अर्जदार / तक्रारदार गैरहजर.
गैरअर्जदार / सामनेवाले गैरहजर.
एम. ए. क्र. 56/2018 वर आदेश
द्वारा मा. अध्यक्ष श्री. एम. वाय. मानकर
1. तक्रारदारांनी ही तक्रार सामनेवाले विमा कंपनी विरुध्द त्यांच्या नातेवाईकांचे, जे शेतकरी होते, अपघातामध्ये निधन झाल्यामुळे नुकसानभरपाईकरीता दाखल केली व तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्याने तो क्षमापित करण्याकामी अर्ज सादर केला. गैरअर्जदाराने त्याबाबत सविस्तर जबाब कागदपत्रांसह सादर केला.
2. अर्जदारातर्फे वकील श्री. अंकुश नवघरे व गैरअर्जदारातर्फे वकील श्रीमती वंदना मिश्रा यांना अर्जाबाबत ऐकण्यात आले. अर्जावर आदेश पारीत करताना त्यास वरीलप्रमाणे अनुक्रमांक देण्यात आला.
3. अर्जदारानुसार त्यांना नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त न झाल्याने त्यांनी ही तक्रार दाखल केली. परंतु गैरअर्जदार यांनी जबाबाच्या परिच्छेद क्र. 1 मध्ये नुकसानभरपाईची रक्कम रु 1,00,000/- दि. 09/05/16 रोजी अदा केल्याबाबत स्पष्टपणे नमूद आहे व त्याबाबत त्यांनी कागदपत्रे सादर केली आहेत. त्यावरुन असे दिसून येते की, श्री. संजय आनंद अंभोरे यांच्या मृत्यूबाबत नुकसानभरपाई यापूर्वीच अदा करण्यात आलेली आहे. ही रक्कम दि. 09/05/16 रोजी अदा करण्यात आलेली आहे. ही बाब तक्रारदारांनी मंचापासून दडवून ठेवली. गैरअर्जदाराने जबाब दाखल केल्यानंतर सुध्दा तक्रारदारांनी कोणताही खुलासा मंचासमक्ष सादर केलेला नाही. यावरुन अर्जदार हे मंचासमक्ष स्वच्छ हाताने आलेले नाहीत. त्यामुळे ते विलंब माफीच्या विनंतीला पात्र ठरत नाहीत. आमच्या मते, रक्कम अदा केल्यानंतर ही तक्रारच मंचासमक्ष चालू शकत नाही. सबब, खालील आदेश,
आदेश,
1. एम. ए. क्र 56/2018 हा फेटाळण्यात येतेा.
2. तक्रार क्र. 489/2017 ग्राहक संरक्षण कायदा कलम 24 (अ) प्रमाणे दाखल करुन घेता येत नाही.
3. अर्ज व तक्रार वादसूचीमधून काढून टाकण्यात यावेत.
4. आदेशाच्या प्रती उभयपक्षांना विनामूल्य पाठविण्यात याव्यात.
5. तक्रारीचे अतिरिक्त संच तक्रारदारांना परत करावेत