Maharashtra

Nagpur

MA/12/2018

DR. RAMKRUSHNA GOPALAN - Complainant(s)

Versus

TATA TELESERVICES LTD. - Opp.Party(s)

ADV. SHRIKANT D. SIRPURKAR

19 Dec 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Miscellaneous Application No. MA/12/2018
( Date of Filing : 14 Jun 2018 )
In
Complaint Case No. CC/418/2018
 
1. DR. RAMKRUSHNA GOPALAN
R/O. 36, SAMARTH NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Appellant(s)
Versus
1. TATA TELESERVICES LTD.
2-A, OLD ISHWAR NAGAR, MAIN MAYURA ROAD, NEW DELHI-110065
DELHI
UP
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
Dated : 19 Dec 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- संजय.वा. पाटील, मा. अध्‍यक्ष)

  1. तक्रारकर्ता यांनी वर्तमान तक्रार दाखल करुन विरुध्‍द पक्ष यांनी सेवेत ञुटी केल्‍याबाबत आणि गैरकायदेशीर बिल पाठविल्‍याबाबत ग्राहक वादाबाबत केस दाखल केली आहे. सदरहु तक्रारीमध्‍ये विरुध्‍द पक्ष यांचेविरुध्‍द बिलाची मागणी करु नये आणि सतत एस.एम.एस. आणि ईमेल पाठवू नये आणि ञास देऊ नये म्‍हणून निशानी क्रमांक ५ प्रमाणे अर्ज केला आहे. सदरहु अर्ज कार्यालयाने एम.ए. १२/२०१८ असा रजिस्‍टर्ड केला आहे. तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्ष यांचेकडुन ईंटरनेट सेवा घेतली होती परंतू मेट्रो रेल च्‍या खोदकामामुळे विरुध्‍द पक्षाची मोठी केबल कापल्‍या गेली होती आणि म्‍हणून ईंटरनेट सेवा खंडीत झाली होती. तरीसुद्धा विरुध्‍द पक्ष हे वापस २०१७ आणि सप्‍टेंबर २०१७ या बिलाची मागणी करतात आणि तक्रारकर्ता यांना सतत ञास देत आहे.
  2. विरुध्‍द पक्ष यांनी ईटरनेट सेवा दिल्‍याचे मान्‍य केले आहे परंतू सेवेमध्‍ये  कोणत्‍याही प्रकारे ञुटी केलेली नाही आणि म्‍हणून विरुध्‍द पक्ष यांना बिल मागण्‍याचा अधिकार आहे असा बचाव घेतलेला आहे आणि निशानी क्रमांक ५ चा अर्ज नामंजूर करण्‍याची विनंती केलेली आहे.
  3. आम्‍ही उभयपक्षाचे वकीलांचा युक्‍तीवाद ऐकला. वर्तमान प्रकरणात तक्रारकर्ते यांना विरुध्‍द पक्ष यांनी ईंटरनेट सेवा दिल्‍याबाबतचे मान्‍य केले आहे आणि सदरहु सेवेमध्‍ये केबल कापल्‍यामुळे खंडीत झाल्‍याचे नाकारले आहे परंतू ही बाब गुणदोषावर वर्तमान प्रकरणामध्‍ये ठरविले आवश्‍यक आहे. तक्रारकर्ता यांनी निशानी क्रमांक ५ ला प्रतिज्ञापञ देऊन सेवा खंडित केल्‍याचे नमुद केलेले आहे आणि सतत ञास देत असल्‍याबाबत नमुद केले आहे. ईंटरनेट सेवेमध्‍ये ञुटी असल्‍यामुळे तक्रारकर्ता हा नुकसान भरपाई सुद्धा मिळण्‍यास पाञ आहे अशा परिस्‍थीतीमध्‍ये विरुध्‍द पक्ष यांनी खंडीत केलेल्‍या काळाबाबत बिल मागणे अयोग्‍य आहे आणि म्‍हणून तक्रारकर्त्‍याचा अंतरिम आदेश मिळण्‍याचा अर्ज मंजूर करणे योग्‍य आहे असे आमचे मत आहे. सबब आदेश खालिलप्रमाणे..

आदेश

  1. तक्रारकर्त्‍याचा अंतरीम आदेश मिळण्‍याचा निशानी क्रमांक ५/एम.ए.१२/२०१८ मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष यांनी मुळ तक्रारीचा अंतिम निकाल होईपर्यंत तक्रारकर्त्‍याला ऑगस्‍ट २०१७ आणि सप्‍टेंबर २०१७ या महिण्‍याचे बिले मागवू नये आणि त्‍यासंबंधी ईमेल, एस.एम.एस अथवा फोन कॉल करुन कार्यवाही करु नये आणि तक्रारकर्त्‍याला ञास देऊ नये.  
  3. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.