Maharashtra

Jalgaon

CC/08/1138

Prakash choithram Tekwani - Complainant(s)

Versus

Tata Asset Management - Opp.Party(s)

Adv.Patil

31 Jan 2015

ORDER

final order
District Consumer Redressal Forum,Jalgaon
 
Complaint Case No. CC/08/1138
 
1. Prakash choithram Tekwani
Jalgaon
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Tata Asset Management
Mumbai
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Nilima Sant PRESIDENT
 HON'BLE MRS. Kavita Jagpati MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

              

निकालपत्र सदस्‍या, श्रीमती. कविता जगपती यांनी पारीत केले

निकालपत्र

प्रस्‍तुत तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये, दाखल केलेली आहे. 

2.    तक्रारदाराचे म्‍हणणे थोडक्‍यात असे की, सामनेवाला क्र. 1 ही कायदयान्‍वये रजिस्‍ट्रर कंपनी आहे व तिचा गुंतवणूकीचा व्‍यवसाय सामनेवाला क्र. 2 ही विमा कंपनी आहे.  सामनेवाला क्र. 1 यांनी टाटा यँग सिटीझन्‍स फंड या नावाने स्किम सुरु केलेली होती त्‍यानुसार तक्रारदार यांनी त्‍यांचा मुलगा नवलकुमार प्रकाश टेकवाणी यांच्‍या नावाने दि.26/09/1989 रोजी युनिट सर्टीफिकेट घेतलेले होते त्‍याचा क्रमांक 1100319  97000 असा आहे व त्‍याचा क्रमांक 26724 युनिट सर्टीफिकेट प्रमाणे तक्रारदार यांना 1000 युनिट घेतलेले असून त्‍याचा प्रत्‍येकी क्रमांक 4896801 ते 4897800 असा होता.  स्किम प्रमाणे सर्टीफिकेट धारक हे सामनेवाला क्र. 2 यांचे मास्‍टर पॉलीसी प्रमाणे युनिट सर्टीफिकेटचे वाटप करण्‍यात आले.  त्‍यामुळे तक्रारदार यांचा मुलगा सामनेवाला क्र. 2 यांच्‍या कडे विमाकृत होता.  तक्रारदार यांनी सदर स्किम अनुसार मुलगा नवलकुमार प्रकाश टेकवाणी यांच्‍या नावाने दि. 26/09/1990 रोजी युनिट सर्टीफिकेट घेतलेले होते.  सदर युनिट सर्टीफिकेटची परिपक्‍वता दि. 26/09/2008 होती.  सदर सामनेवाला क्र. 1 यांनी सर्टीफिकेटची माहिती व अटी प्रमाणे सामनेवाला क्र. 2 यांच्‍याकडे विमाकृत केले होते.  सदर सर्टी‍फिकेटची वैधता सर्टीफिकेटचे वाटप झाल्‍यापासुन जो युनिट सर्टीफिकेट धारक असे पर्यंत सुरु राहील अशी होती.  सदर सर्टीफिकेट अनुसार धारकाचा अपघाती मुत्‍यू झाल्‍यानंतर त्‍याच्‍या खात्‍यात शिल्‍लक असलेले युनिट अल्‍पकिंमतीचे 15 पट रक्‍कम अथवा रु. 1,50,000/- या पैकी जी कमी असेल ती रक्‍कम तक्रारदारांना मिळावी

      तक्रारदार यांचा मुलगा हा युनिट सर्टीफिकेटची मुदत संपण्‍याअगोदर दि. 18/08/2006 रोजी अपघाती मुत्‍यू झाला होता.  त्‍यानुसार सदर युनिटची रक्‍कम तक्रारदार यांचा मयत मुलगा यांना मिळणे आवश्‍यक होते व त्‍यासाठी सामनेवाला जबाबदार आहे असे तक्रारदार यांचे म्‍हणणे आहे.  सदर सामनेवाला क्र. 2 यांच्‍याकडे योग्‍य क्‍लेम फॉर्म भरुन व योग्‍य ते दस्‍ताऐवज जोडुन सामनेवाला क्र. 2 यांच्‍याकडे पाठविला असता सामनेवाला क्र. 2 यांनी दि. 19/12/2007 रोजी पत्रान्‍वये कळविले की, सदर युनिट सर्टीफिकेट धारक यांनी कायदयाच्‍या तरतुदीचा भंग केला पॉलीसीच्‍या अटीचा भंग केला त्‍यामुळे तक्रारदार यांचा क्‍लेम नामंजूर करण्‍यात आला.  तक्रारदार यांनी आपल्‍या विनंती मध्‍ये तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात यावा तसेच सामनेवाला यांचे तक्रारदार यांचा क्‍लेम नामंजूर करण्‍याबाबतचे पत्र व आदेश रदद करण्‍यात यावे तसेच तक्रारदार यांना रक्‍कम रु. 1,50,000/- व्‍याजासह देण्‍याचे आदेश सामनेवाला क्र. 1 व 2 यांना व्‍हावेत अशी विनंती त्‍यांनी मंचाकडे केलेली आहे.

4.    तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्‍या पुष्‍ठयर्थ नि. 03  लगत दस्‍तऐवज यादी दाखल केली त्‍यात युनिट सर्टीफिकेट, तक्रारदार यांनी पाठविलेली नोटीस, पोचपावती, सामनेवाला यांना पाठविलेले पत्र, सामनेवाला क्र. 2 यांनी पाठविलेले पत्र, स्‍मरणपत्र, सामनेवाला क्र. 2 यांनी पाठविलेले पत्र, इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. 

5.    सामनेवाला क्र. 1 हे हजर होवून त्‍यांनी आपला नि. 9 वर खुलासा दाखल केला. त्‍यामध्‍ये त्‍यांनी मयत नवलकुमार प्रकाश टेकवाणी हा दि. 18 ऑगस्‍ट 2006 रोजी अपघात होवून मरण पावला ही गोष्‍ट मान्‍य केलेली आहे.  सदर मयत याचा पल्‍सर बाईक याने अपघात झाला व अपघाती समयी त्‍याचे वय 15 वर्ष होते.  त्‍यामुळे सदर मयत याने मोटार कायदा 1988 नुसार सेक्‍शन 4 प्रमाणे कायदयाचा भंग केला आहे.  त्‍यामुळे तो क्‍लेम प्रथमदर्शनी रदद होण्‍यास पात्र आहे अशी हरकत घेतली.  तसेच तक्रारदार यांनी सामनेवाला यांना मयत टेकवाणी यांची मोटार चालविण्‍याचा परवाना याची मागणी केली असता त्‍यांनी ती पुर्तता केलेली नाही.  सदर मयत यांनी कायदयाचा भंग केलेला आहे.  तसेच मयत हा विना परवाना मोटार सायकल चालवित होते व कायदयाचे उल्‍लघंन केलेले आहे असे आपल्‍या खुलाष्‍यामध्‍ये नमूद केले त्‍यामुळे सदर तक्रारदार हे क्‍लेम च्‍या रक्‍कमेसाठी पात्र नाही. सामनेवाला क्र. 2 यांच्‍या विरुध्‍द पुर्वाधिकारी मंचाने नो से चे आदेश पारीत केले आहे.  म्‍हणुन त्‍यांनी दाखल केलेला खुलासा विचारात घेतला जावु शकत नाही. 

6.    निष्‍कर्षांसाठीचे मुद्दे व त्‍यावरील आमचे निष्‍कर्ष खालील प्रमाणे आहेत.

            मुद्दे                                             निष्‍कर्ष

1)    तक्रारदार हे सदर क्‍लेमची रक्‍कम घेण्‍यास

      पात्र आहे काय ?                                        नाही.

2)    आदेश काय ?                                       अंतिम आदेशाप्रमाणे

 

                              कारणमिमांसा

7. मुद्दा  क्र.1   तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडे टाटा यंग सिटीझन्‍स फंड या स्किम नुसार युनिटस सर्टीफिकेट घेतलेले होते.  त्‍याच्‍या पुष्‍ठयर्थ दस्‍ताऐवज तक्रारदार यांनी नि. 4/1 वर दाखल केलेली आहे.  यावरुन असे दिसते की, मयत नवलकुमार प्रकाश टेकवाणी यांचा जन्‍म दि.26/09/1990 रोजी झालेला आहे.  तसेच तक्रारदार यांच्‍या कथनानुसार दि.18/08/2006 रोजी मयत नवलसिंग टेकवाणी यांचा मृत्‍यू दि.18/08/2006 रोजी झालेला होता.  त्‍यानुसार मृत्‍यू समयी मयत नवलकुमार टेकवाणी यांचे वय 16 वर्ष होते ही गोष्‍ट स्‍पष्‍ट होते तसेच तक्रारदार यांनी नि. 17/3  वरील दस्‍तऐवज यामध्‍ये घटनात्‍मक पंचनामा त्‍याचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, मयत नलवसिंग टेकवाणी हे काळया रंगाची पल्‍सर एम.एच.19 ए.एच. 5363 ही मोटार सायकल चालवत होते व सदर मोटार सायकल चालवित असतांना त्‍यांचा हायवे नं. 6 जळगांव येथे निधन झाले. यावरुन हे स्‍पष्‍ट होते की, मयत त्‍यांचे वय वर्ष 16 असतांना हायवे नं. 6 वर पल्‍सर मोटार सायकल चालवत होते.  तसेच मोटार अपघात नियम 1988 नुसार कलम 4 (1) प्रमाणे 18 वर्ष खालील व्‍यक्‍तीने मोटार सायकल चालविणे बेकायदेशीर आहे तसेच सदर मयत याने मोटार अपघात नियम 1988 नुसार कायदयाचा भंग केलेला दिसून येतो तसेच वय वर्ष 16 असल्‍या कारणाने कायदयानुसार त्‍यांना मोटार परवानाही मिळू शकत नाही असे असतांना सदर कायदयाचा भंग मयत नवलसिंग प्रकाश टेकवाणी यांनी केलेला दिसून येतो.  त्‍यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारुन सेवेत कसूर केलेला आहे असे म्‍हणता येणार नाही असे मंचाचे मत आहे. यास्‍तव मुद्दा  क्र.  1 चा निष्‍कर्ष होकारार्थी देत आहोत.

 

आदेश  

  1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.
  2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
  3. निकालाच्‍या प्रती उभय पक्षांना विना मुल्‍य देण्‍यात याव्‍यात.

 

    गा 

दिनांकः-  31/01/2015    (श्रीमती. कविता जगपती)          (श्रीमती. नीलिमा संत)

                                                  सदस्‍या                                      अध्‍यक्षा

 

 

 

 
 
 
 
 
 
[HON'BLE MRS. Nilima Sant]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kavita Jagpati]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.