तक्रारदाराचे वकील - श्री. विकास शिंदे
आदेश - मा. एम.वाय.मानकर, अध्यक्ष, ठिकाणः बांद्रा (पू.)
तक्रार दाखलकामी आदेश
- तक्रारदार यांचे वकील श्री. विकास शिंदे यांना तक्रार दाखलकामी ऐकण्यात आले.
त्यांनी त्यांच्या निवेदनाच्या पृष्ठर्थ मा. जिल्हा मंचाच्या तक्रार क्रमांक 206/2012 चा न्यायनिर्णय दाखल केला.
2. तक्रार व सोबत दाखल केलेले कागदपत्रे पाहण्यात आली. मयत यांचे वारसदारांनी महाराष्ट्र शासनाचे शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत ही तक्रार दाखल केली आहे. पृ.क्र 18 वर असलेल्या क्राईम डिटेल्स मध्ये असे नमूद आहे की, मयताच्या छातीत दुपारी 3.00 वाजता अचानक दुखु लागल्यामूळे, त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले व उपचार चालु असतांना दुपारी 3.30 मिनीटांनी ते मरण पावले. पृ.क्र. 23 वर असलेल्या अकस्मात मृत्युच्या खबरमध्ये सुध्दा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला अशी नोंद आहे. पृ.क्र 25 वर असलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्युचे कारण “The Probable Cause of Death is Cardio Respiratory arrest due to Myocardial infarction” असे नमूद आहे. तेव्हा मयताचा मृत्यु ह्रदयविकाराने झाल्याचे स्पष्ट होते.
3. या विमा योजनेसंबधी असलेल्या मार्गदर्शक सूचनां प्रमाणे प्रपत्र ‘क’ अनूसार नैसर्गिक मृत्यु, बाळंपणातील मृत्यु, शरीराअंतर्गत रक्तस्त्रावामूळे झालेला मृत्यु विमा संरक्षण योजनमध्ये समाविष्ट नाही. या सूचनासोबत प्रपत्र ‘ड’ मध्ये अपघाताचे पुराव्याबाबत सादर करावयाचे कागदपत्राबाबत उल्लेख व रकाना क्र 2 मध्ये अपघाताबाबत माहिती दिलेली आहे. यामध्ये कोणत्याही आजाराची नोंद नाही. त्यामूळे असे म्हणता येईल की, आजार हा अपघात समजण्यात आला नाही. आजाराने झालेला मृत्यु हा नैसर्गिक समजण्यात यावा असा अभिप्रेत दिसतो. अन्यथा सर्व आजाराकरीता ही योजना लागु करावी लागेल.
4. अपघातामध्ये जखमी/मयत व्यक्तीच्या भूमिकेपेक्षा अन्य व्यक्ती, प्राणी, वाहन, वस्तु, स्थिती किंवा शक्तीची भूमिका महत्वाची ठरते. आमच्या मते शेतकरी जनता विमा योजनेअंतर्गत मयताचा मृत्यु अपघाताने झाला आहे किंवा नाही हे महत्वाचे ठरते. ह्रदयविकारानी मृत्यु जरी अचानक होत असला तरी तो अपघात नाही. तो आजाराने झालेला मृत्यु आहे. या कारणास्तव आम्ही मा. जिल्हा मंचाच्या तक्रार क्र. 206/2012 मधील दि. 01/09/2014 च्या निर्णयाशी सहमत नाही.
5. मयत कै. लक्ष्मण गोविंद पाबळे यांचे मृत्यु ह्रदयविकाराने झाल्यामूळे तो अपघात नाही व ही तक्रार शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत चालु शकत नाही. सबब खालील आदेश.
आदेश
- तक्रार क्र 124/2016 ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 (3) प्रमाणे फेटाळण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही.
- आदेशाच्या प्रती उभयपक्षांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.
- npk/-