जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
तक्रार अर्ज क्रमांक – २३७/२०११
तक्रार दाखल दिनांक – २६/१२/२०११
तक्रार निकाली दिनांक – १७/०२/२०१४
श्री. बापुजी विठ्ठल पाटील,
वय ४०, धंदा – शेती
रा.राहणार – कासारे,
ता.साक्री, जि.धुळे ----------- तक्रारदार
विरुध्द
१) टाटा मोटर्स लि.
पत्ता - सिटी मॉल, पहिला मजला,
गणेश खिंड रोड, पुणे युनिव्हरसिटी जवळ,
पुणे – ०७.
२) उज्वल अॅटोमोटीव्हज,
गुरूद्वाराजवळ, जवळ, अवधान,
मुंबई आग्रारोड, धुळे ---------- सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.श्री.एल.पी. ठाकूर)
(सामनेवाला तर्फे – गैरहजर)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
------------------------------------------------------------------------------------
सामनेवाला यांच्याकडून तक्रारदारास विक्री केलेल्या गाडीतील इंजिन फॉल्टी (खराब) असल्याने गाडीच्या बदल्यात नविन गाडी अथवा गाडीची किंमत सामनेवाला यांच्याकडून मिळावी म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
तक्रारदार हे दाखल दिनांकानंतर तारीख १४/०३/२०१३ पासून सतत गैरहजर आहे. तसेच तक्रार अर्ज सुरू ठेवणेकामी कोणताही पाठपुरावा (Steps) केलेला नाही. यावरून त्यांना तक्रार चालवण्यात स्वारस्य नसल्याचे दिसुन येते. त्यामुळे सदर तक्रार अंतिमरित्या निकाली काढण्यात येत आहे.
आ दे श
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दि.१७/०२/२०१४.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.