जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 227/2008. प्रकरण दाखल तारीख - 25/06/2008 प्रकरण निकाल तारीख - 17/10/2008 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य शेख सादुल्ला अब्दुल गफुर समदा अर्जदार. वय, 45 वर्षे, धंदा, शेती रा. माधव गल्ली, मुखेड पो. मुखेड ता. मुखेड जि. नांदेड. विरुध्द. 1. टाटा मोटर्स फायनान्स लि. वीभागीय कार्यालय, टाटा मोटार फायनान्स सारडा आर्केड, सिडींकेट बँकेच्यावर, स्टेशन रोड, औरंगाबाद. 2. श्री. अरविंदम गोविंदम नायर अधिकृत प्रतिनीधी, टाटा मोटार्स फायनान्स लि. गैरअर्जदार वासन हॉऊस, तिसरा मजला, सिंधी सोसायटी, सी.एस.टी. रोड, एस.बी.आय. जवळ, चेंबुर मुंबई -400 071 3. बाफना मोटर्स प्रा.लि. हैद्राबाद रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.आर.एन. कूलकर्णी गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.वाय.एस. अर्धापूरकर गैरअर्जदार क्र. 3 तर्फे वकील - अड.पी.एस. भक्कड. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या ) गैरअर्जदार हे वित पुरवठा करणारी संस्था आहे.अर्जदाराने गैरअर्जदाराकडून टाटा सुमो स्पॅशिओ क्र.एम.एच.-26-741 हे विकत घेण्यासाठी रु.3,14,000/- चे कर्ज घेऊन हे वाहन गैरअर्जदार क्र. 3 कडून दि.3.1.2004 रोजी घेतले. भाडे कराराप्रमाणे अर्जदाराने दि.5.1.2006 रोजी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना रु.2,13,060/- ही फेडली. अर्जदाराने दि.85,716/- दि.21.12.2003 रोजी जमा केली आहे. अर्जदाराने कर्जाच्या सुरक्षेपोटी डिपॉझीट म्हणून मराठवाडा ग्रामीण बँक शाखा मुखेड यांचे चेक क्र. 374352 ते 374395 असे एकूण 44 चेक जमा केले आहेत. अर्जदाराला कूठलीही सूचना अथवा नोटीस न देता दि.20.12.2005 रोजी टाटा सूमो स्पॅशिओ हे वाहन ताब्यातून ओढून नेले. सदर कृत्यामूळे अर्जदाराचे प्रचंड आर्थिक नूकसान झाले.अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सदर वाहन देण्याची व व्याजानुसार रक्कम स्विकारण्याची विनंती केली परंतु गैरअर्जदाराने त्यांची विनंती फेटाळली, त्यामूळे गैरअर्जदाराने सेवेत कमतरता केली आहे व सदोष सेवा दिली आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी दि.4.12.2007 रोजी अर्जदारास नोटीस देऊन रु.22,086/- देण्याची मागणी केली, त्यांचे उत्तर अर्जदाराने दि.19.12.2007 रोजी दिले. गैरअर्जदाराची सदरील कृती बेकायदेशीर आहे. अर्जदाराने दिलेले कोरे चेक बँकेत जमा करुन ते न वटल्यामूळे अर्जदाराविरुध्द 30 वे न्यायालय कूर्ला, मुंबई यांच्या न्यायालयात कलम 138 अन्वये दि.30.3.2008 रोजी कारवाई केली आहे. हे गैरअर्जदाराचे कृत्य बेकायदेशीर आहे. त्यामूळे अर्जदाराने अशी विनंती केली आहे की, गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्याकडून रु.2,98,776/- दि.20.12.2005 पासून व्याजासहीत मिळावेत, तसेच त्यांच्या ताब्यात असलेले कोरे चेकस मिळावेत, कूर्ला न्यायालयात केलेली कारवाई बेकायदेशीर आहे असे जाहीर करावे, तसेच मानसिक, शारीरिक व आर्थिक ञासाबददल रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु.5000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपला लेखी म्हणणे दाखल केले आहे. अर्जदाराची तक्रार त्यांनी पूर्णपणे खोडली आहे. अर्जदाराने त्यांच्याकडे अनामत रक्कम ठेवलेली नाही तसेच डेकोरेशनसाठी खर्च केल्याबददल कोणतेही कागदपञ दाखल केले नाही. हे म्हणणे खरे आहे की, अर्जदाराने त्यांना चेक्स दिले होते ते त्यांनी वटवण्यासाठी टाकले असता ते बाऊन्स झाले. अर्जदारास दि.14.11.2005 रोजी नोटीस दिल्यानंतर कायदेशीर प्रतिनीधी मार्फत अर्जदाराची गाडी कराराप्रमाणे ताब्यात घेतली आहे. त्यामूळे गैरअर्जदाराने कोणतीही सेवेत ञूटी केली नाही. गाडी ताब्यात सन 2005 मध्ये घेतली आहे व अर्जदाराने दाखल केलेला निकाल हा सन 2007 चा आहे त्यामूळे तो या केसला लागू होत नाही. गैरअर्जदाराने केलेले 138 ची कारवाई योग्य आहे त्यामूळे हा मूददा येथे उपस्थित करण्याचा अर्जदारास अधिकार नाही. गैरअर्जदाराने असाही आक्षेप घेतला आहे की, अर्जदाराची तक्रार मूदतीत नसल्यामूळे ती फेटाळावी. अर्जदाराने गाडीचे हप्ते न भरल्यामूळे त्यांनी गाडी ताब्यात घेतली आहे व स्वतःचे आर्थिक नूकसान टाळण्यासाठी गाडी विकली आहे, हे सर्व गैरअर्जदाराने कायदेशीरपणे केलेले आहे. त्यामूळे गैरअर्जदाराने अर्जदारास कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही. म्हणून ही तक्रार खर्चासह फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदाराने केली आहे. गैरअर्जदार क्र. 3 हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपला लेखी जवाब दाखल केला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अर्जदार हे त्यांचे ग्राहक नाहीत. अर्जदाराने त्यांचे विरुध्द कोणताही क्लेम केलेला नाही. अर्जदाराची पूर्ण तक्रार ही गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे विरुध्द आहे त्यामूळे ही तक्रार खर्चासह फेटाळावी अशी मागणी केली आहे. अर्जदाराने पूरावा म्हणून स्वतःची साक्ष शपथपञाद्वारे नोंदविली, गैरअर्जदारानी स्वतःची साक्ष शपथपञाद्वारे नोंदविली. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत काय होय. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. 3. अर्जदार हे गैरअर्जदार यांना दिलेले चेकस परत घेण्यास पाञ आहेत काय होय. 4. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडून टाटा सूमो स्पॅशीओ या वाहनासाठी कर्ज घेतले होते. ही बाब अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपञावरुन स्पष्ट होत आहे. तसेच गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्या अर्जातील वाहन कर्जा बाबतची कथने त्यांच्या म्हणण्यामध्ये व शपथपञामध्ये नाकारलेली नाहीत. यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मूददा क्र. 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. मूददा क्र. 2 व 3 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडून टाटा सूमो स्पॅशीओ हे वाहन विकत घेण्यासाठी रक्कम रु.3,14,000/- एवढे कर्ज घेतले होते. सदर कर्जाचे थकबाकी झाल्याने व अर्जदार हे डिफाल्टर झाल्याने गैरअर्जदार यांनी सदरचे वाहन अर्जदार यांच्या ताब्यातून ओढून नेलेले आहे. सदरचे वाहन ओढून नेल्यानंतर गैरअर्जदार यांनी सदर वाहनाची विक्री करुन त्यांची रक्कम स्विकारली आहे. या सर्व गोष्टी मंचासमोर दाखल केलेल्या कागदपञावरुन स्पष्ट झालेल्या आहेत. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे वाहन सन 2005 मध्ये ओढून नेलेले आहे.त्यानंतर गैरअर्जदाराने दि.14.11.2005 रोजी अर्जदार यांस उर्वरित रक्कम भरण्यासाठी नोटीस पाठविली होती. सदरची नोटीस पाठवूनही अर्जदार यांनी कर्जाची थकीत रक्कम न भरल्याने गैरअर्जदार यांनी जवळ जवळ तिन महिन्यानंतर म्हणजे दि.10.6.2004 रोजी सदर वाहनाची विक्री रक्कम रु.1,90,000/- एवढया किंमतीस केली आहे. गैरअर्जदार यांनी वाहनाची विक्री सन 2006 मध्ये केल्यानंतर अर्जदार यांचे बरोबर कोणताही पञव्यवहार केलेला नाही अगर गाडी विकून आलेल्या पैशाचा भरणा केल्यानंतर अर्जदार यांचेकडे काही कर्जाची थकबाकी राहत आहे या बाबत मागणी केल्याचेही दिसून येत नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दि.04.12.2007 रोजी थकबाकीची रक्कम रु.22,086/- भरण्या बाबत कळवल्याचे दाखल नोटीसवरुन दिसून येते. सदर नोटीसला अर्जदार यांनी दि.19.1.2.2007 रोजी उत्त्री नोटीस पाठविली आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडून कर्ज घेतले, गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्याकडून कोरे चेक्स घेतलेले आहेत. सदरचे चेक्स गैरअर्जदार यांनी सन 2008 मध्ये बँकेत वटविण्यासाठी टाकल्यानंतर चेक्स न वटल्यामूळे अर्जदार यांचे विरुध्द निगोशियेबल इन्स्ट्रयूमेंट अक्ट, मधील सेक्शन 138 अन्वये 30 वे न्यायालय, कूर्ला, मुंबई येथे फिर्याद दाखल केलेली आहे. सदर फिर्यादीचे समन्स अर्जदार यांना मिळाल्या बाबत अर्जदार यांनी मे. मंचात माहीतीसाठी दाखल केलेले आहे. सदरच्या गैरअर्जदार यांच्या कृत्याने गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचे वाहन गैरअर्जदार यांनी सन 2005 मध्ये ओढून नेऊन त्यांची विक्री केल्यानंतर अर्जदार हे या मंचासमोर तात्काळ दाद मागण्यासाठी आलेले नाहीत. गैरअर्जदार यांनी अज्रदार यांचे वाहनाची विक्री सन 2006 मध्ये केल्यानंतर बाकी कर्ज रक्कमेच्या वसूलीसाठी अर्जदार यांचे विरुध्द कोणताही कारवाई केली नाही. त्यामूळे गैरअर्जदार यांनी सन 2008 मध्ये अर्जदार यांचेकडून घेतलेले कोरे चेक्स वटण्यासाठी बँकेत भरलेले आहेत व अर्जदार यांचे खात्यामध्ये काही रक्कम शिल्लक नसल्याने सदरचे चेक्स न वटता परत आल्याने अर्जदार यांचे विरुध्द निगोशियेबल इन्स्ट्रयूमेंट अक्ट सेक्शन 138 अन्वये फिर्याद दाखल केली आहे. हे गैरअर्जदार यांचे कृत्य योग्य व बेकायदेशीर असे आहे. अर्जदार यांनी अर्जाचे लेखी यूक्तीवादा सोबत सन 2007 (3) सी.पी. जे. पान 161 नॅशनल कमीशन या वरिष्ठ कोर्टाचे निकालपञ दाखल केलेले आहे. सदर निकालपञाचे अवलोकन केले असता, सदर निकालपञाच्या पॅरा क्र.49 मध्ये, However, we make it clear that petitioner shall not be entitled to recover any amount from the complainant on the basis that some amount remains unpaid in their books of accounts. If any ante dated cheques are remaining with the petitioner, the same shall be treated as null and void and no action on that basis shall be taken by the petitioner against the complainant. या विवरणाप्रमाणे अर्जदार यांचे गैरअर्जदार यांचेकउे असणारे चेक्स null and void असल्याने अर्जदार हे गैरअर्जदार यांच्याकडून त्यांनी दिलेले कोरे चेक्स परत मिळण्यास पाञ आहेत. अर्जदार यांची गैरअर्जदार क्र.3 यांचे विरुध्द काहीही मागणी नाही. त्यामूळे त्यांचे विरुध्द काहीही आदेश नाही. अर्जदार यांनी दाखल केलेला अर्ज, शपथपञ, कागदपञ व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद तसेच गैरअर्जदार यांनी दाखल केलेला जवाब, शपथपञ, कागदपञ व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. आज पासून 30 दिवसांचे आंत, गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी 2. अर्जदार यांचे गैरअर्जदाराकडे असणारे चेक्स अर्जदारांना परत करावेत. 3. मानसिक ञासापोटी रु.2000/- दयावेत. 4. अर्जाचा खर्च रु.1000/- दयावेत. 5. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |