अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
**************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक :एपिडिएफ/147/2008
तक्रार अर्ज दाखल दिनांक : 18/08/2005
तक्रार निकाल दिनांक : 12/10/2011
बलबिर सिंग मान, ..)
प्लॉट नं. 61-62, सेक्टर नं. 23, ..)
ट्रान्सपोर्ट नगर, निगडी, ..)
पुणे – 411 044. ..)... तक्रारदार
विरुध्द
1. टाटा मोटर्स लिमीटेड, ..)
24, होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट, ..)
मुंबई – 400 001. ..)
..)
2. बी.यु. भंडारी ऑटो लिमीटेड, ..)
मुंबई – पुणे रोड, वाकडेवाडी, ..)
पुणे – 411 003. ..)... जाबदार
********************************************************************
// निशाणी 1 वरील आदेश //
प्रस्तूतचे प्रकरण सन 2005 मध्ये दाखल झालेले आहे. सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पीडीएफ/224/2005 असा नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/147/2008 असा नोंदविण्यात आला आहे.
प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदारांना मंचाने नोटीस काढली असता “मयत आहे सबब परत “ अशा पोस्टाच्या शे-यासह नोटीशीचे पाकीट परत आले आहे. तसेच तक्रारदारांच्या वारसांनी योग्य ती तजवीज विहीत मुदतीत केल्याचे दिसून येत नाही. सबब सदरहू प्रकरण चालविण्यामध्ये तक्रारदारांना स्वारस्य नाही या निष्कर्षाअंती प्रस्तूतचा तक्रार अर्ज काढून टाकण्यात येत आहे.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक – 12/10/2011
| [ Smt. Sujata Patankar] MEMBER[ Smt. Pranali Sawant] PRESIDENT | |