तक्रार क्रमांक – 03/2007 तक्रार दाखल दिनांक – 10/01/2007 निकालपञ दिनांक – 20/09/2008 कालावधी - 1वर्ष 8 महिने 10 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर श्री. जितेंद्र एन चंदानी रा. सर्व्हे नं. 46, मुबई नाशिक हायवे रोड, भिवंडी, सरळगांव, जिल्हा ठाणे. .. तक्रारदार
विरूध्द
1. व्यवस्थापक/ अध्यक्ष टाटा मोटर्स लिमिटेड (व्यापारी वाहने व्यवहार विभाग) पिंपरी पुणे पिनकोड 411018 नोंदणी कृत कार्यालय मुबई हाऊस 24 होमी मोदी रोड मुंबई - 400 001 महाराष्ट्र राज्य. 2. विभागीय सेवा व्यवस्थापक टाटा मोटर्स लिमिटेड (व्यापारी वाहने व्यवहार विभाग) तीन हात नाका ज्ञान साधना कॉलेज रोड ठीणे पिन कोड 400 604 महाराष्ट्र राज्य 3. मेसर्स कमल माटर्स अधिकृत विक्रता टाटा मोटर्स लिमिटेड (व्यापारी वाहने व्यवहार विभाग) प्लॉट नं. 3 एम ई एस शाळे जवळ विठ्ठलवाडी स्टेशन रोड, उल्हासनगर - 3, जिल्हा ठाणे. .. सामनेवाला
समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य .. 2 .. उपस्थितीः- त.क तर्फे वकिल वि.प तर्फे वकिल आदेश (पारित दिः 20/09/2008 ) मा. श्री. पी. एन. शिरसाट – सदस्य यांचे आदेशानुसार 1. तक्रारकर्त्यांची तक्रार संक्षिप्त स्वरुपात नमुद केली आहे. तक्रारदाराने स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी व रोजगार निर्माण करण्यासाठी विरुध्द पक्षकार नं 3 यांचे अधिकृत दुकानातुन विरुध्द पक्षकार नं. 1 व 2 यांनी उत्पादीत केलेला टाटा टेम्पो नं. 912 एम एच 04 सी. जी 9853 चेसीस नं. 454020 के युझेड 750073 इंजिन नं. 497 टी. सी. 92 चावी नं. 15919 नुसार रुपये 6,79,196.31 व्याज रु. 9,200/- व 4 वर्षाकरीता विमा पॉलीसी रु. 30,000/- असे एकुण रुपये 8,01,198.31स विकत घेतला. त्या सौद्यापोटी रु. 25,000/- धनादेशाद्वारा विरुध्दपक्षाला सादर करुन बाकी रक्कम टाटा फायनान्स कंपनीने दि. 04/11/2005 रोजी दिली. तसेच कर्जफेडीचे मासीक रु. 15,290/- महिन्याप्रमाणे परत करण्याचा व्यवहार ठरला. सदरच्या व्यवहाराची पावती व इतर कागदपत्रे तक्रारीसोबत जोडले आहेत.
2. दिनांक 04/11/2005 रोजी वरील वाहानाचा ताबा घेतल्यानंतर ते वाहन 12/11/2005 रोजी बंद पडले. त्याची विरूध्द पक्षकार नं 3 कडे तोंडी तक्रार केली व वाहन दुरुस्तीसाठी त्यांचे गॅरेज मध्ये ठेवले. तेव्हा वाहनामध्ये असलेले खालील दोष दृष्टीस पडले उदाः क्लच बरोबर काम
.. 3 .. करीत नाहीत, हवा गळती होणे, दरवाजे बरोबर न लागणे, इत्यादी व सदरील वाहनाची वॉरंटी कालावधी कार्यान्वीत असुनही दुरुस्तीचे पैसे तक्रारदाराकडुन वसुल करुन घेतले. परंतु वाहनामध्ये दोष असल्यामुळे तो व्यवस्थीतपणे दुरुस्त केला नाही. त्यामुळे त्याचे विरुध्द पक्षकारांना वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रार केली शेवटी दिनांक 29/09/2006 रोजी व 14/11/2006 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली. तरीही विरुध्द पक्षकरांनी वाहनातील दोष दुरुस्त न केल्यामुळे सदरची तक्रार या मंचात दाखल करुन खालील प्रार्थना केली आहे. अ) दोषयुक्त वाहन बदलून चांगल्या स्थितीतील दुसरे वाहन मिळावे. ब) रु. 12,000/- महीन्याप्रमाणे 14 महिने वाहन चालु नसल्यामुळे झालेली नुकसान रु. 1,67,000/- भरुन देणे. क) तक्रार अर्जाचा खर्च देणे ड) इतर न्यायाचे हुकुम तक्रारदाराचे लाभात व्हावेत त्यानुसार विरुध्दपक्षकार नं. 1 व 2 यांनी वकिलपत्र निशाणी 6 वर व लेखी जबाब निशाणी 7 वर सादर केला. तसेच विरुध्द पक्षकार नं. 3 यांनी वकिलपत्र निशाणी 8 वर लेखी जबाब निशाणी 9 वर सादर केला. तक्रारदाराने त्याचे प्रत्युत्तर निशाणी 10 वर सादर केले तसेच तक्रारदाराने प्रतिज्ञापत्र निशाणी 11 व कागदपत्रे निशाणी 12 वर सादर केले तसेच उभय पक्षकारांना त्यांचे लेखी युक्तीवाद निशाणी 13, निशाणी 14 व निशाणी 15 वर सादर केले. .. 4 .. 3. विरुध्दपक्षकार नं. 1 व नं. 2 यांनी सर्व आरोप फेटाळून लावले व तक्रारदारालाच आव्हान केले की, जर वाहनातच उत्पादनातील दोष होता तर तक्रारदाराने सरकारी किंवा नामांकित प्रयोगशाळेमधून वाहनामध्येच उत्पादनातील दोष आहे असे प्रमाणपत्र आणणे व सादर करणे आवश्यक होते ते त्यांनी केले नाही त्यामुळे वाहनामध्ये उत्पादनातील दोष नाही हे सिध्द होते तसेच वॉरंटी/गॅरंटी कालावधीमध्ये जो जो दोष निर्माण झाला तो दुरुस्त केला. व जो दोष वॉरंन्टीमध्ये नाही त्या दोष दुरुस्तीसाठी रक्कम घेतली ती योग्य आहे. तसेच सदरहु वाहन 1 वर्षामध्ये 36938 किलोमिटर चालले म्हणजे तो उत्पादनातील दोष्ा आहे हे सिध्द होत नाही. तसेच विरुध्दपक्षकार नं. 3 ने वाहनाची डिलिवरी दि. 04/11/2005 रोजी तक्रारदाराला दिली हे मान्य केले परंतु क्लच बरोबर नाही, दरवाजा बंद होत नाही हवा गळती होते हे आरोप मान्य केले नाही. जे दोष दुरुस्त केले व त्यांचे पैसे वसुल केले ते दोष गॅरंटी/वॉरंटी मध्ये उल्लेख नव्हता. अनेक ड्रायव्हर बदलल्यामुळे वाहन बेजबाबदारपणे चालविणे, वाहनाची काळजी न घेणे हि तक्रारदाराचीच जबाबदारी आहे. तक्रारदाराने जी बिले सादर केली ती सामान्य वापरातील wear and tear असल्यामुळे दुरुस्ती करण्यासाठी पैसे आकारणी करावीच लागते कारण ती वॉरंटी/गॅरंटी मध्ये समाविष्ट नाहीत, महाप्रबंधकाने दिनांक 25/10/2006 रोजी तक्रारदाराला एक पत्रलिहुन 25 दिवसात तक्रारदार वाहन दुरुस्तीस आणतील व ते दुरुस्त करुन देऊ तसेच तक्रारदाराने आपले वाहन भिवंडी येथील कार्यशाळेमध्ये .. 5 .. दिनांक 26/10/2006 पर्यंत आणावे व ते त्या तारखेपर्यंत आणले नाही तर त्यांचे वाहन व्यवस्थीतरीत्या चालु आहे ok आहे असे समजावे. तसेच वाहन खरेदी करतांना फॉर्म नं. 21 व फॉर्म नं. 22 देण्यात येतात व त्याची पुर्तता करावी लागते फॉर्म नं 21 मध्ये तांत्रिक बाबी सामाविष्ट असतात उदाः वाहन ओके (व्यवस्थीत स्थितीत चालण्यासाठी) आहे किंवा नाही या साठी असते. तसेच फॉर्म नं. 22 मध्ये (Road worthiness) वाहन रस्त्यावर चालण्यास योग्य आहे किंवा नाही. जर ते वाहन योग्य असेल तरच वाहनाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी पाठवितात व अयोग्य असेल तर वाहनाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी पाठवित नाही. त्यासर्व बाबी तक्रारदाराने विनासायास केल्या. तसेच विरुध्द पक्षकार नं. 3 यांनी दिलेली सरतपारणी हिच लेखी युक्तीवाद समजावा अशी पुरसीस दाखल केली.
3. तक्रारदाराने प्रमाणिकपणे कबुल केले की, त्यांनी वाहन किती किलोमिटर चालले याची नोंद केली नाही. जेव्हा जेव्हा वाहन बिघडले तेव्हा तेव्हा विरुध्द पक्षकाराना लेखी, तोंडी, फॅक्स द्वारे भ्रमणध्वनीद्वारे कळविले. त्याची दखल घेतली नाही म्हणुन वकिलामार्फत 2 वेळा नोटिस पाठविल्या. तसेच वाहन एकाच ठिकाणी उभे असल्यामुळे मालाची ने आण करता आली नाही त्यामुळे आर्थिक उलाढाली करता आल्या नाहीत व आवक नसल्यामुळे व्याजाचे कर्ज फेडता आले नाही व वाहनाचा ताबा सध्या विरुध्दपक्षकार नं 1 व 3 कडेच सुपुर्द केला आहे.
.. 6 .. 4. वरील तक्रारीसंबंधी एकमेव मुद्दा उपस्थीत होतो. तो येणे प्रमाणेः- विरुध्दपक्षकारांनी सेवेमध्ये त्रृटी/न्युनता किंवा बेजबाबदारपणा दाखविला हे तक्रारदार सिध्द करु शकले काय? उत्तर – संमिश्र कारण मिमांसा संदर्भात सर्वप्रथम सर्व संबंधीतांनी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेणे महत्वाचे आहे की, मोठमोठे उत्पादक, व्यापारी, सेवापुरविण्या-या संस्था यांना बाजार पेठेतील अत्याधुनिक ज्ञान, पैसे व चतुराई इत्यादी गुणामुळे ते तक्रारदाराचे शोषण करतात आणि ते होऊ नये म्हणुन लोकसभेने ग्राहक सरंक्षण कायदा 1986 हा तक्रारदाराचे हित जपण्याचे दृष्टीकोनातुन निर्माण करण्यात आला आहे. या तक्रारीसंबधी तक्रारदारालाही तसाच अनुभव आलेला आहे. तक्रारदाराने विरुध्द पक्षकार नं 3 यांना रु. 25,000/- चा धनादेश दिनांक 17/10/2005 व 86,650/- चा धनादेश दिनांक 04/11/2005 रोजी सुपुर्द करुन टाटा उत्पादित टेम्पो नं. 912 एम.एच 04 सी.जी 9853 चेसीस नं. 454020 के. यु. झेड 750073 इंजिन 497 टी सी 92 चावी नं. 15919 नुसार रु. 6,79,198.31 व्याज 92,000/- व 4 वर्षाकरीता विमा पॉलीसी रु. 30,000/- असे एकुण रु. 8,02,198.31 स विकत घेतला. वाहन घेऊन सामानाची/मालाची ने आण करुन स्वतःचा व कुटुंबियांचा उदरनिर्वाह करावयाचा उद्देश होता परंतु वाहनाचा ताबा 04/11/2005 घेतला व दिनांक 12/11/2005 रोजी वाहनामध्ये खालील दोष दृष्टीस पडले उदाः क्लच .. 7 .. बरोबर काम करीत नाहीत, हवा गाळती होते, दरवाजे बरोबर लागत नाहीत. वरील दोष दुरुस्त करावा म्हणुन बरेच वेळा लेखी, तोंडी, फॅक्स द्वारे दुरध्वनिद्वारे कळविले. कोणतीही दखल घेतली नाही म्हणुन वकिलामार्फत 2 वेळा नोटिस पाठविल्या त्यानुसार किरकोळ दुरुस्त्या केल्या परंतु वाहन समाधानकारकरित्या दुरुस्त करुन न दिल्यामुळे तक्रारदाराने ते वाहन विरुध्दपक्षकार नं 1 व 3 यांचे ताब्यात दिले आहे व तेव्हापासुन मालाची आयात निर्यात/ ने आण्ा करणे बंद असल्यामुळे आवक शुन्य असल्यामुळे व्याजाचे हप्ते देण्यास तक्रारदार असमर्थ आहेत. तसेच वाहनात उत्पादनातीलच दोष आहेत हे पुराव्यानिशी कुणीही सिध्द केले नाही. उत्पादनातील दोष आहेत हे सिध्द करण्यासाठी सरकारी किंवा नामांकित कार्यशाळेचे प्रमाणपत्र सादर केले नाही. तक्रारदारानेही वाहन किती किलोमिटर चालले याची नोंद घेतली नाही. विरुध्द पक्षकाराने वाहन 1 वर्षामध्ये 36938 किलोमिटर प्रवास केला असे सिध्द केल्यामुळे त्या वाहनामध्ये उत्पादनातील दोष नाही हे स्पष्ट होते.
वरील बाबींसंबंधी कागदपत्राचा अभ्यास केल्यास असे दिसते की उभय पक्षकाराकडून म्हणजे तक्रारदार आणि विरुध्दपक्षकाराकडून (contributory Negligence) सामुहिक बेजबाबदारपणा झाला आहे. The principle of the Justice delivery system is not only to DELIVER THE JUSTICE; but THE JUSTICE SHOULD BE SEEN BY PUBLIC. न्यायीक प्रक्रियेचे एक महत्वाचे तत्व असे आहे कि, "न्याय .. 8 .. दिला आहे” असेच नाही तर जनतेलाही दिसले पाहिजे की, न्याय झाला आहे.
सदरहु तक्रारीमध्ये उभय पक्षकारांनी आपापली बाजु उत्कृष्टपणे मांडली आहे. उदाः आगावु रक्कम देऊन वाहन खरेदी करणे थोडयाच दिवसात वाहनात दोष निर्माण होणे, दोष दुरुस्त होण्यासाठी प्रयत्न करणे, वाहनामध्ये दोष आहे हे सिध्द होण्यासाठी कार्यशाळेचे प्रमाणपत्र सादर न करणे तक्रारदाराने फॉर्म न. 21 व 22 भरुन देणे. त्या आधारावर रजिस्ट्रेशन करणे एवढे करुनही मनाजोगते वाहन दुरुस्त न होणे व ज्या उद्देशाकरीता वाहन घेतले तो उद्देश सफल न होणे त्या करीता वाहन विरुध्द पक्षकारांच्या ताब्यात देणे त्यामुळे उदरनिर्वाहाचे उत्पन्न बुडणे वरील सर्व बाबी हया सामुहिक बेजबाबदारी (Contributory Negligence) या तत्वात बसत असल्यामुळे हे मंच पुढील आदेश पारीत करीत आहे. अंतीम आदेश 1. तक्रार क्र. 03/2007 हि अंशःत मंजुर करणेत आले आहे. 2. खर्चाचे कोणतेही आदेश नाहीत. 3. विरुध्द पक्षकार 1, 2 आणि 3 यांनी सामुहिकपणे आणि एकत्रीतपणे तक्रारदाराचे वाहन समाधानकारकरित्या स्वः खर्चाने दुरुस्त करुन द्यावा. .. 8 .. 4. वरील आदेशाची अमंल बजावणी विरुध्दपक्षकार 1, 2 व 3 यांनी 30 दिवसांचे आत करावयाची आहे. विहीत मुदतीत अंमलबजावणी न केल्यास त्यांचे विरुध्द पुढील आदेश सुनावण्याचे हक्क हे मंच राखुन ठेवित आहे. 5. वरील आदेशाची सांक्षांकित प्रत उभय पक्षकारास त्वरीत द्यावी. 6. तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही. दिनांक – 20/09/2008 ठिकान - ठाणे (श्री. पी. एन. शिरसाट) (सौ. शशिकला श. पाटील) सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|