Maharashtra

Aurangabad

CC/10/480

GORAKHNATH DADARAO KHILLARE - Complainant(s)

Versus

TATA MOTARS FINANCIAL LTD - Opp.Party(s)

ADV JOSHI

15 Feb 2011

ORDER


DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM AURANGABAD - 431001 2nd FLOOR , COLLECTOR OFFICE BUILDING , AURANGABAD - 431001
Complaint Case No. CC/10/480
1. GORAKHNATH DADARAO KHILLARER/O FATIYABAD,TQ. GANGAPUR,DIST AURANGABAD.AURANGABADMAHARASHTRA ...........Appellant(s)

Versus.
1. TATA MOTARS FINANCIAL LTDNEAR GOLDI TAKIJ,RAILWAY STATION ROAD ,AURANGABAD.AURANGABADMAHARASHTRA ...........Respondent(s)



BEFORE:
Shri.D.S.Deshmukh ,PRESIDENT Smt.Rekha Kapadiya ,MEMBER Smt.Jyoti H.Patki ,MEMBER
PRESENT :ADV JOSHI, Advocate for Complainant
Adv/G.P.shinde, Advocate for Opp.Party

Dated : 15 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

                           

निकाल
          (घोषित द्वारा – श्रीमती ज्‍योती पत्‍की, सदस्‍य )
 
            या तक्रारीची माहिती थोडक्‍यात खालीलप्रमाणे आहे.
         तक्रारदाराने गैरअर्जदार टाटा मोटर्स फायनान्‍स लि., यांचेकडून रिक्षा घेण्‍यासाठी रक्‍कम रु 2,58,000/- अर्थसहाय्य घेतले. सदरील रकमेची परतफेड प्रतिमाह रु 8,650/- प्रमाणे 48 हप्‍त्‍यांमध्‍ये करण्‍याचे ठरले होते. तक्रारदाराने आजपर्यंत 12 हप्‍त्‍यांची रक्‍कम गैरअर्जदाराकडे जमा केलेली आहे. तक्रारदाराचे रिक्षाचा दिनांक 12/10/2009 रोजी अपघात झाला व रिक्षाचे रु 70,000/- इतके नुकसान झाले. सदर रिक्षा दुरुस्‍तीसाठी 5 महिने कालावधी लागला असून रिक्षा दिनांक 21/3/2010 रोजी दुरुस्‍त झाली. सदरील काळात त्‍याचे रिक्षापासून मिळणारे उत्‍पन्‍न बंद असल्‍याने तो गैरअर्जदाराचे हप्‍ते वेळेवर भरु शकला नाही. त्‍यानंतर तक्रारदार गैरअर्जदाराकडे ती हप्‍त्‍यांची रक्‍कम भरणा करण्‍यास गेला असता त्‍यांनी रक्‍कम भरुन घेतली नाही. दिनांक 25/3/2010 रोजी गैरअर्जदाराने तक्रारदारास रु 17,200/- भरण्‍यास सांगितले त्‍यावेळेस तक्रारदाराने ही रक्‍कम गैरअर्जदाराकडे भरली परंतू मागील तीन हप्‍त्‍यांची रक्‍कम गैरअर्जदाराने भरुन घेतली नाही. तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 17/5/2010 , दिनांक 16/6/2010 आणि दिनांक 19/9/2010 रोजी रु 8,650/- प्रतिहप्‍त्‍याप्रमाणे रक्‍कम भरली परंतू मागील तीन हप्‍त्‍यांच्‍या रकमे संदर्भात विचारणा केली असता गैरअर्जदाराने उडवा उडवीची उत्‍तरे दिली. तक्रारदार जानेवारी 2010 पासून तीन हप्‍त्‍यांची रक्‍कम रु 25,930/- भरण्‍यास तयार असून गैरअर्जदार रक्‍कम स्विकारण्‍यास तयार नाहीत. गैरअर्जदाराने बेकायदेशिररित्‍या तक्रारदाराची रिक्षा ओढून नेली. त्‍यानंतर तक्रारदाराने दिनांक 12/7/2010 रोजी रक्‍कम रु 8,650/- आणि दिनांक 20/7/2010 रोजी रक्‍कम रु 35,000/- चा भरणा केला. गैरअर्जदाराने त्‍याचेकडून अतिरिक्‍त रक्‍कम रु 7,000/- वसूल केले. अशा प्रकारे गैरअर्जदाराने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला असून तक्रारदारास त्रुटीची सेवा दिली म्‍हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की गैरअर्जदाराने अतिरिक्‍त घेतलेली रक्‍कम रु 7,000/-   18 टक्‍के व्‍याजासह तसेच मानसिक , शारीरिक , आर्थिक त्रासापोटी व तक्रारीच्‍या खर्चापोटी नुकसान भरपाई देण्‍यात यावी.
         गैरअर्जदार टाटा मोटार्स फायनान्‍स लि., यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्‍यांचे म्‍हणणे असे आहे की, तक्रारदार विलफुल डिफॉल्‍टर असल्‍याकारणाने हायपोथिकेशन अग्रीमेंटप्रमाणे त्‍यांना वाहन जप्‍त करण्‍याचे अधिकार आहेत. तक्रारदाराने वाहन व्‍यापारी उद्देशाकरीता खरेदी केलेले असल्‍यामुळे तक्रारदार ग्राहक या संज्ञेत येत नाहीत. तक्रारदाराने टाटा मॅजीक वाहन खरेदी करण्‍यासाठी दिनांक 28/4/2009 रोजी त्‍यांचेकडून रु 2,73,000/- चे कर्ज घेतले. कर्ज घेतल्‍यापासून दिनांक 25/8/2010 पर्यंत कर्जाच्‍या हप्‍त्‍यांपोटी एकूण रक्‍कम रु 1,49,259/- पैकी रक्‍कम रु 1,32,000/- चा भरणा केला. तक्रारदार थकबाकीदार आहेत. तक्रारदार यांनी थकीत हप्‍ते भरण्‍यासंदर्भात कोणताही प्रयत्‍न केला नाही. याउलट गैरअर्जदार तक्रारदाराकडील थकीत हप्‍ते स्विकारण्‍यास आजही तयार आहेत. तक्रारदाराकडे रु 18,419/- दोन थकीत हप्‍त्‍यापोटी बाकी आहेत. तक्रारदारास कर्ज बाकी रक्‍कम देण्‍यास लागू नये म्‍हणून त्‍याने ही तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदाराच्‍या सेवेत कोणतीही त्रुटी नाही म्‍हणून तक्रारदाराची तक्रार फेटाळण्‍यात यावी व त्‍यास थकीत असलेली हप्‍ते रक्‍कम देण्‍याचा आदेश द्यावा अशी मागणी गैरअर्जदाराने केली आहे.
         तक्रारदार आणि गैरअर्जदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराच्‍या वतीने अड राहूल जोशी आणि गैरअर्जदाराच्‍या वतीने अड ए.एम.मामीडवार यांनी युक्तिवाद केला.
         तक्रारदाराने गैरअर्जदार टाटा मोटार्स फायनान्‍स यांचेकडून टाटा मॅजीक ऑटो रिक्षा हे वाहन खरेदी करण्‍यासाठी कर्ज घेतले होते आणि सदर कर्ज रकमेची परतफेड रु 8,650/- प्रतिमाह हप्‍त्‍याप्रमाणे 48 हप्‍त्‍यामध्‍ये करावयाची होती याविषयी वाद नाही. तक्रारदाराने वेळावेळी कर्ज परतफेडीपोटी गेरअर्जदाराकडे रकमांचा भरणा केल्‍याचे पावत्‍यांवरुन दिसून येते. परंतु तक्रारदाराचे म्‍हणण्‍यानुसार त्‍याच्‍या रिक्षाचा दिनांक 12/10/2009 रोजी अपघात झाला व त्‍याची रिक्षा दुरुस्‍त होण्‍यास 5 महिन्‍यांचा कालावधी लागला त्‍यामुळे सदरील काळात त्‍याचे रिक्षापासून मिळणारे उत्‍पन्‍न बंद झाल्‍याने तो कर्जाचे हप्‍ते वेळेवर भरु शकला नाही. याबाबत गैरअर्जदाराचे म्‍हणणे असे आहे की, तक्रारदाराने थकीत हप्‍ते भरण्‍यासंदर्भात कोणताही प्रयत्‍न केला नाही व ते आजही तक्रारदाराकडील थकीत हप्‍ते स्विकारण्‍यास तयार आहेत.
 
         तक्रारदाराने आपल्‍या तक्रार अर्जात हे मान्‍य केले आहे की, त्‍याच्‍याकडे कर्जाच्‍या रकमेपैकी तीन हप्‍त्‍यांची रक्‍कम बाकी आहे व गैरअर्जदार थकीत रक्‍कम स्विकारण्‍यास तयार नाहीत. तक्रारदाराने थकीत रक्‍कम भरण्‍याचा प्रयत्‍न केला परंतु गैरअर्जदाराने रक्‍कम स्विकारली नाही या म्‍हणण्‍यापुष्‍ठयर्थ कोणताही पुरावा दाखल केला नाही. त्‍यामुळे तक्रारदाराचे या म्‍हणण्‍यावर विश्‍वास ठेवता येणार नाही. तक्रारदाराने हप्‍त्‍यांची रक्‍कम थकल्‍यामुळे गैरअर्जदाराने बेकायदेशिररित्‍या त्‍याची रिक्षा ओढून नेली या म्‍हणण्‍यापुष्‍ठयर्थ कोणताही पुरावा दाखल केला नाही. तक्रारदाराने कर्जाच्‍या रकमेचा पूर्ण भरणा केला असून गैरअर्जदाराने त्‍याचेकडून अतिरिक्‍त रक्‍कम रु 7,000/- वसुल केले याबाबत कोणताही पुरावा दाखल केला नाही. कारण तक्रारदारानेच आपल्‍या तक्रार अर्जात त्‍याच्‍याकडे कर्जाच्‍या रकमेपैकी तीन हप्‍त्‍यांची रक्‍कम बाकी असल्‍याचे मान्‍य केलेले असल्‍यामुळे गैरअर्जदाराने त्‍याचेकडून अतिरिक्‍त रक्‍कम रु 7,000/- वसुल केले या तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये काहीही तथ्‍य नसल्‍याचेच स्‍पष्‍ट दिसून येते. आमच्‍या मतानुसार गैरअर्जदाराच्‍या सेवेत कोणत्‍याही प्रकारची त्रुटी नाही.
         म्‍हणून खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतो.
 
                             आदेश
1. तक्रार फेटाळण्‍यात येते.
2. तक्रारीचा खर्च उभयपक्षांनी आपापला सोसावा.
3. उभयपक्षांना आदेश कळविण्‍यात यावा.
        
 
 
 
(श्रीमती ज्‍योती पत्‍की)     (श्रीमती रेखा कापडिया)       (श्री डी.एस देशमुख)     
     सदस्‍य                   सदस्‍य                   अध्‍यक्ष
UNK
 

[ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER