निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 01/12/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 02/12/2010 तक्रार निकाल दिनांकः- 07/04/2011 कालावधी 04 महिने 05 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.
सदस्या. सदस्या. सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. 1 रेखाबाई भ्र.लक्ष्मण मगर. अर्जदार वय 35 धंदा. घरकाम. अड.व्ही.पी.चौकट. रा.गोगलगांव (सोन्ना) ता.मानवत जि.परभणी. विरुध्द 1 मा.तहसिलदार साहेब. गैरअर्जदार. तहसिल कार्यालय.मानवत ता.मानवत.जि.परभणी. 2 व्यवस्थापक.आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड. अड.अजय व्यास. जनरल इंन्शुरन्स कंपनी लि.झिनत हाऊस. केशवराव खाडे मार्ग.महालक्ष्मी.मुंबई. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा.सौ.सुजाता जोशी.सदस्या. ) अर्जदारास शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत देण्यात येणारी नुकसान भरपाई नाकारुन त्रुटीची सेवा दिल्याबद्दल गैरअर्जदारां विरुध्द अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात अशी की, अर्जदार गोगलगाव ता.मानवत येथील रहिवासी असून अर्जदाराच्या पतीचा जो व्यवसायाने शेतकरी होता,मृत्यू विजेचा धक्का लागल्यामुळे दिनांक 10/03/2006 रोजी झाला अर्जदाराने पतीच्या मृत्यूनंतर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह तहसिलदारांकडे विमा दावा दाखल केला.आजतागायत अर्जदाराचा विमा दावा मंजूर करण्यात आलेला नाही.म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे व रु.1,00,000/-मिळण्याची मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत शपथपत्र, विलंब माफीचा अर्ज, इन्क्वेस्ट पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल इ.कागदपत्र दाखल केले आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 ने त्यांच्या लेखी जबाबात अर्जदाराचा मयत पती हा शेतकरी अपघात विमा पॉलिसीचा लाभार्थी होता हे मान्य केले आहे. व त्यांनी मुळदावा अर्ज सर्व कागदपत्रांसह विमा कंपनीकडे पाठवल्याचे मान्य केले आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 ने गैरअर्जदार क्रमांक 3 कडे दिनांक 15/07/2006 रोजी कागदपत्रांसह विमा दावा पाठवल्याचे पत्र लेखी जबाबासोबत दाखल केले आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदाराने दाखल केलेल्या विलंब माफीच्या अर्जावर आपले म्हणणे दाखल केले आहे व त्यांनी अर्जदाराला दिनाक 28/09/2006 रोजीच एक पत्र पाठवुन काही कागदपत्र 15 दिवसांच्या आत दाखल करण्यास सांगितले होते ही बाब अर्जदाराने मंचापासून दडवुन ठेवलेली आहे. अर्जदाराने विलंब माफीचा अर्ज हा कोणतीही गुणवत्ता नसतांना केलेला आहे म्हणून तो अर्ज फेटाळण्याची विनंती गैरअर्जदार क्रमांक 3 ने केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 ने त्यांच्या लेखी जबाबात अर्जदाराने त्याच्या विमादाव्या सोबत आवश्यक ते कागदपत्र जोडलेले नव्हते म्हणून दिनांक 28/09/2006 रोजी गैरअर्जदाराने त्याला 15 दिवसाच्या आत कागदपत्र दाखल करण्यास सांगितले होते. अर्जदाराने तक्रार दाखल करण्यास 2 वर्ष 8 महिने 22 दिवसांपेक्षा जास्त उशीर केला आहे.तसेच अर्जदाराने शासनाच्या CR 166/11-A दिनांक 05/01/2005 अन्वये कमिशनर ऑफ अग्रीकलचरल पुणे यांच्याकडे हा वाद न्यावयास हवा होता तसेच अर्जदाराने परिपत्रकानुसार घटना घडल्यापासून 7 दिवसाच्या आत विमा दावा दाखल करावयास हवा होता.अर्जदाराने तक्रार दाखल करण्यास कारण दिनांक 10/03/2006 व दिनांक 28/09/2006 रोजी घडले होते.त्यामुळे अर्जदाराने सदरील तक्रार मुदतीनंतर दाखल केल्यामुळे ती फेटाळण्यात यावी. तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 विरुध्द महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय आयागापुढे तक्रार दाखल केली आहे.यामुळे एकाच कारणासाठी दोन तक्रारी दाखल करता येणार नाहीत. सदरील तकार ही मुदतबाह्य आहे व फक्त गैरअर्जदाराला त्रास देण्यासाठी केलेली आहे.म्हणून रु.5000/- च्या नुकसान भरपाई सहीत तक्रार फेटाळण्याची विनंती गैरअर्जदाराने केली आहे. गैरअर्जदाराने लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र, अर्जदाराला दिनांक 28/09/2006 रोजी पाठवलेल्या पत्राची प्रत हे कागदपत्र दाखल केले आहेत. तक्रारीत दाखल कागदपत्र व वकिलांच्या युक्तीवादावरुन तक्रारीत खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर. 1 तक्रार अर्ज कायदेशीर मुदतीत आहे काय ? नाही 2 निर्णय? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे कारणे. अर्जदाराने दाखल केलेला प्रस्तुतचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 24 (अ) ( 1) मधील तरतुदीनुसार तक्रारीस कारण घडल्यापासून 2 वर्षाचे आत दाखल केलेला नाही हे विमा लाभार्थीची मृत्यूची तारीख व प्रस्तुतचे प्रकरण दाखल केलेल्या तारखेचे अवलोकन केले असता लक्षात येते.सदरील तक्रार अर्ज ग्राहक मंचात दिनांक 01/12/2010 रोजी दाखल केलेला आहे वास्तविक Cause of action घडल्यावर म्हणजे मयत लक्ष्मण मगर याचा 10/03/2006 रोजी अपघाती मृत्यू झाल्यावर दोन वर्षांच्या आत म्हणजे दिनांक 10/03/2008 पूर्वी ग्राहक संरखण कायदा कलम 24 (अ) ( 1 ) मधील तरतुदी नुसार तक्रार अर्ज ग्राहक मंचात दाखल करणे आवश्यक होते किंवा गैरअर्जदाराने दिनांक 28/09/2006 रोजी पाठवलेल्या पत्रानंतर 2 वर्षांच्या आत तक्रार दाखल करणे आवश्यक होते.परंतु सदरील तक्रार मुदतीपेक्षा 2 वर्षांपेक्षा उशीरा दाखल केलेली आहे.झालेला उशीर माफ व्हावा म्हणून अर्जदाराने उशीर माफीचा स्वतंत्र अर्ज दिला आहे परंतु त्यात सुध्दा गैरअर्जदाराकडे नुकसान भरपाईची वेळोवेळी मागणी करुनही त्यांनी अर्जदारास काहीही प्रतिउत्तर दिलेले नाही म्हणून तक्रार करणेस सलग कारण घडले असाही ठोस पुरावा सादर केलेला नाही.त्यामुळे तक्रार अर्जास कायदेशिर मुदतीची निश्चितपणे बाधा येत असल्यामुळे तक्रार अर्ज फेटाळण्यास पात्र ठरतो. या संदर्भात रिपोर्टेड केस. 1 2007 (1) सी.पी.जे. पान 232 ( राष्ट्रीय आयोग ) 2 2007 (1) सी.पी.जे. पान 323 ( राष्ट्रीय आयोग ) 3 2009 (1) सी.पी.आर.पान 257 ( राष्ट्रीय आयोग ) 4 महाराष्ट्र राज्य आयोग औरगांबाद सर्कीट बेंच अपील क्रमांक 680/08 कचरुनील विरुध्द आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड जनरल इन्शुरंस कंपनी निकाल 09/02/2002 मध्ये व्यक्त केलेल्या मताचातसेच 5 रीपोर्टेड केस 2009 (3) सी.पी.जे.पान 75 (सुप्रिम कोर्ट ) असे मत व्यक्त केले आहे की, Limitation for the purpose of sec 24 A of Consumer Protection Act 1986 Commences from the date of which incident happen of complaint ought to be filed within 2 years thereof. वरील सर्व रिपोर्टेड केसेस मधील मते विचारात घेऊन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1) तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे. 2) तक्रारीचा खर्च अर्जदार व गैरअर्जदाराने आपापल सोसावा. 3) पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल . सौ.सुजाता जोशी. श्री. सी.बी. पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |