Maharashtra

Nanded

CC/09/23

Shankarrao Laxmanrao Tagee - Complainant(s)

Versus

Thasildar,Tasil Office,Degaloar - Opp.Party(s)

Adv.Bhure B.V.

21 Apr 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/23
1. Shankarrao Laxmanrao Tagee R/o Khanapur Tq.Degaloor.Dist.Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Thasildar,Tasil Office,Degaloar Degaloor.Dist. Nanded.NandedMaharastra2. Managar,National Insurance Company Limited.2nd Flower 65 Marzeban road,D.O.14 Mumbai-01.NandedMaharastra3. Branch Managar,National Insurance Company,Nagina Ghata,NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 21 Apr 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :2009/23
                    प्रकरण दाखल तारीख -   23/01/2009     
                    प्रकरण निकाल तारीख    20/04/2009
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
              मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
 
शंकरराव पि.लक्ष्‍मणराव ठिगळे                               अर्जदार.
वय वर्षे 70, व्‍यवसाय शेती,
रा.खानापुर ता.देगलुर जि.नांदेड.
 
      विरुध्‍द.
 
1.   तहसीलदार,
तहसील कार्यालय,देगलुर,जि.नांदेड.                    गैरअर्जदार.
2.   व्‍यवस्‍थापक,
     नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि,
     स्‍टलिंग सिनेमा बिल्‍डींग दुसरा मजला,
     65,मर्झबान रोड, डि.ओ.14 ख फोर्ट,मुंबई-400001.
3.   नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि, मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक,
     शाखा नगीना घाट रोड,नांदेड.
अर्जदारा तर्फे वकील - अड. बी.व्‍ही.भुरे.
गैरअर्जदार तर्फे वकील - अड.एम.बी.टेळकीकर.
निकालपञ
(द्वारा-मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील,अध्‍यक्ष)
     गैरअर्जदार नॅशनल इंशुरन्‍स कंपनी लि. यांच्‍या सेवेच्‍या त्रुटीबद्यल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंद केली आहे. अर्जदार शंकर पि.लक्षमणराव ठिगळे रा.खानापुर ता.देगलुर जि.नांदेड येथील असुन मयत शेतकरी नागाबाई यांचे ते पती व नॉमीनी आहेत. मयत नागाबाई ही व्‍यवसायाने शेतकरी होती तीच्‍या नांवे मौजे खानापुर येथील गट क्र.526 मध्‍ये क्षेत्रफळ एक हेक्‍टर 82 आर एवढी जमीन आहे. अर्जदाराची पत्‍नी नागाबाई ही दि.22/08/2009 रोजी पोच्‍चमा देवीस नैवेद घेऊन जातांना पाय घसरुन तळयात पडल्‍यामुळे तिचा मृत्‍यु झाला. महाराष्‍ट्र शासनाने शेतक-यासाठी विमा संरक्षण शेतकरी अपघाताचा विमा गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे काढला व त्‍याचे प्रिमीअम शासनाने भरले आहे. गैरअर्जदार क्र.2 कडे विमा घेते वेळेस सर्व प्रकारची जोखीम शेतक-यांच्‍या हक्‍कात स्विकारली आहे. म्‍हणुन अर्जदार हे लाभार्थी आहे. पॉलिसीचा कालावधी हा दि.15/07/2006 ते दि.14/07/2008 असा असुन घटना ही दि.22/08/2006 ची आहे. म्‍हणुन अर्जदार हे नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत. अर्जदाराने पत्‍नीच्‍या अपघातानंतर क्‍लेम दाखल केल्‍यानंतर गैरअर्जदार क्र.2 यांनी क्‍लेम देण्‍यास टाळाटाळ केली व 02/07/2008 रोजी गैरअर्जदार यांना पत्र दिले त्‍यात बेकायदेशिरित्‍या 7/12 ची नोंद ही मृत्‍युच्‍या नंतरची आहे, त्‍यामुळे नो क्‍लेम केल्‍याचे कळविले आहे. अर्जदाराचा क्‍लेम गैरअर्जदार यांनी न देऊन सेवेत त्रुटी केलेली आहे. म्‍हणुन अर्जदाराची मागणी आहे की, विमा रक्‍कम रु.1,00,000/- त्‍यावर 12 टक्‍के व्‍याज आणि मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व दावा खर्चापोटी रु.5,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत अशी विनंती केली आहे.
     गैरअर्जदार क्र. 1 यांनी वकीला मार्फत हजर झाले त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र. 1 ने दि.02/12/2006 तलाठी खानापुर यांनी अर्जदाराची पत्‍नी मयत नागाबाई हीच्‍या नांवे तलाठयाच्‍या प्रमाणपत्रावरुन एक हेक्‍टर 82 आर जमीन असुन त्‍यांच्‍य कुटुंबात 1 ते 4 सदस्‍य आहेत ही बाब खरी आहे असे म्‍हटले तसे संबंधीत क्र. 2 ला पत्र व्‍यवहाराने गैरअर्जदार क्र. 1 ने दि.20/01/2007 रोजी नुकसान भरपाई शेतकरी या नात्‍याने देणे असे लेखी कळविलेले आहे. अर्जदाराने कलम 8 व 9 नुसार मनघडनी असुन गैरअर्जदार क्र. 1 कडुन अपघाताच्‍या घटनेसंबंधी व मयताचे वारसासंबंधी नियमानुसार कार्यवाही करण्‍यास कधीही टाळाटाळ केली नाही. गैरअर्जदार क्र. 2 यांनी बेकायदेशिररित्‍या लॅण्‍ड रेकॉर्ड ऑफ डेड या सबबीखाली नो क्‍लेम म्‍हणुन क्‍लेम नामंजुर केला, याचा गैरअर्जदार क्र. 1 शी काहीही संबंध नाही. सदर जबाबावरुन अर्जदारास पुढील आदेश पारीत करण्‍यात यावे अशी विनंती केली आहे.
     गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी आपला जबाब वकीला मार्फत दाखल केला आहे. अर्जदाराची मयत पत्‍नी नागाबाई यांचा दि.22/08/2006 रोजी पोच्‍चमा देवीस नवैद्य घेवुन जाताना खानापुर गावा लगत असलेल्‍या तलावातील पाणी घेत असतांना पाय घसरुन तळयात पडल्‍यामुळे तीचा मृत्‍यु झाला हे म्‍हणणे मान्‍य नाही, गुन्‍हा क्र.35/2006 पोलिस स्‍टेशन देगलुर येथे नोंदविण्‍यात आला. सदरील नोंद नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी जाणीवपुर्वक करण्‍यात आलेली आहे. अर्जदाराची पत्‍नी व्‍यवसायाने शेतकरी होती तीचे नांवे खानापुर गट क्र.526 मध्‍ये एक हेक्‍टर 82 जमीन होती हे म्‍हणणे निव्‍वळ खोटे आहे असे म्‍हटले आहे. अर्जदाराने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयार्थ 7/12 दाखल केले आहे व जमीन अंमल कोणत्‍या आधारे आला त्‍यासंबंधी 7/12 न्‍यायमंचात दाखल केलेला नाही. गैरअर्जदार यांनी या कामी इन्‍व्‍हेस्‍टीगेटर नेमणुक केली त्‍यांनी चौकशी केली व फेरफार तलाठयानी नोंदविले आहे. सदरील 7/12 बारकाईने पाहीले असता, असे दिसुन येते की, मयत नागाबाई हीच्‍या नांवाने कोर्ट डिग्री आधारे दि.10/12/2000 रोजी फेरफार क्र.1967 अन्‍वये शेत जमीनीचा अंमल केला आहे. फेरफारची नोंदीची पहाणी केली असता, असे दिसुन येते की, फेरफारची नोंदीची खाडाखोड केलेली आहे. सदरील भुमापन क्र.526 मध्‍ये नागाबाई यांचे नांव नाही. फेरफार क्रमांक नसल्‍यामुळे फेरफारची प्रत दिलेली नाही. अर्जदाराने तलाठया हाताशी धरुन महसुल रेकॉर्डला खोटी नोंद केली आहे. म्‍हणुन अर्जदाराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळण्‍यातय यावा अशी विनंती केली आहे.
          अर्जदार यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र दाखल केले आहेत. दोन्‍ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्‍तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्‍तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात.
     मुद्ये.                                    उत्‍तर.
1.   गैरअर्जदार यांच्‍या सेवेतील त्रुटी सिध्‍द होते काय ?           होय.
2.   काय आदेश?                                              अंतीम आदेशा प्रमाणे.
                                                कारणे
मुद्या क्र. 1
     मयत नागाबाई यांचे पती अर्जदार शंकर लक्ष्‍मणराव ठिगळे हे लाभार्थी व नॉमीनी आहेत. मयत नागाबाई यांचा दि.22/08/2006 रोजी पोच्‍चमा देवीस नैवेद घेऊन जात असतांना खानापुर गावालगत असलेल्‍या तलावातील पाणी घेत असतांना पाय घसरुन तळयात पडल्‍यामुळे तिचा मृत्‍यु झाला, यासंबंधी एफ.आय.आर.,पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र व मरणोत्‍तर पंचनामा इ. दस्‍तऐवज अर्जदाराने दाखल केले आहे. गैरअर्जदाराने अपघाती मृत्‍यु विषयी आक्षेप घेतला व गैरअर्जदाराचा आक्षेप असा आहे की, मयत नागाबाई ही व्‍यवसायाने शेतकरी नव्‍हती खानापुर येथील गट क्र.526 मधील एक हेक्‍टर 82 आर एवढी जमीन ही मयत नागाबाईच्‍या मृत्‍युनंतर आलेले आहे. गैरअर्जदाराचा मुळ आक्षेप असा की, 7/12 वर मयत नागाबाईचा अमंल कशा प्रकारे आला व त्‍याचा फेरफार क्रमांक काय आहे, कारण मयत नागाबाईच्‍या नांवा पुढे फेरफार क्रमांक नाही. गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपल्‍या लेखी म्‍हणण्‍यात तलाठयाच्‍या प्रमाणपत्रावरुन मयत नागाबाई ही शेतकरी आहे, ही बाब खरे आहे, असे म्‍हटले आहे व बेकायदेशिररत्‍या लॅण्‍ड रेकॉर्ड ऑफटर डेथ असा आक्षेप घेतला, अशा परीस्थितीत त्‍याचा काहीही संबंध नाही. गैरअर्जदार क्र. 2 कबला इंशुरन्‍स यांनी रिजेक्‍टेड क्‍लेम म्‍हणुन नागाबाईच्‍या नांवा समोरच्‍या रकान्‍यात याचा उल्‍लेख केलेला आहे. अर्जदाराने 7/12 चा उतारा नमुना क्र. 8 दाखल केलेला आहे व गांव नमुना क्र. 12 दाखल केलेला आहे. 7/12 हा दि.30/06/2006 यात नागाबाई यांच्‍या नांवाचा उल्‍लेख आहे व गांव नमुना 12 यामधे मयत नागाबाईचे नांव 1978 पासुन पिक घेतल्‍याची नोंद करण्‍यात आलेले आहे व गांव नमुना 12 या प्रकरणांत दाखल आहे. गैरअर्जदाराने इनव्‍हेस्‍टीगेटरचा रिपोर्ट दाखल केलेला आहे. यात चौकशी निष्‍कर्षामध्‍ये मयत नागाबाई हीचा दि.22/08/2006 ला मृत्‍यु झाला.   खानापुर येथील शेत भुमापन क्र.526 मध्‍ये 7/12 8 अ, 6 क मध्‍ये विना फेर क्रमांकास तलाठयाने शंकरराव ठिगळेच्‍या नांवाची नोंद केली असे म्‍हटले आहे. दि.03/12/2007 रोजी तलाठी खानापुर यांनी गैरअर्जदाराच्‍या नांवाने एक पत्र दिले आहे, यात भुमापन क्र.526 चा 7/12 मधे फेर 1969 मध्‍ये 7/12 मध्‍ये नोंद असल्‍याचे म्‍हटले आहे व फेरफार क्र.असा आहे. त्‍यामुळे फेरफारची प्रत दिलेली नाही असे म्‍हटले आहे व 7/12 मध्‍ये मयत नागाबाई यांच्‍या मृत्‍यु पुर्वी म्‍हणजे 1993-94 पुर्वी पासुनच नांवाची नोंद आहे. फेरफार अधिकार अभीलेख बारकाईने पाहीले असता, यात नोंद घेण्‍यात आलेली आहे व क्रमांक टाकलेले नाही. यामध्‍ये मयत नागाबाई यांची काही चुक नाही. दि.10/12/2000 रोजी कोर्ट डिग्री आधारे नागाबाई यांनी फेरफार क्र.1969 द्वारे शेत जमीनचा अंमल केलेले आहे. म्‍हणजे हा अमंल मृत्‍यु पुर्वी किमान सहा वर्षा आधी झालेले आहे. मृत्‍युच्‍यानंतर अशा प्रकारची नोंद घेण्‍यात आलेली नाही, असे असतांना गैरअर्जदार क्र.2 यांनी विनाकारण किस काढुन आणि आक्षेप घेऊन अर्जदाराचा दावा नामंजुर केला व असे करुन सेवेत त्रुटी केली. गैरअर्जदार त्‍यांच्‍यावर असलेल्‍या जबाबदारीतुन अशा कारणांने मुक्‍त होऊ शकत नाही.
     वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                           आदेश.
 
1.   अर्जदाराची तक्रार मंजुर करण्‍यात येते.
2.   गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी एकत्रित व संयुक्‍तीकरित्‍या अर्जदार यांना
विम्‍याचे रु.1,00,000/- व त्‍यावर दावा नामंजुर केलेली तारीख 02/07/2008 पासुन 9 टक्‍के व्‍याजाने पुर्ण रक्‍कम मिळेपर्यंत व्‍याजासह द्यावे.
3.   गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदारास झालेल्‍या मानसीक त्रासापोटी रु.4,000/- व दावा खर्चा पोटी रु.1,000/- द्यावे.
4.   संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्‍यात यावा.
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे पाटील)                          (श्री.सतीश सामते)     
       अध्‍यक्ष                                                   सदस्‍य
 
गो.प.निलमवार.
लघूलेखक.