Maharashtra

Nagpur

CC/232/2015

Sheikh Nakeeb Ansari s/o Sheikh Hanif Ansari - Complainant(s)

Versus

Tejpal Sing Palahiya S/o Mahendra Singh Palahiya - Opp.Party(s)

John A Raphael

04 Feb 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/232/2015
 
1. Sheikh Nakeeb Ansari s/o Sheikh Hanif Ansari
r/o Qtr No C-30 W.C.L Tha Saoner Nagpur
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Tejpal Sing Palahiya S/o Mahendra Singh Palahiya
Bezonbag Nagpur 440004.
Nagpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 04 Feb 2017
Final Order / Judgement

(आदेश पारित व्दारा - श्री  विजय सी प्रेमचंदानी,  मा.अध्यक्ष )

आदेश

पारित दिनांक–04 फेब्रुवारी,  2017 )

 

  1. तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्त्‍याची तक्रारीतील थोडक्यात हकीकत अशी आहे की, विरुध्‍द पक्षाने श्री एंटरप्राईजेस नावाने फर्म असुन मौजा –नारा, प.ह.नं.11,खसरा नं. 145, आर्य नगर, कोराडी नगर, नागपूर येथे भुखंड क्रं.55,56,61,62, मधे रहीवासी संकुल टाकल्याचे प्रसिध्‍द केले व त्याआधारे सर्व जनतेला त्यामधील बंगले खरेदी करण्‍याकरिता आमंत्रित व प्रोत्साहीत केले. तक्रारकर्त्याला माहिती झाल्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाचे पत्त्यावर प्रत्यक्ष भेटून विरुध्‍द पक्षाचे उपरोक्त रहीवासी संकुलातील भुखंड क्रं.55 ज्याची आराजी 84.995 चौ.मीटर दर्शविली होती. सदर भुखंड रुपये 41,21,000/- मधे खरेदी करण्‍याचा सौदा केला व तक्रारकर्त्याने बुकींगची रक्कम रुपये 21,000/- रोख दिनांक 14.3.2014 ला विरुध्‍द पक्षाला दिले. दिनांक 20.4.2014 ला तक्रारकर्त्याने विरुध्‍दपक्षाकडे बंगला खरेदी करण्‍याकरिता रुपये 1,00,000/- जमा केले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला वादातीत बंगल्याच्या विक्रीचा करारनामा ई-मेल मधे दिनांक 18.4.2014 ला पाठविला. दिनांक 21.4.2014 ला तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाचे कार्यालयात भेट घेऊन विरुध्‍द पक्षाला वादातीत बंगल्याचे नोंदणीकृत विक्रीपत्राचा करारनामा करुन देण्‍याची विंनती केली. विरुध्‍द पक्षाने त्यावर कोणतीही दखल घेतली नाही. व तक्रारकर्त्याची नोंदणी रद्द करुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला त्याने नोदणीकरिता जमा केलेल्या रक्कमेपैकी रुपये 1,00,000/- चा धनादेश दिला व रुपये 21,000/- नगदी देण्‍याचे आश्‍वासन दिले. सदर धनादेश वटण्‍याकरिता बॅकेत जमा केला असता तो धनादेश न वटता परत आला. तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाला दिनांक 3.9.3014 रोजी त्याबाबत नोटीसही दिली. तरीसुध्‍दा विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याकडुन घेतलेली रक्कम परत केली नाही व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असल्याने  सदर  तक्रार मंचासमक्ष  दाखल  केलेली  आहे.
  3. तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी प्रार्थना केलेली आहे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याकडुन घेतलेले रुपये 1,21,000/- तक्रारकर्त्याला व्याजासह परत करावे. तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी, तक्रारीच्या खर्चापोटी नुकसान भरपाई मिळण्‍याचे आदेश व्हावे.
  4. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्‍द पक्षाला नोटीस काढण्‍यात आली. विरुध्‍द पक्ष पाठविलेली नोटीस  “ सुचना देऊनसुध्‍दा नोटीस घेतली नाही ”  या शे-यासह परत आली म्हणुन नि.क्रं.1 वर दिनांक 3.4.2016 रोजी विरुध्‍द पक्षा विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  5. तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल दस्तऐवज व तोंडी युक्तीवादावरुन मंचासमक्ष खाली मुद्दे विचारार्थ आले.

 

              मुद्दे                                                            निष्कर्ष

   1.    तक्रारकर्ता हा वि.प. यांचा ग्राहक आहे काय ?                         होय.

  1. वि.प. ने तकारकर्त्याचे प्रती अनुचित व्यवहार

      पध्‍दतीचा अवलंब केला आहे का ?                                         होय.

   3.    आदेश ?                                                                  अंतिम आदेशाप्रमाणे.

 

कारणमिमांसा

  1. मुद्दा क्र.1 बाबत – 

तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाकडुन मौजा–नारा,प.ह.नं.11, खसरा नं.145, आर्य नगर, कोराडी नगर, नागपूर येथील भुखंड क्रमांक 55, खरेदी करण्‍याचा तोंडी करार केला होता व तो रद्द झाल्याने विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला रक्कम रुपये 1,00,000/- धनादेशाव्दारे परत दिले होते व तो धनादेश वटण्‍याकरिता बॅकेत जमा केला असता तो धनादेश न वटता परत आला ही बाब तक्रारकर्त्याने नि.2 वर दस्त क्रमांक 3 ते 6 वरुन सिध्‍द होते. म्हणुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे असे सिध्‍द होते म्हणुन मुद्दा क्रं.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

  1. मुद्दा क्रं.2 बाबत –  

तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षासोबत बंगला खरेदी करण्‍याकरिता तोंडी करार केला होता व त्यानंतर विरुध्‍द पक्षाने ई-मेल व्दारे कराराची प्रत तक्रारकर्त्याला पाठविलेली होती. त्यानंतर विरुध्‍द पक्षाने विक्रीपत्र करार केला नाही व घेतलेली रक्कम धनादेशाव्दारे तक्रारकर्त्याला परत केली. सदर धनादेश न वटता परत आला. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याकडुन रक्कम घेवूनसुध्‍दा परत केली नाही ही बाब तक्रारकर्त्याने दाखल दस्तऐवज व नोटीस ची प्रत वरुन सिध्‍द होते म्हणून विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याचे प्रती अनुचित व्यापारी प्रथेचा अवहेलना केलेली आहे असे सिध्‍द होते.  सबब मुद्दा क्रं.2 चे उत्तर होकारार्थी  देण्‍यात  येते.

  1. मुद्दा क्रं.3 बाबत – 

मुद्दा क्रं.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

-आदेश-

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याकडुन घेतलेली रक्कम रुपये 1,21,000/ ,दिनांक 20.4.2012 पासुन द.सा.द.शे. 9टक्के दराने परत करावी.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई   दाखल  रु.10,000/-(रुपये दहा हजार फक्त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.5,000/-(रुपये पाच हजार फक्त )द्यावेत.
  4. वरील आदेशाची पुर्तता विरुध्‍द पक्षाने वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या आदेशाची  प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत  करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 

 
 
[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.