::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, किर्ती गाडगीळ (वैदय) मा.सदस्या
१. सामनेवाले यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. अर्जदार ह्यांनी टाटा कंपनीचे गाडी क्र. एम.ए.टी. ६१४०७, सी आर बी..६९३ व इंजीन क्र. २२ एल.डी.आय.सी.ओ.आर. ०९, बि.ए.वाय. क्र. २८४७ रंग पर्ल व्हाईट या स्वरुपाची गाडी रक्कम रु. १०,१४,१४३/- मध्ये अर्जदार क्र. १ कडुन खरेदी केली गाडी खरेदी केल्यानंतर लगेचच जुलै २०१२ ला गाडीचा डाव्या बाजुचे चाक समोरील गार्डला घासत होता. त्याची माहिती गैरअर्जदार क्र. ३ यांना दिली. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व जुजबी दुरुस्ती करुन गाडी परत पाठविली. सदर गाडीत पुन्हा सप्टेंबर २०१२ मध्ये गाडीचे डाव्या बाजुचे चाक समोरील गार्ड ला घासत होते. त्याबद्दल गैरअर्जदार क्र. ३ यांचेकडे तक्रार केली. गाडी घेतल्यापासुन प्रत्येक महिण्यात गैरअर्जदार क्र. ३ यांचेकडे दुरुस्तीला न्यावी लागत होती. गाडीचे प्रति लिटर १४.४ किलोमिटर असे ऐवरेज गाडी खरेदी करतांना कळवुन देखील प्रत्यक्षात ९.५ किलोमिटर असे ऐवरेज मिळत होते. अर्जदराच्या गाडीमध्ये दिनांक १३.१२.२०१२ रोजी लोअर अॅसेंम्बली बिघडली तेव्हा दिनांक १४.१२.२०१२ रोजी गैरअर्जदार क्र. ३ यांनी दुरुस्ती करुन त्याबाबत देयकही दिले. त्यानंतर दिनांक २२.०२.२०१३, ०५.०१.२०१३ तसेच मार्च २०१३ मध्ये आलेल्या बिघाडाची दुरुस्ती देखील गैरअर्जदार क्र. ३ यांनी करुन दिली. सदर स्वरुपाच्या गाडी निर्मीती दोष असुन गैरअर्जदार क्र. ३ यांनी लक्ष दिले नाही. सबब दिनांक १५.०४.२०१३ रोजी अर्जदाराने तक्रार नोटीस गैरअर्जदार यांना पाठवुन गाडीची किंमत परत देण्याची मागणी केली. गैरअर्जदारला पत्र मिळुनही त्यांनी पुर्णता दुर्लक्षता करुन गाडीच्या दुरुस्तीसाठी बराच कालावधी लागल्याने गाडी बंद पडुन राहील्याने अर्जदारास मनस्ताप झाला व प्रस्तुत तक्रार दाखल करावी लागली. वाहनामध्ये निर्मीती दोष असलेली गाडी गैरअर्जदार क्र. २ यांनी परत घेवुन गाडीची खरेदी किंमत रु. १०,१४,१४३/- १२ टक्के व्याजासह गैरअर्जदार यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे द्यावे तसेच मानसिक व शारीरीक खर्च अर्जदाराला देण्यात यावा अशी विनंती अर्जदारांनी केली आहे.
३. गैरअर्जदाराला मंचातर्फे नोटीस प्राप्त झाला. गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी उत्तरात प्राथमीक आक्षेप घेऊन सदर वाद हा ग्राहक वाद नसल्यामुळे सदर तक्रार खारीज करण्यात यावी तसेच तक्रारकर्ताहा सदर वाहनाचा उपयोग सिक्युरीटी सर्व्हीसेससाठी करीत असल्यामुळे लाभ कमवीने हा उद्देश तक्रारकर्त्याचा उद्देश असल्यामुळे सदर तक्रारकर्ता हा ग्राहक संरक्षण कायदा कलम २ (ड) अंतर्गत ग्राहक संरक्षण कायदाकलम २ (ड) अंतर्गत ग्राहक या संज्ञेत येत नाही. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने गैरअर्जदार कडुन विकत घेतलेल्या गाडीत निर्मीती दोष आहे असे कथन केले आहे. परंतु त्याबाबत तज्ञ अहवाल दाखल केलेला नाही. सबब अर्जदाराने केलेली तक्रार खारीज करण्यात यावी. अर्जदाराने सदर गाडी दिनांक १९.०५.२०१२ रोजी विकत घेतली आणि गाडीमध्ये बिघाड २९.०५.२०१३ पर्यंत आला. तेव्हा गाडी ३०८३८ किलामिटर चालली होती. यावरुन असे स्पष्ट होते कि, गाडी रोडवर व्यवस्थीत चालविली गेली असुन जे काही गाडीमध्ये बिघाड गाडीत आले ते गैरअर्जदारकडुन तपासणी करुन निराकरण करण्यात आले होते. सबब गाडी बदलवुन नवि गाडी देण्याबाबतचे अर्जदाराचे कथन ग्राह्य धरण्यासारखे नाही. गैरअर्जदार यांच्या आपसी संबंधात Principal to Principal आधारावर असल्याने अर्जदार व गैरअर्जदार क्र. १ यांचा काहीही संबंध नाही. सदर प्रकरणात गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या गाडीची दुरुस्ती वेळोवेळी करुन दिली परंतु अर्जदार हा स्वत:च्या गाडीची काळजी घेण्यास असमर्थ होता. अर्जदाराने त्याच्या गाडीची नियमीतपणे सव्हीसींग वेळोवेळी सांगुन सुध्दा त्याबद्दलच्या सुचना पाळल्या नाही. सदर प्रकरणात मुळातच गुंतागुंतीचे असल्यामुळे त्यात साक्षीपुरावा तसेच चौकशी व उलट तपासणीची आवश्यकता असल्यामुळे सदर तक्रार दिवाणी न्यायालयात चालविणे योग्य असुन सदर तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्र. १ यांनी केली आहे.
४. गैरअर्जदार क्र. २ यांनी तक्रारीतील मुद्द्यांचे खंडन करुन सदर तक्रार अर्जदाराने वाहन निर्मीती दोषाबद्दल केली असल्याने व गैरअर्जदार क्र. २ हे वाहनाचे निर्माते नसल्याने अर्जदार क्र. २ यांचे विरुध्द कोणतीही मागणी नसल्याने तसेच गैरअर्जदार क्र. २ यांनी केवळ वाहन विक्री केली असुन वाहन विक्री पश्च्यात दुरुस्ती व सेवासुविधा बाबतची जबाबदारी केवळ गैरअर्जदार क्र. ३ यांची असुन प्रस्तुत तक्रार गैरअर्जदार क्र. २ यांचे विरुध्द खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्र. २ यांनी केली आहे. प्रस्तुत तक्रारीमध्ये गैरअर्जदार क्र. ३ व ४ यांनी लेखी उत्तर दाखल न केल्यामुळे गैरअर्जदार क्र. ३ व ४ यांच्या लेखी उत्तराशिवाय तक्रार पुढे चालविण्यात येते.
५. तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद व गैरअर्जदार क्र. १ व २ यांचे लेखी म्हणणे कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यांत येतात.
मुद्दे निष्कर्ष १. अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन विकत घेतलेल्या वाहनाचे तक्रारीत दोष आहे ही बाब तक्रारदार सिद्ध करतात काय ? नाही २. अर्जदाराने गैरअर्जदाराला सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार सिद्ध करतात काय ? नाही ३. आदेश ? तक्रार अमान्य कारण मिमांसा मुद्दा क्र. १ व २ : ६. सदरच्या प्रकरणातील नमुद वाहन अर्जइाराने गैरअर्जदार क्र. २ कडुन विकत घेतले याबाबत वाद नाही. त्याबाबत अर्जदाराने तक्रारीत दस्ताऐवज दाखल केले आहे वते गैरअर्जदारांनी नाकारले नाही. अर्जदाराचा युक्तीवाद असा आहे कि, दिनांक २६.०५.२०१२ रोजी वाहन विकत घेतल्यावर लगेच जुलै २०१२ मध्ये वाहनात बिघाड होण्यास सुरुवात झाली. तसेच गाडीचे ऐवरेज कमी झाले. त्यामुळे गैरअर्जदारांनी गाडी दुरुस्त करुन दिली. तरीही गाडीत नोव्हेंबर २०१२ मध्ये बिघाड येत असल्यामुळे निर्मिती दोष असलेली गाडी अर्जदाराला विकत दिल्याने सदर बाब सेवेत न्यूनता व अनुचित व्यापारी पद्धती आहे. याउलट वरील युक्तिवादाचा प्रतिवाद करताना गैरअर्जदारांनी असे कथन केले कि, अर्जदारांचे वाहन हमी कालावधीमध्ये असल्यामुळे अर्जदाराला वेळोवेळी गैरअर्जदारांनी वाहन दुरुस्त करुन दिलेले आहे, हे दाखल दस्ताएवजावरून दिसून येते. तसेच अर्जदाराच्या वाहन चालविण्याच्या निष्काळजीपणामुळे वाहनात आलेला दोष हा निर्मिती दोष आहे का? याचा निर्णय होणे आवश्यक आहे. Warranty Clause 4(e) मध्ये Warrantyच्या मर्यादा नमूद केल्या आहेत. तसेच सदर प्रकरणात अर्जदाराने तक्रारीतील कथनाप्रमाणे वाहनातील दुरुस्ती गैरअर्जदार क्र. ३ यांनी वेळोवेळी दुरुस्त करुन दिली आहे हे गैरअर्जदारने दाखल केलेल्या job card workshop copy वरून स्पष्ट होत आहे. गैरअर्जदार क्र. २ यांनी युक्तिवादाच्या पुष्टर्थ्य मा. राष्ट्रीय आयोगाने MARUTI UDYOG Ltd. V/s HASMUKH LAKSHMICHAND AND OTHERS III 2009 CPJ 229(NC) या न्यायनिर्णयाचा संदर्भ देवून, “वाहनातील निर्मिती दोष सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांनी वाह्नाची तपासणी तज्ञामार्फत करुन त्याबाबतचा अहवाल दाखल करणे आवश्यक होते.” परंतु असा कोणताही तज्ञ अहवाल प्रकरणात दाखल नसल्याने वाहन बदलवून नवीन वाहन द्यावे किवा वाहनाची किमत परत करावी ही मागणी मान्य करता येणार नाही. तसेच गैरअर्जदारने अर्जदाराला विकलेल्या गाडीची गैरअर्जदार क्र. ३ ने वेळोवेळी दुरुस्ती करुन दिली ही बाब अर्जदाराने मान्य केलेली आहे. सबब, अर्जदाराने तक्रारीत केलेल्या मागणीस व नुकसान भरपाईस अर्जदार पात्र नाही असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. १ व २ चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. ३ : ७. मुद्दा क्रं. १ व २ वरील विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश १. ग्राहक तक्रार क्र. ६५/२०१३ अमान्य करण्यात येते. २. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत. ३. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी. श्रीमत श्रीमती.कल्पना जांगडे श्रीमती. किर्ती गाडगीळ श्री. उमेश वि. जावळीकर (सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष) | |
|