( आदेश पारित द्वारा- श्रीमती अलका पटेल , मा.सदस्या )
आदेश
(पारीत दिनांक –13 डिसेंबर, 2012 )
तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत विरुध्द पक्षाचे सेवेतील त्रृटी बाबत या मंचासमारे दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
तक्रारकर्त्याने आपले स्वतःचे घर असावे या उद्देशाचे विरुध्द पक्षाकडुन मौजा – तारसी ले-आऊट मधील भुखंड क्र 538, खसरा कं.177, ता.जि.नागपूर एकूण क्षेत्रफळ 1104 चौ.फुट घेण्याचा करार करुन भुखंडाची नोंदणी केली व स्टॅम्पपेपरवर बयानापत्र करण्यात आले.
तक्रारदार पुढे नमुद करतात की, बयाणापत्र नोंदविते वेळी रुपये 90,000/- बयाणा दाखल दिले. भुखंडाची किंमत रुपये 1,87,680/- ठरली होती व उर्वरित रक्कम वेळोवेळी हप्तेवारीने देण्याचे ठरले होते. तक्रारकर्त्याने वेळोवेळी हप्त्याप्रमाणे रक्कम भरली व रुपये 45,680/- बाकी राहीले. कराराप्रमाणे विक्री करण्याची 1.4.2011 ठरली होती. तक्रारदाराने दिनांक 28/7/2011 रोजी विकीपत्राबाबत विरुध्द पक्षाकडे चौकशी केली असता एक – दोन महिने थांबावे लागेल असे सांगण्यात आले. तक्रारकर्ता दर महिन्यात विरुध्द पक्षाकडे भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्याकरिता चौकशी करीत राहीला परंतु विरुध्द पक्षाने विक्रीपत्र करुन दिले नाही व टाळाटाळ केली म्हणुन तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास दिनांक 17/4/2012 रोजी कायदेशीर नोटीस दिली. ती नोटीस मिळुनही विरुध्द पक्षाने कोणतेही उत्तर दिले नाही म्हणुन तक्रारर्त्याने ही तक्रार दाखल करुन वरील विवरणातील भुखंडाचे विक्रीपत्र करुन प्रत्यक्ष ताबा मिळावा. नुकसान भरपाई म्हणुन रुपये 3,92,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 20,000/- मिळावे अशी मागणी केली.
तक्रारकर्त्याने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादीनुसार एकुण 7 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात करारनामा, रसिद व पोस्टाची पावती व पोहचपावती इत्यादी कागदपत्रे दाखल केले.
सदर तक्रार दाखल झाल्यानंतर विरुध्द पक्ष यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन विरुध्द पक्ष हजर झाले व लेखी जवाब दाखल करण्याकरिता वेळ मिळण्याबाबत अर्ज केला. परंतु लेखी जवाब दाखल केला नाही म्हणुन प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
तक्रारकर्त्याचे वकील हजर. त्यांच्या तोडी युक्तिवाद ऐकला. तक्रारीत दाखल दस्तऐवज तपासले.
#0#- कारणमिमांसा -#0#
तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार व दस्तऐवजांवरुन तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे करारपत्रावरुन मौजा – तारसी ले-आऊट मधील भुखंड क्र 538, खसरा कं.177, ता.जि.नागपूर एकूण क्षेत्रफळ 1104 चौ.फुट घेण्याचा करार केल्याचे सिध्द होते व बयाणा रक्कम रुपये 45000/- भरल्याचे दाखल दस्तऐवज क्रं. 3 वरुन स्पष्ट होते. तसेच दाखल इतर दस्तऐवजावरुन तक्रारकर्त्याने एकुण 92,000/- रुपये विरुध्द पक्षाकडे भरल्याचे पावतीवरुन सिध्द होते. परंतु तक्रारीत नमुद भुखंडाची किंमत 1,87,680/- पैकी तक्रारदाराने केवळ 90,000/- व 2000/-भरल्याचे दिसते. यावरुन तक्रारदाराने कराराप्रमाणे संपुर्ण रक्कम भरल्याचे दिसुन येत नाही. तक्रारदाराने विरुध्द पक्षाला उर्वरित रक्कम देऊन विक्रीपत्र करुन देण्याबाबत विचारले असता विरुध्द पक्षाने लक्ष दिले नाही व टाळाटाळ करीत आहे. सदरची बाब विरुध्द पक्षाच्या सेवेत त्रुटी दर्शविते.
तक्रारकर्त्याने भुखंडाची संपूर्ण रक्कम विरुध्द पक्षाकडे जमा केलेली नाही. तसेच विरुध्द पक्षांनी कराराप्रमाणे विक्रीपत्र करुन दिले नाही म्हणुन विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याची स्विकृत संपूर्ण रक्कम 12टक्के व्याजासह परत करावी असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब आदेश.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडुन घेतेलेली रक्कम रुपये 92,000/-, द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह, तक्रार दाखल दिनांक 04/06/2012 पासुन रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो मिळुन येणारी रक्कम परत करावी.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 5,000/-(रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2,000/-(रुपये दोन हजार फक्त) द्यावे.
वरील आदेशाचे पालन विरुध्द पक्षाने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे.