Maharashtra

Nanded

CC/09/6

Vekat Mogalaji Sidamoglu - Complainant(s)

Versus

Thasildar,thasil office,deglur. - Opp.Party(s)

Adv.Bhure B.V.

18 Mar 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/6
1. Vekat Mogalaji Sidamoglu R/o.Tamlur tq.deglour dist.nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Thasildar,thasil office,deglur. Thasila office,deglour tq.deglour dist.nandedMaharastra2. Directer,national insurance company limited.staliga cenma bilding 2nd fower 65 musban road,d.o.14 k fourt,Mumbai.NandedMaharastra3. National insurance company limited.c/o.Branceh manager,Branch nagana ghata road,nandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 18 Mar 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नांदेड
 
प्रकरण क्र.06/2009.
                                                     प्रकरण दाखल दिनांक  06/01/2009.
                                                     प्रकरण निकाल दिनांक 18/03/2009.
                                                   
समक्ष         -  मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील.       अध्‍यक्ष.
                     मा.श्रीमती. सुजाता पाटणकर.         सदस्‍या.
                     मा.श्री.सतीश सामते.           सदस्‍य.
 
श्री.व्‍यंकट पि.मोगलाजी सिदामोगलू,                          अर्जदार.
वय वर्षे 47, व्‍यवसाय शेती,
रा.तमलुर ता.देगलुर जि.नांदेड.
 
विरुध्‍द.
 
1.   तहसिलदार,                                      गैरअर्जदार.
     तहसिल कार्यालय,देगलुर ता.देगलुर,
     जि.नांदेड.
2.   व्‍यवस्‍थापक,
     नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि,
     स्‍टलिंग सिनेमा बिल्‍डींग दुसरा मजला,
     65,मर्झबान रोड,
     डि.ओ.14 ख फोर्ट, मुंबई 400 001.
3.   शाखा व्‍यवस्‍‍थापक,
     नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि,
     शाखा नगीना घाट रोड,नांदेड.
 
अर्जदारा तर्फे.        - अड.बी.व्‍ही.भुरे.
गैरअर्जदारा तर्फे      - अड.रियाजुल्‍लाखान.
 
निकालपत्र
(द्वारा,मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्‍या)
 
     यातील अर्जदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी की, अर्जदाराची पत्‍नी गंगाबाई भ्र.व्‍यंकट सिदामोगलू ही दि.25/12/2006 रोजी देगलुरून तमलूरकडे जीप क्र.एमएच26/एल 868 ने जात असतांना कस्‍तुरी ढाबा खानापुर शिवार जवळ नांदेडकडुन येणारा ट्रव्‍हल्‍स क्र. एमएच 26/बी 315 च्‍या चालकाने मोटार सायकयल क्र.एमएच26/पी 5671 ला धडक दिल्‍यामुळे सदरील मोटार सायकल स्‍वार जागीच मरण पावला व मोटार सायकल समोरुन येणा-या जीपवर येऊन जीपला जिपमध्‍ये बाजुला बसलेल्‍या अर्जदाराच्‍या पत्‍नीस सदरील मोटर सायकलची धडक लागल्‍यामुळे अर्जदाराची पत्‍नी गंभीर जखमी झाली व त्‍यानंतर तीला ग्रामीण रुग्‍णालय देगलुर येथे उपचारासाठी शरीक केले. उपचारा दरम्‍यान दि.25/12/2006 रोजी अर्जदाराची पत्‍नी मरण पावली. सदरील घटनेची सुचना पोलिस स्‍टेशनला देण्‍यात आली, पोलिसांनी ट्रक चालका विरुध्‍द नोदंविला आणि एम.आय.आर.,घटनास्‍थळ पंचनामा, दोषारोपपत्र दाखल केली. अर्जदाराची पत्‍नी गंगाबाई ही शेतकरी होती तीच्‍या नांवे मौजे तमलूर येथे गट नं.496 आण 347 क्षेत्रफळ 1 हेक्‍टर 05 आर एवढी जमीन आहे व त्‍या जमीनीचे गंगाबाई ही मालक व ताबेदार होती. महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्रातील शेतक-यांचे शेतक-यांना विमा संरक्षण देण्‍यासाठी शेतक-यांचे शेतकरी अपघात विमा योजना गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे काढली व त्‍याचे प्रिमीयम गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे भरले आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांनी विमा घेते वेळेस सर्व पकारची जोखीम स्विकारली व विमा शेतक-याच्‍या हक्‍कात दिला. अर्जदाराची पत्‍नी ही शेतकरी होती व त्‍याचे प्रिमीयम महाराष्‍ट्र शासनाने भरलेले आहे व तो लाभार्थी आहे म्‍हणुन अर्जदाराची पत्‍नी ही गैरअर्जदार क्र. 2 यांचे ग्राहक आहेत. सदरील पॉलिसीचा कालावधी हा दि.15/07/2006 ते दि.14/07/2007 असा आहे व घटना ही दि.25/12/2006 रोजी घडलेली आहो. त्‍यामुळे गैरअर्जदार हे अर्जदारास नुकसान भरपाई देण्‍यास पात्र आहेत. अर्जदार यांनी तलाठी यांचेकडुन क्‍लेम फॉर्म घेतले व‍ दि.14/03/2007 रोजी तहसील कार्यालय देगलुर यांना विनंती अर्ज व क्‍लेम फॉर्म व सर्व आवश्‍यक कागदपत्र दाखल करुन विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी अर्ज केला. परंतु अर्जदार ही ग्रामीण भागीतील व अडाणी असल्‍यामुळे व त्‍यास सदरील योजनेबद्यल माहीती नसल्‍यामुळे तसेच दुखःत असल्‍यामुळे गैरअर्जदार यांचेकडे क्‍लेम दाखल करण्‍यास उशीर झाला. गैरअर्जदार क्र. 2 यांनी गैरअर्जदार क्र.1 यांना दि.जून 2008 रोजी कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस प्रा.लि. यांचे मार्फत गैरअर्जदार क्र. 1 यांना पत्र पाठविले ते पत्र दि.05/07/2008 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांना मिळाले. सदरील पत्रानुसार गैरअर्जदार क्र. 2 यांनी बेकायदेशिररित्‍या Land Record Change after death  म्‍हणुन No Claim  केल्‍याचे कळविले. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना अनेक वेळा विनंती करुनही क्‍लेम दिला नाही म्‍हणुन गैरअर्जदार यांनी अर्जदार क्‍लेम न देवुन सेवेत त्रुटी केली म्‍हणुन ही तक्रार दाखल करुन तीद्वारे अर्जदार यांनी विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- त्‍यावर 12 टक्‍के व्‍याज तसेच मानसिक त्रासापोटी रु.50,000/- आणि दावा खचो पोटी रु.5,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत अशी मागणी केली.
     गैरअर्जदार क्र.1 यांना मंचातर्फे पाठविण्‍यात आली. गैरअर्जदार क्र. 1 यांनी मे.मंचामध्‍ये हजर राहुन त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे सादर केले. गैरअर्जदार क्र. 1 यांनी नियमाप्रमाणे शेतकरी विमा नुकसान भरपाई मिळण्‍यासंबंधीचे पत्र व्‍यवहार गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांच्‍याशी केलेला आहे, असे म्‍हटलेले आहे.
     गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना नोटीस देण्‍यात आली त्‍यांनी हजर होऊन आपले लेखी म्‍हणणे सादर केले. त्‍यांचे म्‍हणणे असे की, गैरअर्जदारांना अर्जातील परिच्‍छेद क्र.2 व 3 अमान्‍य आहे. तसेच गैरअर्जदारांना परीच्‍छेद क्र. 2 मान्‍य आहे, अर्जातील परिच्‍छेद क्र. 2 व 3 ला आक्षेप नाही. गैरअर्जदाराचे म्‍हणणे असे की, महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्रातील शेतक-यांची विमा काढलेली आहे, त्‍याचा कालावधी दि.15/07/2006 ते 14/07/2007 असा आहे. अर्जदाराची पत्‍नी शेतकरी नसुन सदरची योजना लागु होत नाही म्‍हणुन अर्जदाराचा अर्ज फेटाळण्‍यात यावा. अर्जदार यांनी तहसिलदार यांचे मार्फत क्‍लेम मागणी केले हे गैरअर्जदारांना माहीत नाही. सदरील तक्रार दाखल करण्‍यातस उशिर केला म्‍हणुन तक्रार मुदतीत नाही. अर्जदाराच्‍या मयत पत्‍नीच्‍या नांवे सदरील शेत जमीन मृत्‍युनंतर 7/12 वर आलेली आहे म्‍हणुन प्रस्‍तुतची मागणी अर्जदराचे पत्‍नीस लागु होत नाही. अर्जदाराने केलेली तक्रार पुर्णतः खोटी व चुकीची आहे, गैरअर्जदार क्र. 2 यांनी कायदेशिररित्‍या महसुल रजीस्‍टर पुस्‍तीकेत मृत्‍युनंतर बदल केला आहे. म्‍हणुन अर्जदाराचे मागणी फेटाळण्‍यात यावी. अर्जदाराची पत्‍नी शेतकरी या संज्ञेत बसत नाही त्‍यामुळे अर्जदारास नुकसान भरपाई देण्‍यास गैरअर्जदार जबाबदार नाहीत. गैरअर्जदार यांनी अर्जदाराने केलेली इतर वीपरीत वीधाने नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, अर्जदाराचा अर्ज खारीज करण्‍यात यावा.
     अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच नोक्‍लेम पत्र, क्‍लेम फॉर्म, तलाठयाचे प्रमाणपञ, होल्‍डींग प्रमाणपत्र, 7/12 चा उतारा, एफ.आय.आर.,घटनास्‍थळ पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, मरणोत्‍तर पंचनामा, पोलिस अहवाल,मृत्‍युचा दाखला, शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजना परीपत्रक, 2008(II) All MR (Journal) 13, आय.सी.आय.सी.आय.लोम्‍बार्ड जनरल इन्‍शुरनस कंपनी लि विरुध्‍द श्रीमती. सिंधुबाई खंडेराव खैरनार, महाराष्‍ट्र राज्‍य आयोग, मुंबई यांचे निकालपत्र,लेखी युक्‍तीवाद इत्‍यादी कागदपत्र दाखल केलेले आहेत. गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे रामनारायण रामप्रसाद बंग यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहेत.
     दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                                        उत्‍तर
1.   अर्जदार गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ?             होय.
2.   गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये
     ञूटी केली आहे काय ?                               होय.
3.   काय आदेश ?                            अंतिम आदेशाप्रमाणे.     
 
                                                कारणे
मूददा क्र.1
     अर्जदार यांनी अर्जासोबत गैरअर्जदाराचे ग्राहक असल्‍याबददल गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून प्रमाणपञ, इन्‍शूरन्‍स कंपनीस नूकसान भरपाई संबंधी पाठविलेले पञ, शेतकरी व्‍यक्‍तीगत विमा योजना याबाबत तलाठयाचे प्रमाणपञ इत्‍यादी कागदपञ दाखल केलेले आहेत. गैरअर्जदार यांनी त्‍यांची लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये व शपथपञामध्‍ये सदरची बाब नाकारलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ त्‍यांनी दाखल केलेले कागदपञ यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मूददा क्र.1 चे उत्‍तर वरील प्रमाणे देण्‍यात आले.
मूददा क्र.2
     अर्जदार हा मयत गंगाबाई यांचा पती आहे. व्‍यंकट सिदामोगलु यांचे शपथपञ दाखल केलेले आहे. गंगाबाई व्‍यंकट सिदामोगलु हीचा दि.25.12.2006 रोजी ट्र‍कने धडक दिल्‍यामुळे अपघाती मृत्‍यु झालेला आहे.त्‍या बाबत त्‍यांना ग्रामीण रुग्‍णालय देगलुर येथे उपचारासाठी शेरीक केले होते. अर्जदार यांनी सदर अर्जासोबत मयत गंगाबाई ही शेतकरी होती हे दर्शविण्‍यासाठी 7/12 चा उतारा, भुमापन क्र.347 गांव नमुना 7 सन 1994-95 चा उतारा, भुमापन क्र.496 गांव नमुना 7 सन 1994-95 चा उतारा, पोलिस ठाणे अमंलदार शहर पोलिस स्‍टेशन देगलुर यांचे घटनास्‍थळ पंचनामा, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, पी.एम. प्रमाणपञ इत्‍यादी कागदपञ दाखल केलेले आहेत. अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या पी.एम. प्रमाणपञाप्रमाणे गंगाबाई यांचा मृत्‍यू हा Cause of death due to cardiorespiratory arrest due to Head Injury # off Rt parietal # of frontal bone यामूळे झालेला आहे असे कारण दिलेले आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत विमा अपघाती योजना या बाबतचे शासनाचे परिपञक ही दाखल केलेले आहे. सदर परिपञकाचे अवलोकन केले असता ट्रकच्‍या धडकने अपघात किंवा मृत्‍यू झालेला असल्‍यास शेतकरी हा विमा मिळण्‍यास पाञ आहे असे नमूद करण्‍यात आलेले आहे. तसेच शेतक-याचे प्रकरण तांञिक मूददयावर फेटाळले जाणार नाहीत या बाबत दक्षता घ्‍यावी असे ही नमूद करण्‍यात आलेले आहे. अर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञ, शासनाचे परिपञक, वैद्यकीय अहवाल यांचे अवलोकन केले असता अर्जदार यांचा मृत्‍यू हा अपघाती झालेला आहे. अर्जदार यांचा मृत्‍यू हा दि.25.12.2006 रोजीच्‍या अपघातामुळेच झालेला आहे.    महाराष्‍ट्र शासनाने शेतक-याच्‍या हितासाठी  गैरअर्जदार  यांचेकडून शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा पॉलिसी प्रिमियमची पूर्ण रक्‍कम भरुन घेतलेली आहे व महाराष्‍ट्रातील सर्व शेतकरी लाभार्थी आहेत. मयतगंगाबाईच्‍या नांवाने शेती असल्‍याबददलचा 7/12, भुमान क्र.347 व 497 सन 1994-95 चा उतारा, होल्‍डींग उतारा, अर्जदाराने दाखल केलेले आहेत व इतरही कागदपञ आहेत. त्‍यामूळे ती लाभार्थी आहे याविषयी वाद नाही. शेतकरी विमा योजना सन 2006-07 हे परिपञक या प्रकरणात दाखल आहे. त्‍यामूळे गैरअर्जदार यांना जबाबदारी टाळता येत नाही. त्‍यात 2008 (2) ALL MR (JOURNAL) 13 Consumer Dispute Redressal State Commission Mumbai,   ICICI Lombard General Insurance Com. Ltd.    Vs.   Smt. Sindhubhai Khanderao Khairnar  या प्रकरणात मूदतीचा मूददा येत नाही. यातही मयत विमेदार हा लाभार्थी आहे. हे सर्व असताना मयत गंगाबाई यांचे वारस तीचा पती व्‍यंकट मोगलाजी सिदामोगलु हा विमेदाराची रक्‍कम मिळण्‍यास हक्‍कदार आहे हि बाब स्‍पष्‍ट होत आहे.
     कोणतेही योग्‍य व संयूक्‍तीक कारण नसताना गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे विम्‍याची रक्‍कम मागणी करुनही आज अखेर दिलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेले कागदपञ तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणणे, शपथपञ यांचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
     अर्जदार यांस शेतकरी वैयक्‍तीक अपघात विम्‍याची रक्‍कम गैरअर्जदार यांनी दयावयास पाहिजे असताना व गैरअर्जदार यांनी कोणतेही योग्‍य व संयूक्‍तीक कारण नसताना अर्जदार यांची विमा क्‍लेमची रक्‍कम मागणी करुनही अर्जदार यांना अदा केली नाही. त्‍यामूळे अर्जदार यांना या मंचामध्‍ये सदरची शेतकरी वैयक्‍तीक अपघात विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी अर्ज दाखल करावा लागला आहे व त्‍या अनुषंगाने खर्चही करावा लागला आहे. त्‍यामूळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडून अर्जाचे खर्चापोटी व मानसिक ञासापोटी रक्‍कम मिळण्‍यास पाञ आहे असे या मंचाचे मत आहे.
     अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांना सदर अर्जामध्‍ये आवश्‍यक पक्षकार म्‍हणून सामील केलेले आहे. कारण अर्जदार यांचे विमा क्‍लेम मागणी करण्‍या बाबतचा अर्ज गैरअर्जदार क्र.1 यांचे कार्यालया मार्फत पाठविला आहे. गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून अर्जदार यांचा विमा क्‍लेम मागणीचा अर्ज गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचेकडे पाठविण्‍याचे काम गैरअर्जदार क्र.1 यांनी केलेले आहे. सदरची बाब अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या कागदयादी सोबत दाखल केलेल्‍या दि.14.03.2007 रोजी तहसील कार्यालय, देगलुर यांचे पञावरुन स्‍पष्‍ट होत आहे. यांचा विचार होता गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कोणतीही कमतरता केलेली नाही. सबब गैरअर्जदार क्र.1 यांचा विरुध्‍द कोणताही आदेश करणे योग्‍य होणार नाही असे या मंचाचे मत आहे.
     अर्जदार यांनी अर्जासोबत गैरअर्जदार यांचे क्‍लेम नाकारल्‍याचे पञ दाखल केलेले आहे. त्‍यामूळे अर्जदार हे गैरअर्जदार यांनी पाठविलेल्‍या नो क्‍लेम पत्रा पासुन म्‍हणजेच 31 मार्च 2008 पासुन विमा क्‍लेम रक्‍कम रु.1,00,000/- या रक्‍कमेवर 9 टक्‍के दराने व्‍याज मिळण्‍यास पात्र आहेत, असे या मंचाचे मत आहे.
     अर्जदाराचा अर्ज, शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेले कागदपञ व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद आणि गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी दाखल केलेला लेखी जवाब, शपथपञ तसेच दाखल केलेले कागदपञ व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद यांचा सर्वाचा विचार होता आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करता आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
                            आदेश
 
अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.
गैरअर्जदार क्र.1 यांचे विरुध्‍द आदेश नाही.
आजपासून 30 दिवसांचे आंत.
 
1.   गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदारास रक्‍कम रु.1,00,000/- व त्‍यावर दि.31 मार्च 2008 पासून पूर्ण रक्‍कम पदरीपडेपर्यत 9 टक्‍के व्‍याजाने दयावेत.
2. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदारास मानसिक ञासापोटी रक्‍कम   रु.5,000/- दयावेत.
3.   गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदारास अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.1,000/- दयावेत.
4.   पक्षकाराना आदेश कळविण्‍यात यावा.
 
(श्री.बी.टी.नरवाडे,पाटील)      (श्रीमती.सुजाता पाटणकर)      (सतीश सामते)    
           अध्यक्ष.                             सदस्या                             सदस्‍य
 
 
गो.प.निलमवार,
लघुलेखक.