जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर. तक्रार दाखल दिनांक :12/03/2010 आदेश पारित दिनांक :28/10/2010 तक्रार क्रमांक :- 170/2010 तक्रारकर्ता :– श्री. पुरुषोत्तम सितारामजी नगराळे, वय अंदाजेः 55 वर्षे, व्यवसायः खाजगी, राह. प्लॉट नं.53, महात्मा फुले चौक, आंबेडकर नगर, वाडी, नागपूर-22. -// वि रु ध्द //- गैरअर्जदार :– 1. ब्रांच मॅनेजर, टाटा मोटर्स लिमिटेड, कार्यालय जयका मोटर्स लि., कर्मशियल रोड, पी.बी.नं.1, व्ही.सी.ए. ग्राऊंडजवळ, सिव्हील लाईन्स, नागपूर. 2. टाटा मोटर्स लिमिटेड, रजि. कार्यालयः मुंबई हाऊस-24, होमी मोदी स्ट्रीट मुंबई-01. अर्जदाराचे वकील :– श्री. आर.बी. निकुले. गैरअर्जदाराचे वकील :– श्री. एस.ए. आशीरगडे. गणपूर्ती :– 1. श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष 2. श्री. मिलींद केदार - सदस्य (मंचाचा निर्णय: श्री विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 28/10/2010) तक्रारकर्ता सतत गैरहजर, गैरअर्जदारातर्फे वकीलांचा यापूर्वीच युक्तिवाद ऐकण्यांत आला, तक्रारकर्त्याचे म्हणण्याप्रमाणे त्याने गैरअर्जदारांकडून टाटा एल.पी.टी.1109 हे वाहन घेतले होते आणि गैरअर्जदारांचा वित्त पुरवठा घेतला होता. गैरअर्जदारांनी सदर वाहन कर्जाचे हप्त न भरल्यामुळे दि.26.07.2006 रोजी ताब्यात घेतले व दि. 31.03.2007 रोजी दुस-यास विकल्याचे नमुद केलेले आहे. तक्रारकर्त्यानी तक्रारीत असे नमुद केले आहे की, तक्रारीचे कारण पहिल्यांदा जेव्हा त्याचा व गैरअर्जदार क्र.1 यांच्यामध्ये दि.26.02.2005 रोजी करारनाम्याचे वेळेस उद्भवले. त्यानंतर पुन्हा दि.26.07.2006 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांनी वाहन जप्त केले आणि दि.31.03.2007 रोजी वाहन विकले. तक्रारकर्त्याने वाहन विकल्याची माहिती दि.23.12.2009 रोजी कळली त्यामुळे तक्रार मुदतीत असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केलेली घटना ज्या दिवशी घडली त्यावेळी तक्रारीचे कारण घडले असे गृहीत धरले तर सदर तक्रार वाहन विकल्याचा दिनांक 31.03.2007 पासुन दोन वर्षांचे आंत दाखल करणे गरजेचे होते. परंतु ती प्रत्यक्षात दि.12.03.2010 रोजी दाखल करण्यांत आलेली आहे. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत नमुद केले आहे की, त्याला वाहन विकल्याची माहिती दि.23.12.2009 रोजी कळली आणि म्हणून ती मुदतीत आहे. परंतु तक्रारकर्त्याने यासाठी विलंब माफीचा अर्ज दाखल करणे गरजेचे होते तो त्यांनी केला नाही, त्यामुळे सदर तक्रार मुदतीत नसल्यामुळे खारिज करण्यांत येते. (मिलींद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |