निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 08/12/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 16/12/2010 तक्रार निकाल दिनांकः- 30/04/2011 कालावधी 04 महिने 13 दिवस. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. संजय पिता शेषराव घाटुळ. अर्जदार वय वर्षे.धंदा. शेती. अड.पी.बी.अंधारे. रा.मु.पो.सावरगांव ता.मानवत.जि.परभणी.
विरुध्द मे.टाटा एआयजी जनरल इन्शुरंन्स क. लि. गैरअर्जदार. 202- ए द ओरिएन,2 रा मजला. अड.अजय.व्यास. 5-कोरेगांव पार्क रोड, पुणे – 411001 ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे.अध्यक्ष. ) अपघातात डॅमेज झालेल्या दुचाकी इन्शुअर्ड मोटारसायकलची नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीने बेकायदेशिररित्या नाकारले म्हणून प्रस्तुतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत. अर्जदाराच्या मालकीची हिरोहोंडा स्पलेंडर मोटारसायकल क्रमांक एम.एच. 22 एम.4602 चा गैरअर्जदार विमा कंपनीकडून विमा उतरविलेला होता.त्याचा पॉलिसी क्रमांक 0180070952 व पॉलिसीची मुदत 08/04/2010 ते 07/04/2011 अखेर होती.तारीख 19/07/2010 रोजी सकाळी 07 वाजता अर्जदाराचा भाऊ राजाराम बाईक वरुन कामा निमित्त परभणीला गेला होता.परभणीहून परत येत असतांना पाथरी रोडवर डेंटल कॉलेज जवळ बाईकला समोरुन येणा-या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली व अपघातात अर्जदाराचा भाऊ राजाराम जागीच मरण पावला. परभणी ग्रामिण पोलिस स्टेशनला गु.र.नं 78/10 अन्वये गुन्हा नोंदविला होता.अपघाता नंतर अर्जदाराने लगेच गैरअर्जदारास वाहनाच्या नुकसानी बाबत माहिती दिली व अर्जदाराने हिरोहोंडा कंपनीच्या गॅरेज मध्ये मोटार सायकल दुरुस्त करुन घेतली. त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे क्लेम फॉर्मसह गैरअर्जदाराकडे नुकसान भरपाईचा क्लेम दाखल केला.परंतु गैरअर्जदाराने तारीख 06 ऑक्टोबर 2010 चे पत्र पाठवुन मोटारसायकल चालकाचे ड्रायव्हींग लायसेंन्स दिले नाही म्हणून नुकसान भरपाईचा क्लेम देण्यास नकार दिला. अशा रितीने बेकायदेशिररित्या क्लेम नाकारुन सेवात्रुटी दिली व मानसिकत्रास दिला म्हणून ग्राहक मंचात प्रस्तुतची तक्रार दाखल करुन वाहनाची नुकसानी रु. 20,000/- 12 टक्के व्याजासह मिळावी.याखेरीज मानसिकत्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र ( नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.5 लगत ग्रामिण पोलिस स्टेशन परभणी सी.आर.नं.78/10 मधील एफ.आय.आर, घटनास्थळ पंचनामा, बाईकचे रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट, विमा पॉलिसी, मयत वाहन चालकाचा पी.एम.रिपोर्ट, गैरअर्जदाराचे क्लेम नाकारल्याचे पत्र वगैरे एकुण 10 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदाराना मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर तारीख 07/02/2011 रोजी प्रकरणात शपथपत्र वजा लेखी जबाब ( नि.9) दाखल केला आहे. तक्रार अर्जातील बाईकच्या मालकी बाबत व विमा पॉलिसी बाबतचा मजकूर वगळता इतर सर्व गैरअर्जदाराने नाकारले आहेत.त्यांचे म्हणणे असे की, नुकसान भरपाईची हमी पॉलिसी मधील नियम अटी व मोटार व्हेईकल अक्ट कलम 3 चे तरतुदिंना अधिन राहून दिलेली आहे.त्यामध्ये वाहन चालकाकडे अपघाताच्या वेळी कायदेशिर ड्रायव्हींग लायसेंन्स असणे महत्वाची अट आहे.अर्जदाराने ड्रायव्हींग लायसेंन्स संबंधीची कसलीही माहिती व लायसेंन्सची मागणी करुनही ते दिले नाही त्यामुळे गैरअर्जदाराने 06/10/2010 च्या पत्रानुसार अर्जदाराचा क्लेम नामंजूर केलेला आहे.गैरअर्जदाराचे पुढे असे ही म्हणणे आहे की, सर्व्हे रिपोर्ट प्रमाणे अर्जदाराच्या वाहनाची झालेली नुसान भरपाईचे मुल्यांकन रु.6,921/- इथपर्यंतच देण्याची विमा कंपनी वर जबाबदारी आहे.तक्रार अर्जातून मागणी केलेली नुकसान भरपाईची रक्कम अवास्तव आहे असे त्यांचे म्हणणे आहे.वरील सर्व बाबी विचारात घेवुन तक्रार अर्ज फेटाळण्यात यवा अशी शेवटी विनंती केलेली आहे. लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र (नि.10 व 11 ) दाखल केला आहे. व पुराव्यातील कागदपत्रात नि.12 लगत पॉलिसी टर्मस् कंडिशन, फाईनल सर्व्हे रिपोर्ट, व फोटो वगैरे 4 लागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जाच्या अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदारा तर्फे अड.पी.बी.अंधारे आणि गैरअर्जदारा तर्फे अड. अजय व्यास यांनी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर. 1 मोटार सायकल चालकाचे ड्रायव्हींग लायसेंन्स दिले नाही म्हणून विमा कंपनीने बेकायदेशिररित्या क्लेम नाकारुन सेवात्रुटी केली आहे काय ? होय. 3 अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? होय. असल्यास किती ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्दा क्रमांक 1 अर्जदाराच्या मालकीची हिरोहोंडा मोटारसायकल क्रमांक एम.एच.22 एम.4602 चा गैरअर्जदाराकडून विमा उतरविलेला होता ही अडमिटेड फॅक्ट आहे.अर्जदाराने पुराव्यात नि.5/6 ला पॉलिसीची कॉपीही दाखल केलेली आहे.तीचे अवलोकन करता पॉलिसीची मुदत 08/04/2010 ते 07/04/2011 असल्याची नोंद आहे. तारीख 19/07/2010 रोजी अर्जदाराचा भाऊ राजाराम हा सदरची बाईक परभणीला घेवुन गेला होता तेथून परत येत असतांना पाथरी रोडवर डेंटल कॉलेज जवळ मोटार सायकलला समोरुन येणा-या भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघात होवुन राजाराम घाटुळे हा जागीच मरण पावला होता.ही वस्तुस्थीती शाबीत करण्यासाठी अर्जदाराने पुराव्यात नि.5/1 ला परभणी ग्रामिण पोलिस स्टेशन सी.आर. नं 78/10 मधील एफ.आय.आर.(नि.5/1), घटनास्थळ पंचनामा (नि. 5/3) दाखल केलेला आहे.तीचे अवलोकन केले असता अपघाताची वस्तुस्थिती शाबीत झालेली आहे.अर्जदाराच्या वाहनाचा विमा पॉलिसी मुदतीत अपघात झालेला असल्यामुळे पॉलिसी हमी प्रमाणे नुकसान भरपाई मिळणेसाठी वाहनाची दुरुस्ती करुन घेतल्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह गैरअर्जदाराकडे नुकसान भरपाईचा विमा क्लेम सादर केलेला होता ही अडमिटेड फॅक्ट आहे.क्लेमफॉर्म सोबत दाखल केलेल्या कागदपत्रात वाहन चालकाचा परवाना ( ड्रायव्हींग लायसेंन्स ) नसल्याने गैरअर्जदाराने सप्टेंबर 10 मध्ये त्याची मागणी केली होती परंतु ड्रायव्हींग लायसेंन्स गहाळ झाल्यामुळे ते सादर करता आले नाही.असे अर्जदाराचे म्हणणे आहे.मागणी करुनही अर्जदाराने ड्रायव्हींग लायसेंन्स दिले नाही या कारणास्तव गैरअर्जदाराने दिनांक 06/10/2010 च्या पत्राव्दारे ( नि.5/10) अर्जदाराचा क्लेम नामंजूर केला होता.हे पुराव्यातील संबंधीत पत्रामध्ये नमुद केलेले आहे.त्यामुळे क्लेम नाकारण्याच्या बाबतीत गैरअर्जदाराने दिलेले कारण कायदेशिररित्या ग्राह्य धरता येईल काय ? एवढा एकच मुद्दा निर्णयाच्या बाबतीत महत्वाचा आहे. अर्जदाराच्या मोटारसायकलची अपघातात झालेली नुकसानी ही वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेला नसून ती समोरुन भरधाव येणा-या अज्ञात वाहन चालकाने मोटारसायकलला धडक दिल्यामुळे त्याच्या निष्काळजीपणामुळे झालेला होता ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अर्जदाराच्या मोटारसायकलची झालेली नुकसान भरपाई मंजूर करण्याच्या बाबतीत बाईकच्या वाहन चालकाकडे ड्रायव्हींग लायसेंन्स नव्हते अगर अर्जदाराने ते दिले नाही म्हणून क्लेम मुळीच नाकारता येणार नाही.कारण मोटारसायकल चालकाच्या चुकीमुळे अपघात होवुन वाहनाचे नुकसान झाले असते तर गैरअर्जदार विमा कंपनीने क्लेम नामंजूर करण्याच्या बाबतीत घेतलेला निर्णय ग्राह्य धरता आला असता त्यामुळे अर्जदाराचा बेकायदेशिररित्या क्लेम नाकारुन निश्चितपणे गैरअर्जदाराकडून सेवात्रुटी झालेली आहे.असे मंचाचे मत आहे.युक्तिवादाच्या वेळी गैरअर्जदारातर्फे अड.व्यास यांनी (1) रिपोर्टेड केस 2009 (1) सी.सी.सी.पान 401 (सुप्रिम कोर्ट) (2) 2005 ( 1 ) सी.पी.जे. पान 71 (राष्ट्रीय आयोग) (3) 2007 (3) सी.पी.जे.पान 13 (सुप्रिम कोर्ट) आणि (4) 2008 (1) सी.पी.जे.पान 48 (चंदिगढ) व औरंगाबाद सर्किटबेंच राज्य आयोग अपील क्रमांक 2143/99 निकाल तारीख 19/04/2007 चा आधार घेतलेला आहे. वरील सर्व केसेचे बारकाईने अवलोकन केले असता ति-हाईत व्यक्तिला एखाद्या वाहन अपघातात शारिरीक इजा अथवा मृत्यू झाल्यास त्याची नुकसान भरपाई मागताना वाहन चालकाकाडे कायदेशिर ड्रायव्हींग लायसेंन्स नव्हते हा बचाव विमा कंपनीला घेता येणार नाही व तो थर्डपार्टी क्लेमच्या बाबतीत लागु पडत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने तसेच औरंगाबाद व पंचाब राज्य आयोगाने मत व्यक्त केले आहे.वरील रिपोर्टेड केस मधील अ.न. 2 च्या रिपोर्टेड केसमध्ये अपघाताच्यावेळी ड्रायव्हर हा अज्ञान होता या कारणामुळे क्लेम विमा कंपनीने नाकारला होता या बद्दलची ती केस आहे. त्यामुळे वरील तिन्हीही रिपोर्टेड केसेस प्रस्तुत प्रकरणाला लागु पडत नाही. अर्जदारातर्फे अड अंधारे यांनी युक्तिवादाच्या वेळी सादर केलेली रिपोर्टेड कसेस(1) 2009 (3) सी.पी.आर. 306 (राष्ट्रीय आयोग) यामध्ये असे मत व्यक्त केले आहे की, अपघातात क्षती पोहोंचलेल्या वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे जर अपघात झाला नसेलतर नुकसान भरपाई मंजूर करण्याच्या कामी विमा कंपनीने ड्रायव्हींग लायसेंन्सची मागणी करणे योग्य नाही व आवश्यक नाही.तसेच (2) रिपोर्टेड केस 2005 एन.सी.जे. 481 (राष्ट्रीय आयोग) (3) रिपोर्टेड केस 2005 (1) सी.पी.आर.पान 45 (राष्ट्रीय आयोग) या तिन्ही रिपोर्टेड केससमध्ये देखील अ. नं 1 च्या रिपोर्टेड केसमध्ये जे मत व्यक्त केले आहे तेच मत दिलेले आहे. (4) रिपोर्टेड केस 2009 (3) सी.पी.आर.122 मध्ये वाहन चालकाने खाजगी वाहनात अवैध प्रवाशी वाहतुन केली होती अशा संबंधीची ती केस असल्यामुळे प्रस्तुत प्रकरणाला लागु पडत नाही. (5) रिपोर्टेड केस 2005 (1) सी.पी.आर.पान 40 (राष्ट्रीय आयोग) यामध्ये अपघाताच्यावेळी वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडला हे शाबीत करण्याची जबाबदारी विमा कंपनीची आहे असे मत व्यक्त केले आहे.हेच मत राष्ट्रीय आयोगा पुढिल रिव्हीजन पिटीशन 2146/04 निकाल तारीख 01/12/2004 मध्ये अर्जदारातर्फे दाखल केलेल्या निकाल पत्रात दिलेले आहे. अर्जदारातर्फे सादर केलेल्या वरील सर्व रिपोर्टेड केसेस मधील राष्ट्रीय आयोगाने व्यक्त केलेल्या मतांचा विचार करता अर्जदाराचा नुकसान भरपाईचा क्लेम नाकारण्याच्या बाबतीत गैरअर्जदार विमा कंपनीने क्लेम नाकारण्याचे दिलेले कारण चुकीचे असल्यामुळे त्याबाबतीत त्यांच्याकडून निश्चितपणे सेवात्रुटी झालेली आहे.त्यामुळे अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र ठरतो.सबब मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी देवण्यात येत आहे. मुद्दा क्रमांक 2 अर्जदाराने तक्रार अर्जातून वाहनाची नुकसान भरपाई रु. 20,000/- 12 टक्के व्याजासह मागितलेली आहे, परंतु ती मुळीच ग्राह्य धरता येणार नाही.कारण अर्जदाराने दुरुस्तीची बिले विमा कंपनीकडे सादर केल्यानंतर विमा कंपनीकडून नेमलेल्या सर्व्हेअरने स्पेअर पार्टस् च्या किमतीतून नियमाप्रमाणे घसारा वजा करुन नुकसान भरपाईचे अखेरचे मुल्यांकन रु. 8,588/- केलेले आहे.मात्र विमा कंपनी तर्फे सादर केलेल्या लेखी जबाबात नुकसान भरपाई रु.6,921/- एवढीच देय होते असे म्हंटलेले आहे परंतु या संबंधीचा खुलासा युक्तिवादाच्या वेळी केलेला नाही त्यामुळे ते मान्य करता येणार नाही. असेसमेंट रिपोर्ट गैरअर्जदाराने पुराव्यात नि.12/3 ला दाखल केलेला आहे.त्यामध्ये नमुद केले प्रमाणे रु.8,588/- नुकसान भरपाई मिळणेस अर्जदार पात्र ठरतो.मानसिकत्रासापोटी व अर्जाच्या खर्चापोटी तक्रार अर्जातून मागितलेले नुकसान भरपाई देखील अवास्तव असल्यामुळे ती पूर्णपणे मान्य करता येणार नाही,सबब मुद्दा क्रमांक 3 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास नुकसान भरपाई रु.8,588/- क्लेम नाकारल्या तारखेपासून म्हणजेच तारीख 06/10/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह द्यावी. 3 याखेरीज मानसिकत्रास व सेवात्रुटीची नुकसान भरपाई रु. 2,000/- व अर्जाचा खर्च रु.1,000/- आदेश मुदतीत द्यावे. 4 संबंधीतांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |