जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.2009/39 प्रकरण दाखल दिनांक – 03/02/2009. प्रकरण निकाल दिनांक –13/05/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. रंजना दताञय रेडडी वय,48 वर्षे, धंदा वकिली, अर्जदार रा.संन्मिञ कॉलनी नांदेड. सध्या गुरुसहानी नगर, तिरुपती पार्क, जी-3,एन-4 सिडको, औरंगाबाद विरुध्द 1. मे. टाटा मोटर्स लि. पिंपरी, पुणे. 2. बाफना मोटार्स प्रा.लि. गैरअर्जदार पिंपळगांव (म.) ता.अर्धापूर जि. नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.अनंत भूर्कापल्ले. गैरअर्जदार क्र.1 तर्फे - कोणीही हजर नाही. गैरअर्जदार क्र.2 तर्फे - अड.पी.एस.भक्कड. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष) गैरअर्जदार यांच्या सेवेच्या ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून दि.2.8.2008 रोजी टाटा कंपनीची इंडिका व्ही-2 डि.एल.एस. ही डिझेल कार विकत घेतली. ही कार ते औरंगाबाद येथे वापरीत व फक्त 4500 किलोमिटर चालली आहे. अर्जदाराच्या असे लक्षात आले की, समोर डाव्या बाजूचे चाकाचे रिम (डिस्क) वाकलेले आहे. त्यामूळे ते लगेच गैरअर्जदार यांचे वर्कशॉपमध्ये वाहून दाखवून त्यांचे निदर्शनास आणून दिले, परंतु गैरअर्जदार क्र.2 यांनी आपली गाडी रस्त्यावरील खडयात आदळल्यामूळे आपल्या गाडीचे रिम वाकलेले आहे व आमच्या डिस्क मध्ये काहीही खराबी नाही व ते बदलून देण्यास नकार दिला. अर्जदाराने डिस्कमध्ये मॅन्यूफॅक्चरींग डिफेक्ट असल्यामूळे बदलून दयावे असे दि.28.11.2008 रोजी पञ दिले व कंपनीच्या वरिष्ठांना कळविले. अर्जदार यांचेकडे यापूर्वी महिंद्रा अन्ड महिंद्रा या कंपनीची अबॅसेंडर कार वापरण्यात आली होती. त्यावेळेस रस्ते सूध्दा चांगले नव्हते. त्यामूळे त्या वाहनाचे टायर डिस्क कधी वाकले नाहीत. मग या वाहनाच्या बाबतीत असे का ? अशी त्यांनी विचारणा केली. यांचा अर्थ या वाहनाच्या मॅन्यूफॅक्चरींग डिफेक्ट आहे म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, त्यांचे वाहनाचे सर्व डिस्क उच्च प्रतीचे बदलून दयावे व मानसिक ञासाबददल रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस तामील होऊनही ते हजर झाले नाही म्हणून त्याचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र.2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले म्हणणे दाखल केलेले आहे. ते म्हणतात की, त्यांनी सेवेत कोणतीही कमतरता केलेली नाही. तक्रारकर्ते ही मा. मंचासमोर स्वच्छ हाताने आलेली नाही व एक डिस्क खराब असताना सर्व डिस्क बदलून देण्याची मागणी करीत आहेत. डिस्क मध्ये मॅन्यूफॅक्चरींग डिफेक्ट नाही. ज्यावेळेस गाडीची डिलेव्हरी दिली त्यावेळेस गाडीचे सर्व व्हिलरिम्स चांगल्या प्रकारचे होते. व्हिलरिम दबण्याकरिता सदरील गाडी किती किलोमिटर चालली हा मुददा गोण आहे. व्हिलरिम नेहमी नरम धातुचा असतो व जर एखादी गाडी एखादया खडयामध्ये जोरात आदळलयास व्हिलरिम दबून जातो व शॉकअप ऑबझरवरचा काम करतो. व्हीलरिम जर दबली नाही तर टायर बस्ट होण्याची शक्यता आहे व जोराच्या झटक्याचा परीणाम वाहनाच्या बॉडीवर व इतर पार्टवर, टायरवर होतो. त्यामूळे व्हीलरिम हे नरम धातूने तयार केलेले असते. व्हिलरिम हे विशिष्ट प्रकारच्या झटक्याच्या पेक्षा जोराचा झटका लागल्यास आपोआप दबते. त्यामध्ये मॅन्यूफॅक्चरींग डिफेक्ट असण्याचे काही कारण नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास समजावून सांगितले आहे. गैरअर्जदाराने गाडी तपासणी केली असता असे निदर्शनास आले की, अर्जदाराच्या गाडीच्या समोरील डाव्या बाजूचे चाकाचे डिस्क वाकलेले हाते व ते जोरात खडयात आदळल्यामूळे वाकलेले होते व त्यामध्ये कोणताही मॅन्यूफॅक्चरींग डिफेक्ट नव्हता. या कारणावरुन डिस्क बदलून देण्याचा प्रश्नच येत नाही. डिस्क दबण्यासाठी अजूनही कारणे आहेत जसे टायरमध्ये हवा कमीजास्त असणे, रोड कंडीशन, ड्रायव्हींग गती वरपण अवलंबून असते, एखादी गाडी जास्त स्पीडमध्ये खडयावर आदळल्यास पण व्हीलरिम दबू शकते त्यास व्हीलरिमचा दोष म्हणता येत नाही. त्यामूळे अर्जदारांची तक्रार खोटी असून खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील अनूचित प्रकार सिध्द होतो काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदारांनी गैरअर्जदार क्र.2 यांचे इन्व्हाईस दाखल केलेले आहे याप्रमाणे टाटा इंडिका V2 (DLS) डिझेल हे वाहन घेतल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.1 ही निर्माता कंपनी आहे व गैरअर्जदार क्र.2 हे डिलर व सर्व्हीस सेंटर आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदार यांना गाडी विकल्याचे व ते वाहन वर्कशॉप मध्ये तपासणीनंतर डाव्या बाजूच्या चाकाचे डिस्क दबले होते हे मान्य केले आहे. परंतु हे मॅन्यूफॅक्चरींग डिफेक्ट नसून ते अर्जदाराने वाहन जोरात चालवल्यामूळे किंवा खराब रस्त्यावर चालविल्यामूळे किंवा गाडी खडयात गेल्यामूळे व्हील डिस्क दबू शकते असे म्हटले आहे. सत्य परिस्थिती रस्त्याची खराब कंडीशन, टायरमध्ये हवेचे प्रेशर कमी जास्त असणे व वाहनाचे गती यावर अवलंबून असते. वाहन किती किलोमिटर चालले हा मूख्य मूददा नसून नवीन वाहनाचे देखील व्हील खडयात गेल्यास ते दबू शकते. गैरअर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे व्हील डिस्क ही नरम धातूचे असते व मोठा झटका लागल्यावर ती दबली म्हणजे हा मॅन्यूफॅक्चरींग डिफेक्ट नाही. अर्जदाराच्या वाहनाच्या चाकाचे डिस्क हे खडयामुळे झालेले आहे व हे वॉरंटीत येत नाही व ते बदलून देण्याचा प्रश्न येत नाही हे म्हणणे योग्य वाटते. व्हील डिस्क काढल्यास दबलेला भाग हा दूरुस्त होऊ शकतो. त्यामूळे गैरअर्जदार यांनी व्हील डिस्क बदलून दया असा आदेश करता येणार नाही. व्हील डिस्क दूरुस्त होतील किंवा ते बदलावयाचे असल्यास त्यांचा खर्च अर्जदार यांना दयावा लागेल. गैरअर्जदार क्र.2 हे डिलर ही आहेत व सर्व्हीस सेंटर ही आहे. त्यामूळे वाहनाचे देखभाल ते करतात. अर्जदार यांनी व्हील डिस्कची रक्कम दिल्यास गैरअर्जदार यांना ती बदलून दयावी लागेल. त्यामूळे गैरअर्जदार यांनी डिस्क बदलून देण्यास नकार दिला असेल म्हणजे ती सेवेतील ञूटी नाही. तसे दि.2.12.2008रोजी अर्जदाराच्या नांवाने त्यांनी पञ दिलेले आहे व त्यात स्पष्ट खूलासा केलेला आहे ते पञ ही प्रकरणात दाखल आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (सतीश सामते) अध्यक्ष. सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |