(Case No. CC/15/74)
// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक :74/2015
दाखल दिनांक : 06/04/2015
निर्णय दिनांक : 24/07/2015
तक्रारकर्ता ः श्री सागर शरदराव बुरघाटे
वय 33 वर्षे धंदा – ड्रायव्हर,
रा. बेचखेडा, ता. चांदुरबाजार,
जि. अमरावती ह.मु. अमरावती
// विरुध्द //
विरुध्दपक्ष/गैरअर्जदार ः टाटा फायनान्स कार्यालय तर्फे
मॅनेजर श्री. सिध्दार्थ हिंगले,
रा. नागरंजी टॉवर, पालम रोड,
ट्राफीक पोलिस ऑफीस समोर,
सिव्हील लाईन नागपुर.
गणपूर्ती : 1) मा. अतुल दि. आळशी, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : स्वतः
विरुध्दपक्षा तर्फे : अॅड. सौ. जोशी (एकतर्फा)
(Case No. CC/15/74)
//2//
(मंचाचा निर्णय ः अतुल दि. आळशी – अध्यक्ष यांचे आदेशान्वये)
: : आदेश : :
(पारित दिनांक 24/07/2015)
श्री सागर शरदराव बुरघाटे यांनी विरुध्दपक्ष टाटा फायनान्स नागपुर यांच्याकडून सन 2012 ला कर्ज रु. ३,७९,०००/- घेवून इंडिका कार विकत घेतली. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याकडून गाडयाच्या विमा बाबत रक्कम घेवून सुध्दा विमा पॉलिसी दिली नाही म्हणून नुकसान भरपाई मिळण्याकरीता सदर्हू तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये विरुध्दपक्षाच्या विरुध्द सेवेतील त्रुटीबाबत दाखल केलेली आहे.
तक्रारीचा आशय खालील प्रमाणे ः-
तक्रारकर्त्याने न्यायमंचाच्या अधिकार क्षेत्रात सन 2012 मध्ये इंडिका कार जीचा क्रमांक MH-27-A/R- 4382 असून चेचीस क्रमांक MAT 60018CT09944 विरुध्दपक्षाकडून रु. 3,79,000/- कर्ज घेवून विकत घेतली आहे. तक्रारदाराच्या मते
(Case No. CC/15/74)
//3//
तक्रारकर्ताने जर सुरवातीला 5 वर्षाकरीता विमा काढला तर रक्कम कमी पडेल. त्यानुसार तक्रारकर्त्याने किस्त भरत आहे. तक्रारकर्त्याकडून विमा पॉलिसीची रक्कम घेवून सुध्दा सन 2014-15 विम्याची कॉपी पाठविली नाही. व तक्रारकर्त्याकडे रु. 20 ते 25 हजर थकीत दाखविले. त्यामुळे तक्रारकर्त्यास विरुध्दपक्षाकडे बरेच चकरा माराव्या लागल्या व त्याची गाडी बंद ठेवावी लागली त्यामुळे त्याचे आजपावेतो रु. 50 ते 60 हजार नुकसान झालेले आहे.
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला नोटीस पाठवून सुध्दा विम्याची कॉपी पाठविली नाही म्हणून ही तक्रार दाखल केली व नमूद केले की, सदरची तक्रार वि. न्यायालयात दाखल केली व शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु. 1,00,000/- व तक्रारीचा खर्च रु. 10,000/- ची मागणी केली.
विरुध्दपक्ष यांना हया मंचा मार्फत नोटीस पाठविण्यात आली असता त्यांचे तर्फे वकील पत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना संधी देवून सुध्दा त्यांनी त्यांचे म्हणणे
(Case No. CC/15/74)
//4//
दाखल केले नाही. म्हणून वि. मंचाने सदरील प्रकरण विना जबाब पुढे चालविले.
तक्रारकर्त्या तर्फे लेखी तसेच तोंडी युक्तीवाद करण्यात आला.
तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल केलेले कागदपत्र तसेच लेखी युक्तीवाद यावरुन मा. मंचासमोर पुढील प्रश्न उपस्थित होतो.
तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे काय ? होय
अंतिम आदेश काय ? - कारणमिमांसेनुसार
- (Case No. CC/15/74)
//5//
तक्रारकर्त्याला गाडी कर्जावर दिल्याचे तक्रारकर्त्याने दाखल केलेले विरुध्दपक्षाचे कर्ज मंजुरी पत्र दि. २०.१०.२०१२ जे पान क्र. 13 वर दाखल केलेले आहे. त्यावरुन विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास चार चाकी वाहन घेण्यासाठी कर्ज पुरवठा केला आहे हे म्हणणे सिध्द होते. विकत घेतली आहे. तक्रारकर्ताने सुरवातीला 5 वर्षाकरीता विमा काढला तर रक्कम कमी पडेल असे तक्रारकर्त्याला सांगितले. त्यानुसार तक्रारकर्त्याने किस्त भरली आहे ते दाखल केलेल्या कागदपत्र पान क्र. 14 व 15 वरुन दिसून येते. तक्रारकर्त्याकडून विमा पॉलिसीची रक्कम रु. 858.33 घेतल्याचे सदरील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु रक्कम घेवून सुध्दा सन 2014-15 विम्याची कॉपी पाठविली नाही.
तक्रारकर्त्याचा गाडीचा विमा दि. ३.१०.२०१२ ते २.१०.२०१३ हया कालावधीकरीता रु. १३,१३०/- व२९.९२०१३ ते २८.९२०१४ हया कालावधी करीता विमा रु. २०,१७६/- हे तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या विमा पॉलिसी ज्या पान क्र. 10 व
(Case No. CC/15/74)
//6//
12 वर दाखल केलेल्या आहेत हयावरुन स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याची कर्जाची परत फेड ही दि. २.११.२०१२ ते २.१०.२०१७ या पांच वर्षाकरीता असून तसेच विरुध्दपक्षाने दिलेल्या कर्जाची परतफेड मध्ये कर्जाची रक्कम तसेच विमा हप्त्याचे रु. 858.33 तक्रारकर्त्याकडून वसुल करण्यात आलेले आहे. तक्रारकर्त्याने आता पर्यंत सर्व हप्ते भरलेले आहे तसेच त्यात विम्याची रक्कम सुध्दा वसुल करण्यात आलेली आहे. तक्रारकर्त्याला त्याच्या गाडीची २०१४-१५ हया वर्षाच्या विम्याची प्रत मिळाली नाही हे त्याने प्रतिज्ञा पत्रावर दाखल केलेल्या तक्रारीनुसार व विरुध्दपक्षाला पाठविलेल्या वकीलांच्या नोटीसला विरुध्दपक्षाने न दिलेले उत्तर हया सकृतदर्शनी कागदपत्रांच्या आधारे तक्रारकर्ताला विरुध्दपक्षाने काढलेल्या २०१४-१५ हया वर्षाची विम्याची प्रत मिळाली नाही हे सकृत दर्शनीमान्य करण्यात येत आहे असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्षाला वारंवार विचारणी करुन सुध्दा व नोटीस पाठवून सुध्दा तक्रारकर्त्यास विमा काढल्याची विम्याचे पैसे घेवून सुध्दा
(Case No. CC/15/74)
//7//
माहिती न देणे म्हणजे ही विरुध्दपक्षाची सेवेत त्रुटी आहे हे सिध्द होते. त्यामुळे विरुध्दपक्षाने दि. 2.10.2014 पासुन पुढे वसुल करीत असलेल्या विमा हप्ता रु. 858.33 रक्कम तक्रारकर्त्याचे कर्ज खात्यात समायोजित करण्यात यावे व तसा अहवाल तक्रारकर्तास देण्यात यावा.
विरुध्दपक्षाने तक्रारकर्ताकडून विमा हप्त्या पोटी रक्कम घेवून सुध्दा त्याचा वाहनाचा विमा काढला नाही त्यामुळे ही कृती सेवेतील त्रुटी ठरते त्यामुळे साहजिकच तक्रारकर्ता यास मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला त्यामुळे तक्रारकर्ता नुकसार भरपाई मिळण्यास पास आहे असे मंचाचे मत आहे.
करीता खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतीम आदेश //
तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(Case No. CC/15/74)
//8//
विरुध्दपक्षाने दि. 2.10.2014 पासुन पुढे वसुल करीत असलेल्याविमा हप्त्याची रक्कमतक्रारकर्त्याचे कर्ज खात्यात समायोजित करण्यात यावी व तसे तक्रारकर्त्यास अहवाल द्यावा.
तक्रारदाराला शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु. १०,०००/- (रुपये दहा हजार) व तक्रार खर्च रु. ५०००/- (अक्षरी रु. पांच हजार) असे एकूण रु. १५,०००/- (पंधरा हजार) विरुध्दपक्षाने द्यावे.
वरील आदेशाचे पालन, निकालाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे. आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य द्यावीत.
दि. 24/07/2015 (रा.कि. पाटील) (अतुल दि. आळशी)
SRR सदस्य अध्यक्ष