कच्चे रजि.नं.69/2008 ग्राहक तक्रार क्रमांकः-380/2008 तक्रार दाखल दिनांकः-20/06/2008 (अडमशिन स्टेज) निकाल तारीखः-06/09/2008 कालावधी-00वर्ष02महिना 17दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे. 1)रजनी देवी 2)अमरेश चंद्रा दोघेही राहणार-पलॅट नं.1ए-13/14, 4था मजला, बिल्डींग नं.1, श्री कृष्णा को.ऑ.सो.लि., शहाड (प) 421 103 ....तक्रारकर्ता 1 व 2 विरुध्द 1)टाटा स्टील लि., बॉम्बे हाऊस, 24 होमी मॉडे स्ट्रीट, फोर्ट, मुंबई. 400 001 ....विरुध्दपक्ष1
2.जे.सी.भाम, कंपनी सेक्रेटरी व कम्प्लायन्स ऑफिसर टाटा स्टील लि., बॉम्बे हाऊस, 24, होमी मॉडे स्ट्रीट फोर्ट, मुंबई.400 001 ....विरुध्दपक्ष 2
3)इनटाईम स्पेक्ट्रअम रजिस्ट्री लि., सी-13, पॅनल सिल्क मिल्स कंपाऊंउ, भांडूप (प)मुंबई 400 078 ....विरुध्दपक्ष 3 2/- गणपुर्तीः-1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.श्री.पी.एन.शिरसाट, मा.सदस्य
निकालपत्र (पारित दिनांकः-06/09/2008) सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा यांचेव्दारे आदेशः- 1.सदरची तक्रार तक्रारदार यांनी विरुध्द पक्षकार यांचे विरुध्द दाखल करुन नमूद केली आहे की, तक्रारदार यांनी विरुध्पक्षकार यांचेकडे 80सीसीपीएस करता 8,000/- रुपये रक्कम कंपनीज् बँकर्स व 18 इक्वीटी शेअर्स 5,400/- रुपये दि.15/12/2007 रोजी मिळण्याकरता भरणा केले आहे. परंतू विरुध्दपक्षकार यांनी दि.21/01/2008 रोजी तक्रारदार यांनी तक्रारदार यांचे अर्जामध्ये सहया वेगवेगळया प्रकारच्या असल्याने व अन्य कारणाने रक्कम परत केली आहे, व शेअर्स देण्याचे नाकारले आहे असे शेअर्स तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकार यांचेकडून मिळावेत व मंचाने तसे आदेश करावेत. तक्रारदार यांचे मागणीप्रमाणे शेअर्स देय केले नाही. म्हणून आर्थिक व शारीरीक मानसिक त्रास झाला व सदर अर्ज दाखल करणे भाग पडले म्हणून नुकसान भरपाई मागणी केलेली आहे. विरुध्दपक्षकार यांनी दि.01/02/2008 रोजी तक्रारदार यांचा अर्ज का नामंजूर केला व शेअर्स का दिले नाही. याबाबत लेखी कळविले होते. परंतू तदनंतर तक्रारदार यांनी दि.28/02/2008 रोजी पुन्हा माहिती दिली नाही. म्हणून सदरची तक्रार मंचात दाखल करुन वरील प्रमाणे मागणी केलेली आहे व विनंती केलेली आहे.
3/- 2.तक्रारदार यांनी दाखल केलेला अर्ज व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद यांची सुक्ष्मरित्या अवलोकन केलेअसता तक्रारदाराने विरुध्दपक्षकार यांचेकडे अर्जात नमूद केल्याप्रमाणे रक्कम पाठविली आहे व शेअर्स मागणी केली आहे परंतु असे शेअर्स अर्जामध्ये तांत्रीक चुका असल्याने देय केले नाही व रक्कम तक्रारदार यांना परत पाठविले आहे. व या ठिकाणी लेखी उत्तर दि.01/02/2008 रोजी विरुध्दपक्षकार यांना दिला असल्याने विरुध्द पक्षकार यांचेकडे सदरच्या त्रुटी हलगर्जीपणा केले हे सिध्द होत नाही. म्हणून सदरची तक्रार करणे कोणतेच तथ्य नसल्याने सदरची तक्रार अडमशिन (तक्रार दाखल करणे) स्टेजला दाखल करुन घेण्याचे स्थितीतच तथ्य नसल्याने व पात्र नसल्याने दाखल करुन घेतलेली नाही.
3.मा.राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग नवी दिल्ली यांचे दिनांक 31 मे 2005 चे नियमानुसार सदर तक्रार ''प्राथमिक टप्प्यावर तपासणी व पडताळणी'' केली असता सदर प्रकरण मंचात दाखल करुन घेण्यासच पात्र नाही. म्हणून अडमशिन स्टेजलाच सदर तक्रार दाखल करुन घेण्यास आलेली नाही. म्हणून आदेश.
आदेश 1.तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंचात चालणेस पात्र नसल्याने नामंजूर करणेत आला आहे.
4/- 2.तक्रारकर्ता यांनी स्टॅम्पकरता जमा केलेली डीडी/आयपीओ ची रक्कम रु.100/- शासन दप्तरी जमा करुन घ्यावा.
3.तक्रारदार यांनी अर्जाचा खर्च स्वतः सोसावा.
4.तक्रारदार यांनी मा.सदस्य तक्रार दाखल केलेल्या दोन प्रती (फाईल)त्वरीत परत घेऊन जाव्यात.
दिनांकः-06/09/2008 ठिकाणः-ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट) (सौ.शशिकला श.पाटील) सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे. दापांशिंदे |