नि.36 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 192/2010 नोंदणी तारीख – 11/08/2010 निकाल तारीख – 30/12/2010 निकाल कालावधी – 139 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री आनंद रामचंद्र कदम रा.चितळी, ता.खटाव जि. सातारा सध्या रा. 177/2अ, बुधवार पेठ, सातारा ----- अर्जदार विरुध्द 1. व्यवस्थापक, दत्तात्रय एन.शिंदे टेली जंक्शन, महसूल भवन, गाळा नं.25, एस.टी.स्टँडसमोर, सातारा ----- जाबदार क्र.1 (एकतर्फा) 2. व्यवस्थापक, उदय दिगंबर परांजपे नोकिया केअर सेंटर, शाहू स्टेडियम, एस.टी.स्टँडजवळ, सातारा ----- जाबदार क्र.2 (अभियोक्ता श्री सागर शेडगे) न्यायनिर्णय 1. जाबदार क्र.1 यांचा मोबाईल संच विक्रीचा व्यवसाय आहे. जाबदार क्र.2 हे नोकीया कंपनीचे मोबाईल संच दुरुस्त करुन देण्याचे अधिकृत सेंटर आहे. अर्जदार यांनी जाबदार क्र.1 यांचेकडून नोकिया कंपनीचा 7210 हा संच रक्कम रु.5,800/- देवून खरेदी केला होता. त्याचा वॉरंटी कालावधी दि.23/8/2010 पर्यंत आहे. सदरचा संच सुरुवातीस काही महिने व्यवस्थित चालू होता. परंतु नंतर त्यामध्ये अनेक बिघाड निर्माण होवू लागले. डिसेंबर 2009 पासून सदरचा संच पूर्णपणे अचानक बंद पडला. म्हणून जाबदार क्र.1 यांचे सांगणेवरुन अर्जदार यांनी जाबदार क्र.2 यांचेकडे तो दुरुस्तीसाठी दिला. जाबदार क्र.2 यांनी त्याचे सॉफटवेअर बदलून दिले परंतु दोन महिन्यांनंतर पुन्हा तो हँग झाला. जाबदार क्र.2 यांनी त्याचे सॉफटवेअर चारवेळा बदलून दिले आहे. त्यानंतर दि.28/6/2010 रोजी अर्जदार हे जाबदार यांचेकडे संच दुरुस्तीसाठी घेवून गेले असता, त्यांनी तो जमा करुन घेतला व अर्जदार यांना 49 नंबरचे टोकन दिले. परंतु सदरचे मोबाईलचे सॉफटवेअर बदलल्यानंतर जाबदार यांनी रु.250/- चे बेकायदेशीर मागणी अर्जदार यांचेकडे केली. अर्जदार यांनी नाईलाजाने रक्कम जमा करुन मोबाईल संच ताब्यात घेतला. परंतु त्यानंतर देखील मोबाईल संचामध्ये वारंवार दोष येवू लागला. म्हणून अर्जदार यांनी मोबाईल संच बदलून मागितला असता जाबदार यांनी त्यास नकार दिला. सबब अर्जदार यांनी जाबदार यांना नोटीस पाठविली परंतु जाबदार यांनी त्यास काहीही प्रतिसाद दिला नाही. सबब मोबाईल संच बदलून द्यावा अगर त्याची किंमत रु.5,800/- परत मिळावेत, दुरुस्तीपोटी घेतलेली रक्कम रु.250/- परत मिळावी, मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार यांनी नि. 26 कडे म्हणणे देऊन तक्रार नाकारली आहे. जाबदार यांचे कथनानुसार अर्जदाराच्या सदोष हाताळणीमुळे तसेच मोबाईलमध्ये व्हायरस असलेल्या संगणकामधून काही बाबी घेतल्यामुळे मोबाईलमध्ये व्हायरस गेला व तो बंद पडला. सदरच्या मोबाईलमधून व्हायरस स्कॅन करुन काढावयाचा असल्यास तो वॉरंटी कालावधीमध्ये करुन मिळणार नाही याची पूर्ण कल्पना अर्जदारास दिली होती. अर्जदाराने सदरची बाब मान्य करुन रु.250/- जाबदारकडे जमा केलेले आहेत. मोबाईल संच दुरुस्तीचे अधिकार नोकिया कंपनीने जाबदार क्र.2 यांना दिलेले आहे ते बदलून देण्याचे अधिकार दिलेले नाहीत. अर्जदार यांचा मोबाईल दुरुस्त करुन देण्यास जाबदार तयार आहेत असे जाबदार क्र.2 यांनी अर्जदार यांना कळविलेले आहे. जाबदार यांनी सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रुटी केलेली नाही, सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 3. जाबदार क्र. 1 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही ते नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 4. अर्जदार व जाबदारतर्फे युक्तिवाद ऐकणेत आला तसेच अर्जदार व जाबदार यांची कागदपत्रे पाहणेत आली. 5. अर्जदारची तक्रार पाहता अर्जदारने जाबदार क्र.2 नोकिया केअर सेंटर आहे. जाबदार क्र.1 नोकिया कंपनीच्या मोबाईलचे विक्रेते आहेत. अर्जदारने नोकिया 7210 हा मोबाईल संच जाबदार क्र.1 कडून रक्कम रु.5,800/- ला खरेदी केला परंतु घेतले पासून वारंवार हँग होत आहे. जाबदार क्र.2 यांनी चार वेळा सॉफटवेअर बदलून दिले, एकदा रु.250/- जाबदार क्र.2 यांना दिले आहेत. मोबाईल संच वॉरंटीमध्ये असले कारणामुळे मोबाईल संचाची किंमत परत मिळावी, बेकायदेशीरपणे घेतलेले रु.250/- परत मिळावेत तसेच तक्रारीचा खर्च व मानसिक त्रासापोटी रक्कम मिळावी अशी तक्रार दिसते. 6. जाबदार क्र.2 यांनी नि.26 कडे म्हणणे तसेच शपथपत्र देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदार यांनी आपले कथनामध्ये दि.28/6/2010 रोजी अर्जदारचा मोबाईल दुरुस्तीसाठी घेतला असता सदरच्या मोबाईलमध्ये व्हायरस आलेमुळे (Infection) मोबाईल बंद पडला आहे व व्हायरस स्कॅन करणे वॉरंटी मध्ये नसलेने त्याचे रु.250/- अर्जदारकडून घेतले आहेत. अचानक आवाज बंद होणे, ऐकू येणे हे नेटवर्कचे दोषामुळे होत असते. जाबदारने सदोष सेवा दिली नाही असे कथन केले आहे. 7. अर्जदारने नि. 3 कडे कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये जाबदार क्र.1 ची नोकिया 7210 मोबाईलची रक्कम रु.5,800/- ची मूळ पावती आहे. जाबदार क्र.2 यांनी नि. 29 कडे कागदपत्रे दाखल केली आहेत. जाबदारचे कथनानुसार मोबाईलमध्ये व्हायरस गेलेमुळे मोबाईल हँग झाला होता. सदर कथनाचे पृष्ठयर्थ जाबदार क्र.2 केअर सेंटर कडे इंजिनिअर म्हणून नोकरीस असलेले निखिल गायकवाड यांचे नि.35/1 कडे शपथपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचा मोबाईल व्हायरस गेलेमुळे हँग झाला होता असे कथन केले आहे. व सदर व्हायरस, व्हायरस असलेल्या संगणकामधून अथवा व्हायरस असलेल्या मोबाईलमधून गाणी घेणे, फोटो घेणे वगैरे इ. बाबी केल्यामुळे त्यामधून व्हायरस जात असतो असे कथन केले आहे. सदर व्हायरस स्कॅन करावा लागतो व त्यासाठी वॉरंटी नसते. सबब स्कॅनिंगचे रु.250/- घेतले आहेत असे कथन केले आहे. 8. निर्विवादीतपणे कंपनीने मोबाईल संचामध्ये अनेक facilities उपलब्ध करुन दिलेल्या आहेत व म्हणूनच रु.5,800/- एवढी किंमत कंपनीने घेतली आहे. अशा परिस्थितीत सदर facilities चा उपयोग करताना व्हायरस जातो व व्हायरस स्कॅनसाठी वॉरंटी नाही असे म्हणणे चुकीचे आहे. व्हायरस गेला असे जाबदारचे कथन आहे. परंतु सदर घटना वॉरंटी काळात असलेने दि.28/6/2010 रोजी जाबदार क्र.2 ने अर्जदारकडून सॉफटवेअर अपडेट करणेसाठी घेतलेने रु.250/- अर्जदार परत प्राप्त करुन घेणेस पात्र आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 9. अर्जदारचे पुढील कथन व विनंती पाहता दोषयुक्त मोबाईल संच जाबदार यांनी बदलून द्यावा अथवा रु.5,800/- परत द्यावेत अशी आहे. निर्विवादीतपणे अर्जदारचे मोबाईल दोषयुक्त आहे असे कथन असेल तर दोषयुक्त मोबाईल उत्पादन करणा-या कंपनीस पक्षकार करणे तसेच त्या अनुषंगाने पुरावा दाखल करणे आवश्यक आहे. परंतु अर्जदारने तसे केलेले दिसत नाही. सबब अर्जदारची सदर विनंती मान्य करणे योग्य होणार नाही. 10. अर्जदारच पान नं.2 वरती मोबाईल संच दि.23/8/2010 पर्यंत वॉरंटी कालावधीमध्ये आहे असे कथन करत आहे. तथापि दि.8/10/2010 रोजी पुन्हा वॉरंटीनंतर सॉफटवेअर अपग्रेड करुन रु.250/- घेतलेची पावती अर्जदारने दाखल केली आहे परंतु यावरुन अर्जदारचा facilities चा वापर जास्त आहे हेच दिसते. तसेच दि.11/10/2010 रोजी व्हायब्रेटर नवीन बसविला आहे त्याची रक्कम रु.350/- ची पावतीही अर्जदारने दाखल केली आहे व जाबदारचे चुकीमुळेच व्हायब्रेटर बिघडला असा युक्तिवाद अर्जदारने केला. निर्विवादीतपणे सॉफटवेअर अपग्रेड करताना व्हायब्रेटरशी काही संबंध येत नाही. सबब अर्जदारचे कथनात तथ्य दिसून येत नाही. सबब केवळ रु.250/- तक्रारीचा खर्च व मानसिक त्रासासाठीची रक्कम मिळणेस अर्जदार पात्र आहेत या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 11. सबब आदेश. आदेश 1. अर्जदारचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र.1 व 2 यांनी स्वतंत्र व संयुक्तरित्या अर्जदारास रक्कम रु.250/- परत करावेत. 3. जाबदार क्र.1 व 2 यांनी स्वतंत्र व संयुक्तरित्या अर्जदार यांना तक्रारीचा खर्च व मानसिक त्रासासाठी रु.1,000/- (एक हजार) द्यावेत. 4. जाबदार क्र.1 व 2 यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 30/12/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |