Maharashtra

Dhule

CC/14/101

Ganesh GANGARAM Gawali - Complainant(s)

Versus

Tata Moters Finace Ltd. co. - Opp.Party(s)

Wagh

21 Nov 2014

ORDER

Consumer Disputes Redressal Forum,Dhule
JUDGMENT
 
Complaint Case No. CC/14/101
 
1. Ganesh GANGARAM Gawali
At post Dattawadi Chalisgoan
Jalgon
maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Tata Moters Finace Ltd. co.
old prabadvi Road, Mumbai 4000025
Mumbai
maharashtra
2. Head officer, Tata moters fainces Ltd. co.
Old prabhadvi Road, Mumbai
Mumbai
maharashtra
3. Br.Manager, Tata Moters Finaces
Br.office, Agrwal Nager Groser bagullo , Dhule
Dhule
Maharashtra
4. Shri Sunil Ramesh Kulkarni, Cashier Tata moters Finace Ltd. Br. Dhule.
vrindvan coloni, Devpur, Dhule
Dhule
maharashtra
5. Manager, cell opertion Tata moters
Awadhan, Tal. Dhule
Dhule
maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V.R.Londhe PRESIDENT
 HON'BLE MR. S.S. Joshi MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.

 

                                  ग्राहक तक्रार क्रमांक  –   १०१/२०१४

                                  तक्रार दाखल दिनांक  – १७/०७/२०१४

                                 तक्रार निकाली दिनांक – २१/११/२०१४

श्री. गणेश गंगाराम गवळी

उ.व.३५, धंदा – चहा विक्री,

रा.दत्‍तवाडी, नगरपालिका दवाखान्‍यामागे,

चाळीसगाव, जि. जळगाव                            . तक्रारदार

 

        विरुध्‍द

 

(१) टाटा मोटर्स फायनान्‍स लिमिटेड कंपनी

    पत्‍ताः मुख्‍य कार्यालय, नानावटी महालया,

    तिसरा मजला,१६, हॉनी मोडी मार्ग,

    मुंबई – ४००००१

    आणि पत्‍ताः डिजीपी हाऊस, चौथा मजला,

    जुना प्रभादेवी रोड, मुंबई- ४००००२५

(२) मुख्‍य प्रवर्तक, टाटा मोटर्स फायनान्‍स लिमिटेड कंपनी

    पत्‍ताः डिजीपी हाऊस, चौथा मजला, जुना प्रभादेवी

    रोडी, मुंबई – ४००००२५

(३)  शाखा व्‍यवस्‍थापक, टाटा मोटर्स फायनान्‍स

    ब्रॅंन्‍च ऑफीस, रा.अग्रवाल नगर, ग्रोसर बंगला,

    ता.जि. धुळे

(४)  कॅशीयर टाटा मोटर्स फयानान्‍स लि., धुळे शाखा

    श्री.सुनिल रमेश कुलकर्णी, रा.वृंदावन कॉलनी,

    देवपूर, धुळे

(५)  मॅनेजर तथा प्रमुख सेल ऑपरेशन टाटा मोटर्स

    उज्‍वल ऑटोमोटिव्‍ह प्रा.लि.,

    पत्‍ता – उज्‍ज्‍वल मोटर्स प्रा.लि. अवधान, ता.जि. धुळे   . सामनेवाला

 

न्‍यायासन  

 (मा.अध्‍यक्ष – श्री.व्‍ही.आर. लोंढे)

 (मा.सदस्‍य – श्री.एस.एस.जोशी)

 

उपस्थिती

(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.एम.पी. वाघ)

(सामनेवाला क्र.१ ते ३ तर्फे – अॅड.श्री.एस.ए.पंडीत)

(सामनेवाला क्र.४ व ५ तर्फे  – गैरहजर)

 

निकालपत्र

 (द्वारा मा.सदस्‍य – श्री.एस.एस.जोशी)

 

१.   सामनेवाले क्र.१ यांच्‍याकडून घेतलेल्‍या वाहन कर्जाची पूर्णफेड करूनही त्‍यांनी कर्जफेडीचा दाखला दिला नाही, या कारणावरून तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.

 

 

२.   आपल्‍या तक्रारीत तक्रारदार यांनी म्‍हटले आहे की, त्‍यांनी सामनवाले क्र.५ यांच्‍याकडून टाटा इंडिका व्हिस्‍टा हे वाहन खरेदी केले होते.  त्‍यासाठी त्‍यांनी सामनेवाले क्र.१ यांच्‍या स्‍थानिक शाखेकडून रूपये २,७०,०००/- एवढे कर्ज घेतले होते.  या कर्जापैकी रूपये १,२५,०००/- एवढया रकमेची त्‍यांनी दि.३१/०८/२०१३ रोजी एकरकमी फेड केली. सामनेवाले क्र.४ यांच्‍याकडे ती रक्‍कम जमा केल्‍यानंतर सामनेवाले क्र.४ यांनी त्‍याबाबत पावतीही दिली. कर्जफेड झाल्‍यानंतर तक्रारदार यांनी सामनवेाले क्र.४ यांच्‍याकडे ‘कर्ज बाकी नाही’ असा दाखला मागितला. त्‍यावेळी त्‍यांना दि.२०/०९/२०१३ रोजी येवून सामनेवाले क्र.३ यांच्‍याकडून दाखला घेवून जावा असे सांगण्‍यात आले. तक्रारदार हे वरील तारखेस दाखला घेण्‍यासाठी गेले तेव्‍हा त्‍यांना सामनेवाले क्र.४ हा पैसे जमा न करता पळून गेल्‍याचे सांगण्‍यात आले.  सामनेवाले क्र.४ याने तुमच्‍या कर्जाचे पैसे जमा न केल्‍याने तुम्‍हाला दाखला देता येणार नाही असेही सांगण्‍यात आले.  सामनेवाले यांची ही कृती सेवेतील त्रुटी असून त्‍यांच्‍याकडून ‘कर्ज बाकी नाही’ असा दाखला मिळावा अशी मागणी तक्रादार यांनी केली आहे. त्‍याचबरोबर नुकसान भरपाईपोटी रूपये २५,०००/- मिळावे अशीही मागणी केली आहे.

 

३.   तक्रारदार यांनी तक्रारीसोबत शपथपत्र, वाहन क्रमांक एम.एच.१९, ए.एक्‍स-४०५५ याचे नोंदणी प्रमाणपत्र, विमा पॉलिसी, सामनेवाले क्र.१ यांच्‍याशी झालेले करारपत्र, तक्रारदार यांनी सामनेवालेंकडे वेळोवेळी भरलेल्‍या हप्‍त्‍याच्‍या पावत्‍या, तक्रारदार यांनी दि.३१/०८/२०१३ रोजी एकरकमी कर्जफेड केल्‍याची पावती,  वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, सामनेवाले क्र.४ याच्‍याविरूध्‍द पोलिसात दिलेली तक्रार, सामनेवाले क्र.१ यांनी नोटीसीला पाठविलेले उत्‍तर, आदी कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती दाखल केल्‍या आहेत.

 

४.   सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी हजर होवून संयुक्‍त खुलासा दाखल केला,  त्‍यात म्‍हटले आहे की, तक्रारदार यांनी नमूद केलेला वाद ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ‘वाद’ या संज्ञेत मोडत नाही. या मंचास तक्रार चालविण्‍याची न्‍यायकक्षा नाही. सामनेवाले क्र.४ याचेवर विश्‍वास ठेवून त्‍याच्‍याकडे रोखपालाची जबाबदारी सोपविण्‍यात आली होती.  मात्र त्‍याने कंपनीच्‍या अधिका-यांचा विश्‍वासघात करून अनेक ग्राहकांची फसवणूक केली.  त्‍याच्‍याविरुध्‍द गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून ते प्रकरण सध्‍या  न्‍यायप्रविष्‍ट आहे.  तक्रारदार यांची तक्रार त्‍यामुळे रद्द करावी अशी मागणी सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी केली आहे. सामनेवाले क्र.४ व ५ हे मंचात हजर झाले नाहीत, त्‍यामुळे त्‍यांच्‍याविरूध्‍द ‘एकतर्फा’ आदेश करण्‍यात आला आहे.

 

५.   सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी खुलाशासोबत दर्शन गुलाबराव पाटील यांचे शपथपत्र दाखल केले आहे.  

 

६.   तक्रादार यांची तक्रार, त्‍यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी दाखल केलेला खुलासा,  शपथपत्र, तक्रारदार व सामनेवाले क्र.१ ते ३ यांच्‍या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद पाहता आमच्‍यासमोर निष्‍कर्षासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात.

 

              मुद्दे                                    निष्‍कर्ष

  1.  तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक

 आहेत काय ?                                     होय

 

ब. तक्रारदार हे त्‍यांची तक्रार मंजूर होवून मिळण्‍यास

   पात्र आहेत काय ?                                  होय

 

क. आदेश काय ?                               अंतिम आदेशाप्रमाणे

 

  •  

 

७. मुद्दा ‘अ’-  तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.५ यांच्‍याकडून टाटा इंडिका व्हिस्‍टा   हे वाहन खरेदी केले होते. त्‍याचवेळी त्‍यांनी सामनेवाले क्र.१ यांच्‍याकडून वाहनासाठी रूपये २,७०,०००/- एवढे कर्ज घेतले होते. त्‍या कर्जाची तक्रारदार यांनी वेळोवेळी परतफेड केली आहे.  त्‍याच्‍या पावत्‍या तक्रारदार यांनी दाखल केल्‍या आहेत. दि.३१/०८/२०१३ रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍या कर्जाची एकरकमी परतफेड केली आहे.  त्‍याची रक्‍कम रूपये १,२५,०००/- ही सामनेवाले क्र.४ यांनी सामनेवाले क्र.१ यांच्‍याकरिता स्विकारली आहे. त्‍याची पावतीही तक्रारदार यांनी दाखल केली आहे. यावरून तक्रारदार यांचा सामनवाले क्र.१ यांच्‍याशी व्‍यवहार झाल्‍याचे आणि त्‍यांनी सामनवाले क्र.१ यांच्‍याकडून सेवा घेतल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  सामनेवले क्र.२ हे तक्रारदार यांचे नोंदणीकृत कार्यालय आहे. तर सामनेवाले क्र.३ हे शाखा कार्यालय आहे.  सामनेवाले क्र.४ याची नियुक्‍ती सामनेवाले क्र.१,२ व ३ यांनीच केली होती. तर सामनेवाले क्र.१ यांच्‍याकडून तक्रारदार यांना कर्ज मिळवून देण्‍यात सामनेवाले क्र.५ यांचाही सहभाग असल्‍याचे दिसून येते. यावरून तक्रारदार आणि सामनेवाले  यांच्‍यामध्‍ये  सेवा देण्‍याचे आणि सेवा घेण्‍याचे नाते निर्माण झाले आहे हेच स्‍पष्‍ट होते. याच कारणामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक ठरतात.  म्‍हणून मुद्दा ‘अ’ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

 

 

७. मुद्दा -     तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडून वाहनासाठी रूपये २,७०,०००/- एवढया रकमेचे कर्ज घेतले होते.  त्‍याबाबत करारनामा तक्रारदार यांनी दाखल केला आहे. त्‍या कर्जापैकी काही रक्‍कम तक्रारदार यांनी नियमित  हप्‍त्‍यांच्‍यापोटी फेडली आहे. त्‍याबाबतच्‍या पावत्‍या क्र.१२३४२४, १२४०३७, १२०४९७,१२३७०८,१२३८१४,१२२४६१,१०९०३२,१०९७४८,०९३३७१, ०९३८३१, ०९४७७४, २४८५८५,०००४६७,२१८४७७,२१९३१४,२२००९१,२२१६६९,१२२४४४,१५००५५,१६५२९८, १३४८,१७९,३४३ तक्रारदार यांनी दाखल केल्‍या आहेत. दि.३१/०८/२०१३ रोजी तक्रारदार यांनी एकरकमी कर्जफेड केली आहे. त्‍यावेळी रूपये १,२५,०००/- सामनेवाले क्र.४ यांनी स्विकारले होते. त्‍याबाबतची पावती तक्रारदार यांनी दाखल केली आहे.  या पावतीवर सुनिल कुलकर्णी, ऑपरेशन एक्‍झुकेटीव्‍ह, ईएमपी कोड ११५३७, ब्रॅंच धुळे असा शिक्‍का आहे. तर पावतीच्‍या वरती टाटा मोटर्स फायनान्‍स लि., सिम्‍युलेटेड प्रिमॅच्‍युअर टर्मिनेशन अॅज ऑन ३१/०८/२०१३ असे नमूद आहे.

 

     वरील पावत्‍यांवरून तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांच्‍याकडून वाहनासाठी कर्ज घेतले होते आणि त्‍याची ते नियमितपणे वेळोवेळी परतफेड करत होते हे दिसून येते. त्‍याचबरोबर तक्रारदार यांनी दि.३१/०८/२०१३ रोजी सामनेवाले क्र.१ यांच्‍याकडे रूपये १,२५,०००/- एवढया रकमेची एकरकमी फेड केली आणि ते पैसे सामनेवाले क्र.४ यांनी स्विकारले हेही दिसून येते. तक्रारदार यांनी दि.३१/०८/२०१३ रोजी सामनेवाले क्र.१ यांच्‍याकडे एकरकमी कर्जफेड केल्‍यानंतर तक्रारदार यांच्‍याकडे कर्जाची रक्‍कम घेणे निघत नाही असेही वरील पावतीवरून स्‍पष्‍ट होते.  त्‍यामुळे त्‍याचवेळी सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांना ‘कर्ज बाकी नाही’ असा दाखला देणे अपेक्षित होते. मात्र तक्रारदार यांनी केलेल्‍या कथनानुसार आणि तक्रारीसोबत दाखल कागदपत्रांवरून सामनेवाले यांनी असा दाखला दिला नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

 

     सामनेवाले क्र.४ याने तक्रारदार यांच्‍याकडील रक्‍कम स्विकारली मात्र ती रक्‍कम कंपनीकडे जमा केली नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांच्‍या खात्‍यावरील  कर्जफेड पूर्ण झाली नाही. याच कारणामुळे तक्रारदार यांना ‘कर्ज बाकी नाही’ असा दाखला देता येणार नाही, असा बचाव सामनेवाले यांनी घेतला आहे. तक्रारदार यांची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्यास अभिप्रेत असलेल्‍या ‘वाद’ या संज्ञेत मोडत नाही असेही सामनेवाले यांचे म्‍हणणे आहे. याबाबत मंचाने तक्रारीत दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता या मंचाचे असे मत बनते की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ ते ५ यांच्‍याकडून सेवा घेतली आहे. त्‍याबाबतचा मुद्दा क्र.‘अ’ मध्‍ये स्‍पष्‍ट झाला आहे. या मुद्यात तक्रारदार हे ग्राहक असल्‍याचे सिध्‍द झाले आहे.  याच कारणामुळे तक्रारदार यांची तक्रार ‘वाद’ या संज्ञेत मोडते असे मंचाचे मत आहे.

 

     सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी खुलाशात नमूद केल्‍यानुसार तक्रारदार यांनी त्‍यांची रक्‍कम सामनेवाले क्र.४ याच्‍याकडे जमा केली होती. ती रक्‍कम  सामनेवाले क्र.४ याने सामनेवाले क्र.१ यांच्‍याकडे जमा केली नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांच्‍या कर्जाची पूर्णफेड होवू शकली नाही. तथापि, सामनवेाले क्र.१ ते ३ यांनी आपल्‍या खुलाशातील मुद्दा क्र.९.४ मध्‍ये नमूद केले आहे की, सुनिल रमेश कुलकर्णी हे इसम रोखपाल म्‍हणून कार्यरत होते. त्‍यास सध्‍या निलंबित करण्‍यात आले आहे. सदर इसमाचे काम कर्जात भरण्‍यासाठी आलेल्‍या रकमा स्विकारणे आणि त्‍याबाबतच्‍या पावत्‍या देणे असे होते .......... सुनिल कुलकर्णी यांनी गोड बोलून अधिका-यांचा विश्‍वास संपादन केला होता आणि त्‍यांनी प्रामाणिकपणे काम करण्‍याची हमी दिली होती. त्‍यामुळेच त्‍यांना रोखपालाचे जबबादारीचे काम सोपविण्‍यात आले आहे ...........  सुनिल कुलकर्णी या इसमाने दि.१२/०९/२०१३ रोजी तक्रारदार यांच्‍याकडून त्‍यांच्‍या कर्जात जमा करण्‍याकरिता म्‍हणून रक्‍कम रूपये ,२५,०००/- प्राप्‍त केली मात्र ती रक्‍कम तक्रारदराच्‍या  कर्जात जमा न करता स्‍वतःचा गैरलाभ करून घेतला. सामनेवाले क्र.१ ते ३  यांचे खुलाशातील हे कथन पाहता सामनेवाले क्र.४ हा त्‍यांचा कर्मचारी होता आणि त्‍याने सामनेवाले क्र.१ यांच्‍यासाठी तक्रारदाराकडून रक्‍कम स्विकारली हे स्‍पष्‍ट होते.

 

     तक्रारदार यांच्‍याकडून सामनेवाले क्र.४ याने रक्‍कम स्विकारली, मात्र ती रक्‍कम सामनेवाले क्र.१ यांच्‍याकडे जमा केली नाही. वरील रकमेबाबत सामनेवाले क्र.४ याने तक्रारदार यांना पावती दिली आहे. याचाच अर्थ तक्रारदार यांनी रूपये १,२५,०००/- ही एकरकमी कर्जफेडीची रक्‍कम सामनेवाले क्र.४ याच्‍यामार्फत सामनेवाले क्र.१ यांना दिली आणि सामनेवाले क्र.१ यांनी ती सामनेवाले क्र.४ याच्‍यांमार्फत स्विकारली असा होतो. ही रक्‍कम स्विकारल्‍यानंतर तक्रारदार यांना नियमानुसार ‘कर्ज बाकी नाही’ असा दाखला मिळणे आवश्‍यक हेाते. मात्र सामनेवाले क्र.१ ते ५ यांनी तो दिला नाही उलट सामनेवाले क्र.४ हा त्‍यांची रक्‍कम घेवून फरार झाला असे त्‍यांना सांगण्‍यात आले. 

 

     तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.४  याच्‍यामार्फत सामनेवाले क्र.१ यांच्‍याकडे रक्‍कम जमा केली असतांना आणि त्‍याबाबत त्‍यांना पावती मिळालेली असतांना सामनेवाले क्र.१ व ४ यांच्‍यात अंतर्गत काय वाद झालेत आणि ते कोणत्‍या परिस्थितीत पोहोचले याच्‍याशी तक्रारदार यांचा संबंध पोहोचत नाही असे आमचे मत आहे. 

 

     वरील सर्व विवेचनाचा विचार करता तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या संपूर्ण  कर्ज रकमेची सामनेवाले क्र.१ यांच्‍याकडे परतफेड केली आहे हे स्‍पष्‍ट होते.  त्‍यामुळे त्‍यांना ‘कर्ज बाकी नाही’ असा दाखला मिळणे आवश्‍यक आहे आणि त्‍यांचे वाहन तारणमुक्‍त होणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी ते पात्र ठरतात असे या मंचाचे मत बनले आहे.  म्‍हणूनच मुद्दा ‘ब’ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.  

 

८.   वरील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे त्‍यांना ‘कर्ज बाकी नाही’ असा दाखला मिळण्‍यास पात्र ठरतात हे स्‍पष्‍ट आहे.  सामनेवाले यांनी असा दाखला त्‍यांना वेळीच न दिल्‍यामुळे त्‍यांना या मंचात दाद मागावी लागली आणि त्‍याचा खर्च सहन करावा लागला. त्‍याबाबतही त्‍यांना भरपाई मिळायला हवी असे आमचे मत आहे.  सामनेवाले क्र.१ यांच्‍याकडून तक्रारदार यांनी वाहन कर्ज घेतले होते. सामनेवाले क्र.२ हे तक्रारदार यांचे नोंदणीकृत कार्यालय आहे. तर सामनेवाले क्र.३ हे शाखा कार्यालय आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांच्‍या तक्रारीबाबत पूर्तता करून देण्‍याची जबाबदारी सामनेवाले क्र.१ ते ३ यांची आहे असे मंचाचे मत आहे.  सामनेवाले क्र.४ हे सामनेवले क्र.१ ते ३ यांचे कर्मचारी असले तरी ते सध्‍या फरार आहे आणि त्‍यांच्‍याविरूध्‍द गुन्‍हा दाखल झाला असून न्‍यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍याविरूध्‍द कोणतेही आदेश करणे योग्‍य होणार नाही. सामनेवाले क्र.५ यांच्‍याकडून तक्रारदार यांनी फक्‍त वाहनाची खरेदी केली होती.  कर्ज मिळवून देण्‍यात सामनेवाले क्र.५ यांचा सहभाग असला तरी प्रत्‍यक्षात कर्ज प्रकरणाशी त्‍यांचा संबध येत नाही.  त्‍यामुळे त्‍यांच्‍याविरूध्‍द आदेश करणे योग्‍य होणार नाही असे मंचाचे मत आहे. म्‍हणून आम्‍ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.

 

                   आ दे श

 

१.  तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येत आहे.

 

२. सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून ३० दिवसाच्‍या आत वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना पुढीलप्रमाणे पूर्तता करून     द्यावी.

 

  1.  तक्रारदार यांना त्‍यांच्‍या संपूर्ण कर्जफेडीबद्दल ‘कर्ज बाकी नाही’ असा  

 दाखला देण्‍यात यावा.

 

(ब)   तक्रारदार यांचे एम.एच.१९, ए.एक्‍स-४०५५ हे वाहन तारणमुक्‍त करून   

    देण्‍यासाठी आर.टी.ओ. जळगांव यांच्‍याकडे आवश्‍यक ती कायदेशीर

    पूर्तता करून द्यावी.

 

 

  1.   तक्रारदार यांना तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रूपये १,०००/- द्यावे.

 

 

३.  सामनेवाला क्र. ४ व ५ यांच्‍या बाबत कोणतेही आदेश नाहीत.

 

 

 

धुळे.

दिनांकः २१/११/२०१४.

       (श्री.एस.एस. जोशी)   (श्री.व्‍ही.आर. लोंढे) 

                                      अध्‍यक्ष

        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.

 
 
[HON'BLE MR. V.R.Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.