुन त्यांचे शेतीची मालकी सिध्द होते. एफ.आय.आर. व पोलिस पंचनामा यावरुन अपघात झाल्याचे सिध्द होते. पोलिसांनी जी पोहच पावती घेतली आहे यावरुन त्यांचे प्रेत त्यांचे नातेवाईकांचे ताब्यात दिलेले आहे. पी.एम. रिपोर्ट आहे. यावर सरकारी हॉस्पीटल यांचे सही व शिक्का आहे. त्यामूळे मयताचे वेगळे मृत्यू प्रमाणपञ शिक्का जरी नसला तरी त्यांची आवश्यकता नाही. अर्जदार यांचे मराठवाडा ग्रामीण बँक या बँकेच्या पासबूकाचा खाते उतारा दाखल केला आहे. तसेच मयत सूर्यकांत व त्यांची विधवा सूरेखाबाई यांचे निवडणूक ओळखपञ दाखल आहे. एवढे सर्व कागदपञ क्लेम सेंटल करण्यास पूरेसे आहेत. त्यामूळे गैरअर्जदार यांना एवढे कागदपञ मिळालेले आहेत. जरी कागदपञ मिळाले नसले तरी न्यायमंचामधून हे कागदपञ घेऊन त्यांनी अर्जदार यांचा क्लेम दिला पाहिजे. गैरअर्जदार यांचा एक आक्षेप असा आहे की, काही वाद निर्माण झाल्यास कमिटीकडे वाद दयावा. पण ग्राहक न्यायमंच हे Additional Remedy आहे व यांचा लाभ अर्जदार घेऊ शकतात. निवड समितीकडे जाणे हे काही बंधनकारक नाही. लाभार्थी असल्याबददल मा.सर्वोच्च न्यायालय यांनी रिजनल प्रोव्हीडंड फंड कमिश्नर विरुध्द शिवकुमार जोशी 2000 (1) एस.सी.सी. 98 यात अर्जदार हे लाभार्थी म्हणून यांचा उल्लेख करता येईल. कमिटी संदर्भात उदा. घेताना संजय कावडीया विरुध्द मिताली घोष 2008 पार्ट 7, जुलै भाग 3, सीपीजे 73 यांचा उल्लेख केला असता न्यायमंच हे प्रकरण चालवू शकते. गैरअर्जदारांनी अद्यापही क्लेम नाकारलेला जरी नसला तरी दि.13.07.2008 ला अपघात झाल्यानंतर दोन महिन्याचे आंत क्लेम सेंटल करणे आवश्यक असताना त्यांनी अद्यापही तो क्लेम मंजूर केला नाही किंवा नाकारलेला नाही म्हणजेच त्यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदार क्र.2 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत विम्याची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर प्रकरण दाखल केले पासून म्हणजे दि.04.12.2008 पासून 9 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह अर्जदारास दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |