Maharashtra

Chandrapur

CC/15/228

Sangita Bajarang Pendharkar At Chek Ballarpur - Complainant(s)

Versus

Tata A.I.G.Ganral Insurance Co.Ltd Chandrapur - Opp.Party(s)

Adv.Gayakwad

21 Mar 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/15/228
 
1. Sangita Bajarang Pendharkar At Chek Ballarpur
At Chek Ballarpur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Tata A.I.G.Ganral Insurance Co.Ltd Chandrapur
Near Water Tank Chandrapur
Chandrapur
Maharashtra
2. Kabal Insurance Broking Service , Pune
101 karndikar house 3 floor Mangala Tokies Shivajinagar Pune.
Pune
Maharashtra
3. Taluka Krushi Adhikari Pombhurnana
Pombhurna Tah Pombhurna
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 21 Mar 2018
Final Order / Judgement

::: नि का   :::

मंचाचे निर्णयान्‍वये, कल्‍पना जांगडे (कुटे)   मा.सदस्‍या

१.         विरूद्धपक्ष यांनी, तक्रारकर्त्यास ग्राहक संरक्षण अधिनियम अन्‍वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर केल्‍याने प्रस्‍तूत तक्रार दाखल केली आहे. 

२.         तक्रारकर्तीचे पती श्री. बजरंग दादाजी पेंढारकर यांच्या मालकीची चेक बल्लारपूर, ता. पोम्भूर्णा, जि. चंद्रपूर येथे भूमापन क्र. १२७ शेतजमीन आहे.  सदर शेतजमीन ते करत होते. महाराष्ट्र शासन निर्णय मधील अटी व शर्ती प्रमाणे शेतकरी अपघात विमा योजना जाहीर केली. तक्रारकर्ती यांचे पती श्री. बजरंग दादाजी पेंढारकर यांचे दिनांक ०१.०२.२०१५ रोजी रस्ता अपघातात निधन झाल्याने तक्रारकर्ती यांनी शेतकरी अपघात विमा दावा दिनांक  १०.०४.२०१५ रोजी विरुद्ध पक्ष क्र. ३ यांच्याकडे सादर केला. अर्जदाराने फॉर्म नं. ६ ड सादर करून पत्र पाठवून विमा दावा मंजुर करणेची मागणी केली. परंतु विरुद्ध पक्ष क्र. १ यांनी तक्रारकर्ता यांचे पतीचा विमा दावा अदा न केल्याने तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करून विरुद्ध पक्ष यांनी विम्याची रक्कम तसेच शारिरीक, मानसीक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी दंडात्‍मक रक्‍कम तक्रारकर्त्यास  अदा करावी अशी विनंती तक्रारकर्ता  यांनी केली आहे.

 

३.     विरुद्ध पक्ष क्र. १ यांना मंचाची नोटीस पाठविली असता, त्यांनी तक्रारीतील मुद्द्यांचे खंडन करुन तक्रारकर्ती यांच्या पतीचा दि. ०१.०२.२०१५ रोजी मृत्यू अपघातात झाला असल्याने सदर योजनेचा लाभार्थी नाही. तक्रारकर्ती यांनी विहित मुदतीत तक्रार दाखल केली नाही. मयताची मृत्यूपूर्वी ६ ड मध्ये नोंद नव्हती, त्यामुळे विमा योजनेचा लाभ मयतास मिळणार नाही.विरुद्ध पक्ष क्र. १ यांनी दि.२.१२.२०१५रोजि व शेवटची संधी दि.३.२.२०१६रोजि पत्र पाठवून विमा दावा निकाली काढण्याबाबत आवश्यक दस्तावेजाची मागणी केली परंतु तक्रारकर्त्याने कोणतेही दस्तावेज न दिल्यामुळे विमादावा निकाली काढण्यात आलेला नाही. विरुद्ध पक्ष क्र. १ यांनी तक्रारकर्तीस सेवा सुविधा देण्यास कसूर केला नसून, तक्रारकर्तीस विम्याची रक्कम अदा करणे न्यायोचित नाही सबब तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी, अशी विनंती विरूद्ध पक्ष क्र. १ यांनी केली आहे.

४.        विरुद्ध पक्ष क्र. २ यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनसुद्धा प्रकरणात हजर न झाल्याने त्यांचेविरुद्ध दि.२०.०३.२०१८ रोजी एकतर्फा आदेश पारित करण्यात आले.

५.        विरुद्ध पक्ष क्र. ३ यांना मंचाची नोटीस पाठविली  असता,  विरुद्ध पक्ष क्र. ३ यांनी लेखी जवाब दाखल केला. त्यामध्ये तक्रारकर्तीचे पतीचा दि. १.२.२०१५ रोजी गाडी चालवीत असताना अपघाती मृत्यू झाल्याने शेतकरी विमा अपघात योजनेंतर्गत रक्कम मिळणेकरिता अर्ज केला होता. सदर अर्ज वि.प. क्र. ३ यांनी दि. १६. ०४.२०१५ रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांना सादर केला. दि. २६.०८.२०१५ रोजी वि. प. क्र. २ यांनी वि. प क्र. ३ यांना पत्र पाठवून प्रस्तावातील दस्तावेजाची पूर्तता करण्यास सांगितले. वि. प क्र. ३ यांनी सदर पत्र दि. २८.०८.२०१५ रोजी तक्रारकर्तीला दिले. तक्रारकर्तीने त्रुटीची पूर्तता करून सादर केलेला प्रस्ताव दि. ३.९.१५ रोजी वि. प क्र. ३ यांना मिळाला. त्यांनी सदर प्रस्ताव त्याच दिवशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांचेकडे सादर केला. वि. प क्र. ३ यांनी अपघातग्रस्त व्यक्तीच्या प्रस्तावासंबधी  वरीलप्रमाणे आवश्यक कारवाई व पत्रव्यवहार वरिष्ठ कार्यालयास केलेला आहे.      

६.        तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, तक्रारीलाच पुरावा शपथपत्र समजण्यात यावे अशी पुर्सीस, तसेच विरुद्ध पक्ष क्र. १ व ३ यांचा लेखी जवाब, दस्तावेज, विरुद्ध पक्ष क्र.१ याचे लेखी उत्तरालाच  पुरावा शपथपत्र समजण्यात यावे अशी पुर्सीस आणि तक्रारकर्ती व वि.प.क्र.१ यांचे तोंडी युक्तीवादावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्‍यात येतात.                                                                                                                 मुद्दे                                                    निष्‍कर्ष

 

  1. विरुद्ध पक्ष क्र. १ यांनी तक्रारकर्तीस विमा

कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर

       केल्याची बाब सिद्ध करतात काय?        होय                                                                                                  

  1. विरुद्ध पक्ष क्र. १ तक्रारकर्तीस नुकसानभरपाई

अदा करण्यास पात्र आहेत काय ?      होय                   

   ३.   आदेश ?                                         अंशतः मान्‍य

                       

कारण मिमांसा

मुद्दा क्र. १ व २ :

७.         विरुद्ध पक्ष क्र. ३ यांनी तक्रारकर्तीच्या मयत पतीचा विमा दावा पुढील पूर्ततेसाठी विरुद्ध पक्ष क्र. १ यांचेकडे पाठविला. विरुद्ध पक्ष क्र. १ यांनी सदर दावा पडताळणी करुन दिनांक ०२.१२.२०१५ व दिनांक ०३.०२.२०१६ रोजी ६ ड फॉर्म व इतर दस्तावेजांची मागणी केली. शासन निर्णयामध्ये शेतक-याचा अपघात वा अन्य कारणाने मृत्यू झाल्यास विमा रक्कम अनुज्ञेय आहे, हे न्यायतत्व आहे. सबब, विरुद्ध पक्ष  क्र. ३ यांनी विरुद्ध पक्ष  क्र. १ यांच्याकडे विमा दावा विहित मुदतीत सादर केल्याबाबतचे  दस्तावेज विरुद्ध पक्ष  क्र. ३ यांनी दाखल केली आहेत. यावरून  विरुद्ध पक्ष क्र. १ यांच्याकडे विमा दावा प्राप्त आहे. तसेच तक्रारकर्तीने दाखल केलेल्या ७/१२ व इतर दस्तऐवजावरून तक्रारकर्तीचे मयत पतीचे नावे शेती होती हे सदर दस्तावेजावरून सिद्ध होते. वि. प. क्र. २ यांनी मागितलेल्या दस्तावेजाची पूर्तता तक्रारकर्तीने केल्याचे वि. प क्र. ३ यांचे लेखी उत्तरात नमूद आहे. तसेच त्यांनी त्यासंदर्भात दस्तावेज दाखल केले आहेत. यावरून विरुद्ध पक्ष क्र. १ यांनी दि. २.१२.२०१५ व दि.३.२.२०१६ रोजी  मागणी  केलेल्या दस्तावेजाची पूर्तता तक्रारकर्तीने केली हे सिद्ध होते. महाराष्ट्र शासन निर्णय मधील अटी व शर्ती प्रमाणे शेतकरी अपघात योजने अंतर्गत विमा दावा केवळ विलंबाने सादर केला या तांत्रिक बाबीमुळे नामंजूर करता येणार नाही, असे नमुद केले आहे. शेतकरी अपघात विमा योजना विशेष विमा संरक्षण असून व्यक्तिगत विमा दावा विरुद्ध पक्ष  क्र. ३ यांनी विरुद्ध पक्ष क्र. २ यांच्याकडे पाठविल्यानंतर विहित मुदतीत विरुद्ध पक्ष क्र. १ यांच्याकडे पाठविणे आवश्यक आहे. शासन निर्णयाप्रमाणे, विमा दावा विरुद्ध पक्ष  क्र. ३ यांच्याकडे सादर केल्याचा दिनांक विरुद्ध पक्ष क्र. १ यांना विमा दावा प्राप्त झाल्याचा दिनांक समजण्यात यावा, असे नमूद आहे. जर अपघाती मृत्यु झाला तर केवळ अपघात झाला या कारणास्तव विमा दावा मान्य करावा, असेही नमूद आहे. वि.प.क्र. ३ हे विनामोबदला सल्ला व सहाय्य देणारी संस्था असून विरुद्ध पक्ष क्र. १ यांना महाराष्ट्र शासनाने विमा हप्ता रक्कम अदा करुन घेतल्याची बाब सिद्ध होते. तसेच विरुद्ध पक्ष क्र. १ यांनी महाराष्ट्र शासन निर्णय मधील अटी व शर्ती प्रमाणे न्यायोचीत कारणाशिवाय तक्रारकर्तीच्या पतीचा विमा दावा रक्कम न दिल्याची बाब सिद्ध होते, असे मंचाचे मत आहे. विरुद्ध पक्ष क्र. १ यांनी, न्यायोचित आक्षेपाशिवाय, करारातील अटी व शर्तीचा भंग केल्याची बाब तक्रारकर्तीने सिद्ध केली आहे. विरुद्ध पक्ष  क्र. १ यांनी विमा दावा रक्कम न दिल्याने  तक्रारकर्तीस मानसिक व  शारीरिक त्रास झाला ही बाब दस्तावेज व पुराव्यावरून सिद्ध होते. विरुद्ध पक्ष क्र. १ यांनी तक्रारकर्तीस विमा दावा सेवेबाबत हेतुतः निष्काळजीपणा करुन, अटी व शर्तीचे पालन न केल्याची बाब सिद्ध होते.  तक्रारकर्तीने विमा दावा अर्ज  सादर करूनही विरुद्ध पक्ष  यांनी विमा दावा रक्कम अदा करण्याबाबत कोणतीही उपाययोजना न केल्याची बाब दस्तावेजामुळे सिध्‍द होते. ग्राहक संरक्षण अधिनियम कलम २ (१)(ओ) अन्‍वये “सेवा” या संज्ञेची व्‍याप्‍ती पाहता वैध विमा दावा करार सेवेबाबतची तक्रार मंचाकडे दाखल करता येते, असे न्‍यायतत्‍व आहे. सबब, तक्रारकर्तीची तक्रार वर नमूद निष्‍कर्षावरून, तक्रारकर्तीने सदर तक्रार विमा दावा करार सेवेबाबत दाखल केल्‍याने व ही बाब दस्तावेजासह  सिध्‍द झाल्‍याने, विरुद्ध पक्ष क्र.१ यांनी तक्रारकर्तीस विमा दावा कराराबाबत सेवा सुविधा पुरविण्‍यात कसूर केल्याची बाब सिध्‍द झाल्‍याने व परिणामी तक्रारकर्तीस मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला आहे, ही बाब सिध्‍द झाल्‍याने मुद्दा क्र. १ व २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते. 

 

मुद्दा क्र. ३ : 

८.          मुद्दा क्र. १ व २ चे वरील विवेचनावरुन  खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.

 

आदेश

 

१.  ग्राहक तक्रार क्र. २२८/२०१५ अंशतः मान्‍य करण्‍यात          येते.          

२.  विरुद्ध पक्ष  क्र. १ यांनी, तक्रारकर्तीस शेतकरी अपघात विमा दावा कराराप्रमाणे, ग्राहक संरक्षण अधिनियम अन्‍वये तरतुदीनुसार सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.                                                                                                                               सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केल्‍याची बाब जाहीर करण्यात येते.

३. विरुद्ध पक्ष  क्र. १ यांनी शेतकरी अपघात विमा दावा रक्कम रुपये १,००,०००/- दिनांक १४.१२.२०१५ पासून रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.से. १०% व्याजासह तक्रारकर्तीस अदा करावे.

४. विरुद्ध पक्ष  क्र.१ यांनी शेतकरी अपघात विमा दावा कराराबाबत सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर केल्याने  तक्रारकर्तीस मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. ३०,०००/- या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसात तक्राकर्तीस अदा करावे.

५. विरुद्ध पक्ष  क्र. २ व ३ यांचे विरुद्ध कोणतेही आदेश नाहीत. 

६. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ पाठविण्‍यात यावी. 

 श्री  कल्‍पना जांगडे (कुटे)        किर्ती वैद्य (गाडगीळ)    उमेश वि. जावळीकर   

    (सदस्‍या)                                   (सदस्‍या)              (अध्‍यक्ष)     

 
 
[HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.