Maharashtra

Nagpur

CC/493/2015

Namindersingh Amarjeetsingh Johar - Complainant(s)

Versus

Tata Capital Financial Services Ltd - Opp.Party(s)

P. B Rathi

28 Nov 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/493/2015
( Date of Filing : 11 Sep 2015 )
 
1. Namindersingh Amarjeetsingh Johar
Telephone Exchange Nagpur 16
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Tata Capital Financial Services Ltd
Ramdaspeth Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 28 Nov 2018
Final Order / Judgement

-निकालपत्र-

(पारित दिनांक-28 नोव्‍हेंबर, 2018)

(मा. अध्‍यक्ष, श्री  संजय वा. पाटील)            

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षा सोबत कर्ज परतफेडीचा करारनामा केला आणि जेसीबी थ्रीडी एक्‍स कॅव्‍हेटर ही मशीन विकत घेतली. सदर्हू कर्ज खात्‍याचा क्रमांक-7000137078 असा आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या मे. जोहर अर्थ मुव्‍हर्स या फर्मचे नावाने हायड्रोलीक एक्‍सकॅव्‍हेटर ही मशीन विकत घेण्‍यासाठी आणखी एक कर्ज संबधाने करारनामा केला असून त्‍या कर्ज खात्‍याचा क्रमांक-7000191946 असा आहे. तसेच त्‍याने आणखी एक  वाहन CEQLPS- 4018- TC हे वाहन विकत घेण्‍यासाठी करारनामा केला असून त्‍याचा कर्ज खात्‍याचा क्रमांक-700165754 असा आहे.    तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, जेसीबी मशीनच्‍या कर्ज खात्‍या मध्‍ये त्‍याने मासिक हप्‍ता रुपये-58,518/- भरण्‍याचे कबुल केले होते आणि त्‍या प्रमाणे नियमित कर्ज रकमेचे हप्‍ते भरलेत. त्‍याचे कर्ज खाते क्रं-7000165754 मधील ट्रीप ट्रेलर हे चार चाकी वाहन चोरीला गेल्‍यामुळे त्‍याने एफ.आय.आर.दाखल करुन विमा कंपनीला कळविले परंतु विमा कंपनीने विम्‍याची रक्‍कम रोखून ठेवलेली होती,  त्‍या कर्ज खात्‍या मध्‍ये तक्रारकर्त्‍याने काही कर्ज हप्‍ते भरले नाहीत कारण त्‍याचे वाहन हे चोरीला गेलेले होते. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याला असे समजले की, त्‍याच्‍या जेसीबी मशीनच्‍या कर्ज खात्‍या मध्‍ये  कर्ज हप्‍ते क्रं 24 ते 28 संबधाने त्‍याने ज्‍या काही रकमा जमा केल्‍या होत्‍या, त्‍या कर्ज हप्‍त्‍यांची रक्‍कम विरुध्‍दपक्षाने स्‍वतःहून दुस-या कर्ज खात्‍यामध्‍ये म्‍हणजेच कर्ज खाते क्रमांक-7000165754 मध्‍ये हस्‍तांतरीत केली होती आणि अशी रक्‍कम हस्‍तांतरीत करण्‍यासाठी तक्रारकर्त्‍याची परवानगी सुध्‍दा घेतलेली नव्‍हती, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला विनाकारण मानसिक त्रास झाला आणि जेसीबीच्‍या कर्ज खात्‍या मध्‍ये ओव्‍हरडयू रेकॉर्ड निर्माण झाल्‍याने त्‍याचा सिबिल स्‍कोअर सुध्‍दा कमी झाला विरुध्‍दपक्षाने आपल्‍या सेवेत त्रृटी करुन गैरकायदेशीरपणे एका कर्जखात्‍यामध्‍ये भरलेल्‍या रकमांचे दुस-या कर्ज खात्‍यामध्‍ये हस्‍तांतरण केले आणि तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली असे नमुद केले. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार विरुध्‍दपक्षा विरुध्‍द  ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे त्‍याने सदर्हू कर्ज हप्‍त्‍याची भरलेली रक्‍कम रुपये-2,92,590/- ही त्‍याचे कर्ज खाते क्रमांक-7000137078 मध्‍ये जमा करावी अशी मागणी केली. तसेच त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-2,00,000/- आणि तक्रारीचा खर्च विरुध्‍दपक्षा कडून मिळावा अशी मागणी  केली.
  2.     तक्रारकर्त्‍याने तक्रारी मध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं-(2) म्‍हणून कोटक महिन्‍द्र कंपनी लिमिटेड यांना प्रतिपक्ष केले होते आणि त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्रं-(2) यांचे नाव वगळण्‍यासाठी अर्ज दाखल केला, सदर अर्ज मंजूर करुन विरुध्‍दपक्ष क्रं-(2) यांचे नाव तक्रारीतून वगळण्‍यात आले.
  3. विरुध्‍दपक्ष क्रं-(1) टाटा कॅपीटल फायनॉन्शियल सर्व्‍हीसेस लिमिटेड म्‍हणजेच या प्रकरणातील विरुध्‍दपक्ष यांना तक्रारीमध्‍ये लेखी उत्‍तर दाखल करण्‍यास पुरेशी संधी देऊनही त्‍यांनी लेखी जबाब दाखल केला नसल्‍याने त्‍यांचे विरुध्‍द तक्रार लेखी जबाबाशिवाय चालविण्‍याचा आदेश दिनांक-19/01/2017 रोजी पारीत केला. त्‍यानंतर विरुध्‍दपक्षाने त्‍याचा लेखी जबाब अभिलेखावर घेण्‍यासाठी अर्ज केल्‍याने तो दिनांक-19.07.2017 रोजी अभिलेखावर घेण्‍यात आला. विरुध्‍दपक्षाने लेखी जबाबात कर्जा बाबतचे करारनामे मान्‍य केले परंतु कोणत्‍याही प्रकारे सेवेमध्‍ये त्रृटी केल्‍याचे नाकारले. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत महत्‍वाची माहिती लपवून ठेवल्‍याचे विरुध्‍दपक्षाचे म्‍हणणे आहे तसेच सदर्हू कर्ज हप्‍त्‍याची रक्‍कम तक्रारकर्त्‍याचे सहमतीनेच वाहन चोरी गेलेल्‍या कर्ज खात्‍यामध्‍ये हस्‍तांतरीत करण्‍यात आली होती त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला सदरची तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडलेले नाही आणि करारनाम्‍यातील अटी व शर्ती प्रमाणे सदर्हू वाद हा लवादा (Arbitrator) कडे पाठविण्‍याचे तक्रारकर्त्‍याने कबुल केलेले आहे. तसेच प्रस्‍तुत तक्रार ही मुदतीत नाही असा बचाव विरुध्‍दपक्षाने घेऊन उपरोक्‍त नमुद कारणास्‍तव तक्रार खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्षाने केली.

4.    तक्रारकर्त्‍याची  तक्रार, विरुध्‍दपक्षाचे लेखी उत्‍तर, लेखी व मौखीक युक्‍तीवाद आणि प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्‍यात आले असता मंचा तर्फे खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यात येऊन त्‍याचा निष्‍कर्ष नोंदविण्‍यात येत आहे.   

मुद्दे                                                                 निष्‍कर्ष

  1.   तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्षाचा ग्राहक आहे काय?                         नाही.
  2.   विरुध्‍दपक्षाने आपल्‍या सेवेत त्रृटी ठेवली आहे काय?                  नाही.
  3.   काय आदेश?                                                                           अंतिम आदेशा नुसार

कारणमिमांसा

मुद्दा क्रं.1 ते 3 बाबत

5    आम्‍ही उभय पक्षाचे वकीलांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकला आणि त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्र, जबाब आणि लेखी युक्‍तीवाद याचे बारकाईने अवलोकन केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षा कडून कर्ज घेतल्‍या बाबत तसेच एका कर्ज खात्‍याची रक्‍कम दुस-या कर्ज खात्‍यात वळती केल्‍या बाबत या प्रकरणा मध्‍ये वाद नाही. विरुध्‍दपक्षाच्‍या बचावा प्रमाणे तक्रारकर्त्‍याचे दुसरे कर्ज खाते हे एन.पी.ए. झाले होते आणि त्‍याच कर्ज खात्‍यातील वाहना बाबत तक्रारकर्त्‍याला विमा दावा करावयाचा होता. सबब सदर्हू कर्ज खाते व्‍यवस्थित करण्‍यासाठी त्‍या खात्‍यामध्‍ये ईतर दोन कर्ज खात्‍यातील जमा असलेली रक्‍कम वळती केल्‍याचे दिसून येते आणि या बाबत विरुध्‍दपक्षाच्‍या कथनामध्‍ये तथ्‍य असल्‍याचे मंचास दिसून येते. तसेच तक्रारकर्त्‍याने सदर्हू तीन मोठया वाहनांसाठी घेतलेले कर्ज हे त्‍याचे मे.जोहर अर्थ मुव्‍हर्स या फर्मसाठी व्‍यवसायिक कारणासाठी घेतले असल्‍याचे दिसून येते आणि म्‍हणून तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्षाचा ग्राहक होत नाही असे आमचे मत आहे.

6.   उभय पक्षानीं केलेल्‍या करारनाम्‍या प्रमाणे निरनिराळया क्रेडीट अॅसेटस या बाबत कर्ज देणा-याला खूप अधिकार आहेत आणि म्‍हणून विरुध्‍दपक्षाने त्‍यांच्‍या सेवेत काही त्रृटी केल्‍याचे दिसून येत नाही, म्‍हणून मुद्दा क्रं 1 व मुद्दा क्रं 2 चे  “नकारार्थी” उत्‍तर देत आहोत. सबब तक्रारकर्त्‍याची तक्रार ही मान्‍य करण्‍यास योग्‍य नाही असे आमचे मत आहे.

7   वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, आम्‍ही तक्रारी मध्‍ये  खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-

                                        अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची  विरुध्‍दपक्षा विरुध्‍दची तक्रार खारीज  करण्‍यात येते.
  2. खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
  3. निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क पाठविण्‍यात याव्‍यात.
  4. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.