Maharashtra

Jalgaon

CC/10/959

Rahul Patil - Complainant(s)

Versus

Tata Motor Finance Ltd. - Opp.Party(s)

Adv. Hemant Bhangale

13 Nov 2014

ORDER

final order
Add.District Consumer Redressal Forum,Jalgaon
 
Complaint Case No. CC/10/959
 
1. Rahul Patil
Jalgaon
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Tata Motor Finance Ltd.
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vishwas D. Dhawale PRESIDENT
 HON'BLE MRS. Poonam N.Malik MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .

                       

                               ग्राहक तक्रार क्र. 959/2010.                  

                              तक्रार दाखल तारीखः-19/07/2010.

                              आदेश पारीत तारीखः- 13/11/2014.

 

श्री.राहुल सुभाष पाटील,

उ.व.सज्ञान, धंदाः शेती व व्‍यापार,

रा. मोठा वाघोदा,ता.रावेर,जि.जळगांव                   ..........     तक्रारदार.

 

            विरुध्‍द

 

1.     टाटा मोटर फायनान्‍स (टाटा मोटर्स लि.)

टाटा मोटर्स बिल्‍डींग, दुसरा मजला,तीनहात नाका,

ज्ञानसाधना कॉलेज सर्व्‍हीस रोड, ठाणे 02.

(समन्‍स कार्यकारी संचालक यांचेवर बजवावेत.)

 

2.    टाटा मोटर फायनान्‍स (टाटा मोटर्स लि)

उज्‍वल ऑटो मोटीव्‍ह कंम्‍पाऊंड, पहीला मजला,

मुंबई आग्रा रोड, अवधान, धुळे 11.

(समन्‍स शाखा व्‍यवस्‍थापक यांचेवर बजवावेत.)    .........      विरुध्‍द पक्ष

 

                        कोरम

                        श्री.विश्‍वास दौ.ढवळे                    अध्‍यक्ष

                                                श्रीमती पुनम नि.मलीक                 सदस्‍या.

 

 

            तक्रारदारातर्फेः श्री.हेमंत अ.भंगाळे वकील.

            विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 तर्फे श्री.पंकज अ.अत्रे वकील.(नो-से)

 

निकाल-प्रत

व्‍दारा-श्री.विश्‍वास दौ.ढवळे,अध्‍यक्षः विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदाराकडुन कर्जाची रक्‍कमेपोटी स्विकारलेले चेक परत न करणे तसेच कर्ज रक्‍कम संपुर्ण परतफेड केल्‍यानंतर कर्जाऊ वाहनाचे एन ओ सी व वाहनाचे आर सी बुक व इतर कागदपत्रे परत न करुन दिलेल्‍या सेवेतील त्रृटीदाखल प्रस्‍तुतची तक्रार तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केलेली आहे. तक्रारदाराच्‍या तक्रार अर्जातील हकीकत थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-

            2.    तक्रारदार हे वर नमुद पत्‍यावरील रहीवाशी असुन प्रतिष्‍ठीत नागरीक असुन शेती व्‍यवसाय करतात.  तक्रारदार यांना टाटा इंडीका वाहन घ्‍यावयाचे असल्‍याने त्‍यांनी सदरचे वाहन फायनान्‍सवर घेण्‍याची माहिती उज्‍वल ऑटोमोटीव्‍हज,धुळे यांचेकडुन घेतलीव त्‍यानुसार दि.26/05/2006 रोजी तक्रारदाराने रु.82,130/- डाऊन पेमेंट भरणा करुन विरुध्‍द पक्ष कंपनीकडुन फायनान्‍सवर मासिक हप्‍त्‍याने वाहन खरेदी केले.    सदरची रक्‍कम अधिक व्‍याज अशी मिळुन रु.3,37,038/- एकुण 35 मासिक हप्‍त्‍यांमध्‍ये परतफेड करण्‍याचे ठरले होते.   परतफेडीचा पहीला हप्‍ता रु.9,788/- रोख स्‍वरुपात भरणा करुन इतर 2 ते 35 हप्‍ते रु.9,325/- प्रती मासिक हप्‍ता चेकव्‍दारे विरुध्‍द पक्ष यांनी काढलेल्‍या अंतीम हिशोबानुसार परतफेड करावयाचे होते.   तक्रारदाराने जळगांव जिल्‍हा मध्‍यवर्ती सह बँकेकडे असलेल्‍या त्‍याचे खात्‍यावरील एकुण 34 चेक विरुध्‍द पक्षास दिले होते त्‍यानुसार प्रत्‍येक महीन्‍यात एक याप्रमाणे चेक वटण्‍यासाठी टाकण्‍याचे निश्चित ठरले होते.  तथापी विरुध्‍द पक्ष हे तक्रारदाराबरोबर ठरलेप्रमाणे न वागता बेकायदेशीरपणे कोणताही चेक कोणतीही पुर्व सुचना न देता कधीही बँकेत वटण्‍यासाठी टाकत असत तथापी तक्रारदाराने त्‍याकडे दुर्लक्ष करुन विरुध्‍द पक्षाकडे एकुण रक्‍कम रु.3,27,413/- भरणा केले.   तसेच रक्‍कम रु.9,625/- तक्रारदाराकडुन घेणे शिल्‍लक असल्‍यावर व तक्रारदाराचा एक चेक विरुध्‍द पक्षाकडे शिल्‍लक असतांनाही करार रक्‍कम रु.3,37,038/- पेक्षा जास्‍त रक्‍कम खोटया व बेकायदेशीर मार्गाने कर्ज खात्‍यात नांवे टाकुन ती वसुल करण्‍याचा विरुध्‍द पक्षाचा प्रयत्‍न आहे.   तक्रारदाराने विरुध्‍द पक्षाकडे खाते उतारा व इतर कागदपत्रांची मागणी केली असता त्‍यास ती देण्‍यात आली नाहीत.   तसेच तक्रारदाराचे कर्जाऊ वाहन उचलुन घेण्‍याची व पोलीस कारवाई करण्‍याची तक्रारदारास धमकी दिली.   सरतेशेवटी तक्रारदाराने विरुध्‍द पक्षास नोटीस देऊन राहीलेले दोन चेक परत करण्‍याचे व नाहरकत प्रमाणपत्र देण्‍याबाबत कळविले तथापी विरुध्‍द पक्ष हे नोटीस मिळुनही त्‍याप्रमाणे वागले नाहीत अगर नोटीस उत्‍तरही दिले नाही.  सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजुर करण्‍यात यावा, तक्रारदाराने विरुध्‍द पक्षास दिलेले दोन चेक परत करण्‍याचे विरुध्‍द पक्षास आदेश व्‍हावेत, तक्रारदारास विरुध्‍द पक्ष यांनी वाहनाचे नाहरकत पत्र, आर सी बुक व इतर कागदपत्रे देण्‍याचे आदेश व्‍हावेत, तक्रारदारास झालेल्‍या मानसिक त्रासाचे नुकसानी दाखल रु.50,000/- व तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.20,000/- देण्‍याचे विरुध्‍द पक्षास आदेश व्‍हावेत अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.

            3.    विरुध्‍द पक्ष यांना या मंचातर्फे रजिष्‍ट्रर ए.डी.नोटीस काढण्‍यात आली.  विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 हे याकामी विधिज्ञांमार्फत हजर झाले तथापी मुदतीत लेखी म्‍हणणे दाखल न केल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द नो-से आदेश पारीत करुन तक्रार निकालासाठी घेतली.  

            4.    तक्रारदार यांची तक्रार,  दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, व तक्रारदाराचे विधिज्ञांचा युक्‍तीवाद याचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता न्‍यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.

            मुद्ये                                       उत्‍तर

1)    विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना आवश्‍यक ती सेवा

      न देऊन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला आहे

      काय ?                                                            होय.              

 2)    आदेश काय ?                                     खालीलप्रमाणे.

                              वि वे च न

            5.    मुद्या क्र.1  -         तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष फायनान्‍सकडुन कर्जाव्‍दारे चार चाकी वाहन इंडीका खरेदी केले तथापी सदरचे कर्जाऊ वाहनाचे सर्व हप्‍ते वेळेवर भरणा केल्‍यानंतरही तक्रारदाराकडुन अनधिकृतपणे रक्‍कम मागणी करुन तसेच त्‍यास एन ओ सी व आर सी बुक व इतर कागदपत्रे दिले नाहीत त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाकडील दोन चेक परत मिळावेत व इतर नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.   विरुध्‍द पक्ष हे याकामी विधिज्ञांमार्फत हजर झाले तथापी त्‍यांनी तक्रारदाराची तक्रार व तक्रार अर्जासोबत दाखल कागदपत्रे यांना लेखी म्‍हणण्‍यातुन प्रतिउत्‍तर देऊन नाकारलेले नाही.   तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत दाखल केलेले कागदपत्र पाहता तक्रारदाराचे सेव्‍हींग खाते असलेल्‍या दि.जळगांव जिल्‍हा मध्‍यवर्ती सह बँक यांनी दि.16 जुन,2009 चे पत्रान्‍वये तारखेनिहाय चेक वटवुन पाठविलेबाबतचा तपशिल दिलेला आहे त्‍यावरुन तक्रारदाराने विरुध्‍द पक्षाकडे दिलेले चेक व्‍दारे त्‍यांनी कर्जाऊ रक्‍कमेचा भरणा विरुध्‍द पक्षाकडे केल्‍याचे स्‍पष्‍ट होते.   तक्रारदाराकडुन घेतलेले दोन जादा चेक तक्रारदारास कर्जाची संपुर्ण रक्‍कम भरणा केल्‍यानंतरही परत न करुन तसेच एन ओ सी व कर्जाऊ वाहनाचे आर सी बुक व इतर कागदपत्र तक्रारदारास न देऊन सदोष सेवा दिल्‍याचे निष्‍कर्षाप्रत आम्‍ही येत आहोत.  सबब मुद्या क्र. 1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

            6.  मुद्या क्र. 2 -  तक्रारदाराने विरुध्‍द पक्षास दिलेले दोन चेक परत करण्‍याचे विरुध्‍द पक्षास आदेश व्‍हावेत, तक्रारदारास विरुध्‍द पक्ष यांनी वाहनाचे नाहरकत पत्र, आर सी बुक व इतर कागदपत्रे देण्‍याचे आदेश व्‍हावेत, तक्रारदारास झालेल्‍या मानसिक त्रासाचे नुकसानी दाखल रु.50,000/- व तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.20,000/- देण्‍याचे विरुध्‍द पक्षास आदेश व्‍हावेत अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.   विरुध्‍द पक्ष यांचेकडे जर तक्रारदाराने संपुर्ण कर्ज रक्‍कमेचा भरणा केल्‍यानंतर दोन चेक शिल्‍लक असतील तर त्‍यांनी ते तक्रारदारास तात्‍काळ परत करावेत तसेच तक्रारदाराने जर कर्जाऊ रक्‍कमेचा भरणा पुर्ण केला असेल तर त्‍यास एन ओ सी व इतर कागदपत्रे द्यावेत तसेच विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारास दिलेल्‍या सेवेतील त्रृटीदाखल व दिलेल्‍या मानसिक त्रासादाखल रु.10,000/- व तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.5,000/- विरुध्‍द पक्षांकडुन मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहे.   सबब आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.

                              आ    दे    श 

( अ )       तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्‍यात येतो.

( ब )       विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांना वैयक्‍तीक अथवा संयुक्‍तीकरित्‍या असे निर्देशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदाराचे त्‍यांचेकडे असलेले दोन चेक क्र.713761 व 713762 तक्रारदारास तात्‍काळ परत करावेत.

( क )       विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांना वैयक्‍तीक अथवा संयुक्‍तीकरित्‍या असेही निर्देशीत करण्‍यात येते की, तक्रारदाराने जर कर्जाऊ रक्‍कमेचा भरणा पुर्ण केला असेल तर त्‍यास एन ओ सी व इतर कागदपत्रे या आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत., तसेच तक्रारदारास झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रु.10,000/-(अक्षरी रक्‍कम रु.दहा हजार मात्र )  व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- (अक्षरी रु.पाच हजार मात्र ) या आदेशाचे प्राप्‍तीपासुन 30 दिवसांचे आंत अदा करावेत.

   गा 

दिनांकः-  13/11/2014.   ( श्रीमती पुनम नि.मलीक )  ( श्री.विश्‍वास दौ.ढवळे )

                                                      सदस्‍या                         अध्‍यक्ष

                                   जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.

 
 
[HON'BLE MR. Vishwas D. Dhawale]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Poonam N.Malik]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.