निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 11/10/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 07/12/2011
तक्रार निकाल दिनांकः-13/05/2014
कालावधी 2 वर्ष 7 महिने 2 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष - श्री प्रदीप निटुरकर, B.Com.LL.B.
सदस्या - सौ.अनिता ओस्तवाल M.Sc.
सोपान पिता मुंगाजी लांडे अर्जदार
वय 38 वर्षे, धंदा शेती, अWड.एस.पी.भोसले
रा.भोगाव,ता.पालम, जि.परभणी.
विरुध्द
1 टाटा मोटार्स लिमीटेड कंपनी गैरअर्जदार
इनकॉर्पोरेटेड अंडर प्रोव्हिजन ऑफ दि अWड.अजय व्यास
कंपनीज अॅक्ट 1956 इॅवींग इट्स रजिस्टर्ड
ऑफिस अॅट बॉम्बे हाउस 24 हाती,
मोदी स्ट्रीट फोर्ट मुंबई - 400 001.
2 टाटा मोटार्स लिमिटेड,
व्दारा बाफना मोटार्स प्रा.लि.नांदेड,
नांदेड, ता.जि.नांदेड.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.प्रदीप निटुरकर, अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल, सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
(निकालपत्र पारित व्दारा – सौ.अनिता ओस्तवाल, सदस्या)
गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी ञुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 कडुन वाहन नों.क्र. एम.एच.-22/2392 खरेदी केले. त्यासाठी रक्कम रुपये 3,89,887/- चे कर्ज गैरअर्जदाराकडुन घेतले. कर्ज रक्कमेची परतफेड 9650/- प्रति हप्ता या प्रमाणे 47 हप्त्यामध्ये करावयाची होती. अर्जदाराने कर्ज रक्कमेचे हप्ते नियमीतपणे भरले. परंतु काही हप्ते देणे बाकी असल्यामुळे गैरअर्जदार क्र.2 याने दिनांक 21.06.2007 रोजी सदर वाहन जप्त केले. अर्जदाराने अनेक वेळा गैरअर्जदार क्र.2 कडे जावुन त्याचे वाहन परत करण्याची विनंती केली. परंतु गैरअर्जदाराने त्याच्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही. पुढे गैरअर्जदाराने अर्जदाराच्या विरोधात लवादाकडे प्रकरण दाखल केले. लवादाने दिलेल्या आदेशाप्रमाणे दिनांक 31.03.2010 पुर्वी अर्जदारास रक्कम रुपये 1,00,000/- चा भरणा गैरअर्जदाराकडे करणे गरजेचे होते. त्यानुसार अज्रदाराने दिनांक 27.02.2010 रोजी रुपये 1,00,000/- पावती क्र.310654616 अन्वये गैरअर्जदार क्र.2 कडे भरले. परंतु गेरअर्जदाराने सदरचे वाहन अर्जदारास परत न करता साहेबराव कोरडे यांना वाहन विक्री केले. वास्तविक पाहता अर्जदाराने रक्कम रुपये 1,00,000/- भरल्यानंतर गैरअर्जदाराने वाहन अज्रदारास परत करणे गरजेचे होते. म्हणुन अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदाराचे वाहन नो.क्र.एम.एच.-22/2392 परत करावे किंवा सदर वाहनाची किंमत रुपये 3,89,887/- व्याजासह अर्जदारास द्यावे तसेच तसेच मानसीक ञासापोटी रक्कम रुपये 20000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रुपये 5000/- मिळावेत अश्या मागण्या मंचासमोर केल्या आहेत.
अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपञ नि..2 व पुराव्यातील कागदपञ नि.6 वर मंचासमोर दाखल केले.
मंचाची नोटीस गैरअर्जदार क्र.1 यांना तामील झाल्यानंतर गैरअर्जदार क्र.1 ने लेखी निवेदन नि.18 वर मंचासमोर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, सदरचा वाद हा कायदेशिर मुदतीत नाही कारण दोन्ही पक्षात करार हा दिनांक 20.11.2004 रोजीझालेला आहे व कराराच्या टर्म्सप्रमाणे फक्त 4 वर्षापर्यंतचा सदरचा करार अस्तित्वात होता. अर्जदार हा थकबाकीदार असल्यामुळे गैरअज्रदाराने सदरचे वाहन दिनांक 21.06.2007 रोजी ताब्यात घेतले व दिनांक 16.11.2007 रोजी त्याची विक्री केली. त्यामुळे तक्रारीस कारण घडल्यापासून 2 वर्षाच्या आत अर्जदाराने तक्रार मंचासमोर दाखल करणे गरजेचे होते. परंतु अज्रदाराने 2011 साली मंचात तक्रार दाखल केलेली असल्यामुळे मुदतबाहय आहे. तसेच अनेक वेळा थकीत हप्ते भरण्याविषयी सुचना देवुनही अर्जदाराने थकीत हप्ते न भरल्यामुळे कायदेशिर बाबींची पुर्तता करुन सदरचे वाहन ताब्यात घेतले व तदनंतर त्याची बाजारभवाप्रमाणे विक्री केली. अद्यापही अर्जदाराकडुन रक्कम रुपये 1,79,839/- येणे बाकी आहेत व उर्वरीत रक्कम वसूल करण्याचा पुर्ण अधिकार गैरअर्जदारास आहे. तसेच सदरचे वाहन हे व्यावसायीक उद्देशाने घेतलेले आहे. पुढे गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, करारानुसार दोन्ही पक्षात उदभवलेला वाद फक्त लवादाच्या समोरच चालण्यास पाञ आहे. सबब वरील सर्व कारणास्तव अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती गैरअर्जदार क्र.1 ने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी निवेदनासोबत शपथपञ नि.19 वर व पुराव्यातील कागदपञ नि.20 वर मंचासमोर दाखल केले.
गैरअर्जदार क्र.2 यांना मंचाची नोटीस तामील झालेली नसल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 विरुध्द पेपरमध्ये नोटीसीचे जाहिर प्रगटन होउनही गैरअर्जदार क्र.2 मंचासमोर नेमल्या तारखेस हजर न झाल्यामुळे त्याच्या विरोधात एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला व सदरचे प्रकरण त्याच्या विरोधात एकतर्फा चालविण्यात आले.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1 सदरचा वाद या मंचासमोर चालण्यास पाञ
आहे काय ? नाही
2 आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2 -
अर्जदाराने तक्रार अर्जातुन असे कथन केले आहे की, गैरअर्जदाराने अर्जदाराविरुध्द लवादाकडे प्रकरण दासल केले होते व त्या प्रकरणात लवादाने आदेश दिल्याप्रमाणे अर्जदार दिनांक 27.02.2010 रोजी रक्कम रुपये 1,00,000/- भरलेले आहेत. परंतु सदरचे वाहन गैरअज्रदाराने अज्रदारास परत केलेले नाही. गेरअज्रदाराने लेखी निवेदनातुन अर्जदाराच्या कथनाविषयी कुठलेही भाष्य केलेले नाही. तसेच अर्जदाराने व गैरअर्जदाराने लवादाने दिलेल्या निकालाची प्रत मंचासमोर दाखल केलेली नाही. त्यामुळे लवादाने नेमका काय आदेश दिलेला आहे हे समजण्यास मार्ग नाही. तसेच जर लवादाने दिलेल्या आदेशाची पुर्तता गैरअर्जदाराने केलेली नसेल तर त्यासाठी अर्जदारास मंचासमोर दाद मागता येणार नाही असे मंचाचे ठाम मत असल्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
2 दोन्ही पक्षांना निकालाच्या प्रती मोफत पुरावाव्यात
सौ.अनिता ओस्तवाल श्री.प्रदीप निटुरकर
सदस्या अध्यक्ष