Maharashtra

Solapur

cc/09/262

Vashanti D. Surya vanshi - Complainant(s)

Versus

Tata Motors Pvt. Ltd - Opp.Party(s)

30 Mar 2015

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum, Solapur.
Behind District Treasury Office, Solapur.
 
Complaint Case No. cc/09/262
 
1. Vashanti D. Surya vanshi
Bijapur Rd. solapur
...........Complainant(s)
Versus
1. Tata Motors Pvt. Ltd
Hutatma Chowk, Mumbai
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Milind B. Pawar PRESIDENT
  HON'BLE MR.O.G.PATIL MEMBER
 HON'BLE MRS. Babita M. Mahant Gajare MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. 

ग्राहक तक्रार क्रमांक : 262/2009

तक्रार दाखल दिनांक :  29/05/2009

(मा.राज्‍य आयोगाकडून फेर चौकशीचा आदेश दि.21/09/2010 )  

आदेश दिनांक :30/03/2015   

निकाल कालावधी:-05वर्षे,10म,01दि.

 

श्रीमती वासंती डी. सूर्यवंशी, वय 58 वर्षे, व्‍यवसाय नोकरी,

रा. डी.सी.सी. बँक कॉलनी, ब्‍लॉक नं.44, इंदिरा नगरचे

पाठीमागे, विजापूर रोड, सोलापूर - 413 004.                       तक्रारकर्ता/अर्जदार 

                        विरुध्‍द   

1. (अ) टाटा मोटर्स प्रा.लि., मुंबई, मुख्‍य कार्यालय,

   गीत अनिल बिल्‍डींग, 13/90, नागीनदास मास्‍टर रोड,

   हुतात्‍मा चौक, फोर्ट, मुंबई - 400 001.

   (ब) टाटा मोटर्स प्रा.लि., पुणे, रिजनल ऑफीस,

   पहिला मजला, सिटी मॉल, पुणे विद्यापिठाशेजारी,

   गणेश खींड रोड, पुणे - 411 007.

2. (अ) हुंडेकरी मोटर्स प्रा.लि., अहमदनगर,

   अहमदनगर-मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर-414003.      

   (ब) हुंडेकरी मोटर्स प्रा.लि. सोलापूर,

   मॅनेजर श्री. चिडगुपकर, वय 45 वर्षे, व्‍यवसाय मॅनेजर,

   रा. 164-डी, काळजापूर मारुतीजवळ, सोलापूर 413001.             विरुध्‍द पक्ष/गैर अर्जदार

 

               उपस्थिती:- श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्‍यक्ष

                 श्री.ओंकारसिंह जी.पाटील,सदस्‍य

                   अर्जदार तर्फे विधिज्ञ :-श्री.एस.एस.कालेकर

           विरुध्‍दपक्षातर्फे विधिज्ञ:-श्री.व्‍ही.एस.आळंगे वि.प.1 करीता

                              श्री.रमेश कणबसकर वि.प.2 करीता

निकालपत्र

(पारीत दिनांक:-30/03/2015)

मा.श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्‍यक्ष यांचेव्‍दारा :-

                              (2)               त.क्र.262/2009

 

1.     प्रस्‍तूत तक्रार  तक्रारकर्ता यांनी विरुध्‍दपक्ष नं.1 व 2 विरुध्‍द वाहनातील उत्‍पादनाती दोषाबद्दल दाखल केली आहे. मात्र सुरुवातीस प्रकरण दाखल झालेनंतर विरुध्‍दपक्ष क्र.1 हे हजर न राहिल्‍याने त्‍याच्‍यांविरुध्‍द एकतर्फा आदेश होवून प्रस्‍तूत प्रकरण गुणदोषावर चालून वि.मंचाचे पूर्वअधिकारी यांनी 31/10/2009 रोजी निकाल दिला होता. परंतू सदर निकालावर नाराज होउवून विरुध्‍दपक्ष नं.1 व 2 यांनी मा.राज्‍य आयोग, मुंबई यांचेकडे अपील नं.1455/2009 दाखल केले होते. त्‍यामध्‍ये मा. राज्‍य आयोगाने सदर अपील मंजूर करुन सर्व पक्षकारांना पुरावा देणेची संधी व तज्ञांचा अहवाल या बाबीची पूर्तता करणेसाठी प्रकरण फेर चौकशीसाठी रिमांड केले. त्‍याप्रमाणे पून्‍हा सर्व पक्षकारांना नोटीस काढून प्रस्‍तूत प्रकरण पुन्‍हा नव्‍याने फैलावर घेणेत आले.

 

2.    तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, विरुध्‍द पक्ष नं.1 ही इंडिगो कार तयार करणारी कंपनी आहे. तर विरुध्‍दपक्ष नं.2 अ हे त्‍यांचे डिलर आहेत. व विरुध्‍दपक्ष नं.2 ब हे सोलापूर येथे ग्राहकांना सेवा देतात. तक्रारकर्ताने विरुध्‍द पक्ष क्र.2 (ब) यांच्‍याकडून दि.9/1/2009 रोजी टाटा इंडिगो सी.एस. (एल.एक्‍स.) कार रु.4,87,097/- किंमतीस खरेदी केलेली आहे. सदर कारचा रजि. क्र.एम.एच.13/ ए.सी.6996 असा आहे. कार खरेदी करण्‍यासाठी त्‍यांनी रु.1,36,247/- डाऊन पेमेंट केले असून उर्वरीत रु.3,00,000/- करिता त्‍यांनी सुंदरम फायनान्‍स लि., सोलापूर यांच्‍याकडे कर्ज घेतले आहे. कार घेतल्‍या दिवशीच तक्रारदार यांनी वाहनातील तांत्रिक चुका विरुध्‍द पक्ष यांच्‍या निदर्शनास आणून दिल्‍या. कार चालवत असताना उजव्‍या बाजुला ओढत असल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.2 (ब) यांनी वारंवार दुरुस्‍तीचे प्रयत्‍न केले आहेत. परंतु कारमधील दोष कायम राहिला आहे. तक्रारदार यांनी कार बदलून मागतली असता त्‍यास नकार देण्‍यात आला. त्‍यामुळे तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून कार बदलून नवीन कार मिळावी किंवा कारची किंमत व इतर खर्च असे एकूण रु;4,95,597/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. तसेच त्‍यांनी त्रासापोटी रु.2,00,000/- व तक्रार खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.

 

3.    विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी म्‍हणणे दाखल केले व तक्रार अमान्‍य केली आहे. पुढे असेही म्‍हंटले आहे की, तक्रारकर्ताने पुराव्‍यानिशी तक्रार सिध्‍द केलेली नाही, तक्रार अर्जात नमूद केलेले कारमधील उत्‍पादीत दोष सिध्‍द करुन दाखवले नाही.त्‍याकरीता प्रयोगशाळेच्‍या तज्ञ व्‍यक्‍तीचा अहवाल आवश्‍यक आहे. तक्रारकर्ताने दि.18/01/2011 च्‍या अंतरीम आदेशाची पुर्तता केली नाही.वाहनातील उत्‍पादीत दोष हे तक्रारकर्ताने सिध्‍द केलेले

                              (3)               त.क्र.262/2009

 

नाहीत. वॉरंटी काळात काही दोषास्‍पद भाग दिसत असेल तर तो दुरुस्‍त केला जाऊ शकतो किंवा बदलला जाऊ शकतो. तसे दुरुस्‍त व पार्ट बदलून दिले आहेत. श्री.नितीन पाटील ही व्‍यक्‍ती कारमधील उत्‍पादित दोष दाखवण्‍याच्‍या बाबतीत तज्ञ नाही. वाहनातीत उत्‍पादित दोषाबाबत योग्‍य प्रयोगशाळेच्‍या तज्ञांचा रिपोर्ट तक्रारदाराने दाखल केलेला नाही. तक्रारकर्ताची विनंती मागणी फेटाळणेत येऊन तक्रारकर्ताची तक्रार रद्द करावी अशी विनंती केली आहे.

 

4.    विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल केले असून तक्रार अमान्‍य केली आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार वाहनामध्‍ये कोणताही उत्‍पादकीय किंवा तांत्रिक दोष नाही. वाहन एका बाजूस ओढत असल्‍याचा दोष हा व्‍हील बॅलन्‍सींगचा दोष असू शकतो आणि तोही दोष तक्रारदार यांच्‍या वाहनामध्‍ये नाही. तक्रारदार यांच्‍या समाधानाकरिता वाहनाचे व्‍हील अलायंमेंट व दोन टायर बदलून दिले असून त्‍याचा मोबदला घेण्‍यात आलेला नाही.  तक्रारदार यांच्‍या वाहनामध्‍ये दोष नसल्‍यामुळे वाहन घेऊन जाण्‍याबाबत दि.29/5/2009 रोजी पत्र दिलेले आहे. परंतु तक्रारदार वाहन नेण्‍यासाठी आलेले नाहीत. त्‍यांच्‍या कंपनीचे सर्व्‍हीस मॅनेजर श्री. कपील कुलकर्णी यांनीही वाहनाची पाहणी करुन वाहनात दोष नसल्‍यामुळे वाहन नेण्‍यास सांगितले आहे. तक्रारदार यांची तक्रार खोटी असल्‍यामुळे खर्चासह रद्द करण्‍यात यावी, अशी त्‍यांनी विनंती केली आहे.

 

5.    तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष यांचे म्‍हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्‍यानंतर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

              मुद्दे                                      उत्‍तर

 1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना सदोष वाहन विक्री      

    केले आहे काय ? आणि तदनंतर सेवा देण्‍यामध्‍ये त्रुटी 

   केली आहे काय ?                                                                            होय.

2. तक्रारदार नवीन वाहन बदलून मिळण्‍यास किंवा वाहनाची

   किंमत परत मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?                 होय.

3. काय आदेश ?                                    शेवटी दिल्‍याप्रमाणे. 

निष्‍कर्ष 

6.    मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी विरुध्‍दपक्ष क्र.1 यांनी उत्‍पादीत केलेले विरुध्‍द पक्ष क्र.2 (ब) यांच्‍याकडून टाटा इंडिगो सी.एस. (एल.एक्‍स.) कार क्र.MH-13/AC-6996

(4)               त.क्र.262/2009

 

रु.4,87,097/- किंमतीस खरेदी केल्‍याचे विवादीत नाही. तसेच  कार चालवत असताना उजव्‍या बाजुला ओढत असल्‍यामुळे तक्रारदार यांनी निदर्शनास आणून दिल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष दुरुस्‍तीबाबत वारंवार प्रयत्‍न केल्‍याचे विवादीत नाही. तक्रारदार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार कार दुरुस्‍त करुनही कारमधील दोष कायम राहिलेला आहे. उलटपक्षी, विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार वाहनामध्‍ये कोणताही उत्‍पादकीय किंवा तांत्रिक दोष नसून वाहन एका बाजूस ओढत असल्‍याचा दोष हा व्‍हील बॅलन्‍सींगचा दोष असू शकतो आणि तोही दोष तक्रारदार यांच्‍या वाहनामध्‍ये नाही.

 

7.    कार चालवत असताना उजव्‍या बाजुला ओढत असल्‍याच्‍या तक्रारीनंतर कारचे वारंवार व्‍हील बॅलन्‍सींग व व्‍हील अलायंमेंट केलेले असून त्‍याचे रिपोर्ट रेकॉर्डवर दाखल आहेत. विरुध्‍द पक्ष यांनी जॉब कार्ड दाखल केलेले असून त्‍यामध्‍ये व्‍हील अलायंमेंट केल्‍याचे नमूद केलेले आहे. विरुध्‍द पक्ष यांनी केलेल्‍या दुरुस्‍तीनंतरही कारमधील दोष कायम राहिल्‍याचे तक्रारदार यांचे म्‍हणणे  आहे. त्‍यामुळे तक्रारदार व विरुध्‍द पक्ष यांच्‍यामध्‍ये थर्डपार्टी इन्‍स्‍पेक्‍शन करुन त्‍यांचा निर्णय दोन्‍ही पक्षांनी मान्‍य करण्‍याचे ठरविले. त्‍याप्रमाणे दि.19/5/2009 रोजी स्‍टर्लींग मोटार्स प्रा.लि.चे वर्क्‍स मॅनेजर श्री. पाटील यांची थर्डपार्टी इन्‍सपेक्‍शनकरिता आपसात नियुक्‍ती करुन दोष तपासणीसाठी राष्‍ट्रीय महामार्ग क्र.9 वर गेले असता कार चालवताना श्री.पाटील यांना कार उजव्‍या बाजुला खेचत असल्‍याचे निदर्शनास आले. त्‍याप्रमाणे त्‍यांनी रिपोर्ट तयार करुन कारच्‍या सर्व्‍हीस बुकवर तसा शेरा नमूद केला आहे. तसेच वि.मंचाने सदर नितीन पाटील यांना साक्षी समन्‍स काढलेनंतर नि.71 कडे नितीन पाटील यांनी आपला अहवाल दाखल केला आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी नमुद केला आहे की,  “ गाडी उजव्‍या बाजूला ओढते  हे नमूद केले पण ती कोणत्‍या कारणामुळे ओढते हे सांगता येणार नाही­. ” यावरुन गाडी एका बाजूस ओढते ही तक्रारकर्ताची तक्रार रास्‍त होती हे दिसून येते. मात्र या अहवालाबाबत विरुध्‍दपक्ष यांनी आक्षेप घेतला.  

 

8.    विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी तक्रारदार यांच्‍या वाहनामध्‍ये दोष नसल्‍यामुळे वाहन घेऊन जाण्‍याबाबत पत्र देऊनही तक्रारदार वाहन नेण्‍यासाठी आले नसल्‍याचे नमूद केले आहे. तसेच त्‍यांच्‍या कंपनीचे सर्व्‍हीस मॅनेजर श्री. कपील कुलकर्णी यांनीही वाहनाची पाहणी करुन वाहनात दोष नसल्‍याचे नमूद केले आहे.तसेच विरुध्‍दपक्ष क्र.1 यांनी मा.राज्‍य आयोगापुढे अपील नं.1455/2009 मध्‍ये त्‍यांचे कस्‍टमर सपोर्ट मॅनेजर अनाज के.ए. यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेची प्रत याकामी दाखल केली आहे. त्‍यांचे मत सुध्‍दा वाहनामध्‍ये

                              (5)               त.क्र.262/2009

 

उत्‍पादकीय दोष नाही. सदर कस्‍टमर सपोर्ट मॅनेजर हे विरुध्‍दपक्ष क्र.1 चे नोकर आहेत. तसेच वर नमूद केलेले विरुध्‍दपक्ष क्र.2 चे सर्व्‍हीस मॅनेजर कपिल कुलकर्णी हे सुध्‍दा तयांचे विरुध्‍दपक्ष क्र.2 कंपनीचे नोकर आहेत. त्‍यामुळे वर नमूद दोन्‍ही अधिकारी त्‍यांचेकंपनीत नोकरीस असल्‍याने ते त्‍यांचे कपंनीचे विरुध्‍द कसे सांगतील किंवा बोलतील याचा विचार करणे सुध्‍दा गरजेचे ठरते. किंबहुना तशी अपेक्षा करणे पूर्णत: चूकीचे आहे. वर नमूद दोन अधिकारी यांचे शिवाय कोणी ति-हाईत कंपनीने किंवा तज्ञाने रिपोर्ट देणे गरजेचे ठरते. मात्र तसा प्रयत्‍न विरुध्‍दपक्ष क्र.1 व 2 यांनी केला नाही. विरुध्‍दपक्ष क्र.1 यांनी फक्‍त वि.मंचाकडे अर्ज दाखल करुन सदर वादातील वाहन ARAI  (ऑटोमोटीव रिसर्च असोसिएटस् ऑफ इंडिया पुणे) मार्फत तपासणी करावी असा अर्ज फक्‍त दाखल केला. त्‍यावर वि.मंचाने आदेश पारीत करुन विरुध्‍दपक्ष व तक्रारकर्ता यांनी अर्धा अर्धा खर्च करावा व रिपोर्ट आणावा असा आदेश केला. त्‍यावर तक्रारकर्ताने मा.राज्‍य आयोगाकडे रिव्‍हीजन 2/2011 दाखल केले जे नामंजूर झाले. मात्र तक्रारकर्ता यांना  ARAI यांचेकडून वाहनाची तपासणी करुन घेणे आर्थिक दृष्‍टया पडवडणारे नव्‍हते. म्‍हणून त्‍याबाबत तक्रारकर्ता यांनी ARAI चा अहवाल आणणेचा प्रयत्‍न केला नाही. परंतू जर विरुध्‍दपक्ष नं.1 यांना सदर वादातील वाहनामध्‍ये उत्‍पादकीय दोष नाही याबाबत पक्‍की खात्री होती तर ते पूर्णत: सिध्‍द करणेसाठी त्‍यांनी स्‍वत: खर्च करुन ARAI कडून वाहन तपासणी करणेचा कोणताही प्रयत्‍न का केला नाही हा मुद्दा निर्विवादपणे प्रामुख्‍याने उभा राहतो. विरुध्‍दपक्ष क्र.1 यांनी ARAI कडून वाहन तपासणी करुन घेणेचा तक्रारकर्ता यांना आदेश व्‍हावा असा अर्ज दाखल केला, पण स्‍वत:हून ARAI चा रिपोर्ट आणणेचा प्रयत्‍न केला नाही. त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्र.1 सुध्‍दा त्‍यांचे वाहनाचे दोषाबद्दल साशंक होते असा अन्‍वायर्थ काढणे गरजेचे ठरते. तसेच जर वाहनात उत्‍पादकीय दोष नसतील तर ते पुराव्‍यानिशी सिध्‍द करणेची जबाबदारी उत्‍पादकाची असते. याबाबत  मा.दिल्‍ली राज्‍य आयोगाने 'टाटा मोटार्स लि. /विरुध्‍द/ मनोज गडी व इतर', 2009 सी.टी.जे. 180 (सीपी) (एनसीडीआरसी) या निवाडयामध्‍ये असे नमूद केले आहे की, 

      Para. 7 : In our view, onus shifts to the manufacturer to prove that the vehicle did not suffer from any defect including the manufacturing defect one the consumer proves from job cards that the vehicle was taken on large number of occasion for removing one defect or the other.

 

            8. Every good or vehicle has to pass the test of its quality and standard on the touchstone or definition of word 'defect' which in terms of Section 2(1)(f) means any fault, imperfection or shortcoming in the quality, quantity, potency,

(6)                     त.क्र.262/2009

 

purity or standard which is required to be maintained by or under any law for the time being in force or under any contract, empress or implied or as is claimed by any goods. In such an eventuality there are four options open to the  Consumer Forum. First to direct the trader to remove defect, second is to replace the goods with new good with same standard and specification free from defect, third is to refund the price to the consumer charged by the trader, and fourth is to pay an amount as compensation for any loss, injury suffered by the consumer due to negligence of the Opposite Party.

 

            9. It is too much to expect from the consumer to get the services of an expert to prove the manufacturing defect as he has already suffered due to sale of defective vehicle and to ask him to pay further for engaging the services of the expert is too much to ask. Thus onus is heavily upon the manufacturer to prove that vehicle dow not suffer from any manufacturing defect.

 

 9.    मा.राज्‍य आयोगाने रिव्‍हीजन पिटीशन नं.2/2011 मध्‍ये तक्रारकर्ता यांने ARAI ऐवजी दुसरीकडे वाहन तपासणी करण्‍याचे झाल्‍यास तशी विनंती ग्राहक मंचाकडे तक्रारकर्ताने करावी व ग्राहक मंचाने त्‍यावर योग्‍य तो निर्णय घ्‍यावा असे स्‍पष्‍ट केले आहे.  त्‍यानंतर तक्रारकर्ता यांनी टाटा मोटर्सची डिलर स्‍टर्लिंग मोटर्सचे मॅनेजर नितीन पाटील यांना साक्षी समन्‍स काढून अहवाल मागविला. त्‍यावेळी नितीन पाटील यांनी नि.71 कडे आपण अहवाल दाखल केला व त्‍यामध्‍ये वाहन एका बाजूने ओढत आहे असा अहवाल दिला त्‍याचा ऊहापोह वर नमूद परिच्‍छेदामध्‍ये वि.मंचाने केला आहे त्‍याची पुन्‍हा पुनर्वृत्‍ती करणेची गरज नाही.

 

10.   तसेच विरुध्‍द यांचे कथनानुसार तक्रारकर्ता यांनी त्‍यांची केस स्‍वत: सिध्‍द करणेचे गरज आहे. म्‍हणून त्‍यांनी वर नमूद नितीन पाटील यांचे अहवालानंतर सुधीर चव्‍हाण यांचे तज्ञांचा रिपोर्ट दाखल करणेची परवानगी मागितली जी वि.मंचाने मंजूर केली त्‍याप्रमाणे सुधीर चव्‍हाण यांनी त्‍यांचा तज्ञ रिपोर्ट म्‍हणून दाखल केला आहे. जो विरुध्‍द यांना मान्‍य नाही. मात्र सदर सुधीर चव्‍हाण हे स्‍वत: ऑटो मोबाईल इ‍ंजिनिअर आहेत आणि 1998 पासून ते ऑटो मोबाईल क्षेत्रात कार्य करतात. त्यामुळे मंचाचे परवानगीने तक्रारकर्ता यांनी वैयक्‍तीकरित्‍या सदर रिपोर्ट दाखल केला व सोबत त्‍यावर प्रतिज्ञापत्रसुध्‍दा दाखल केले. त्‍यामुळे त्‍यांचा रिपोर्ट हा ग्राहय धरणे गरजेचे ठरते. याबाबत 2010(I)CPR 118 (NC) Merck Ltd V/s Hubali Dignostics Medicare या निवाडयात मा.राष्‍ट्रीय आयोगाने “ Person qualified in the field can be said to be expert ” असे नमूद करुन “ Mechanical Engineer is also expert “ असे स्‍पष्‍ट केले आहे. प्रस्‍तूत प्रकरणात सुध्‍दा

(7)                     त.क्र.262/2009

 

श्री.चव्‍हाण हे सुध्‍दा ऑटो मोबाईल इंजिनिअर आहेत व त्‍यांचा त्‍यांचे क्षेत्रातील अनुभव पाहात ते “Expert” या संज्ञेत येतात. तसेच त्‍यामुळे वर नमूद निवाडयाचा आधार घेता श्री.चव्‍हाण यांनी “Expert” म्‍हणून दिलेला अहवाल व पुरावा म्‍हणून गृहीत धरणे वि.मंचास न्‍यायोचित वाटते. तसेच मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने खालील निवाडयात सुध्‍दा ही बाब स्‍पष्‍ट केली आहे.

2011(3)M.h.L.J. MANUFACTURING DEFECT IN VEHICLE ENTITLEMENT TO REFUND OF PRICE,ETC(Supreme Court) C.N.ANANTHARAM V/s FLAT INDIA LTD.AND OTHERS  Consumer Protection Act (68 of 1986), SS.2(1)(f) and 14-Complaint of manufacturing defects in the vehicle- Manufacturer replaced the engine of the vehicle with a new on- No question of replacing the vehicle itself arises- If the independent technical expert directed to be appointed by the District Forum is of the opininion that there are inherent manufacturing defects in the vehicle, the opinion that there are inherent manufacturing defects in the vehicle, the petitioner will be entitled to refund of the price of the vehicle and the lifetime tax and EMI along with interest @ 12% per annum and costs.(Paras 15 to 17 )

 

11.   विरुध्‍दपक्ष क्र.1व 2 यांनी स्‍वतंत्ररित्‍या कोणत्‍याही ति-हाईत तज्ञांचा अहवाल आणलेला नाही. सदर सुधीर चव्‍हाण यांचे रिपोर्टनुसार सदर वादातील वाहन एका बाजूस ओढते.सदर दोष हा उत्‍पादकीय किंवा अंतर्गत चुकीमुळे आहे जो दोष डिलरला सापडलेला नाही. तसे तो दोष डिलरने दुरुस्‍त करुन दिलेला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ता यांचे सदर वाहनात सुरुवाती पासूनच दोष आहेत व तो उत्‍पादनातील दोष आहे, या तक्रारीस पुष्‍ठी मिळते.  सदर वाहनात वर नमुद केल्‍याप्रमाणे सुरुवातीपासूनच उत्‍पादकीय दोष आहेत. विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांनी सुध्‍दा सदर वाहन वारंवार दुरुस्‍त करुन देणेचा प्रयत्‍न केला परंतू तो कायमस्‍वरुपी दोष दूर झाला नाही. कोणीही गरजु  नेहमी नवीन वाहन घेण्‍याचा प्रयत्‍न करतो कारण सुरुवातीचे काही वर्ष त्‍याचे मेंटेंनन्‍स (किरकोळ देखभाल, खर्च व दोष ) याची काळजी नसते. म्‍हणून तक्रारकर्ताने विरुध्‍दपक्ष  यांचे नवीन वाहन घेतले, परंतु सदर वाहनात सुरुवाती पासूनच दिसू लागले व ते दोष हे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते.  त्‍यामुळे वाहनातील दोष जर कागदपत्रांवरुन दिसून येतात व सर्व परिस्‍थीती स्‍पष्‍ट होत असेल तर तज्ञाचे अहवालाची गरज पडत नाही.  या बाबत मा. राष्‍ट्रीय आयोग यांनी खालील निवाडयात ही गोष्‍ट स्‍पष्‍ट केली आहे.

II (2013) CPJ 743 (NC) TATA ENGINEERING AND LOCOMORIVE CO. LTD. & ANR. V/s. SUBHASH AJUJA & ANR.

Consumer Protection Act, 1986 – Section 2(1)(f), 2(1)(g), 14(1)(d), 21(a)(ii) – Motor Vehicle – Manufacturing defect – Engine replaced – Major problems with

(8)                     त.क्र.262/2009

 

various other parts – Mental agony and harassment – Deficiency in service -  State commission allowed complaint – Hence appeal – Contention, even though there was no manufacturing defect in engine, it was changed as a gesture of good-will after the warranty period – Not accepted – No car manufacturer would change an engine if it could be rectified through repairs – Almost every part of vehicle has some problem or other – Vehicle had to be taken to workshop on 36 occasions during warranty period – Evidence in form of opinion of technical expert is not required – Case of res ipsa loquitur – Compensation @ Rs. 2,50,000 rightly awarded.

या निवाड्यात वाहन सतत दुरुस्‍त करावे लागत असेल, वाहन वारंवार वर्कशॉप मध्‍ये आणावे लागत असेल तर तज्ञाचे रिपोर्टची आवश्‍यकता नसते.  कारण त्‍यास     res ipsa loquitur चे तत्‍व लागु पडते म्‍हणजे परिस्थिती स्‍वतःहून बोलते. तसेच

II (2013) CPJ 520 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI

“Consumer Protection Act, 1986 – Section 2(1)(f), 2(1)(g), 2(1)(r), 14(1)(d), 21(b) – Motor vehicle – Manufacturing defect – Repaired for many defects – Unfair trade practice – Deficiency in service – District Forum dismissed complaint – State commission allowed appeal – Hence revision – Vehicle was purchased on 5.2.2005 and it was taken for repairs within 12 days i.e. 17.2.2005 – Vehicle remained in showroom for 38 days for repairs – Defects listed in complaint corroborated by job cards placed on file – Facts speak for themselves – No expert advice was required – Manufacturing defect proved – Costs awarded. तसेच

 

I (2013) CPJ 201 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI ASHOK LEYLAND LIMITED V/S. GOPAL KHAN & ORS.

“Consumer Protection Act, 1986 – Section 2(1)(f), 2(1)(g), 14(1)(d), 21(b), - Bolck cylinder burst – Refund of repair charges – District Forum allowed complaint – State Commission dismissed appeal – hence revision – There was manufacturing defect in vehicle during warranty period – it is not necessary to obtain expert report separately – 3 pistons had ceased and block of cylinder had burst itself proves manufacturing defect  Non examination of another expert not essential – Refund directed. ”

      वरील नमुद दोन्‍ही निवाड्यात वारंटी कालावधीत दोष निर्माण झाल्‍यास विशेष तज्ञाची नेमणुकीची गरज नाही,असे नमुद केले आहे.  तरीही तक्रारकर्ता यांनी नितीन पाटील व सुधीर चव्‍हाण या ति-हाईत (3rd Party) तज्ञांचा अहवाल दाखल केला आहे. वरील निवाड्यांचा आधार घेता व तज्ञांचा अहवाल पाहता तसेच तक्रारकर्ताची तक्रार यावरुन सदर वाहन वारंवार वि.प. क्र. 2 कडे दुरुस्‍तीसाठी न्‍यावे लागत होते व वारंवार  त्‍यामध्‍ये बिघाड होत होते,  त्‍यामुळे सदर वाहनात उत्‍पादकीय दोष होता, हे सिध्‍द होते.

(9)                     त.क्र.262/2009

 

12.   प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारकर्ताची तक्रार,  विरुध्‍दपक्ष क्र. 1 व 2 यांचे दोषात्‍मक वाहनाचे दुरुस्‍तीचे कागदपत्रे, यावरुन वाहनात उत्‍पादकीय दोष आहेत, हे सिध्‍द होते आहे.  त्‍यामुळे सदर मॉडेलच्‍या इतर मॉडेलमध्‍ये तक्रारकर्ताचे गाडी सारखा उत्‍पादकीय दोष नाही असा कोणताही पुरावा विरुध्‍दपक्ष यांनी वि.मंचात दाखल केलेला नाही.  त्‍यामुळे सदर वाहन बदलवून द्यावे  किंवा त्यांची किंमत परत करणे उचित ठरणारे आहे. त्‍यामुळे त.क्र. यांनी वाहनाचे किंमतीपोटी विरुध्‍दपक्ष क्र. 1 व 2 कडे भरलेली रक्‍कम परत करणेचा आदेश करणे उचित ठरेल, असे वि.मंचास वाटते. या बाबत खालील निवाड्याचा आधार घेण्‍यात आला.

2013(1) CPR 178 (Raj.) RAJASTHAN STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION  JAIPUR Terex Vectra Pvt Ltd.  V/s. Meharchand

Consumer Protection Act, 1986 – Section 15 and 17 – Machinery  - Supply of defective Loader – District Forum directed appellant and concerned dealer either to replace vehicle by giving complainant  a new vehicle of same make or in alternative may make payment of vehicle as per purchase bill as well as Rs. 3000 as compensation  - There is nothing on record to substantiate allegation of appellant that vehicle was not handled properly by complainant – As per job card main parts of vehicle had been replaced – There appears to be inherent mechanical defect in vehicle itself – No error or illegality in findings and discretions used by District Forum  - Appeal dismissed.

      या मध्‍ये वि.राज्‍य आयोगाने  वाहन व्‍यवस्‍थीत वापरले नाही, याचा पुरावा आणला नसेल आणि वारंवार पार्टस् बदलावे लागत असतील तर वाहनामध्‍ये दोष आहेत, हे सिध्‍द होते, त्‍यामुळे  वाहन बदलवून द्यावे किंवा वाहनाची स्विकारलेली किंमत परत करावी असे नमुद केले आहे.

 

13.   मा. राज्‍य आयोग यांनी अपील क्र. ए/07/663 Tata Motors ltd  V/s. Manoj Gadi and Anr दि. 17/12/2008 मध्‍ये

Consumer Protection Act, 1986 – Section 2(1)(g) – Manufacturing defect – Once the consumer proves from Job card that vehicle was taken several times for renewal of defects to the mechanic, onus to prove that there was no manufacturing defect lies on the manufacturer – In the present case, the vehicle started giving noise from steering and shockers – Problem could not be rectified despite repeated repairs – Replacement of vehicle in the situation is not a proper solution as it may not satisty the complainant – Appellant/OP is directed to refund the price of vehicle instead of its replacement – Rest of the order upheld with these modification

 

 

(10)                    त.क्र.262/2009

 

      या निवाड्यात वाहन वारंवार वर्कशॉप मध्‍ये न्‍यावे लागत असेल आणि दोष दुरुस्‍त करुन सुध्‍दा पुन्‍हा निर्माण होत असतील तर त्‍यावेळी वाहनाचे खरेदीपोटी स्विकारलेली रक्‍कम परत करावी, असे निर्देश दिले. तसेच

2013 (2) CPR 11(H.P.) HIMACHAL PRADESH STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, SHIMLA  Rekesh Negi  V/s. Sai Automobiles and Ors.

“ Consumer Protection Act, 1986 – Section 15 and 17 – Automobile – Manufacturing defect – District Forum dismissed complaint mainly on ground that no expert evidence had been led by appellant in support of his contention that vehicle suffered from some manufacturing defect – Vehicle has not been delivered to appellant thereafter either by removing defect or otherwise – Vehicle has been giving trouble repeatedly not only within warranty period of three years,  but just within a few days of its purchase, and problem could not be set right despite vehicle having been taken to workplace of manufacturer of fuel pump – Respondent directed to refund price of vehicle ( Rs. 4.80 lacs) with 12 interest,  Rs. 20,000 as compensation and Rs. 5000 as litigation expenses.”

 

14.   वरील निवाडयामध्‍ये वाहनातील दोष अंतिमतः काढून वाहन ग्राहकाचे ताब्‍यात दिले नाही.  त्‍यामुळे वाहन खरेदी किंमत 12 टक्‍के व्‍याजने देण्‍याचा आदेश केलेला आहे.  त्‍यामुळे वर नमुद तिनही निवाड्यात वाहनातील उत्‍पादकीय दोष अंतिमतः निराकरण होत नसतील तर खरेदी किंमत परत करावी, असे नमुद आहे, त्‍यामुळे सदर निवाडे या प्रकरणास लागू पडतात.  त्‍यामुळे  वि.प. यांनी त.क चे वाहन खरेदीपोटी स्विकारलेली रक्‍कम परत करणे गरजेचे ठरते व तसा आदेश करणे वि. मंचास उचित वाटतो.

 

15.   विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांनी सदर वाहनामधील उत्‍पादकीय दोषाबाबत विरुध्‍दपक्ष क्र.2 हे जबाबदार नाहीत, असा बचाव केला आहे. व आपली जबाबदारी टाळण्‍याचाप्रयत्‍न केला आहे.  मात्र वाहनाचे विक्री नंतर विरुध्‍दपक्ष क्र. 2 यांनाही काही प्रमाणात रक्‍कम मिळाली आहे.  तसेच  विरुध्‍दपक्ष क्र.2 यांची गाडी विक्री नंतरची सेवा देण्‍याची जवाबदारी आहे.  त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्र. 2 हे आपली जबाबदारी टाळू शकत नाही   राष्‍ट्रीय आयोगाने या बाबत II (2013) CPJ 534 (NC)National Consumer Disputes Redressal Commission, New DelhiBalaji Motors  V/s. Devendra & Anr.

            Consumer Protection Act, 1986 – Section 2(1)(f), 2(1)(g), 21(b) – Motor Vehicle – Manufacturing defect – Rectifiction within warranty period – District Forum allowed complaint – State Commission dismissed appeal – Hence revision – Since, complaint was made within warranty period, it was the duty of dealer to attend to the same and repair the vehicle – Incase, dealer thinks that there is no defect in vehicle,  it can give a certificate to this effect that vehicle is fit from all angles – Such certificate

(11)                    त.क्र.262/2009

 

shall be open to scrutiny by any expert/specialized agency – However, dealer cannot escape his responsibility of attending to complaint if made before it during warranty period.

      या निवाड्यात मा. राष्‍ट्रीय आयोगाने डिलर आपली जवाबादारी टाळू शकत नाही, असे स्‍पष्‍ट केले आहे.  त्‍यामुळे प्रस्‍तुत प्रकरणात सुध्‍दा विरुध्‍दपक्ष क्र. 2 हे आपली जबाबदारी टाळू शकत नाही, असे म्‍हणणे उचित ठरेल. तसेच

2013 (2) CPR 14 (H.P.) HIMACHAL PRADESH STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, SHIMLA

M/s. Dewan Chand Atma Ram V/s. Smt. Adabala

“ Consumer Protection Act, 1986 – Section 15 and 17 – Apparels – Appellant ordered by District Forum to refund price of defective jacket and also to pay Rs. 1000 as damages and Rs. 500 as litigation expenses – Consumer has nothing to do with manufacturer of article, when he purchases article from a trader, without any intimation about manufacturer of article – Question of liability of manufacturer is a matter between manufacturer and trader – Appeal dismissed with cost of Rs. 1000.”

या निवाड्या मध्‍ये  Manufacturer व trader  यांची जबाबदारी हा वादाचा मुद्दा, उत्‍पादक व डिलर, व्‍यापारी यांचे मधील आहे.  यावरुन विरुध्‍दपक्ष क्र.2 हे उत्‍पादकांवर संपुर्ण जबाबदारी टाकू शकत नाही तर त्‍यांची सुध्‍दा जवाबदारी आहे, हे सिध्‍द होते.

 

16.    तक्रारदार यांनी नवीन कार खरेदी केलेली असून त्‍याकरिता वित्‍तीय संस्‍थेकडून कर्जही घेतलेले आहे. नवीन कार खरेदीनंतर त्‍यांना जे समाधान मिळावयास पाहिजे होते, त्‍याऐवजी त्‍यांना मानसिक व शारीरिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे. कार कर्ज काढून खरेदी केलेली असून त्‍याचे हप्‍ते तक्रारदार व्‍याजासह भरणा करीत आहेत. त्‍यामुळे तक्रारदार हे निश्चितच खरेदीची किंमत परत मिळणेस पात्र ठरतात, असे आम्‍हाला वाटते.

 

17.   मा.राष्‍ट्रीय आयोगाने 'भोपाळ मोटार्स प्रा.लि. /विरुध्‍द/ सुदानसिंग व इतर', 2 (2008) सी.पी.जे. 174 (एन.सी.) या निवाडयामध्‍ये असे नमूद केले आहे की,

  Para. 8 : As regards manufacturing defect, in ordinary course, if the dealer acts just as an agent of the manufacturer, he could not be held liable for the manufacturing defect and the liability would be that of manufacturer. But in case where the independent dealership without there being any agency of the manufacturers, vehicles are purchased for the purpose of sale, then the dealer cannot escape from the liability in respect of even manufacturing defect for he was supposed to see at the time of taking the delivery that the vehicle did not suffer from any manufacturing defect.

 

 

 (12)                    त.क्र.262/2009

 

18.   तक्रारदार यांना कार विक्री करणारे विरुध्‍द पक्ष क्र.2 हे विरुध्‍द पक्ष क्र.1 कंपनीचे डिलर आहेत. उपरोक्‍त विषद तत्‍वानुसार विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी वाहनाची विक्री करण्‍यापूर्वी त्‍यामध्‍ये दोष आहेत काय? यांची खात्री करुन वाहन विक्री करणे आवश्‍यक होते. परंतु त्‍यांनी तशी कार्यवाही केलेली नाही. त्‍यामुळे उत्‍पादकीय दोषाकरिता विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 हे दोघेही वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या जबाबदार ठरतात. तक्रारदार यांनी मा.राष्‍ट्रीय आयोगाने 'आर.राजाराव /विरुध्‍द/ म्‍हैसूर अटो एजन्‍सीज', 2 (2006) सी.पी.जे. 64 (एन.सी.) हा निवाडा दाखल केला असून सदर निवाडा या तक्रारीतील प्रश्‍न निर्णयीत करताना निश्चितच लाभदायक ठरतो.

 

19.   वरील सर्व निवाड्यांचा आधार घेता मंचास या ठिकाणी नमूद करावेसे वाटते की, विरुध्‍दपक्ष क्र.1 व 2 हे निरनिराळे वाहन प्रलोभनात्‍मक जाहीराती करुन ग्राहकांना आकृष्‍ठ करुन वाहनांची विक्री करतात, अशा स्थितीत स्‍वत:चे वापरासाठी घेतलेले वाहन खरेदीच्‍या कमीत कमी पहिल्‍या दोन ते तीन वर्ष कालावधीकरीता तरी वाहन सुस्थितीत व विना तक्रार चालावे अशी आशा प्रत्‍येक वाहन धारकाला असते असे मंचाचे मत आहे, परंतू या प्रकरणामध्‍ये त.क.ला वाहन खरेदी केल्‍यांनतर सुरूवातीपासूनच वाहनाच्‍या वापरात वाहन निर्मीती दोषामुळे अडथळे आले आहे. वाहनाचे निर्मीती दोषामुळे (वाहनाचे स्‍पेअर पार्ट) कमी कालावधीतच खराब झाल्‍याचे स्‍पष्‍ट होते. म्‍हणून विक्रेता किंवा उत्‍पादक हे त्‍यांचे ग्राहकास दोषयुक्‍त वाहन वापरणेस सक्‍ती करु शकत नाही असे मा.राज्‍य आयोग, मुंबई यांनी खालील निवाडयात स्‍पष्‍ट केले आहे.

2013(I)CPR15 (MAH) Cotmac Pvt Ltd V/s Mohammad Muzaffar crown engineer works

20.    प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये कार उजव्‍या बाजुला खेचत असल्‍याचा दोष वारंवार दुरुस्‍त करुनही कायम राहिल्‍याचे दाखल कागदपत्रांवरुन स्‍पष्‍टपणे दिसून येते. विरुध्‍दपक्ष यांनी आपसात त्‍यांनी कारमध्‍ये दोष नसल्‍याविषयी वाहनाचा रिपोर्ट रेकॉर्डवर दाखल केलेला नाही. केवळ वाहनामध्‍ये दोष नाही, या त्‍यांच्‍या कथनाशिवाय इतर कोणताही उचित पुरावा त्‍यांनी सादर केलेला नाही. ज्‍यावेळी वारंवार प्रयत्‍न करुनही नवीन कारमधील दोषाचे कायमस्‍वरुपी निराकरण झालेले नाही, त्‍यावेळी तो दोष निश्चितच उत्‍पादकीय दोष असल्‍याचे मान्‍य करावे लागेल. ARAI  चा अहवाल या मंचात दाखल नाही अशास्थितीत वाहन  सदोष असल्‍या कारणाने तसेच  विरुध्‍दपक्ष क्र.1 व 2 ने तक्रारकर्ताला योग्‍य मार्गदर्शन व सहकार्य केले नाही.  त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना उत्‍पादकीय दोष असलेले वाहनाचा पुरवठा करुन दुषित व त्रुटीची सेवा दिली आहे व

(13)                    त.क्र.262/2009

 

अनुचित व्‍यापार प्रथेचा वापर केला आहे.  त्‍यामुळे अशा स्थितीत तक्रारकर्त्‍याला विरुध्‍दपक्ष क्र.1 व 2 ने  वाहनाचे खरेदीपोटी स्विकारलेली रक्‍कम रु.4,87,097/-  परत देण्‍याचे आदेशीत करणे कायदेशीर व न्‍यायोचित ठरते असे वि.मंचास वाटते.

 

21.   विरुध्‍दपक्ष क्र.2 ने प्रत्‍यक्षपणे तक्रारकर्ताला वाहन विक्रीमध्‍ये  उत्‍साहाने सहभाग घेतला आहे व त्‍याकरीत विरुध्‍दपक्ष क्र.2 ला काही रक्‍कम कमिशन स्‍वरुपात नक्‍कीच मिळाली आहे. तसेच वाहन खरेदीपासून वाहनातील दोष दुर करणेसाठी वाहन विरुध्‍दपक्ष क्र.2 कडेच ठेवलेले होते आणि विरुध्‍दपक्ष क्र.2 प्रत्‍येक वेळेला मंचासमक्ष ‘तो मी नव्‍हेच’ असा बचाव करीत आलेला आहे, परंतू मंचाचे असे मत आहे की, विरुध्‍दपक्ष क्र.2 हा सुध्‍दा संपूर्ण व्‍यवहाराला संपूर्णपणे जबाबदार आहे, विरुध्‍दपक्ष क्र.2 सुध्‍दा तक्रारकर्ताला नुकसान भरपाई देण्‍यास पात्र व जबाबदार आहे.

 

22.   उपरोक्‍त सर्व विवेचनावरुन वि. मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

                  :- आदेश -:

1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.

 

2) विरुध्‍दपक्ष क्र.1 व 2  ने सदोष वाहन त.क.ला पुरवून त्‍याला दोषपूर्ण सेवा व अनुचीत व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला आहे असे घोषीत करण्‍यांत येते.

 

3) विरुध्‍दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तीकरित्‍या तक्रारकर्ता यांचे गाडी टाटा इंडिगो एल.एस.एम.एच.13-एसी/6996 चे खरेदीपोटी स्विकारलेली रक्‍कम रु. 4,87,097/-( रुपये चार लाख सत्‍तेऐंशी हजार सत्‍तेनऊ फक्‍त ) द्यावे. व सदर देय रक्‍कमेवर गाडी खरेदी दिनांकापासून म्‍हणजेच दि.09/01/2009 पासून द.सा.द.शे.10 टक्‍के दराने व्‍याज द्यावे. सदर आदेशाचे पालन निकाल प्राप्‍ती पासून 30 दिवसांच्‍या आंत करावे.

 

4) विरुध्‍दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तीरित्‍या  तक्रारकर्ता यांना झालेल्‍या आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल आणि दुषित व त्रुटीची सेवा दिल्‍याबद्दल व तक्रारी अर्जाचा खर्च रु.10,000/- नुकसान भरपाई द्यावी.

 

 

 

(14)                    त.क्र.262/2009

 

5) वर नमूद केल्‍याप्रमाणे विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना वादातील वाहनची रक्‍कम आदा केलेनंतर विना विलंब, विना अट तक्रारकर्ता यांनी सदर वाहन विरुध्‍दपक्ष यांचे नांवे वाहन ट्रान्‍सफर करुन द्यावे व त्‍याचा खर्च विरुध्‍दपक्ष यांनी करावा.

 

6) उभयपक्षांना आदेशाची प्रमाणित प्रत  निःशुल्‍क देण्‍यांत यावी.

 

 

    (श्री.ओंकारसिंह जी.पाटील)                 (श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे) 

             सदस्‍य                               अध्‍यक्ष                       जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                  दापांशिंनिलि02303150

 

 
 
[HON'BLE MR. Milind B. Pawar]
PRESIDENT
 
[ HON'BLE MR.O.G.PATIL]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Babita M. Mahant Gajare]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.