Maharashtra

Jalgaon

CC/10/790

Madhusudhan Rane - Complainant(s)

Versus

Tata AIJ General Insurance Co.Ltd - Opp.Party(s)

Adv.R.R. Patil

23 Feb 2015

ORDER

final order
District Consumer Redressal Forum,Jalgaon
 
Complaint Case No. CC/10/790
 
1. Madhusudhan Rane
Jalgaon
Jalgaon
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Tata AIJ General Insurance Co.Ltd
Mumbai.
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vishwas D. Dhawale PRESIDENT
 HON'BLE MR. C.M. Yeshirao Member
 HON'BLE MRS. Poonam N.Malik MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

कोरम

                        श्री.विश्‍वास दौ.ढवळे,                    अध्‍यक्ष.

                        श्री.पुनम नि.मलीक,                          सदस्‍या.

 

                        तक्रारदार तर्फे श्री.स्‍वप्‍नील एस.पाटील वकील.

                        विरुध्‍द पक्ष तर्फे योगीनी बोटेकर/देशमुख वकील.

 

 

                        निकालपत्र

 

व्‍दाराः-श्री.विश्‍वास दौ.ढवळे,अध्‍यक्षः  विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार हिला एम्‍ब्रायडरी वर्क करायचे तक्रारदाराचे उपयोगात न येणारे इलेक्‍ट्रॉनिक्‍स मशिनची बळजबरीने विक्री करुन दिलेल्‍या सेवेतील त्रृटीदाखल तक्रारदार यांनी प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे.

            2.    तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की,

तक्रारदार ही एक घटस्‍फोटीत परितक्‍त्‍या स्‍त्री असुन तिला लहान मुलगा असुन तक्रारदाराचे वडील व एकुलता एक भाऊ सुमारे 2/3 वर्षापुर्वी मयत झालेले आहेत.    तक्रारदारास तिचे घरगुती कामासाठी लेडीज पंजाबी ड्रेसवर गळयाच्‍या जवळ डिझाईनचे एम्‍ब्रायडरी वर्क करण्‍यासाठी तसेच बेडशिटवर मोठे डिझाईनचे एम्‍ब्रायडरी वर्क करण्‍यासाठी तसेच दरवाजे खिडक्‍यांच्‍या पडदयांवर मोठे डिझाईनचे एम्‍ब्रायडरी वर्क करण्‍यासाठी इलेक्‍ट्रॉनिक मशिनची आवश्‍यकता असल्‍याने तक्रारदार हिने विरुध्‍द पक्ष यांचेकडे येऊन चौकशी केली व विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारास ब्रदर एन व्‍ही 900 हे मशिन तिचेकरिता योग्‍य राहील तसेच तक्रारदाराचे आवडी निवडी प्रमाणे कितीही छोटया मोठया आकाराचे डिझाईन करता येईल असे आश्‍वासन देऊन सदरची मशिन रु.73,000/- इतक्‍या किंमतीस पडेल असे सांगीतले.   त्‍यावेळी तक्रारदार हिने विरुध्‍द पक्षाकडे एकुण रक्‍कम रु.35,000/- मशिनचे अडव्‍हान्‍सपोटी अदा करुन उर्वरीत रक्‍कम रु.38,000/- मशिनचे डिलेव्‍हरीचे वेळेस देण्‍याचे ठरले.  त्‍यानंतर तक्रारदार हिला विरुध्‍द पक्षाने मशिन मागवुन दिली व ती त्‍याचे दुकानातील व्‍यक्‍तीसोबत तक्रारदाराचे घरी पाठवुन दिली त्‍यावेळी रोख राहीलेले रु.38,000/- तक्रारदाराने दिले व सदर मशिनचा डेमो देण्‍याची विनंती केली असता विरुध्‍द पक्षाचे माणसांनी तक्रारदार हिला सदरचे मशिन हे संगणक व स्‍कॅनर व्‍दारे ऑपरेट होत असल्‍याचे सांगुन सदरच्‍या वस्‍तु अगोदर घ्‍याव्‍या लागतील असे सांगीतले त्‍यानंतर तक्रारदार हिची आर्थिक कुवत नसल्‍याने तिने विरुध्‍द पक्षास त्‍वरीत फोन करुन दिलेले मशिन परत घेऊन जा तसेच त्‍याकामी आलेले हॅण्‍डलिंग चार्जेस वगैरे कापुन घ्‍या व उर्वरीत रक्‍कम परत करा अशी विनंती केली असता त्‍यांनी तक्रारदारास मशिन घ्‍यावेच लागेल असे सांगीतले व बिल तसेच वॉरंटी कार्ड आल्‍यावर देऊन असे सांगुन सर्व्‍हीस साठी रु.1,000/- परस्‍पर घेतले.   त्‍यानंतर तक्रारदार हिची आर्थिक कुवत नसतांनाही तिने संगणक व स्‍कॅनर खरेदी केले तसेच मशिनचा डेमो देण्‍यासाठी विरुध्‍द पक्षास विनंती केली असता त्‍याने पाठविलेल्‍या दोन व्‍यक्‍तींनी तक्रारदाराचे घरी येऊन संगणकात सी डी व सॉफटवेअर डाऊनलोड करुन दिले तसेच कोणतीही सी डी अगर सॉफटवेअर दिले नाही व त्‍यासाठी प्रत्‍येकी रु.500/- तक्रारदाराकडुन स्विकारुन सदर मशिनवर 4 बाय 4 आकाराच्‍या मोजक्‍याच डिझाईन करुन दाखवल्‍या.   तक्रारदार हिने इतर अन्‍य डिझाईन का होत नाही याची विचारणा केली असता त्‍यांनी या मापाशिवाय दुस-या डिझाईन होणार नाही असे स्‍पष्‍ट सांगीतले.    त्‍यानंतर तक्रारदार हिने विरुध्‍द पक्षाकडे येऊन सदर मशिनचे बिल व वॉरंटी कार्ड मागीतले असता त्‍यांनी न दिल्‍याने तक्रारदार हिने पोलीस स्‍टेशन जळगांव येथे केलेल्‍या तक्रारीअंती विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार हिला रु.73,000/- चे बिल दि.9/1/2010 अशी तारीख नमुद करुन दिले.   तक्रारदार हिने मुंबई येथे स्‍वतः जाऊन ब्रदर इंटरनॅशनल या कंपनीत जाऊन सदरचे मशिन बाबत चौकशी केली असता त्‍यांनी रिटेलरकडुन सदरची मशिन रु.49,000/- इतक्‍या किंमतीस मिळेल असे सांगीतले तसेच त्‍यावर एक वर्षाची वॉरंटी,सॉफटवेअर सी डी, एका वर्षात चार सर्व्‍हीसींग मिळतील असे सांगीतले तसेच 4 बाय 4 एवढयाच मापाच्‍या मोजक्‍या डिझाईन होतील असेही सांगीतले त्‍यानंतर तक्रारदार हिने मुंबई येथील कंपनीचे रिटेलरकडुन सदरचे मशिनचे कोटेशन घेतले व विरुध्‍द पक्षाकडे संपर्क केला असता त्‍यांनी तक्रारदाराकडुन जास्‍तीचे घेतलेले रक्‍कमेपैकी फक्‍त रु.15,000/- रोख परत केले तथापी रु.9,000/- राहीलेली रक्‍कम परत करण्‍यास स्‍पष्‍ट नकार दिला. तक्रारदार हिने वकीलांमार्फत नोटीस पाठवुन मशिन परत घेऊन रक्‍कमेची मागणी केली असता त्‍यांनी काहीएक प्रतिसाद दिला नाही.   अशा रितीने विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार हिला फसवणुक करुन तिच्‍या उपयोगाची नसलेली मशिन विक्री करुन तक्रारदार हिची घोर फसवणुक केली. सबब विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारास विक्री केलेली ब्रदर एन व्‍ही 900 मशिन तक्रारदाराचे कामाची नसल्‍याने ती परत घ्‍यावी व तक्रारदाराकडुन त्‍यापोटी स्विकारलेली रक्‍कम रु.58,000/- रोख परत करावेत तसेच सर्व्‍हीस चार्जेस पोटी स्विकारलेली रक्‍कम रु.2,000/-, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.15,000/-द सा द शे 12 टक्‍के व्‍याजासह विरुध्‍द पक्षाकडुन देण्‍याचे आदेश व्‍हावेत व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती तक्रारदार हिने केलेली आहे.  

            3.    सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्‍द पक्ष यांना  ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब  प्रमाणे  नोटीस काढण्‍यात आली.  

            4.    विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार हिची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे.    तक्रारदार ही ग्राहक या व्‍याख्‍येत येत नाही तिने डिझायनींगचे व्‍यवसायासाठी मशिन खरेदी केले असुन ती पाचोरा येथुन जळगांव येथे विरुध्‍द पक्षाकडे आली होती त्‍यावेळी दोन वेळा डेमो दाखविल्‍यानंतर सदर मशिनला संगणक व स्‍कॅनर मशिन आवश्‍यक असते याची माहिती झाल्‍यावरच तक्रारदाराने मशिनची ऑर्डर दिली होती.   त्‍यामुळे संगणक व स्‍कॅनर ची माहिती नव्‍हती याबाबतचे म्‍हणणे खोटे व लबाडीचे आहे.   विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारास फसविले नाही अगर सेवेत त्रृटीही केलेली नाही.    तक्रारदाराने वेळोवेळी बोलविल्‍यावर विरुध्‍द पक्षाचे तज्ञ यांनी जाऊन सेवा दिलेली असुन प्रत्‍यक्षात तक्रारदार हिला मशिन चालविता येत नाही त्‍यामुळे हा दोष कंपनीचा अगर विरुध्‍द पक्षाचा नाही.    तक्रारदारास जर मशिन चालविता येत नाही तर तिने ते स्‍वतःकडे ठेवुन घ्‍यावयास नको होते.    सदर मशिन ही व्‍यावसायीक कारणासाठी घेतली असल्‍याने प्रस्‍तुत तक्रारदार हि ग्राहक या संज्ञेत येत नसल्‍याने या मंचास प्रस्‍तुत तक्रार चालविण्‍याचे अधिकार नसल्‍याने तक्रार अर्ज खर्चासह रद्य करण्‍यात यावा तसेच तक्रारदार हिचेकडुन नुकसान भरपाई दाखल रु.10,000/- देण्‍याचे आदेश व्‍हावेत अशी विनंती विरुध्‍द पक्ष यांनी केलेली आहे. 

             5.    तक्रारदार यांची तक्रार, दाखल केलेले कागदपत्रे, विरुध्‍द पक्षाचे लेखी म्‍हणणे व उभयतांचा युक्‍तीवाद याचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता न्‍यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.

            मुद्ये                                      उत्‍तर

1)    तक्रारदार हिची तक्रार ग्राहक या संज्ञेखाली या मंचासमोर

      चालण्‍यास पात्र आहे काय ?                          होय.

2)    विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार हिला तिचे वापरात न येणारी

      मशिनची विक्री करुन त्रृटीयुक्‍त सेवा दिली आहे काय ?  होय.

3)    आदेश काय ?                                     खालीलप्रमाणे.

                              वि वे च न

            6.    मुद्या क्र.1 - तक्रारदार यांनी तक्रार अर्जातुन त्‍या एक घटस्‍फोटीत परितक्‍त्‍या महीला असल्‍याचे नमुद करुन तसेच त्‍या कोणावरही अवलंबुन नसल्‍याचे नमुद करुन लहान मुलाची पालन पोषणाची जबाबदारी त्‍यांचेवर असल्‍याने त्‍यांचा कौटुंबीक चरितार्थ चालविण्‍यासाठी विरुध्‍द पक्ष यांचेकडुन एम्‍ब्रायडरी मशिनची खरेदी केल्‍याचे तक्रारदाराचे विधिज्ञांनी या मंचासमोरील युक्‍तीवादात नमुद केले.     तसेच तक्रार अर्जासोबत तक्रारदार हिने विरुध्‍द पक्षाकडुन दि.09/01/2010 रोजी एकुण रक्‍कम रु.73,000/- इतक्‍या रक्‍कमेस ब्रदर एन व्‍ही 900 हे एम्‍ब्रायडरी चे मशिन विकत घेतल्‍याबाबतचे बिलाची छायाप्रत दाखल केली आहे तसेच विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारास सदरचे मशिन विक्री केल्‍याबाबत लेखी म्‍हणण्‍यातुन स्‍पष्‍ट केलेले आहे त्‍यामुळे तक्रारदार हिची तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 2 (1) (डी) अंतर्गत ग्राहक या संज्ञेत या मंचासमोर चालण्‍यास पात्र असल्‍याचे निष्‍कर्ष आम्‍ही नोंदवित आहोत.   यास्‍तव मुद्या क्र. 1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

            7.    मुद्या क्र. 2 - तक्रारदार हिला फसवणुक करुन तिच्‍या उपयोगाची नसलेली मशिन विक्री करुन तक्रारदार हिची घोर फसवणुक केली तसेच सदरचे मशिन विक्री करतांना तक्रारदार हिचेकडुन जादा रक्‍कम स्विकारली अशा प्रकारे विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार परितक्‍त्‍या महिलेची फसवणुक करुन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला असल्‍याचे तक्रारदाराचे विधिज्ञांनी या मंचासमोरील युक्‍तीवादातुन प्रतिपादन करुन तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजुर करावी असे नमुद केले.  

            8.    विरुध्‍द पक्ष यांनी लेखी म्‍हणणे व युक्‍तीवादातुन तक्रारदाराचे तक्रार अर्जास हरकत नोंदवुन तक्रारदार हिने स्‍वतः जळगांव येथे विरुध्‍द पक्षाकडे येऊन दोन वेळा डेमो बघुन तसेच सदर मशिन ला संगणक व स्‍कॅनर चे वापराशिवाय चालविणे अशक्‍य आहे याची माहिती असतांनाही खरेदी केले असुन तक्रारदारास सदरचे मशिन प्रत्‍यक्षात चालविता येत नसल्‍यामुळे सदरचे बाबीस विरुध्‍द पक्ष हे जबाबदार नसल्‍याचे नमुद करुन वेळोवेळी तक्रारदार हिला तज्ञ व्‍यक्‍तींकडुन सेवा देण्‍यात आलेली असुन कोणतीही सेवा त्रृटी केलेली नसल्‍याचे नमुद केले.  

                        9.    उपरोक्‍त विवेचन, तक्रारदाराची तक्रार, विरुध्‍द पक्षाचे लेखी म्‍हणणे तसेच आमचे समोर उपलब्‍ध असलेली कागदपत्रे पाहता तक्रारदार हिने विरुध्‍द पक्षास दि.3/4/2010 रोजी नोटीसीने कळवुन तक्रारदार हिचे उपयोगात न येणारी मशीन परत घेऊन जाऊन त्‍याबदल्‍यात स्विकारलेली रक्‍कम परत करण्‍याचे विधिज्ञांमार्फत कळविलेले असल्‍याचे दाखल नोटीसीचे स्‍थळप्रतीवरुन स्‍पष्‍ट होते.    सदरची नोटीस‍ मिळाल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदाराकडील मशिन परत घेऊन तिला त्‍यापोटी स्विकारलेली रक्‍कम परत केली असती तर तक्रारदारासारख्‍या एका घटस्‍फोटीत परितक्‍त्‍या महिलेस या मंचासमोर दाद मागावी लागली नसती तसेच किमान या मंचाची नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर देखील विरुध्‍द पक्ष यांना तक्रारदाराकडील मशिन परत घेऊन त्‍यापोटी स्विकारलेली रक्‍कम तिला परत करता आली असती तथापी विरुध्‍द पक्ष यांनी लेखी म्‍हणण्‍यातुन तक्रारदारास जर मशिन चालविता येत नाही तर तिने ते स्‍वतःकडे ठेवुन घ्‍यावयास नको होते असे बेजबाबदारपणाचे विधान केलेले आहे.    तसेच सर्वात महत्‍वाची बाब म्‍हणजे तक्रारदार हिने मुंबई येथे स्‍वतः जाऊन कंपनीकडे चौकशी केल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांनी विक्री केलेले मशिन अवघ्‍या रक्‍कम रु.49,000/- इतक्‍या किंमतीस मिळत असल्‍याचे तक्रारदार हिने मुंबई येथील वितरकाचे कोटेशन याकामी दाखल करुन पुराव्‍यानिशी शाबीत केलेले आहे तसेच विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार हिला रु.15,000/- त्‍यानंतर परतही केलेले आहेत.    त्‍यामुळे एकुण विवेचनाचा विचार करता विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारा सारख्‍या एका परितक्‍त्‍या असाहय महिलेची फसवणुक करुन तिचे उपयोगात न येणारे मशिनची अवास्‍तव रक्‍कमेस विक्री करुन तक्रारदार हिला त्रृटीयुक्‍त सेवा दिलेली असुन अनुचित व्‍यापारी प्रथेचाही अवलंब केला असल्‍याचे निष्‍कर्षाप्रत आम्‍ही येत आहोत.   सबब मुद्या क्र. 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

            10.   मुद्या क्र. 3 - विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारास विक्री केलेली ब्रदर एन व्‍ही 900 मशिन तक्रारदाराचे कामाची नसल्‍याने ती परत घ्‍यावी व तक्रारदाराकडुन त्‍यापोटी स्विकारलेली रक्‍कम रु.58,000/- रोख परत करावेत तसेच सर्व्‍हीस चार्जेस पोटी स्विकारलेली रक्‍कम रु.2,000/-, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.15,000/-द सा द शे 12 टक्‍के व्‍याजासह विरुध्‍द पक्षाकडुन देण्‍याचे आदेश व्‍हावेत व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती तक्रारदार हिने केलेली आहे.   आमचे मते तक्रारदार हिने तिचेकडे असलेले मशिन सद्यस्थितीत आहे त्‍या परिस्थितीत विरुध्‍द पक्षाचे ताब्‍यात द्यावे त्‍यानंतर लगेच त्‍वरीत विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार हिचेकडुन सदरचे मशिनपोटी स्विकारलेल्‍या रक्‍कमेतुन रु.15,000/- वजा जाता राहीलेली रक्‍कम रु.58,000/- रक्‍कम स्विकारल्‍याची दि.09/01/2010 पासुन द सा द शे 8 टक्‍के व्‍याजासह तक्रारदार हिला परत करावी, तसेच तक्रारदार हिला झालेल्‍या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- द्यावेत.   यास्‍तव आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.

आ    दे    श

( अ )       तक्रारदार हिचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.

( ब )       तक्रारदार हिने तिचे कडे असलेली एम्‍ब्रायडरी मशिन सद्यस्थितीत आहे त्‍या परिस्थितीत विरुध्‍द पक्षाचे ताब्‍यात द्यावी., त्‍यानंतर लगेच त्‍वरीत विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार हिचेकडुन सदरचे मशिनपोटी स्विकारलेल्‍या रक्‍कमेतुन रु.15,000/- वजा जाता राहीलेली रक्‍कम रु.58,000/- रक्‍कम स्विकारल्‍याची दि.09/01/2010 पासुन द सा द शे 8 टक्‍के व्‍याजासह तक्रारदार हिला तात्‍काळ परत करावी.

( क )       विरुध्‍द पक्ष यास असेही  निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार हिला झालेल्‍या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.10,000/- (अक्षरी रक्‍कम रु.दहा हजार मात्र )  व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/-(अक्षरी रक्‍कम रु.पाच हजार मात्र )  या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.

ज  ळ  गा  व

 

दिनांकः-  27/02/2015.

 
 
 
 
 
 
[HON'BLE MR. Vishwas D. Dhawale]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. C.M. Yeshirao]
Member
 
[HON'BLE MRS. Poonam N.Malik]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.