Maharashtra

Nanded

CC/15/225

Kiranjeet Satapalsingh Nalewale - Complainant(s)

Versus

Tata Motors Finance Ltd. - Opp.Party(s)

Adv. Jaspalsingh Sukhmani

09 Jul 2015

ORDER

District consumer Disputes Redressal Forum
Nanded
Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
 
Complaint Case No. CC/15/225
 
1. Kiranjeet Satapalsingh Nalewale
Bhagatsingh Road Nanded
NANDED
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Tata Motors Finance Ltd.
Malegaon Road Nanded
NANDED
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Smita B.Kulkarni PRESIDENT
 HON'BLE MR. R.H.Bilolikar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                     निकालपत्र

(दि.09.07.2015)

(घोषीत द्वारा- मा.सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्‍यक्ष)

 

            अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्‍यात खालील प्रमाणेः-

1.          अर्जदार यांनी तक्रारीमध्‍ये गैरअर्जदार यांची गाडी ट्रक क्रमांक एमएच 26/एडी 834 बेकायदेशीररीत्‍या जप्‍त केला व सदरील वाहन अर्जदाराच्‍या ताब्‍यात देण्‍याचे गैरअर्जदार यांना आदेशीत करण्‍यात यावे. तसेच गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा ट्रक जप्‍त करुन तिच्‍या व्‍यापारात प्रतिदिनास रु.5000/- नुकसानीस कारणीभूत झाले म्‍हणून अर्जदारास रक्‍कम रु.1,00,000/- द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याजासह गैरअर्जदार यांनी द्यावे तसेच अर्जदाराचे राहिलेले भविष्‍यातील उर्वरीत हप्‍ते हे हप्‍तेवारीनुसार स्विकारुन सदर गाडीचे ना-हरकत प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे अर्जदारास देण्‍याचे  आदेश गैरअर्जदार यांना द्यावेत.  तसेच गैरअर्जदार यांनी सदर ट्रक क्रमांक एमएच 26/एडी 834 हा कोणासही विक्री करु नये व अर्जदारास परत करावी.

2.          अर्जदार यांनी तक्रारीसोबत अंतरीम मनाई हुकूमाचा अर्ज दाखल केलेला होता.  अर्जदाराच्‍या मनाई हुकूमाच्‍या अर्जावर नोटीस काढण्‍यात आल्‍यानंतर गैरअर्जदार तक्रारीमध्‍ये हजर झाले व गैरअर्जदार यांनी आपला लेखी जबाब दाखल केला.  त्‍यानंतर मंचाने दोन्‍ही पक्षकारास मंचासमोर हजर राहण्‍याचे निर्देश दिले. दिनांक 06.07.2015  रोजी दोन्‍ही पक्षाचे वकील व पक्षकार स्‍वतः हजर  झाले असता गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडे एकूण 5 ते 6 ट्रक असून अर्जदार हा व्‍यावसायीक कारणासाठी ट्रकचा वापर करतो असे सांगितले त्‍यावर मंचाने अर्जदारास समक्ष ही बाब विचारली असता अर्जदाराने ही बाब मान्‍य केली. अर्जदार हा ‘’ग्राहक’’ या व्‍याख्‍येमध्‍ये अंतर्भूत होतो काय असा प्राथमिक मुद्या उपस्थित होतो. अर्जदार यांचेकडे एकापेक्षा जास्‍त वाहन असून अर्जदार त्‍याचा वापर ट्रान्‍सपोर्ट व्‍यवसाय करणेसाठी करीत आहे.  यावरुन अर्जदाराने वादग्रस्‍त वाहन हे व्‍यावसायीक कारणासाठी खरेदी केलेले असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. यावरुन ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(d) (i)  नुसार अर्जदार हा ग्राहक या व्‍याख्‍येत अंतर्भूत होत नाही असे मंचाचे मत आहे. तसेच  मा. राष्‍ट्रीय आयोग यांनी दिलेल्‍या (  III (2013) CPJ (NC)  प्रकरण क्रमांक Revision Petition NO. 3267 of 2012 , Indusind Bank Ltd. Vs. Avtar Singh , decided on: 02.05.2013  Consumer Protection Act, 1986—Section 2(1)(d),21(b)- Complainant is having more than 4 vehicles in his name- loan was taken for purchasing another vehicle for commercial purpose- Complainant has not availed services of OP for purpose of his livelihood by means of self employment- Complainant not falls within purview of consumer  मधील निर्णयानुसार  मा. राष्‍ट्रीय आयोगाच्‍या मताप्रमाणे अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक होत नाही. अर्जदार हे त्‍यांचे वाहन व्‍यापारी कारणासाठी वापरत असल्‍याने अर्जदार यांची तक्रार मंचासमोर चालू शकत नाही.  तसेच अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे कर्जाची परतफेड नियमानुसार केलेली नाही हे अर्जदार यांनी तक्रारीमध्‍ये मान्‍य केलेले आहे. परंतु कर्जाची परतफेड न करणेसाठी दिलेले कारण हे संयुक्‍तीक नाही.  गैरअर्जदार यांनी आपल्‍या लेखी जबाबामध्‍ये अर्जदार हा थकबाकीदार आहे असे कथन केलेले आहे.  त्‍यामुळे अर्जदार हे थकबाकीदार आहेत हे स्‍पष्‍ट होते.  वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.

             वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.

                       आ दे श

 

1.     अर्जदार यांची  तक्रार नामंजूर करण्‍यात येते.

2.    खर्चाबाबत आदेश नाही.

3.    दोन्‍ही पक्षकारास निकालाच्‍या प्रती मोफत पुरविण्‍यात याव्‍यात.  

 
 
[HON'BLE MRS. Smita B.Kulkarni]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. R.H.Bilolikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.