संयुक्त निकालपत्र :- (दि.01.12.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुत ग्राहक तक्रार केस नं.158 ते 161/2010 या चारही तक्रारींच्या विषयांमध्ये साम्य आहे. तसेच, सामनेवाला हे देखील एकच असल्याने हे मंच सदर चारही प्रकरणांमध्ये एकत्रित निकाल पारीत करीत आहे. (2) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तसेच, तक्रारदारांच्या वकिलांनी लेखी युक्तिवाद दाखल केले आहेत. (3) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार हे शैक्षणिक संस्था आहे. सदर संस्थेतर्फे दिप पब्लिक स्कूल ही सी.बी.एस्.ई. पॅटर्न मध्ये शिक्षण देणारी शाळा चालविली जाते. सामनेवाला क्र.1 ही वाहन उत्पादक कंपनी आहे व सामनेवाला क्र.2 हे अधिकृत डिलर आहेत. (4) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये नेणे-आणण्याची सोय होण्यासाठी तक्रारदार संस्थेने सामनेवाला क्र.1 यांनी उत्पादित केलेली मार्को-पोलो व सिटी राईड ही वाहने खरेदी केलेली आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे :- अ.क्र. | बसचे मॉडेल | खरेदी दिनांक | खरेदी व अदा केलेली किंमत | इन्व्हॉईस नं. | अदा किंमतीचा तपशील | बस रजिस्ट्रेशन नं. | तक्रारदाराच्या बस कर्जाबाबतचा तपशील | 1. | मार्कोपोलो | 31.05.2009 | 10,11,300/- | 49 | डी.डी.नं.214019 दि.03.06.2009 | 3291 | 22,75,00/- दि फेडरल बँक लि., शाखा जयसिंगपूर | 2. | सिटीराईड | 26.06.2009 | 6,35,000/- (1,37,000/- व 4,98,000/-) | 97 | चेक नं.28463 दि.18.06.09 व दि.02.07.09 | 3591 | 5,45,000/- टाटा फायनान्स, कोल्हापूर | 3. | मार्कोपोलो | 31.05.2009 | 10,11,300/- | 50 | डी.डी.नं.214019 दि.03.06.09 | 2791 | 22,75,00/- दि फेडरल बँक लि., शाखा जयसिंगपूर | 4. | मार्कोपोलो | 31.05.2009 | 10,11,300/- | 51 | डी.डी.नं.214019 दि.03.06.09 | 3391 | 22,75,00/- दि फेडरल बँक लि., शाखा जयसिंगपूर |
(5) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, उपरोक्त उल्लेख केलेल्या बसेसमध्ये खालीलप्रमाणे दोष दिसून आले आहेत :- बस नं.3291 (मार्कोपोलो) दि.02.08.2009 रोजी सामनेवाला यांचेकडे ग्रिसिंग व टायर्स दाखविणेसाठी गेले असता फक्त ग्रिसींग करुन देणेत आले. व बॉडी लिकेजचा प्रॉब्लेम आहे, गाडीचे गिअर्स नीट पडत नाहीत. टायरची झीज होते. तसेच, बस नं.3591 (सिटीराईड) सामनेवाला यांनी बॅटरी चेकअप करुन रिप्लेस केली. तसेच, ग्रीसींग, वॉशिंग, डिझेल टाकी व गिअर इत्यादी कामे वॉरंटी पिरियडमध्ये करुन दिली. बसचा एअरफिल्टर फुटला असून वॉरंटी पिरीयडमध्ये बदलून मिळावा अशी मागणी करणेत आली. गाडीचा पूर्ण टर्न मारलेनंतर आवाज येणे, ब्रेक मारलेनंतर गाडी एका बाजूला ओढणे हे प्रॉब्लेम येत आहेत. बस नं.2791 (मार्कोपोलो) - सदर गाडीमध्ये सस्पेन्शन व पॉवर स्टेअरिंगमधून खूप आवाज येत होता. बस नं.3391 - या बसचे अॅक्सिलेटर व केबल बदलून दिलेले नाही. तसेच, फायर इक्विपमेंट रिप्लींग करुन दिलेले नाहीत. गाडीचा पूर्ण टर्न मारलेनंतर आवाज येणे व बॉडी लिकेज व टायरची वारंवार झीज होणे हे प्रॉब्लेम येत आहेत. (6) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, वाहनांमध्ये मोठया महत्त्वाच्या तक्रारी या बॉडी लिकेज, टायर रिप्लेसमेंट व बॅटरी या तक्रारी गंभीर स्वरुपाच्या असून त्यात उत्पादित दोष आहे. सबब, सामनेवाला यांनी तक्रारीत उल्लेख केलेले वाहन बदलून देणेचा आदेश व्हावा. तसे अशक्य असलेस, बस खरेदी रक्कमा या द.सा.द.शे.12 टक्के व्याजासह देणेचा आदेश व्हावा. तसेच, तक्रार चालू असलेचे काळात बसला सर्व्हिंसिंग न मिळाल्याने वापरात न आलेस इतर बस वापरणे गरजेचे होणार आहे व त्याचा खर्च मिळावा. तसेच, मानसिक-शारिरीक व आर्थिक त्रासापोटी ग्राहक तक्रार क्र. 158/10, 160/10 व 161/10 मध्ये प्रत्येक तक्रारीकरीता रुपये 9,85,000/- व तक्रार क्र.159/10 मध्ये रुपये 5 लाख देणेचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (7) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत टायर रिप्लेसमेंअचे दि.02.08.09 रोजीचे बिल, तक्रारदार शाळेने बस सर्व्हिसिंगसाठीची दि.01.08.09, दि.09.08.09, दि.19.08.09, दि.22.08.09, दि.29.08.09 ची पत्रे, तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.21.08.09, दि.16.09.09, दि.29.09.09 रोजी पाठविलेल्या नोटीसेस, तक्रारदारांनी चेतन मोटर्स, कोल्हापूर व ठाणे यांना दि.14.10.09 रोजी पाठविलेली नोटीस, तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.27.10.09 व दि.29.10.09, दि.28.11.09 रोजी पाठविलेले ई-मेल, सामनेवाला यांनी तक्रारदारांना दि.23.10.09 रोजी दिलेले पत्र, दि.21.06.09, दि.27.06.09, दि.10.08.09, दि.09.08.09, दि.02.08.09, दि.30.08.09, दि.13.09.09, दि.22.08.09, दि.11.08.09, दि.03.12.09, दि.05.12.09 बस रिपेअरी खर्च व्हौचर्स, दि.27.06.09 रोजीचे बस ड्रायव्हर्सचे जेवण बिल, बस नं.3291, 3391, 3591, 2791 च्या रिपेअरी संबंधीचे तक्ते, बस बिल क्र.2541, 2539 चलन नं.2077, 2075, टॅक्स इन्व्हॉईस सीएम्/09-10/97, रिसीट नं.18469, दि.23.11.09, दि.10.01.10, दि.07.03.10 रोजीचे बस रिपेअरी इन्व्हॉईस, दि.29.11.09 रोजीचे अधिकारपत्र, दि.06.01.10, दि.17.12.09, दि.06.02.10, दि.08.01.10, दि.12.01.10 रोजी सामनेवाला यांना पाठविलेल्या बस तक्रार पत्रे, दि.04.12.10, 05.12.10 रोजीच्या बस रिपेअरी खर्च पावत्या, रजि.पावत्या, पोचपावत्या इत्यादी व शपथपत्रे दाखल केलेली आहेत. (8) सामनेवाला क्र.1 उत्पादक कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत नाही. तसेच, तक्रारदारांनी केलेली मागणी ही रुपये 20 लाखाच्या पुढे असल्याने प्रस्तुतची तक्रार चालणेस पात्र नाही. सदर सामनेवाला यांनी उत्पादित केलेल्या वाहनामध्ये कोणताही दोष नाही. तसेच, दोषाबाबत लॅबोरेटरी टेस्ट किंवा परिक्षण केलेशिवाय दोष निश्चित करता येणार नाहीत. तक्रारीत उल्लेख केलेले दोष संपूर्णपणे समाधानकारकरित्या दुरुस्त करुन दिलेले आहेत. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (9) सामनेवाला क्र.2 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, प्रस्तुतची तक्रार चालविणेस या मंचास कार्यक्षेत्र नाही. तसेच, सदर तक्रारी या आर्थिक अधिकारक्षेत्राच्या बाहेर आहेत. सदर सामनेवाला यांनी वॉरंटी पिरीयडमध्ये चांगली सेवा दिलेली आहे. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये वाहनाबाबत वरवर स्वरुपाच्या तक्रारी केलेल्या आहेत. सदर सामनेवाला यांनी गाडीचे ग्रिसींग, वायपर, डोअर लॉक, अॅक्सिलेटर केबल याबाबत किरकोळ स्वरुपाच्या असलेल्या तक्रारीबाबतची सेवा विनामोबदला दिली आहे. तसेच, वाहनास स्टार्टर लागला नाही, सस्पेंशन व पॉवर स्टेअरिंगमधून आवाज येत होता, गिअर नीट पडत नाही, बॅटरीमध्ये प्रॉब्लेम आहे इत्यादीबाबतच्या तक्रारदारांच्या तक्रारी चुकीच्या आहेत. वाहनामध्ये कोणत्याही स्वरुपाचा उत्पादित दोष आढळून आलेला नाही. वाहनांचा दर्जा अतिशय चांगला आहे. (10) सदर सामनेवाला पुढे सांगतात, सामनेवाला यांनी टाटा मोटर्स कंपनीच्या इंजिनिअर्सची टीम घेवून पाहणी केलेली आहे. त्यानुसार कॉम्बिनेशन स्विचचे वायरिंग कट केले होते व एअर हॉर्न बसविणेकरिता त्यातून चुकीच्या पध्दतीने काढलेले होते. अशा रितीने तक्रारदारांच्या चुकीमुळे कॉम्बिनेशन स्विचमध्ये तक्रार आली होती. तरीसुध्दा कॉम्बिनेशन स्विच बदलून दिलेला आहे. तसेच, व्हील गरम होणे ही बाबदेखील डिजिटल टेम्परेचर मिटर लावून चेक केले असता त्यावेळी ती प्रमाणित कमाल तापमानापेक्षा खूपच कमी आढळून आले आहे. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये खोटी व बनावट कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सदरची कथने म्हणजे इंडियन पिनल कोड 463, 464, 468, 471 अन्वये फौजदारी स्वरुपाचा दखलपात्र गुन्हा आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी व कॉम्पेनसेटरी कॉस्ट रुपये 50,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (11) तक्रारदार तसेच त्यांचे वकिल हे पुढीलप्रमाणे चौकशीच्या तारखांना गैरहजर राहिलेले आहेत. दि.07.08.2010, दि.21.08.2010, दि.04.09.2010, दि.27.09.2010 रोजी गैरहजर आहेत. दि.12.10.2010 रोजी तक्रारदार व त्यांचे वकिल गैरहजर असल्याने सामनेवाला क्र.1 यांचा युक्तिवाद ऐकून घेतलेला आहे. तसेच, त्यानंतर दि.29.10.2010 रोजी सामनेवाला क्र.2 यांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झालेनंतर प्रस्तुतची प्रकरणे निकालाकरिता घेतलेनंतर तक्रारदारांचे वकिल हजर झाले आहेत. दि.30.11.2010 रोजी तक्रारदारांच्या वकिलांनी लेखी युक्तिवाद दाखल केले आहेत. (12) या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्हणणे, उपलब्ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे तक्रारदार संस्थेने सामनेवाला उत्पादक कंपनीचे मार्कोपोलो व सिटीराईड ही वाहने खरेदी केलेली आहेत. सदरच्या वाहनांमध्ये दोष असल्याने प्रस्तुतच्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमधील परिच्छेद 9 मध्ये वाहनांमध्ये असलेल्या मोठया तक्रारी या बॉडी लिकेज, टायर रिप्लेसमेंट व बॅटरी या गंभीर स्वरुपाच्या तक्रारी असलेचे नमूद केले आहे. सामनेवाला यांनी सदरची वस्तुस्थिती नाकारली आहे व तक्रारदारांच्या वाहनांना वेळोवेळी सर्व्हिसिंगची सेवा दिलेली आहे व सद्यस्थितीत सदर वाहने चालू आहेत असे प्रतिपादन केले आहे. तक्रारदारांनी वाहनांच्या दोषाबाबत ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांचेकडे तपासणी होवून मिळणेबाबतचा अर्ज दिला होता. त्यानंतर तक्रारदारांच्या वकिलांनी प्रस्तुत प्रकरणी उपरोक्त उल्लेख केलेल्या वाहनामध्ये बॉडी लिकेजशिवाय कोणताही दोष नसल्याने जयसिंगपूर, जि.कोल्हापूर येथील वाहनाच्या बॉडी लिकेजबाबत तज्ज्ञाकडून तपासणी होवून अहवाल यावा याबाबतचा अर्ज दिला होता. परंतु, उपरोक्त उल्लेख केलेप्रमाणे तक्रारदार व त्यांचे वकिल गैरहजर असलेने सदर तक्रारीच्या गुणदोषावर सामनेवाला वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतलेला आहे व सदरची प्रकरणे निकालावर घेतलेनंतर तक्रारदारांच्या वकिलांनी लेखी युक्तिवाद दाखल केलेले आहेत. सदर लेखी युक्तिवादाचे अवलोकन या मंचाने केले आहे. उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता वाहनांमध्ये उत्पादित दोष असलेचे दिसून येत नाही. तसेच, उपरोक्त उल्लेख केलेप्रमाणे वाहनामध्ये बॉडी लिकेज आहे असे तक्रारदारांनी प्रतिपादन केले होते. सदर वाहनाच्या इंजिनमध्ये कोणताही उत्पादित दोष नसल्याचे दोन्ही बाजूंच्या वकिलांनी प्रतिपादन केले आहे. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनांवरुनही वाहनामध्ये उत्पादित दोष असलेबाबतचे स्पष्ट होत नाही. इत्यादीचा विचार करता तक्रारदारांच्या तक्रारीमध्ये कोणतीही गुणवत्ता या मंचास दिसून येत नाही. सबब उपरोक्ति चारही तक्रारीमध्ये एकत्रित आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. उपरोक्त सर्व तक्रारी फेटाळणेत येतात. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |